An experience ....... a lesson in Marathi Short Stories by prajakta panari books and stories PDF | एक अनुभव....... धडा देणारा

एक अनुभव....... धडा देणारा

आम्ही गेल्या शनिवारी बाजार करून येत होतो तस मी कधी जात नाही पण मम्मी आलेली म्हणून तिच्यासोबत गेलेले. तेव्हा एक ट्रॅक्सवाला थांबला होता. आम्ही त्या ट्रॅक्स मध्ये बसलो तेव्हा एक चार सिटा भरलेल्या थोडा वेळ थांबाव लागल नंतर आणखी काही लोक आली ती पण चढली पण टॅक्स वाला पुढे जायला तयार होईना आणखी दोन येवू दे थोड्या लांब असलेल्या गावच्या मग जावूया अस करत करत त्याने खूप वेळ घालवला नंतर आणखी काही लोक आली पण तरीही तो जाईना लोक कंटाळत तर होती पण तो काही जाईना झाल अस कि त्या ट्रॅक्स मध्ये चढलेले थोडेच पॅसेंजर लांब च्या गावचे होते आणि बाकिचे जवळपासच्या गावातले होते ट्रॅक्सवाला थांबला त्याला म्हणावे त्या गावचे पॅसेंजर मिळेनात मग काय तो वाट बघत बसला तोपर्यंत एक पाच मिनिटात एक बस आली आणि त्या ट्रॅक्स मध्ये बसलेले सगळे पॅसेंजर उठून बसमध्ये गेले नंतर आम्ही पण गेलो खरतर आमच्या मम्मीला त्या ट्रॅक्स मध्ये बसायचेच नव्हते त्या ट्रॅक्स वाल्याने गेल्यावेळी जवळच्या गावातले म्हणून घेतले नव्हते खरतर मला तिच ऐकून एक दिवस आठवला जेव्हा बसचा संप नव्हता तेव्हा हे ट्रॅक्स वाले ट्रॅक्स मध्ये याव म्हणून बसला यायला अजून वेळ आहे अस म्हणत म्हणत कसे बसवायचे आणि बस नसताना मात्र जवळच्या गावातल्या लोकांना घ्यायला किती आढेवेढे घ्यायचे कसे असतात ना लोक मतलबा पुरत जवळ येतात आणि नंतर मात्र जवळ करत नाहीत यावरून परत अनुभव घेतला कि जगात कोणीच कोणाच नसत आपल्यासाठी शेवटपर्यंत आपणच असतो. असो पण मम्मीच्या मनात तेव्हाचा तो राग अजून होता यातून मला मात्र एक गोष्ट शिकायला मिळाली कधी कधी आपण एका मोठ्या गोष्टींसाठी अडून राहतो पण मिळालेल्या संधी गमावून बसतो जस त्या ट्रॅक्स वाल्याला आणखी दोन पॅसेंजर हवे होते म्हणून त्याने मिळालेली संधी घालवली. खर तर अशा घटना आपल्या आयुष्यात पण बरेचदा येतात. बघा ना कधी कधी आपण पेमेंट कमी मिळेल आपल इतक शिक्षण झालय त्यामानान नोकरी मिळेना किंवा व्यवसाय करताना कमी उत्पादन मिळत आहे म्हणून सोडून देतो आणि काही गोष्टी हातच्या गमावून बसतो एका गोष्टीसाठी अडून राहून आणि नंतर वाटत कि अरेरे उगाचच हातची संधी सोडली त्यातून काहीतरी मिळाल असत ना भलेही आज कमी पगाराची नोकरी मिळेल पण त्यातून जो अनुभव मिळेल त्यातून भविष्यात तरी चांगली संधी नोकरी मिळेल आज नफा कमी आहे पण हळूहळू व्यवसाय डेव्हलप होत जाईल व एक दिवस असा येईल की खूप चांगला नफा मिळेल.
तसच काही वेळेला आपण आज या व्यक्तीकडून जास्त काही मिळत नाही म्हणून त्याला कसही बोलतो पण हे विसरून जातो कि आयुष्यात कधी काय होईल हे सांगता येत नाही व कधी ती व्यक्ती आपल्या गरजेला येईल ते सांगता येत नाही.
आणखी एकदा असच झालेले एकदा दुसरा एक ट्रॅक्स वाला बस येईल म्हणून मिळेल त्या शिटा घेवून गेला त्याने मिळालेली संधी जावू दिली नाही हातची कदाचित याच गोष्टीमुळे काही लोक आयुष्यात पुढे जातात आपली प्रगती करतात आणि यश खेचून आणतात तर काही लोक छोट्या छोट्या गोष्टींसाठी आयुष्यात येणाऱ्या संधी गमावून बसतो. आणि तरीही भुतकाळात डोकावून त्या गोष्टीचा अभ्यास न करता आलेल्या अपयशाबद्दल इतरांना दोष देत राहतो. पण एक मात्र खरे आहे आपण स्वतः हाचा अभ्यास करत नाही तोपर्यंत स्वतः:हात चांगले बदल घडवून आणू शकत नाही.
हा छोटासा अनुभव मिळाला जो मी फर्स्ट टाइम लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. काही चूका असतील अवश्य सांगा तसच चांगले वाटले तरीही सांगा.
चुका या सुधारणेसाठी मार्गदर्शन करतात आणि कौतुक हे पुढे जायला प्रोत्साहन देते.

Rate & Review

Vaishali C Thakur
मच्छिंद्र माळी

खरोखरच अतिशय जीवनात धडा शिकविणारा प्रसंग फार कलात्मक पध्दतीने छान प्रकारे चित्रित केला आहे. छान. मच्छिंद्र माळी औरंगाबाद . 8830068030

Aniruddha

Aniruddha 3 months ago

Basavraj Madivale

Basavraj Madivale 3 months ago