Raabta - 3 PDF free in Love Stories in Marathi

राबता - अ क्रेझी लव्ह... - 3

या सहा जणांची मैफिल रंगात आली होती....

युग मध्येच सिरीयस होत " गाईस , पूर्वा जेल मधुन सुटली...."

युग च ऐकुन तसं हे चौघ शौक मध्येच एकत्र " व्हॉट ?...."

युग कानावर हात ठेवत " अरे हे हळू ना किती मोठ्याने ओरडता..."

सोहम " ही नसलेला मेंदू कशी काय सुटली जेल मधुन , आपण तर अस अडकवल होत की ती यातून कधीच बाहेर पडू नाही शकणार...."

वेद " हो , अशी कशी लगेच सुटली ही.... हे अस नाही का कोणीतरी तिची साथ देत आहे...."

युग " हम , हो असू शकत.... आता मी गप्प नाही बसणार त्यादिवशीच मी तिला कायमची वर पाठवणार होतो पण तुम्ही लोकांनी मला अडवल , अश्या लोकांना जगून काही फायदा नाही जे असे प्रत्येक वेळी त्रास देत असतात त्यांना फरकच पडत नाही समोरच्याला किती त्रास होत असेल ते...."

अन्वी ला पूर्वा ने दिलेला त्रास युग च्या डोळ्यासमोर झरझर करत येत होते , त्यामुळे त्याचा राग ज्वालामुखी सारखा झाला होता.....

युग च्या बाजूला बसलेल्या अन्वी ने त्याचा एक हात आपल्या हातात घेत आणि दुसरा हात पाठीवर रब करत युग ला शांत करू लागली....

अन्वी युग च्या पाठीवर हात फिरवत त्याला " युग शांत हो , एवढा राग बरा नाही माहीत आहे ना तुला त्रास होतो डोकेदुखी चा प्लीज शांत हो... तुझ्याशिवाय कोणी नाही आहे आता मला सांभाळून घ्यायला , तूच नसशील तर काय होईल माझं.... प्लीज युग अस स्वताला त्रास नको करून घेऊ माझ्यासाठी... ( हे शेवटचं वाक्य ती भरल्या डोळ्यांनी आणि अडखळत बोलत होती....)

अनाया पण युग च्या अश्या वागण्यावर त्याला " हो युग या वेड्या अन्वी ला तूच सांभाळू शकतो.... सो प्लीज अस स्वताला त्रास नको करून घेऊ...."

( युग ला मायग्रेन चा प्रॉब्लेम होता तो कधी जास्त टेन्शन मध्ये असला तर त्याच भयंकर डोक दुखत असत....)

अन्वी ला आपल्या मुळे त्रास होत आहे आणि तिच्या डोळ्यात आपल्यामुळे पाणी येत आहे हे बघून युग ला खूप वाईट वाटत...

युग अन्वी चा हात आपल्या हातातून सोडवून तो हात आपल्या हातात घेत त्यावर हलक रब करत , मग एक हात गालावर ठेवून अंगठ्याने तिच्या डोळ्यातून निघालेल एक थेंब पुसत थरथरत्या आवाजात " अन्वी आय एम सॉरी माझ्या मुळे त्रास होतोय तुला , मी.... मी.... परत अस रागावणार नाही प्लीज शांत हो...... आणि हो हा युग त्याच्या अन्वी ला कधीच सोडून जाणार नाही , गेलो तरी कसही करून परत येईल समजल.... जेव्हा तू स्वतः बोलशील जा तेव्हा जाणार तोपर्यंत तर नाही समजल.... आता या चेहऱ्यावर एक गोड हास्य आण तर तुझ्या युगच्या पण चेहऱ्यावर हास्य पसरेल...."

युग च्या बोलण्याने अन्वी गोड हसते....

नंतर लटक्या रागात त्याच्या दंडावर हलक मारत " युग मी कधीच अस बोलणार नाही की तू जा म्हणून समजल.... मी जा बोललं आणि तू गेला तर तुला तुडवून परत आणीन समजल...."

युग हात जोडून मान खाली करत करत " जी माते जैसा आप चाओ.... "

युग च्या अश्या वागण्याने अन्वी खळखळून हसते....

तिला अस खळखळून हसता ना बघून युग ला समाधान वाटत... तो तिचा चेहरा ओंजळीत घेत कपाळावर हलक किस करतो....

सोहम घसा खाखरत " आम्ही आहोत इथे , हे रोमान्स वैगरे बेडरूम मध्ये करा..."

सोहम ने अस बोलल्यावर नेत्रा त्याच्या दंडावर जोरात मारते....

सोहम कळवळत दंड चोळत नेत्राला " मी काय केलं आता , इतक्या जोरात मारल ते...."

नेत्रा रागात " तू ना आज जास्तच बोलत आहेस हा सोहम आपण कुठे आहोत याचं तरी भान ठेव... काही लाज आहे की नाही तुला..."

सोहम " अरे इथे आपलीच माणसं असताना यात लाज कसली.... हं तू पण यांच्यासारखी निघाली काही तरी इज्जत ठेवा रे माझी ( वर बघत....) देवा बघत आहे ना या जीवाची काय हालत केली आहे ( बाकी सगळ्यांना बघत.... ) या लोकांनी...."

सोहम च्या अश्या बोलण्याने नेत्रा युग आणि वेद कडे बघत त्यांना " वेद , युग मी सांगते याला ना चांगल तुडवून काढा...."

नेत्रा ने ऑफर दिल्या वर हे दोघ थोडी ना गप्प बसणार आहे , सोहम सोफ्या वरून पाळायच्या आत हे दोघ त्याच्यावर तुटून पडले... मन भरल्यावर या दोघांनी सोहम ला सोडून दिलं....

सोहम कंबर चोळत नेत्राला कडे बघून हळू आवाजात " तू भेट बेडरूम मध्ये कसा त्रास देतो ते तुला...."

सोहम च्या बोलण्याने नेत्रा त्याच्या दंडावर मारते तस सोहम कळवळतो...
दंडावर हात ठेवत सोहम " आ...."

सोहम पुढे काही बोलणार तर नेत्रा त्याला मध्येच अडवते ...

नेत्रा तोंडावर बोट ठेऊन सोहम ला गप्प करते " श्श्श...."

तस सोहम शांत होतो....


वेद " तिने काही हालचाल केली का , म्हणजे अन्वी ला त्रास वैगरे दिला का ?...."

युग " नाही , पण तिने काही करायच्या आत काही तरी करायला हवं..."

वेद " युग आताच नको काही करु नाही तर विस्कटेल सगळ आधी हे माहिती करू की नक्की ती यावेळी काय करणार आहे... मगच आपण यावर काही तरी करू...."

युग " हो वेद तू बरोबर बोलत आहेस..."

यावर वेद एक गोड स्माईल देतो....

युग " ओके चला जेवायला नंतर आराम करा... उद्या करू मज्जा मस्ती...."

तसे सगळे " हो..." बोलून जेवायला निघून जातात....
जेवत जेवत त्यांच्या गप्पा चालू असतात....







इथे पूर्वा आपल्या घरी आल्या पासून धुसपुसत होती , कारण ती जेल मधुन सुटल्यावर धमक्या द्यायला अन्वी च्या घरी गेली होती , पण तिथे घराला कुलूप होते....

आजूबाजूला विचारपूस केली तर तिला समजल की अन्वी कायमची हे शहर सोडून गेलेली....

अन्वी शहर सोडून गेली समजल्यावर तिचा राग सातव्या आस्मानावर पोहोचला होता , ती तशीच धुसपुसत घरी आलेली......

घरी येऊन तिने सरळ आपल बेडरूम गाठल होत....
पूर्वा बेडरूम मध्ये येत तिने सगळ सामान फेकायला सुरुवात केली तिला अन्वीचा खूपच राग येत होता....
सामान इकडे तिकडे फेकून झाल्यावर रागातच बेड वर बसत कोणाला तरी कॉल केला.....

पलीकडून कॉल रिसिव्ह झाल्यावर त्याच काहीही न ऐकता ऑर्डर सोडली " मला अन्वी शिंदे ची ( तिला माहित नव्हत की तिचं लग्न झालं आहे...) सगळी डिटेल पाहिजे ती कुठे राहते , काय करते वैगरे सगळी माहिती पाहिजे समजल...."

आणि समोरच्याच रिप्लाय न ऐकता लगेच तिने कॉल कट केला...

कॉल कट करून झाल्यावर ती फ्रेश व्हायला जाणार तर अचानक कोणीतरी रागात तिच्या समोर येऊन उभ राहत....

अस मध्ये येऊन उभ राहत तिला अडवल्याने , ती आधीच रागात असल्याने ती आणखीनच चवताळली आणि समोरच्याला उलट बोलू लागली " बाबा , तुम्हाला समजत नाही का अस समोर येऊन अडवत आहात..."

तिचे बाबाही तेवढ्याच रागात तिच्यावर बरसले " दिसतय मला सगळ , आणि मी तुझ्या फोन वरच सगळ बोलण ऐकल आहे ( पूर्वा रूम मध्ये जाताना त्यांनी पाहिलं होत तसे तेही तिच्या पाठोपाठ निघाले , रूम च्या बाहेर पोहोचल्यावर ती फोन वर बोलत असताना त्यांच्या कानापर्यंत पोहोचलं तस ते तिथेच थांबले....) तू अस काहीच करणार नाही समजल , आधी खूप माफी मागितली तू आणि माफ केल मी पण आता नाही तुझ्या कोणत्याही गोड बोलण्यावर फसणार नाही मी बस आता... त्यादिवशी तुझ सगळ खर रूप समोर आल नसत तर आता निष्पाप जीवाला विनाकारण त्रास झाला असता... इथून पुढे अस काही वाईट केलं ना तर बघ मी काय करतो ते... "

पूर्वा च्या बाबांनी नको ते बोलल्यावर तिला आणखीनच राग आला ती अजुन रागात येऊन त्यांना " अन्वी असेल तुमची लाडकी पण मी गप्प बसणार नाही.... "

पूर्वा चे बाबा रागात " तू अशी ऐकणार नाहीस थांब...."

ते रागातच रूम च्या बाहेर येतात आणि धाडकन दरवाजा बंद करून त्याला कुलूप लावतात....

ते रागातच पूर्वा ला " बघू आता कशी बाहेर निघते ती..."

तिथे बाजूला उभ्या असलेल्या पूर्वा च्या आईला बघत " कोणीही हा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करणार नाही... उघडलात तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही...."

एवढ बोलून ते रागातच तिथून निघून जातात , तस पूर्वा ची आई पण तिथून निघून जाते...

इथे पूर्वा आणखी रागात येऊन दरवाजा जोरजोरात आपटून उघडण्यासाठी विनंती करते तिचं कोणीही ऐकुन न घेतल्याने ती शांत होते आणि धारधार आवाजात स्वतःशीच " मी कसही करून या अन्वी ला अद्दल घडवणार , हिच्या मुळे माझी लाईफ स्पोईल झाली आहे... अन्वी जस्ट वेट अँड वॉच लवकरच भेटू आपण..."


क्रमशः

- भाग्यश्री परब


Share

NEW REALESED