Raabta - 2 PDF free in Love Stories in Marathi

राबता - अ क्रेझी लव्ह... - 2

युग आणि अन्वी घरात येतात तर समोर बघून आश्चर्यचकित होतात सोबत चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो.....

कारण समोर त्या दोघांचे मित्र होते नेत्रा , अनाया , वेद आणि सोहम....

नेत्रा , सोहम आणि अनाया , वेद ह्या दोन जोडी नवरा बायको आहेत....

युग आणि अन्वी च लग्न झालं तस या चौघांनी पण नंतर लग्न केल....
युग , अन्वी आणि नेत्रा , सोहम यांचं एक बिसनेस होता...
त्याबरोबर वेद आणि अनाया हे डॉक्टर होते , या दोघांनी खूप मेहतीने एक वी.ए नावाच हॉस्पिटल उभ केल आणि तेही टॉप मध्ये आलेल....
या सहा जणांची ओळख बारावी नंतर फर्स्ट इअर ला झाली होती....

युग आणि अन्वी ला बघून हे चौघ ओरडतात " सरप्राइज...."

या चौघांच्या आवाजाने हे दोघं भानावर येतात....

युग " यार काय सरप्राइज आहे , पण नेत्रा , सोहम तुम्ही बंगलोर आणि अनाया , वेद तुम्ही दुबई ला जाणार होता ना ?.... मग अस इथे अचानक...."

सोहम " ओ मिस्टर युग इथे मज्जा मस्ती करायचं सोडून काय हे घेऊन बसला आहेस...."

सोहम च बोलण ऐकून युग त्याला डोळे मोठे करून थोड मोठ्या आवाजात " सोहम सांगतोस की नाही...."

सोहम " ( अन्वी कडे बघत...) वहिनी...."

अन्वी युग ला दटावत " युग काय बोलतोय , शोभत का तुला..."

युग " ( सोहम कडे बघत....) हे वहिनी चा चमचा नीट बोलतो की नाही , देऊ का ( आपल्या हाताच्या मुठी दाखवत...) दोन ठेवून...."

युग च्या बोलण्याने सोहम केविलवाण्या नजरेने अन्वी कडे बघत होता....

आणि बाकीचे यांची नोकझोक बघत होते आरामात बसून....

अन्वी थोड्या मोठ्या आवाजात युग ला " युग...."

युग तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत सोहम ला रुक्ष अवजांत त्याच्या कडे जात " सोहम बोलणार आहेस की नाही...."

युग त्याच्या कडे येतोय बघून सोहम पटकन बोलतो " ओके ओके सांगतो , तू तिथेच उभा राहा...."

कारण सोहम ला माहीत आहे त्याचे हात एकदम जबरदस्त लागतात ते , म्हणून तो त्याला तिथेच थांबायला सांगतो.....

युग थांबत " ठीक आहे , सांग आता पटकन...."

सोहम " हा , नेत्रा आणि माझी जी मीटिंग होती ती तीन दिवसानंतर धकलण्यात आली..... योगायोग म्हणजे वेद आणि अनाया ची मीटिंग पण त्याच दिवशी आहे( हॉस्पिटल मध्ये काही नवीन वस्तू ॲंड करायच होत , म्हणून ते स्वतः चेक करण्यासाठी तिथे जाणार होते , म्हणजे नंतर काही अडचण येऊ नये..) , त्यामुळे आता टाईम होत तर आम्ही चौघांनी डिसाईड केलं की हे दोन दिवस मस्त मज्जा मस्ती करू सो तुम्हा दोघांना न सांगता इथे आलो सरप्राइज म्हणून...."

युग " आणि ही मस्ती मज्जा करण्याची आयडिया पण तुझीच असेल हो ना...."

सोहम हृदयावर हात ठेवून युग ला " हाय मेरे भाई सही पेहचाना.... कही तुम्हे मुझसे प्यार तो नहीं हुआ...."

सोहमचा अश्या वाक्यावर युग सोडून बाकी सगळे खळखळून हसू लागले....

युग आठ्या पाडत सोहम " व्हॉट , तुझी ही नौटंकी ना कधी संपणार नाही.... सुधर रे जरा लग्न झालं आहे तुझ...."

सोहम " जर बायको झेलायला आहे तर सुधारण्याची काय गरज...."

सोहम च्या अश्या बोलण्याने नेत्रा खाली मान घालून लाजली....

सोहम नेत्राला अस लाजतना बघून चेहऱ्यावर गोड हास्य पसरत तिला चिडवत " आई ग... काय लाजते माझी बायको... आज माझं काही खरं नाही अस वाटतय...."

सोहम ने सगळ्यांसमोर अस फ्लर्ट केल्यावर नेत्रा चे गाल अजूनच गुलाबी झाले आणि ती पळतच किचन मध्ये निघून गेली....

नेत्रा ला किचन मध्ये जाताना बघून अन्वी पण तिच्या मागे निघून गेली....

अनाया सोहम च्या डोक्यावर टपली मारत " तुला काही लाज शरम , कुठेही काहीही बोलतोस... कधी सुधारणार रे तू...."

सोहम खोट लटक्या रागात " काय रे तुम्ही माझ्या सुधारणाच्या मागे लागला आहात.... नेत्रा ला मी जसा आहे तसाच आवडतो मग तुम्हाला काय प्रोब्लेम आहे रे...."

युग त्याच्या पोठात एक बुक्की मारत " प्रॉब्लेम तर नाही पण पुढे जाऊन तुझी मुल तुझ्या सारखी नाही झाली पाहिजे म्हणजे झाल...."

सोहम युग च्या पाठीत एक बुक्की मारत त्याच्या पासून थोड लांब होत ( काय आहे युग ने त्याची चटणी बनवली तर म्हणून...) " इथे माझी मुल आणि मलाच बोला , ( किचन च्या दिशेने जात...) मी चाललो माझ्या बायको कडे इथे माझी कदर च नाही बाबा...."

सोहम किचन कडे जात असताना थोड्या मोठ्या आवाजात हसतच त्याला " तिथे जात आहेस तर माझ्या बायकोला पाठवून दे रे...."

सोहम युग च न ऐकल्यासारख करत निघून जातो....


आणि इथे युग , वेद आणि अनाया खळखळून हसतात....








इथे किचन मध्ये....

सोहम आत येत अन्वी ला " ओ , वहिनी साहेब तुम्हाला मिस्टर युग बोलवत आहे..."

अन्वी " सोहम तू मला नावाने बोलू शकतो अगोदर ही बोलायचा ना.... "

सोहम " काय आहे युग आहे ना तुमचा नवरा मी जर तुम्हाला नावाने हाक मारली तर तो मला एका बंद खोलीत उल्टा लटकवून माझी हालत खराब करेल त्यामुळे आहे तस बोलू द्या...."

अन्वी हसतच नेत्रा ला " नेत्रा सांभाळ याला ( सोहम कडे बघत...)आज हा जास्त बोलायला लागला आहे...."

एवढ बोलून अन्वी हातात ट्रे घेऊन हॉल मध्ये निघून गेली...

अन्वी गेल्यावर नेत्रा सोहम ला बघून त्याला रागात डोळे मोठे करून " सोहम तुझी ही नौटंकी ना सकाळपासून चालूय , काय झाल आहे आज तुला....तू...."

नेत्रा पुढे काही बोलणार तर सोहम तिचे ओठ आपल्या ओठात बंदिस्त करतो , हे इतक अचानक होत की नेत्राला काही समजत नाही... नंतर नेत्रा सावरल्यावर तीही त्याला प्रतिसाद देते....

श्वास जड झाल्यावर दोघ बाजूला होतात....
थोड रिलॅक्स झाल्यावर सोहम नेत्रा च्या कंबरेत हात घालून तिला आपल्या जवळ खेचत " काय आहे आज माझी बायको सकाळपासून एकदम अप्सरे सारखी दिसत आहे , त्यामुळे आज माझ्यात इतका उत्साह आला आहे...."

सोहम च बोलण नेत्राच्या गालावर लाली पसरत होती....

तिला अस लाजता ना बघून सोहम " आणि तू अशी लाजत असते तर मला माझ्यावर कंट्रोल ठेवणे अवघड होत यार...."

नेत्रा त्याला मीठी मारत गोड आवाजात " सोहम..."



नेत्रा आणि सोहम एकमेकांच्या मिठीत सहवास घेत असताना कोणीतरी खोकत , तसे ते दोघं पटकन बाजूला होतात....

दोघ बाहेर बघतात तर तिथे वेद असतो....

वेद गालात हसत " तुमचं रोमान्स करून झाल असेल तर जायचं का हॉल मध्ये तुमची कॉफी आणि मित्र वाट बघत आहे...."

नेत्रा काहीही न बोलता लाजतच तिथून पळून हॉल मध्ये निघून जाते....

इथे सोहम केसांवर हात फिरवत वेद जवळ येतो....
तस सोहम च्या खांद्यावर हात ठेवत त्याला तिथून घेऊन जातो...

वेद सोहम सोबत चालता चालता त्याला " काय रे तू इथे मज्जा करायला आला आहेस की रोमान्स करायला...."

सोहम रागात आपल्या खांद्यावर ठेवलेला वेदचा हात काढून झटकत " दोन्ही करायला आलोय ऍनी प्रॉब्लेम...."

वेद त्याच्या कडे बघून हसत " एन्जॉय मग...."

एवढ बोलून वेद तिथून निघून जातो....

इथे सोहम " हं , सुखाने जगू पण देत नाही ही लोक...."

सोहम स्वतःशीच बोलून तोही तिथून निघून जातो....

सोहम आणि वेद आल्यावर मग या सहा जणांची गप्पांची मैफिल रमते.....








इथे एक व्यक्ती बाल्कनीत उभ राहत कॉफी पीत स्वतःशीच बोलत असते " अन्वी मी परत आलोय त्यादिवशी चा अपमान सहन नाही होत अजूनही , हा तेज इतक्या लवकर नाही विसरत.... मी बदला घेईन जरूर घेईन , हा तेज छोटा त्रास नाही खूप मोठा त्रास देतो तेही कायमच वर पाठवून... मी तुझ्या युग ला वर पाठवेन आणि तुझ आयुष्य एक बॉम्ब सारखं उद्वस्थ होईल , बूम.....हा.. हा.. हा.."


क्रमशः

- भाग्यश्री परब


Share

NEW REALESED