जानू - 24 in Marathi Love Stories by vidya,s world books and stories Free | जानू - 24

जानू - 24

चार दिवस झाले समीर जानू सोबत बोलला नव्हता..किती तरी मॅसेज करून जानू थकली होती ..आणि त्याचा फोन ही लागत नव्हता..काय करावं हे तिलाच कळत नव्हत..ठीक आहे मी ही बोलत नाही म्हणून तिने त्याला एक रिप्लाय सेंड केला..आणि स्वतःच्या कामाला लागली ...सर्व आवरून ती कॉलेज ला गेली पणं तिचं लक्ष कशातच लागत नव्हत ..का करतोय अस समीर ? काय कमी आहे आपल्या प्रेमात ? काय चुकत आहे माझं ? सारे प्रश्न ती स्वतः ला च विचारत होती..कॉलेज संपून ती घरी गेली ..घरचं वातावरण पाहून तर तिला धक्काच बसला ..स्मशान शांतता होती घरात ..बाबा ही आज बँकेत गेले नव्हते.. आई हळू हळू रडत होती? काय झालं आहे हे तिला कळेना ..तिने हळूच आई ला विचारल काय झालं आहे ..कारण बाबा खूपच रागात दिसले तिला..पणं आई ने काही नाही जा आवरून घे आणि जेवण कर म्हणून सांगितलं..मग तीही जावून कपडे बदलून बाहेर आली च की दरात ..स्नेहा दीं ( जानू ची मोठी बहीण) उभी होती पण तिच्या सोबत एक मुलगा ही होता ..फुलांच्या माळा गळ्यात घातल्या होत्या ..जानू ला कळायला वेळ लागला नाही की दीदी न लग्न केलंय ते ही बाबा न विचारता..ती दारात दिसताच ..जानू च्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता पणं जसे बाबा मोठ्याने ओरडले तस ती भानावर आली..
बाबा : थांब ..घरात पाऊल टाकू नकोस ..पराक्रम करून आलीस आणि आता घरात काय आहे तुझं ?

स्नेहा दीदी : अहो बाबा तुमचा आशीर्वाद घेण्या साठी आलो आहोत ..थोड ऐकुन तर घ्या माझं ..

बाबा : कसला आशीर्वाद ? आणि कोण तू ? लग्न करताना बाबा आठवले नाहीत का तुला ? आता आली आहेस आपल काळ तोंड घेऊन ..चल चालती हो इथून ..या घरात तुझं कोणी नाही ..पुन्हा इथे पाऊल ही ठेवू नकोस ..आम्हाला एकच मुलगी आहे जानू ..
बाबा स्नेहा च काहीच ऐकुन घेत नव्हते व तिला बोलू ही देत नव्हते..तेवढयात जानू पुढे येऊन बाबा शांत व्हा ..दीदी च थोड ऐकुन तर घ्या अस बोलली च की पुढच्या क्षणी तिला तिच्या कानात कोणीतरी ..कडवलेल तेल ओतल आहे अस तिला जाणवू लागलं होत..तिचा हात केव्हाच काना जवळ पोहचला होता..खूप जोरात कळ येत होती कानातून ...थोड्या वेळा साठी आपण बहिरी झालो आहे असच तिला वाटलं ..तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होत ..आईने तिला ओढुन जवळ घेतलं व आत जा म्हणून सांगितलं होत ..आज पहिल्यांदा बाबा नी जानू च्या कानाखाली मारली होती..बाबांचा राग पाहून आणि मिळालेल्या प्रसादा मुळे तर जानू थंडच पडली होती ..स्नेहा चा सर्व राग त्यांनी जानू वर काढला होता..ती शांत पने बाजूला उभी राहून काय होतय ते पाहत होती...स्नेहा आणि तिचा पती ही थोडे घाबरून गेले होते..
जात ना पात ..उठली आणि केलं कोणा सोबत ही लग्न ..अग आपल्या जतीतली मुल मुली होती का ? जे परक्या जातीत जावून लग्न केलस ? माझं नाव मातीत मिसळून आलीस ? लग्न करायचं होत तर सांगायचं होत मला एका पेक्षा एक मूल  शोधली असती आपल्या जातीतली तुझ्या साठी ..आता त्यांनी आपला मोर्चा स्नेहाच्या नवऱ्या कडे वळवला..आणि तू रे ..ती तर मूर्ख आहे ..तुला नाही कळाल का ? घरच्यांनी कशी परवानगी दिली तुला ? काय संस्कार असतील देव जाणे ..आता तुला तर काय म्हणू जेव्हा मीच हरलो ..माझ्याच मुलीने ..माझी मान खाली घातली तर ..चला चालते व्हा दोघे ही ..पुन्हा इथे दिसलात तर चांगलं नाही होणार..आमचा तुमच्या शी काहीच संबंध नाही...दोघंही ही आले तसे ..घरात पाऊल ही न ठेवता ..दारातूनच निघून गेले..आई तर बाबा न पुढे कधी काही बोलतच नव्हती ..जानू ने बोलायचा प्रयत्न करून आपला कान सुजवून घेतला होता..ती तशीच न जेवता च ..रूम मध्ये जावून झोपी गेली ..जेव्हा जाग आली तेव्हा ही घरात टाचणी पडली तरी ऐकू येईल इतकी शांतता होती..अचानक जानू च्या मनात एक विचार आला आणि सरकन तिच्या अंगावर काटा उभा राहिला..बाबा ना समीर बद्दल कळलं तर ? तो ही आपल्या जातीचा नाही..बापरे...कधी विचारच केला नव्हता...जानू ला रडू आवरेना ..समीर चा विचार आला तसा तिने आपला मोबाईल पाहिलं ..समीर ने ..४.५.. तासा पूर्वी मॅसेज केला होता ..पणं जानू ने पहिलाच नव्हत ..पटकन तिने रिप्लाय दिला..

जानू : हॅलो .

समीर : काय ग तुझं हे रोजच रुसण ? थोडा वेळ नाही बोलणं झाल की लगेच रुसण .. रडणं ..मला नाही सहन होत हे आता..त्यापेक्षा ..तू तुझ्या वाटेने जा आणि मी माझ्या ..या पुढे तुझ्या सोबत बोलणं माझ्याने होणार नाही..झालं गेलं विसरून जा..तू तुझी लाईफ जग मी माझी जगतो.

जानू वर पडलेला हा सर्वात मोठा बॉम्ब होता..सकाळी जे घडल ते ती विसरून ही गेली थोड्या वेळा साठी..१० वेळा तिने समीर चा मॅसेज वाचला ..तरी जस तिला काहीच कळत नाही अस तिला वाटू लागलं..आपल्याला वाचता येत ना ? हे ती स्वतः ला च विचारत होती..

               क्रमशः


Rate & Review

uttam parit

uttam parit 3 months ago

Vaishali Kamble

Vaishali Kamble 3 months ago

Mansi Gaikwad

Mansi Gaikwad 3 months ago

I M

I M 3 months ago

Pooja

Pooja 3 months ago