Janu - 33 in Marathi Love Stories by vidya,s world books and stories PDF | जानू - 33

जानू - 33

अभय आज इतका खुश होता ना की त्या नादात आपण आकाश ला फोन केला नाही हे ही तो विसरला..का कोणास ठाऊक आज ऑफिस मध्ये अभय ला खूप काम होत..तरी ही त्याने जानू चा पुन्हा मॅसेज आला आहे का हे पाहण्यासाठी किती तरी वेळा मोबाईल चेक केला होता..पणं नाही एक ही मॅसेज नव्हता..पणं सकाळी झालेलं बोलणंच त्याने पुन्हा पुन्हा वाचून काढलं होत..गडबडीत ही अभय नी आकाश ला फोन लावला..

अभय: आकु my jaan ..thanku very much...

आकाश: सकाळी खून करतो म्हणत होतास आणि आता एकदम जान वा अभ्या भारी आहेस ?बोललेली दिसतेय जान्हवी ..

अभय: सकाळ साठी सॉरी रे ..मला खर वाटलं नव्हतं..हो बोलली जानू .

आकाश : इतकाच विश्वास का मित्रा वर ?

अभय: आता बोललो की सॉरी का पाय धरू तुझे ?

आकाश : पाय नको पणं पार्टी द्यायची आहे विसरू नकोस.. बर ते जावू दे ..जान्हवी काय बोलली ? सांगितलंस का तिला तुझ्या फिलिंग बद्दल?

अभय: हो पार्टी तर देऊ....अरे जानू मला बेस्ट फ्रेन्ड म्हणाली आणि तिने मला लगेच ओळखलं ही..

आकाश : बेस्ट फ्रेन्ड ? अरे वा मग सांगितलं स की नाही तिला ?

अभय : तू काय माझी लव्ह स्टोरी सुरू हो न्या आधी संपवायचा विचार करत आहेस का ?

आकाश: म्हणजे..?

अभय: अरे आज तर ती बोलली आहे..आणि एकदम प्रेमाचं सांगितलं की डायरेक्ट ब्लॉक करून टाकेल मला ती..आधीच लहान पणी चीड चीड करायची थोडी..आता थोडी ठीक बोलली आहे..

आकाश: होय बरोबर आहे तुझं ..पणं लवकर सांग तिला..

अभय: होय बर चल अरे आजच कुठून काम आल आहे काय माहित इतकं..बोलू नंतर..

आकाश: हो बर..पणं पार्टी विसरू नको..

अभय: होय रे बाबा जानू साठी एक पार्टी काय ..१० पार्टी देईन तुला..

आकाश: हे हुयी ना बात ..बर कर काम.

अभय सर्व काम आवरून घरी येतो ..जानू चा मॅसेज येईल म्हणून वाट पाहतो ..पणं मॅसेज काही येत नाही मग तोच मॅसेज करतो.

अभय: हॅलो..

थोड्या वेळाने रिप्लाय येतो..

जानू : बोल..

अभय: अवराल का काम ?

जानू : हो आताच ..ऑफिस मधून येऊन थोडी आई ला मदत केली ..आणि आताच बसले होते ..तो पर्यंत तुझा मॅसेज आला..तुझं काय चाललंय ?

अभय: मी ही ऑफिस मधून येऊन बसलो आहे आज काम खूप होत ऑफिस मध्ये..घरचे कसे आहेत ग ?

जानू : ठीक आहेत सर्व जण..आणि तुझ्या ?

अभय: माझ्या ही ठीक आहेत..बाबा कसे आहेत ग तुझे ..मी खूपच शिव्या खाल्या त्यांच्या..

जानू : हो आहेत ठीक ..ये पणं तू कधी शिव्या खा लास ?

अभय: तू इथून गेल्यावर तुझ्या बाबा न च्या मोबाईल वर मी फोन करायचो..पणं त्यांचा आवाज ऐकुन घाबरून काही बोललो च नाही.

जानू ला मग बाबां न च्या फोन वर येणारे ते कॉल्स आठवतात..आणि तिला हसू ही येत..

जानू : म्हणजे तो तू होतास ? अरे रे..रे..

अभय: हो तुझी खूप आठवण यायची ना..म्हणून आवाज ऐकावा म्हणून करायचो फोन पणं नंतर फोन लावला पण लागत नव्हता.

जानू : हो बाबा न चा तो नंबर बंद झाला म्हणून त्यांनी नवीन घेतला होता..पणं तू खरच वेडा आहेस रे ?

अभय ला खूप बोलावंसं वाटलं ..हो जानू मी आहे वेडा फक्त तुझ्या साठी ..तुझच वेड आहे मला पणं अस बोललं तर जानू रागवेल अस वाटून त्याने बोलणं टाळलं..

अभय: तुला एक स्टोरी सांगू ?

जानू : स्टोरी ? बर सांग..

अभय: एक परी होती..ती होती ना तेव्हा जग खूप सुंदर वाटायचं..सर्व बाजूला फक्त आनंद आहे अस वाटत होत..मी खूप खुश होतो परी माझ्या जवळ होती म्हणून..पणं अचानक परी माझ्या पासून दूर गेली सर्व असून ही नसल्या सारखं झाल..जगण्याला ही अर्थ नाही अस वाटू लागलं..मी खूप उदास झालो होतो..परी गेली त्यानंतर तर मी कधी मनापासून खुश झालोच नाही..पणं आता ती परी परत माझ्या आयुष्यात आली आहे आणि मी खूप खूष आहे ..शब्दात सांगता येत नाही मला..मी किती खुश आहे ते..आणि ती परी तु आहेस जानू..

जानू : छान आहे स्टोरी ..पणं काही तरीच काय ? मी काय परी बिरी नाही ..मी एक साधी सरळ मुलगी आहे.

जानू ला अभय आपल्याला इतकं जवळच समजतो हे ऐकुन खूप आश्चर्य वाटत होत...पणं तो आहेच स्वभावाने सर्वांना आपलंसं करणारा सर्वांना आपल मानणारा म्हणून तिला काही जास्त विशेष वाटलं नाही.

अभय: इतरान साठी नसलीस तरी माझ्या साठी तू परीच आहेस ..बर तो डी पी चा फोटो तुझाच आहे ना ?

जानू : अरे ती डॉल आहे ..मी नाही..

अभय: आता इतकी वर्ष झाली मी तुला पाहिलं नाही ना म्हणून वाटलं तूच आहेस ..एक फोटो तर पाठव पाहू दे कशी दिसतेस ?

जानू अभय ला एक फोटो पाठवते.. अभय तर फोटो पाहून जाम खुश होतो..

अभय: छान ..किती सुंदर..अजून २.३ पाठव ना..

जानू : अरे एक पाठवला काय आणि २ काय दिसणार मी दोन्हीत पणं सारखीच ना ?

अभय: अग पाठव ना ..

जानू मग अजून २.३फोटो पाठवते.. अभय त्या फोटो मध्ये गुंतून जातो..

अभय: बघ मी म्हटलं होत ना ती डॉल आणि तू सेम दिसता..तू तुझा आणि डॉल चा फोटो मॅच करून तर बघ..

जानू खरंच त्याने सांगितलं तस फोटो पहाते मॅच करून..आणि तिला स्वतः वरच हसू येत ..हा तर वेडा आहे आणि आपण पणं हा सांगेल ते करू लागलो.

जानू : ये तू खरच वेडा आहेस..

अभय च मन पुन्हा म्हणाल हो फक्त तुझ्या साठीच तर वेडा आहे..

अभय: मला तर दोघी सेम च वाटता..पणं तू अजून हि तशीच दिसतेस..जशी पूर्वी दिसायचीस ..सुंदर..वाटत च नाही मी इतक्या वर्षांनी तुला पाहिलं.

जानू : थँक्यु बाबा..बर मी झोपते सकाळी उठून आणि ऑफिस ला जायचं आहे.

अभय : ऑफिस ला तर मला ही जायचं आहे पणं बोल ना थोडा वेळ ..

जानू : नको .. जागले की डोक दुखत माझं..

अभय: बर ठीक आहे ..झोप तू .

जानू : ok gn

जानू तर झोपते पणं अभय ला कुठली झोप? अख्खी रात्र तो फक्त जानू चा फोटो पाहत होता..किती तरसाला होता तो हा चेहरा पाहायला मग झोप येणार कशी त्याला ? डोळे भरून जे पाहायचं होत त्याला जानू ला..त्याने आपल्या व्हॉट स अप ला एक स्टेटस ठेवलं..

मे देखु तेरी फोटो
सौ सौ बार कुडे
के उठते तुफान सिने वीच
सौ सौ बार कूडे..
तू सपने मे आ ही जाती हैं
तू निंदे उडा ही जाती हैं..
मिल एक बार कू डे..
मे दे ..खू..तेरी फोटो
सौ सौ बार ..

अभय ला वाटत जणू हे गाणं फक्त त्याच्या साठीच बनवलं आहे..त्याच्या खऱ्या भावना त्या गाण्यात जे होत्या.. पहाटे केव्हा तरी त्याला झोप लागली.

क्रमशः..


Rate & Review

Swati Jagtap

Swati Jagtap 8 months ago

Shashank Ghadage

Shashank Ghadage 8 months ago

uttam parit

uttam parit 8 months ago

Prakash Gonji

Prakash Gonji 8 months ago

Vaishali Kamble

Vaishali Kamble 8 months ago