इथे सहा जण जेऊन आपापल्या रूम मध्ये निघून जातात...
युग आणि अन्वी आपल्या रूम मध्ये आल्यावर एकमेकांच्या कुशीत झोपून जातात , पण अन्वी ला काही केल्या झोप नाही येत....
नकळत ती भूतकाळात हरवून जाते....
भूतकाळ.....
अन्वी आणि पूर्वा ची ओळख त्या दोघी आठ वर्षाची असताना झाली होती....
पूर्वा ही अन्वी ची मामेबहीण होती....
अन्वी आणि पूर्वा मोठ्या झाल्यावर ते पहिल्यांदाच एकमेकांना बघत होत्या....
पूर्वा चे बाबा आणि अन्वी ची आई हे बहीण भाऊ लांब राहत असल्याने त्यांना भेटता येत नसे कधी तरी त्यांचं बोलणं फोन वरून व्हायचं...
तशीच अन्वी ही मामाची लाडकी होती तिचा स्वभाव , राहणीमान खूप आवडायचा अन्वी प्रत्येक गोष्टीत हुशार होती , या गोष्टीचं तिच्या आई बाबांना खूप कौतुक वाटायचं की आपली मुलगी इतक्या लहान वयात समजूतदार आहे.... सगळेच तिची वाहवा करायचे.....
अन्वी च सगळीकडे कौतुक होत असल्याने तिच्या मामीला खटकायच , तसचं पूर्वा लाही तिचं कोणी केलेलं कौतुक आवडल नव्हत... कारण प्रत्येक वेळी आतापर्यंत तिचं कौतुक होत आलेलं आणि आता तिच कोणीतरी भरभरून कौतुक करत आहे हे तिला आवडल नव्हत....
ते म्हणतात ना कोणी कितीही कौतुक करा त्याचा ॲटीट्युड कधी दाखवायचा नाही , नाही तर त्याची सवय होऊन जाते आणि आपण अहंकारी बनतो....
तसचं पूर्वा सोबत होत होते , ती अहंकारी बनत चालली होती हे तिलाच समजत नव्हत.....असो
अन्वी च्या मामीने खूप प्रयत्न केला अन्वी ची इमेज लॉ करण्याचा पण काहीच फायदा झाला नाही उलट तिचं आणखी कौतुक होत होते....
एक दिवस मामी नी तिची चूक पकडली होती , पण त्यात तिची काहीच चूक नव्हती तरीही मामी तिच्यावर ब्लेम करत होती.....
मामी तुटक पणे अन्वी ला सगळ्यांसमोर " तू स्वताला हुशार समजते ना मग अस तुझ्या आई वडिलांना उलट का बोलत आहेस...."
अन्वी विनवण्या करत " मामी मी उलट नाही बोलले माझ्या आई वडिलांना मी फक्त एक्स्प्लेन करत होते माझी चूक नाही ती....तुम्ही चुकीचं समजत आहात मला...."
मामी सगळ्यांना ओरडून " बघा रे बघा कशी मुलगी आहे , आपल्या मामीला पण उलट बोलू लागली ही कार्टी...."
अन्वी रडत च त्यांना " मामी मी तुम्हाला उलट नाही बोलले , मी फक्त गैरसमज झाला आहे एवढच सांगत होते.... अस काही नाही आहे...."
मामी तुटक पणे तिला " आता खर रूप समोर आल तर , रडत आहेस व्वा काय नाटक करते तू , अजुन कोणत रूप दाखवायचं बाकी आहे तेही दाखव...."
इथे विनंत्या करून काही होणार नाही म्हणून अन्वी रडत तिथून आपल्या रूम मध्ये पळून जाते....
ती पळून गेली त्या दिशेने बघत " बघा खर रूप समोर आल म्हणून पळून गेली....."
मामीच्या अश्या बोलण्याने मामांना खूप राग येतो ते रागातच त्यांना दटावतात " संजना...."
मामांच्या धाकाने मामी शांत होतात त्या ही सगळ्यांसमोर मामांनी ओरडल्याने तणतणतच तिथून निघून जातात , मामीच्या पाठोपाठ मामाही तिथून सगळ्यांची माफी मागून तेही निघून जातात....
इथे पूर्वा ला अन्वी चा सगळ्यांसमोर केलेला अपमान बघून समाधान वाटत होत....
हळू हळू सगळे आपापल्या कामाला लागतात कारण दोन दिवसांनी अन्वी च्या मोठ्या भावाच शुभम च लग्न असत....
मामा आणि मामी आपल्या बेडरूम मध्ये येतात...
मामा बेडरूम मध्ये आल्या आल्या मामी वर बरसतात " तुला सगळ्यांसमोर अस अन्वी ला बोलायची गरज का होती.... एकांतात बोलू शकत नव्हती का...."
मामी पण त्यांच्यावर तेवढ्याच रागाने " तिला एकांतात बोललं तर सगळ्यांना कस समजेल की ही मुलगी कशी आहे , तिचं खरं रुप दाखवत होते सगळ्यांना...."
मामा " तू जास्तच ओळखते का अन्वी ला हा , किती माहिती आहे तुला तिच्या बद्दल.... तुझ्या डोक्यात ना कचरा भरला आहे कचरा जास्तच चवचव चालली आहे
अन्वी ला घेऊन... काय सिद्ध करायचं काय आहे तुला...."
मामी " त्या बिघडलेल्या अन्वी मुळे मला काहीही नका बोलू समजल , मी बघतेच आणखी कोणते रूप लपले आहे तिच्यात...."
मामा वैतागून " तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही.... पण एक लक्षात ठेव अन्वी ला जर काही झाल ना या गोष्टी मुळे तर मी कधीच माफ नाही करणार कधीच नाही...."
एवढ बोलून ते रूम च दार जोरात आपटत तिथून निघून जातात.....
इथे मामी चरफडत स्वतःशीच " या अन्वी मुळे आज माझा नवरा सगळ्यांसमोर ओरडला सोडणार नाही मी हिला...."
इथे अन्वी आपल्या रूम मध्ये एका कोपऱ्यात बसून रडत होती....
तेवढ्यात तिच्या डोक्यावर कोणीतरी प्रेमाने हात फिरवत...
ती डोकं वर करून बघते तर तो शुभम असतो...
शुभम ला बघून अन्वी रडतच त्याला मीठी मारते " दादा..."
शुभम तिच्या डोक्यावर हळू हळू हात फिरवत कुरवाळत तिला शांत करतो " माझी गोडू मला अशी रडलेली नाही आवडत माहीत आहे ना...."
अन्वी त्याच्या मिठीत च राहत रडवेल्या आवाजात " मग काय करू मी... मी.... उलट नव्हते बोलत मी फक्त एक्सप्लेन करून सांगत होती , यात माझी काय चूक...."
शुभम " तुझी काहीच चूक नाही गोडू , तुला माहीत आहे ना मामी चा स्वभाव त्यांना अस कोणी दुसऱ्यांच्या मुलांच कौतुक केलेलं आवडत नाही , फक्त कौतुक आपली मुलगी पूर्वा चाच व्हावा म्हणून त्या अस वागत आहे.... तुझ केलेलं कौतुक आवडल नाही त्यांना म्हणून त्या अश्या वागल्या... आपण लक्ष नाही द्यायचं एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं.... अश्या माणसांना समजावून सांगून शब्द वाया नाही घालवायचे... समजल...."
अन्वी अजूनही त्याच्या मिठीत राहत " हो समजल...."
शुभम अन्वी ला आपल्या मिठीतून हळुवार बाजूला करत तिचा चेहरा ओंजळीत घेत तिचे अश्रू पुसून " मग हस बघू...."
तशी अन्वी गोड हसते....
शुभम ही हसत " हम , माझी गोडू हसताना च छान दिसते...."
शुभम च्या बोलण्याने अन्वी आणखी गोड हसते , तस शुभम तिच्या कपाळावर किस करतो आणि तिला आपल्या मिठीत घेत कुरवाळतो....
इथे अन्वी च्या बेडरूम च्या बाहेर त्या दोघांचे आई बाबा डोळ्यात पाणी आणत भावा बहिणीच प्रेम बघून समाधानी होतात....
वर्तमानकाळ....
काहीश्या आवाजाने अन्वी भानावर येते....
युग " अन्वी काय झाल झोपली नाहीस आणि तुझ्या ( तिचे डोळे पुसत....) डोळ्यात अश्रू....."
अन्वी " काही नाही ते दादाची आठवण येत आहे , कुठे असेल माझा दादा...."
युग " अन्वी आपण शोधू तुझ्या दादा ला प्लीज अशी रडत नको राहू , यू नो ना तुझ्या दादासारख मलाही तुझ्या डोळ्यात पाणी आलेलं नाही आवडत....."
युग च्या बोलण्याने अन्वी आपले डोळे पुसले आणि युग च्या मिठीत शिरून झोपून जाते....
युग तिला कुरवाळत थोपटत असतो.....
थोड्यावेळाने अन्वी झोपून जाते , तस युग ही झोपून जातो....
इथे एका व्यक्तीला खुर्ची ला बांधून ठेवलेले असते.....
एक व्यक्ती त्या बांधलेल्या व्यक्तीला लाकडाने मारत होता...
तसा तो व्यक्ती खळवळत होता " आ...."
तो व्यक्ती रागातच त्या व्यक्तीला " बोल लवकर तुझी बहिण कुठे आहे...."
बांधलेला व्यक्ती " नाही सांगणार समजल , तू मारून टाकल तरी नाही सांगणार...."
तो सांगत नाही म्हणून तो व्यक्ती अजुन च त्या व्यक्तीला मारायला लागतो...
तस त्या बांधलेल्या व्यक्तीच्या त्याच्या वेदने सोबत त्या बंद खोलीत भयंकर किंकाळी ऐकु येते....
क्रमशः
-भाग्यश्री परब