जानू - 28 in Marathi Love Stories by vidya,s world books and stories Free | जानू - 28

जानू - 28

प्रेम वेड्या जानू ची आता heartless जानू झाली होती..जानू चा स्वभाव आता पूर्ण पने बदलला होता..खूप चीड चीड..करत असे ती..राग तर जणू नेहमी तिच्या सोबत फिरे..कधी खळखळून हसन नाही की कधी मनमोकळ्या गप्पा नाही..जे तिला नव्याने ओळखू लागले होते ते तिला heartless आणि गर्विष्ठ समजायचे पण जानू ला मात्र काहीच फरक पडत नसे..तिने स्वतः ला खूप बिझी करून घेतलं होतं..शेवटची सेमीस्टर जवळ आली होती..जानू ने अभ्यासा ला च सर्व काही बनवलं होतं आता...वाचन करता करता कधी कधी..समीर चा चेहरा त्या अक्षारांन मधून तिला दिसायचा ..नकळत डोळे ओले करून जायचा..पणं बस ..जानू लगेच...स्वतः ला सावरून पुन्हा अभ्यासाला लागायची..कॉलेज पूर्ण झालं ...जानू फर्स्ट क्लास ने पास झाली ..पणं आता तिला भीती वाटत होती की कॉलेज संपलं आणि आपल्या कडे वेळ शिल्लक राहिला तर पुन्हा आपल्या जखमा ताज्या होऊन आपल जगणं असह्य करतील ...म्हणून तिने कॉलेज संपत असतानाच जॉब शोधायला सुरुवात केली होती..आणि सुदैवाने जानू ला जॉब मिळाला होता..आता ती फक्त आपल्या कामात लक्ष घालत असे ...ऑफिस मध्ये ही कोणाशी जास्त बोल ..मैत्री कर असले प्रकार तिने कधी केले नाहीत ..त्यामुळे सर्वजण तिला गर्विष्ठ समजायचे..पणं आपल्या कामात ती एकदम तरबेज झाली होती ..तिचं तिच्या कामा मुळे बरच कौतुक होवू लागलं होत.

ऑफिस ला जायला ..आज थोडा उशीर झाला होता गडबडीत ..जानू ने केसांची स्टाईल केली ..पणं जेव्हा तिने आरशात पाहिलं तिला स्वतः चा च राग आला ..नकळत तिच्या केसांची तिचं स्टाईल झाली होती जी समीर ला आवडत होती..तिने आपले केस पूर्ण विस्कटले ..आणि आपला चेहरा हातानी लपवून रडू लागली..का का का ? तो समीर तर मला केव्हाच विसरून गेला आणि मी का मूर्ख पना करत आहे ? का त्याची आठवण काढते? आजचा पूर्ण दिवस जानू उदास होती....

अभय ला विसरला तर नाहीत ना ? विसरू ही नका ही स्टोरी तर त्याची च आहे ..आता पर्यंत आपण पाहिलं जानू च्या लाईफ मध्ये काय चालू होत ..आता या पुढे पाहू .. अभय राजेंच काय चालू होत...

प्रधान काकांचा नंबर जसा लागणे बंद झालं ..आणि अभय ला कळलं की त्यांचा नंबर बदलला आहे ..तो पुन्हा उदास झाला.. .कोणी तरी सांगितलं होत की जानू नाशिक मध्ये आहे तो ४.५ वेळा नाशिक फिरून आला होता एकदा जानू दिसेल या आशेने पणं इतक्या मोठ्या शहरात त्याला जानू कशी भेटेल ?किती ही मनातून काढलं तरी जानू त्याच्या मनातून आणि डोक्यातून ही जात नव्हती..एक ना एक दिवस जानू आणि आपली भेट होईल ..आणि नक्की होईल अस त्याने स्वतः ला च बजावलं होतं ..आणि तसा त्याचा विश्वास ही होता..एक दिवस नक्की आपण जानू ला भेटू ..जानू सोबत बोलू...जानू ला त्याने एका क्षणा साठी सुद्धा स्वतः पासून वेगळं केलं नव्हत .. अभय च ही कॉलेज पूर्ण होऊन ..त्याला ही जॉब लागला होता..दिवस भर तर त्याचा कामात जायचा पणं घरी आल्यावर अजून ही तो जानू राहत असलेल्या घरा कडे पाहत असे..आता तिथे दुसरे कोणी तरी राहायला आले होते ..पणं तरी ही अभय ..जानू ला तिथे आपले डोळे बंद करून अनुभवायचा..आकाश जेव्हा जेव्हा त्याला भेटायचा.. अभय नेहमी त्याला बोलायचा की एक ना एक दिवस जानू मला पुन्हा भेटेल..पणं मनातून तो ही थोडा खचला होता..अलीकडे तर जानू त्याला खूपच आठवू लागली होती..त्यातच त्याला जयपूर हुन जॉब ऑफर आली पण घरचे त्याला नको बोलत होते..इतक्या लांब कशाला ? त्यांचा एकुलता एक मुलगा होता अभय ..नको तो जॉब म्हणून त्यांनी त्याला समजावलं ही पणं आता खरच अभय ला वाटू लागलं होतं की जानू चा तर कुठेच पत्ता नाही ..आणि इथे राहिलो तर एक क्षण सुद्धा तिच्या आठवणी आपली पाठ सोडत नाहीत..आपण थोड दूर गेलो तर निदान जानू च्या आठवणी कमी तरी होतील ..त्यामुळे त्याने घरच्यान चा विरोध पत्करून जयपूर ला जान फिक्स केलं ..

जयपूर राजस्थानची राजधानी ..गुलाबी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहराच्या रंगा मागे ही एक कथा आहे.. प्रिन्स अल्बर्ट च्या स्वागता साठी राजा सवाई रामसिंग  दुसरे यांनी शहरातील सर्व वास्तू टेरा कोटा गुलाबी रंगात रंगवून घेतल्या होत्या ..प्रिन्स अल्बर्ट भेटी नंतर ही जयपूर शहराला फक्त गुलाबी रंगात च ठेवण्याचा सल्ला राणीने राजाला दिला होता..त्यामुळे आज ही जयपूर गुलाबी शहर म्हणूनच ओळखले जाते..अशा या गुलाबी शहरात आपला अभय येऊन पोहचला..जानू च्या आठवणीने ..जीवाची होणारी तगमग दूर करण्यासाठी..पणं या गुलाबी शहरात ही त्याचं मन रमलं नाही ...तो आपल काम पूर्ण निष्ठेने करायचा ..सुट्टीच्या दिवशी जयपूर मधील प्रसिद्ध ठिकाणी फिरायला जात असे..अभय मनाचा राजा होता जो त्याच्या संगतीत राही ..तो त्याला आपलस करून टाकत असे त्यामुळे त्यांची मित्र मंडळी मोठ्या प्रमाणात होती..त्यात त्याला सवय च होती की कोणी अडचणीत असल की अभय पहिला त्याच्या मदतीला धावत असे...पणं त्याचं मन मात्र जानू त अडकल होत ..जयपूर ला येऊन ..शांतता भेटेल अस त्याला वाटलं होत पणं झालं उलट च ..इथे आल्या पासून त्याला जानू ची जास्तच आठवण येऊ लागली..
पाऊस सुरू होता अभय ..आपल्या रूमच्य खिडकीतून बाहेर पाहत उभा होता....आज पुन्हा त्याला जानू ची खूप आठवण येत होती...

रिमझिम बारिश की बूँदो में
तेरा ही अहसास हैं
भिगी मिटटी सी खुशबू तेरी
महकाती मेरी सास हैं
हर पल हर लम्हा मुझं को बस तेरा इतजार हैं...

i miss you jaanu.....

क्रमशः


Rate & Review

V

V 3 months ago

पुढची स्टोरी च काय झाल ती कधी येणार

uttam parit

uttam parit 3 months ago

I M

I M 3 months ago

Vaishali Kamble

Vaishali Kamble 3 months ago