जानू - 39 in Marathi Love Stories by vidya,s world books and stories Free | जानू - 39

जानू - 39

जानू आता पहिल्या सारखी मन मोकळे पणाने अभय सोबत बोलत नव्हती ... अभय ला खूप वाईट वाटत होत तरी त्याने तिला समजून घेतलं..जानू चिडत असे भांडत असे त्याच्या सोबत पणं तो शांत पने सर्व सहन करी..तिचा कधी रागच येत नसे अभय ला आणि याच त्याच्या चांगुल पना मुळे , स्वभावा मुळे जानू परत पहिल्या सारखी अभय सोबत बोलू लागली..आज सुट्टी होती .. अभय नी सध्याकाळी जानू ला मॅसेज केला..

अभय: हॅलो,काय करत आहेस ?

जानू : काही नाही .. बसलेय..आज काय सुट्टी होती  त्यामुळे निवांत होते..बोल..

अभय: आज तुला खूप मिस केलं..

जानू : का? आज काय आहे ?

अभय: विसरलीस ? नवरात्र सुरू होणार आहे ..आज चाळीत कार्यक्रम चालू झाले..तू आणि मी फुलांच्या माळा बनवल्या होत्या..

जानू : हा ..अरे हो रे..किती छान होते ते दिवस..

अभय: खूप छान होते..तुला माहितीये ..आज ही फुलांच्या माळा मीच बनवतो...तुझ्या आठवणीत..मिहिर अजून हि मला माळा बनवताना चिडवतो..काय दीदी ची आठवण येते का म्हणून ..

जानू : काही पणं सांगतो ...किती वर्ष झाली..कोणी आठवण ही काढत नसतील माझी..

अभय: काही पणं कुठे ? खर तेच सांगत आहे..तू विसरली असशील ..पणं आम्ही तुझी आज ही आठवण काढतो..

जानू : मला ही आठवत. ..मी कुठे विसरली आहे ?

मग ते चाळीच्या दिवसाच्या बऱ्याच गप्पा मरतात..शिडी वरून पडल्याचा प्रसंग जानू ला आठवतो..

जानू : आणि तू लाईट लावताना शिडी वरून पडला होतास ? लक्ष कुठे होत तुझं?

अभय: तुझ्या कडेच की..तू समोर असलीस की बाकीचं काहीच दिसत नाही मला..तुलाच पाहताना मी  पडलो होतो..

जानू : झालं.. आल सगळं फिरून माझ्या वर..तुझ्या आयुष्यात सगळं माझ्या मुळेच होत वाटत..

अभय: हो ..आता तुला नाही पटत तर काय बोलू ? बर तुला संक्रांत अठवते का ग ?

जानू : हो ..तू घरी आला होतास तेव्हा आणि बाबा ना घाबरून बाहेरूनच जात होतास..

अभय: ..तुला च द्यायला आलो होतो..बाबा होते मग काय करणार..ये पणं तुला आठवते का ? तिळ गुळ देताना तू माझ्या पाया पडली होतीस..

जानू : ये बस हा..काही पणं खोटं बोलू नकोस..मला आठवत ..मी तिळगुळ दिलं होत तुला बाहेर येऊन ..पणं मी काही तुझ्या पाया वगेरे पडले नव्हते..आणि मी का पडेन पाया ? तू माझ्या एवढाच होतास..

अभय: मी खोटं नाही बोलत तुला नसेल आठवत..पणं मला सर्व आठवत..तू पडली होतीस.

या गोष्टी वर बरेच वाद होतात दोघात ..जानू नाही म्हणत होती आणि अभय ही आपल्या बोलण्यावर ठाम होता..

जानू : बर तुझच खर..मला नाही आठवत...या वेळेस भेटले ना तू पड माझ्या पाया म्हणजे फिटा फि ट..होईल..

अभय: हो पडतो ना..पणं भेट तर आधी..जानू ये ना इकडे ..नवरात्र ही सुरू आहे.. प्लीज..

जानू : नाही रे अभय..बाबा साध .. बाजारा मध्ये ही जावू देत नाहीत ..मग इतक्या लांब कसं पाठवतील ? आणि तस ही तिथे आमचं कोणीच नाही रे..मी कसं येणार ?

अभय: कोणीच कसं नाही ?आम्ही आहे ना..आमच्या कडे ये ..परक का समजतेस ?

जानू : तुझ्या घरा सारखं वातावरण नाही रे माझ्या घरी..तुझ्या घरचे सर्वांना आपल समजतात..पणं माझे बाबा नाहीत रे तसे..मी नाही येऊ शकत.

अभय: विचारून तर बघ ना..

जानू : माझे बाबा आहेत ते मला माहित आहेत ते कसे आहेत ?

अभय: मी येऊ का नाशिक ला ?

जानू : झालं का चालू तुझं ?

अभय: अग किती वर्ष झाली तुला पाहून ..खूप मिस करतोय तुला...कधी भेटेन अस झाल आहे तुला..तुझं हसणं नुसता फोटोत नाही तर समोर पाहायचं आहे मला..

जानू : अभय तू ड्रिंक करतोस का रे ?

अभय: घ्या ..म्हणजे आता तुला मी बेवडा पणं वाटतो का ?

जानू : नाही..पणं..

अभय: मग तुला का वाटलं मी ड्रिंक करत असेन अस ?

जानू : बोलतच आहेस तू तस् बेहकल्या सारखं..

अभय: आता खर सांगितलं तर तुला पटत च नाही यार... जो बेहका पेहलेसे ही तेरे इश्क में क्या उसे बेहकाना ओ जालीमा ओ जालीमा..

जानू : म्हणजे मी जालीमा ?

अभय: नाही ग..तू तर परी आहेस माझी..परी .. बर ऐक ना ..फोटो पाठव ना किती दिवस झाले तू फोटो नाही पाठवलेस?

जानू : नाहीत माझ्या कडे फोटो..

अभय: किती खोटं बोल व माणसाने..तूच तर बोलली होतीस ..२०० फोटो आहेत तुझ्या मोबाईल मध्ये..

जानू : मी कधी बोलल होत ?

अभय मग त्यांच्या बोलण्याचा स्क्रीन शॉ ट ..तिला सेंड करतो त्यात तिने २०० फोटो आहेत म्हटलं होत..आता बीचारीची फजिती झाली ..खोटं बोलली ना ती ..

जानू : पणं मी नाही देत ...काय करणार इतके फोटो घेऊन ?

अभय: सांगितलं ना अल्बम बनवणार आहे..

जानू : ये पणं तू माझं नाव काय सेव केलं आहेस तुझ्या फोन मध्ये ? स्वीट लव्ह ?

अभय: का ? तुला आवडल नाही का ? नाही चालत का तुला ?

जानू : तुझी मर्जी आता तू कशी पणं बोल ..स्वीट लव्ह बोल..नाही.. तर ..मीठ लव्ह बोल..नाही.. तर..गोड.. लव्ह..बोल..माझं काय जात..

अभय ला तिचं बोलणं ऐकून हसू येत ..

अभय: बर पाठव ना फोटो.. प्लीज..

जानू: नाही..मी नाही पाठवत..

अभय: अग पाठव ना..किती तडपवतेस?

परत त्यांचा फोटो वरून वाद होतो..शेवटी अभ् य..जिंकतो..वादात आणि जानू फोटो पाठवते.. अभय खुश होऊन फोटो पाहत बसतो..

क्रमशः..


Rate & Review

uttam parit

uttam parit 2 months ago

Vaishali Kamble

Vaishali Kamble 2 months ago

Prakash Gonji

Prakash Gonji 2 months ago

I M

I M 2 months ago

Pooja

Pooja 2 months ago