Dracula - 31 in Marathi Horror Stories by jayesh zomate books and stories PDF | ड्रेक्युला - भाग 31

ड्रेक्युला - भाग 31

॥ ड्रेक्युला॥18 भाग 31

युध्दाची चाहूल..
..

.....


"मी काय सांगतो ते निट ऐका!" युवराज सुरजसेन म्हणाले.
त्यांच्या बाजुला महाराज,रघुबाबा, कोंडूबा उभे होते. आणी त्या सर्वांन मधोमध एक मोठा चौकोनी टेबल ठेवलेला दिसत होता..ज्यावर राहाजगडचा नक्शा होता. आणि आजूबाजूला भिंतिवर तलवारी, भाले ,वाघाचे ,हरणीचे,सिंहाचे डोके लावलेले होते.

" कोंडूबा! किती सैनिक आहेत आपल्याकडे ?"
" जी युवराज बाराशे सैनिक आहेत!"
" आणि आता वापरत किती आहोत?"
" दोनशे सैनिक! राहाजगडच्या चारही दिशेंना! पन्नास -पन्नास ,असे मिळुन ठेवले हाईत ! "
" म्हंणजे हजार सैनिक आहेत तर! " युवराज काहीतरी विचार करत असल्यासारखे डावीकडून उजवीकडे डोळे फिरवू लागले.
" एक काम करा ? हजार मधले पाचशे सैनिक तैयार ठेवा ! आताच्या आता ! आणि दारु गोळा जेवढ आहे तेवढ बाहेर काढा ! तोफा तैयार ठेवा !आणी जर कधी अचानकच शत्रुच आगमन झाल! तर लागलीच , तोफेचा गोळा उडवून आम्हाला संकेत पोहचवा! सर्वांना सतर्क रहायला सांगा "
" जी युवराज !" कोंडूबा कमरेत लऊन घाई-घाईत निघुन गेले.
महाराज एकटक सुन्न होऊन युवराजांकडे पाहत बसलेले! त्यांचा एक नी एक शब्द खोटा ठरला होता.की युवराज राहाजगडच्या गादीवर बसण्या लायक नाहीत! प्रजेच्या भल्याचा विचार ते करु शकत नाहीत ! अजुन ब-याच गोष्टी होत्या, परंतु त्या सर्वांना उकरुन काढायला आपल्याकडे मुळीच वेळ नाही!कारण युद्ध अटळ आहे ! ...
" बाबाश्री ! आम्हाला माहीतीये की आम्ही ह्या अगोदर खुप चुकीच वागलो आहोत , परंतु आम्हाला आमची चुक कळाली आहे! बस्स एवढच म्हंणेल मी! की काहीही करुन आपल्या मांणसांना आंणि आपल्या ह्या राहाजगडला त्या सैतानाच अंत करुन वाचवायच आहे ! " युवराज सूरजसेन अस म्हंणतच निघुन गेले! महाराजांच्या मनात काहीसेकंदापुर्वी एक विचारही आला! की खाडकन मिठीच मारावी युवराजांना परंतु ते त्यांनी आवरल..!
" महाराज ! कधी-कधी दिसत तस नसतच ! न्हाई का ?"
रघुबाबा मागून मंद स्मित हास्य करत म्हणाले. त्यांच्या बोलण्याचा
अर्थ महाराजांना कळाला होता.
×××××××××××××
वर आकाशात चंद्राभोवती काळ्या मेघांनी गराडा घालुन त्याचा प्रकाश आडवुन धरायला सुरुवात केली होती. जंगलात सावजाच्या शिकारीसाठी ट्पून बसलेले रामु,ढमाबाई,यार्वशी ,लंक्या ! आणि ती सैतानी सेना आता कोणत्याही क्षणी बाहेर पडणार होती! कारण मध्यरात्र झाली होती. बस्स एक हुकूम हवा होता त्यांना !
घोड्यावर बसुन कोंडूबा राहाजगडच्या प्रथम वेशीवर आले!
पुढे सैनिकांचा पहारा सुरुच होता.
" काय र पोरा..वो ! काय हालचाल दिसली का जंगलाच्या दिशेन ! .. जर काय दिसल असल तर सांगा मला !" कोंडूबा घोड्यावर बसुनच म्हणाले.
" हो मला दिसली कोंडूबा! काय तरी काळी टोपी घातल्यावाणी झाडामागुन बघत असल्यासारख! " हा तोच सैनिक होता, ज्याने ओरडून त्या दोन सैनिकांना सांगितल होत.परंतु त्या दोघांनी पाहताच समीर काहीही नव्हत.
" अहो कोंडूबा! ह्याला भास झाला होता ओ ! काय बी नव्हत तिथ !"
त्या दोन सैनिकां पैकी एक म्हणाला.परंतु कोंडूबा मात्र आपल्या विचारात हरवलेले..
" काळे कपडे घातलेली मांणस झाडा आडून बघत व्हत म्हंणजे?..ते आल तर नसतील ना?" कोंडूबा आपल्या घोड्यावरुन उतरला ..
पटकन चालत त्या सैनिकापाशी आला ज्याने ती हालचाल पाहीली होती.
" कुठ बघीतलस र?" कोंडूबाच्या ह्या वाक्यावर त्या सैनिकाने बोट न दाखवता फक्त डोळ्यांनी इशारा करत ती जागा दाखवली. बोट दाखवल्याने शत्रु सावध झाला असता !
" ए पोरांनो ! म्या काय सांगतो ते ऐका! धनुष्यबाण आणा ! आणि सुरसुरी भरलेला एक गोळा बी आणा... " कोंडूबाच्या वाक्यासरशी पुढच्याक्षणाला सैनिकांनी धनुष्यबान आणि एक काला गोळा तिथे आणला ज्यात सुरसुरी भरलेली.कोंडूबाने हळुच धनुष्य उचल्ल , त्यातल्या दोरीत बाण अडकवला. आणि तो सुरसुरी भरलेला काला गोळा..त्या सैनिकाकडे दिला..ज्याने ती हालचाल पाहीली होती.
" आता माझा ऐक ? ह्या गोळ्याला असा ताकदीन भिरकाव! की हा गोळा थेट तु जिथ ती हालचाल पाहीलस त्या जागेवर पडायला हवा!"
कोंडूबाच्या वाक्यावर त्या सैनिकान हाती तो काला गोला घेऊन फक्त होकारार्थी मान हळवली..
आणी आपला एक पाय हळूच मागे नेत.. दुसरा पुढे ठेवला..मग तो गोळा ज्या हातात होता ..तो हात सुद्धा मागे घेऊन जात कोंडूबाकडे पाहत डोक हलकेच हो असा इशारा करत हलवल.कोंडूबांने हि मग बाजुला असलेल्या मशालीवर बाणाची चंदेरी पात तापत ठेवली..आणि होकार दर्शवला. ..तसा त्या सैनिकाने तो गोळा असलेला हात वेगाने पूढे आणला ....त्याच्या हातातुन तो गोला सुटला जात थेट वेगाने वर हवेत उडाला .गोल,गोल भिंगत त्या गोळ्याने वीस ,तीस-चाळीस -पन्नास साठ मीटरच अंतर पार करुन सत्तर मीटरच अंतर पार करायला सुरुवार केली..की तोच इकडे कोंडूबांने त्या बाणाच्या पातीकडे पाहील..मशालीच्या आगीने ती पात तप्तपने तापली गेलेली.त्याच तप्त पातिचा बाण कोंडूबाने धनुष्याच्या दोरीला आधीव अडकवला होता.. कोंडूबाने बाण सरल करत्त एक डोळा बंद करत जास्त अवधी न घालवता ..बाणाची दोरी मागे नेत ..सपक्कन हवेला कापत सोडली..सुई,सुई करत तप्त झालेल्या त्या बाणेच्या पातिने
हवेलाही लाजवेल अशा गतीने तो सुरसुरी असलेला गोळा गाठला..
खाली जंगलात लपलेले रामु सावकार, ढमाबाई, लंक्या, यार्वशी
सर्वांनी हा दृष्य उभ्या डोळ्यांनी पाहिला...दोन मिसाईल ज्याप्रकारे
हवेतच एकमेकांना धडकल्या जाव्यात आणि वर आकाशात त्यांचा एक मोठा ल्कख प्रकाश उजळवत एक स्फोट व्हावा त्याचप्रकारे त्या बाणाची तप्त पात जशी त्या सुरसुरीच्या गोळ्यात घुसली...सुरसुरीच्या असंख्य कणांनी डोळ्यांची पापणी लवण्या अगोदरच पेट घेतला..! आणि पुढच्याचक्षणाला आकाशात एक मोठा धडाड धम्म्म आवाज होत एक लख्ख प्रकाश पसरला..त्या प्रकाशाने पुर्णत राहाजगडच जंगल दिवस असल्यासारख ऊजळून निघाल. त्या आवाजाची तीव्रता इतकी होती ..की राहाजगड गावातले लोक झोपेतुन उठुन एक-एक करत घराबाहेर आले ! प्रत्येकाच्या चेह-यावर नवल , आश्चर्यकारक भाव पसरले होते.
राझगड महालात ही काही वेगळी परिस्थिती नव्हतीच! यु:ज्ञी.रुपवती,महाराणी,महाराज रघुबाबा सर्वांना खिडकीतून राहाजगडच्या वेशीवर एक लक्ख असा प्रकाश चमकताना दिसत होता.
परंतु त्या सर्वांना ती सैतानाची सेना मात्र दिसत नव्हती, जी की कोंडूबा आणि सैनिक आ-वासुन , थक्क होत पाहत बसलेले.
त्या प्रकाशाचा जसा विस्फ़ोट झाला , वर हवेत काहीवेळासाठी तांबड्या रंगाच्या मोठ-मोठ्या ठिंणग्या पसरल्या.ज्यांच्या उजेडात वेशीवर असलेल्या कोंडूबा, सर्व सैनिकांना पुढील दृश्य दिसल.जंगलातल्या झाडांच्या खोडापाशी सात-आठ फुट शरीरयष्टी असलेली काळे पायघोळ आणि डोक्यावर त्रिकोणमिती टोपी असलेली दणकट -पाहाडी शरीरयष्टी असलेली मांणस ऊभी होती. त्यांच्या शरीराची काडीचाही संबंध नसल्याप्रमाणे अगदी स्तब्ध उभे होते ते, आणि त्या सर्वांच्या हातात विचित्र-पद्धतीची हत्यारे होती. दुर-दुर पर्यंत पुर्णत जंगल त्यांच्या काळ्या कपड्यांमुळे पाण्याला शेवाळ लागल्यासारख काळ झाल होत..
जणु अंधाराला सुद्धा त्या सैतानी सैनिकांनी आपल्या शरीरात सामावुन घेतल होत.दुर-दुर पर्यंत नजर जाईल तिकडे ती शत्रुची फौज अगदी स्तबध एका मृत घोषित असलेल्या प्रेता सारखी ऊभी असलेली दिसत होत..पुर्णत जंगल त्या सर्वांनी संक्रमित करुन सोडल होत..त्यांच्या अंगातुन निघणा-या दर्पाने वातावरणातल्या हवेत-कुबट वास सुटला होता.
" को..को..कोंडूबा,क.क्क..क कय हाई हे !" पुढील शत्रुची सेना पाहुन राहाजगडच्या सैनिकांची पाचावर धारण बसली.पोटात भीतिने गोळे निर्माण होऊ लागले .त्यातलाच एक सैनिक म्हणाला. बाकीच्यांच ही तेच मत होत.परंतु कोंडूबा काही घाबरले नव्हते, एकेकाळी जवानीत त्यांनी ही हा युध्दपातळीवरचा मैदान चांगलाच गाजवलेला होता.
" अरे ए तोफ आणा !" कोंडूबा गरजले, परिस्तितीतून नुसार आवाज वाढवाव लागल, अन्यथा सैनिकांची भीती मनावर काबू होणार होती.जी की कोंडूबांना नको होती..अन्यथा सैनिक पलो या मरो ऐवजी पलोची निवड करुन वेशीवरुन पळून गेले असते! कारण पुढील सेना होतीच तशी छातीत धडकी भरवण्यासारखी.
कोंडूबांच्या वाक्यावर पाच सहा सैनिकांनी एक काळी तोफ तिथ ढकलत आणली! तर बाकीच्या दोघांनी गोळ्यांची पेटी आणली होती.प्रत्येक पेटीमध्ये चार-चार गोळे होते.
" एकबार उडवा! "कोंडूबाच्या आज्ञेसरशी एका सैनिकाने थरथरत्या हाताने हळूच पेटीतुन एक काळा दारु गोळा बाहेर काढला, व तो गोळा तोफेच्या मागच्या होलातुन आत घुसवला.कोंडूबांनी हळुच बाजूची मशाल उचलुन घेत,तोफेवरच्या एका होलातुन एक सफेद जाडी वात बाहेर आलेली दिसत होती...त्याच वातेवर वरची सफेद वात त्या मशालीच्या आगीने शिलगावली.आगीचा स्पर्श होताच त्या पांढरट वातेने सर्रकन पेट घेतला. आणि त्याचक्षणी तोफेला एक जोरदार धक्का बसला तोफ थोडी मागे गेली व तोफेच्या मुखातुन धुर आणि आवाजाचा बार उडाला जात, तो काला दारु गोला वेगाने तोफेच्या पुढच्या नळीतुन बाहेर आला.सेकंदाच्या काट्या गणीक त्या गोळ्याने वेग धरुन वीस-चाळिस-पन्नास मीटर हवेतच पार केल होत , आता त्या हवेत असलेल्या गोळ्यापुढे खाली जमिनीत दोन-फुट काठ्या रोवलेल्या त्यांवर
लाल पिवळा दोरा बांधलेला दिसत होता-जो की रघुबाबांचा सुरक्षा कवच होता. त्या काळ्या दारु गोळ्याने हवेतुन अगदी मंद गतीने गोल-गोल भिंगत दहा मीटरच अंतर कापल ,व त्या कवचावरुन बाहेर पडून शत्रुवर आघात करणार की तोच त्याचक्षणी त्या काठ्यांचा रंग बदलला अक्षरक्ष ज्वालामुखीतल्या तांबड्या तप्त लाव्ह्यासारख्या त्या काठ्या एकापाठोपाठा-रसत्यावरच्या खांबल्यावरच्या लाईटस जश्या झप-झप प्रकाश फेकत पेटाव्या त्याचप्रकारे तांबड्या रंगाने चमकल्या..पुर्णत गावाला वेटोळा घातलेल्या त्या काठ्या ताड-ताड आगीच्या ठिँणग्यासहीत गरम निखारे उडवत पेटल्या आणि त्या काठ्यांमधुन एक तांबड्या रंगाचा पारदर्शक प्रकाश एखाद्या भिंतीप्रमाने वर हवेत उडाला आणि ही सर्व क्रिया अगदी झपाट्याने घडली..जेव्हा तो गोळा त्या कवचा पल्याड जाणार होता,परंतु रघुबाबांच्या कवचाने शेवटी आपली करामत दाखवली.तो दारुचा गोला धाड-दिशी त्या उभ्या तांबड्या पारदर्शक कवचावर आदळला,तसा त्या दारु गोळ्याचा हवेतच स्फोट झाला..आणि त्या कवचावरचा तांबडा रंग तेवढ्यावेळापुरता लक्खपणे चमकला.जो तो उभ्या डोळ्यांनी हा दृश्य आपल्या डोळ्यांत साठवून ठेवत बसलेला-कारण हे अद्भुय अविस्मरणीय अनुभव पुन्हा घ्यायला मिळणार नव्हत.प्रत्येकाच्या तोंडाचा आ-वासला ,नवल,आश्चर्य,भीती,भय,काय असत त्याच मिश्रण पाहायला मिळु लागल.
" आई शप्प्थ!" कोंडूबाच्या तोंडून आश्चर्यकारक उद्दार बाहेर पडला.
×××××××××××

"बाबा राहाजगड गावाला ते अद्भूत, अस गोल गराडा घातलेल काय दिसत आहे ?" महाराजांणी मोठ्या नवळाने रघुबाबांना विचारल. रघुबाबा त्यांच्या खिडकीतून पुढे पाहत होते.त्यांच्या नजरेस राहाजगड गावाला चारही बाजुनी खाली जमिनीतुन एक तांबडा पात्तळसा पडदा वरआकाशात ढगांच्या वरपर्यंत पोहचलेला दिसत होता. आणी त्या तांबड्या पडद्याने पुर्णत राहाजगडला..चारही बाजुनी घेरल होत.
" त्यो मी राहाजगडच्या सुरक्षेसाठी लावलेला कवच हाई महाराज! जो की आता जागरुक झालाय! ह्याचा अर्थ शत्रु आलेत आणि त्यांनी त्या कवचावर प्रहार ही केला आहे !
" महाराज,महाराज!" एक सैनिक मोठ-मोठ्याने महाराजांच्या नावाने ओरडत त्यांच्या खोलीत आला. त्याच्या चेह-यावर भय पसरल होत-नाकपुड्या फुगल्या होत्या,त्यातुन श्वावास्चोश्वास वेगाने बाहेर पडत होता.डोळे विस्फारले गेलेले-कपाळावरुन घामाचे ओघळ खाली बरसत होते.त्याच्या ह्या अवस्थेवरुन महाराजा-रघुबाबा दोघांनाही त्या सैनिकाकडे काहीतरी भयानक बातमी असल्याची खात्री झाली होती.
" म..म..महाराज!" त्या सैनिकाचा श्वास अद्यापही वेगाने बाहेर पडत होता." वेशीवर जंगलात शत्रुच आगमन झालय ! आ...आ..आण, त्या शत्रुच्या स्ंघात यार्वशी प्रधान, " यार्वशी यांच नाव ऐकुन महाराज रघुबाबा दोघांनीही एकमेकांकडे पाहील " आण अजुन तीन जण हाईत, त्यातल्या एकाच अंग पांढरट राख फासल्यासारख सफेद हाई डोक्यावर टक्कल आणि ,खाली एक काळ धोतर हाई, आण एक टक्कल केलेली जाडजुड बाई बी हाई ..तिथ. आणि महाराज" त्या सैनिकाने हळुच एक आवंढा गिळला" त्या समद्यांची फौज काळे कपडे घातलेली आणि एका सैतानी मांणसांच्या उंची एवढी हाई..आण त्या समद्यांच्या संख्येने राहाजगडच पुर जंगल भरुन गेलय!" तो सैनिक हे सर्व सांगतांना थरथर होता! त्याला अजुन खुप काही सांगायच होत..परंतु भीतिपोटी शब्द
डोक्यात येत नव्हते,सूचत नव्हते.
" ठीके या तुम्ही !" महाराजांच्या हुकमासरशी तो सैनिक निघुन गेला.
" बाबा!त्या सैनिकाच्या नुसत्या वर्णनानेच अंगावर काटा येत आहे. तर वेशिवर काय परिस्थित असेल! "
" महाराज , इथ युध्द कोण्या मानवा संग न्हाई ! तर सैताना समवेत हाई !..आण मला हे पहिलेच ठावुक होत. म्हणुनच समोर परिस्थिती कशीही असली, भलेही पुढे सैतान असो की कोणीही आपला धीर आणी हिम्मत सोडायची न्हाई! आता येळ आलीये महाराज तुमच्या राहाजगडला सैतानापासुन वाचवण्याची! आण तुम्ही काय बी काळजी करु नका , म्या हाई तुमच्या संग -आण समर्थ बी हाईत की! ते लवकरच ह्या सर्व तोडग्याच उपाय घेऊन येतील." रघुबाबांच्या वाक्यावर महाराजांनी फक्त होकारार्थी मान हलवली.
" चला महाराज येतो मी ! मला एक महत्वाच काम करायच हाई " रघुबाबा अस महंणतच जाऊ लागले.
" महत्वाच काम?" महाराज न समजुन म्हणाले. रघुबाबा जागेवरच थांबले,त्यांनी हळूच मागे वळून पाहिल.
" महाराज मला ह्या सैतानां संग युद्ध करायचय म्हंटल्यावर माझी शक्तिव वाढवावी लागलच ना ! ." रघुबाबा अस म्हंणतच निघुन गेले !
महाराज फक्त त्यांच्या पाठमो-या आकृतीला जाताना पाहत राहिले . मनातल्या वादलात समर्थांचा विचार आला.
" समर्थ कुठे असतील! काय करत असतील ?"
×××××××××xxx
सर्वरंगी द्वाराआत समर्थांच देह वेगाने आत खेचल्या नंतर ते एका वेगळ्या जगात ,एका वेगल्याच मितीत येऊन पोहचले होते.
समर्थ एकाच जागेवर उभ राहून ,जागेवरच गोल गिरकी घेत त्या जगाच आगळ-वेगळ दृष्य आपल्या डोळ्यांत पाहत बसलेले.समर्थांच्या पायाखाली जमिनीवर सर्व दिशेला गवत पसरलेल दिसत होत, परंतु ते गवत हिरव नसुन लाल होत. लाल गवतावर आजुबाजुला शेकडोने सुकलेली चौकलेटी रंगाची झाड होती-ज्या झाडांना आपन बिनकामाचे समजतो ! प्रेत जालण्यासाठी वापरतो.. कारण ह्या झाडांवर फळ येत नसतात त्याचा आयुष्य संपलेले असत.! परंतु ह्या जगात सर्वकाही वेगळ होत.त्या सुकलेल्या चौकलेटी झाडांवर वेग-वेगळ्या पद्धतीची चिकू,आंबे,पेरू,अशी फळ उगवुन आली होती.
" अद्भूत!" समर्थांनी अस म्हंणतच वर आकाशात पाहिल. सर्वसाधरणपणे मणुष्य वस्तीतल्या आकाशात,दिवसा पांढरट ढग दिसत असतात, रात्री निळ चांदण, आकाश गंगेतल्या टीम-टीमणा-या चांदण्या ह्या सर्वांची हजेरी असते! परंतु ह्या आकाशात काही औरच होत-
मोठ-मोठे काळे,निळे,हिरवे,जाडजुड खडकासारखे दगड त्या सप्तरंगी आकाशात इकडून तिकडे सरकताना दिसत होते. समर्थांनी हलकेच हे सर्व अकलनीय-अतर्कनीय , दृश्य पाहत -आपली पाऊले पुढे वाढवायला
सुरुवात केली. त्या सुकलेल्या झाडांमधुन एक वाट पुढे जात होती.त्याच वाटेवरुन समर्थांची चार-पाच पावल चालून झाली असतील की तेवढ्यात त्यांच्या पायाखाली असलेल्या लाल गवतात त्यांचा एकपाय
खड्डयात पडल्यासारखा रुतला गेला! समर्थ ह्या धोक्यापासुन पुर्णत अजाण होते ज्याने त्यांच पुर्णत शरीर पुढच्या दिशेने खाली जमिनीवर पडन्यास झुकल गेल-कोणत्याही क्षणी ते नाकावर पडनार होते! की अचानक आजुबाजुच दृष्य फुंकर मारल्यासारख पांढरट धुराचा लोट उडून बदल्ल. आता ते अंतराळात येऊण पोहचले, समर्थांच पुर्णत शरीर पुढच्या दिशेने झूकून अंतराळातल्या वातावरणामुळे हलक होउण एक गिरकी घेत पुन्हा सरळ झाल.समर्थांनी ह्या परिस्थितीत सुद्धा आजुबाजुला एक कटाक्ष टाकला. त्यांना आपल्या पुढे सूर्य मालेतले आठ ग्रह मंद गतीने फिरताना दिसले , आणि कानांत अंतराळातला विशिष्ट प्रकारचा (व्ह्वव्ह) आवाज ऐकु आला(येत होता).
समर्थ एक दोन क्षण त्या सुर्यमालेतल्या आठग्रहांकडेच पाहत राहिलेले. की तेवढ्यात त्यांची नजर सुर्याकडे गेली.गोल आगीचा विशाल गोला,ज्यात पुर्णत पृथ्वी नष्ट करण्याची बेचीराख करण्याची हिम्मत आहे! ज्याच्या समोर अणुबॉंब ही फिका पडेल अशा ह्या सुर्याला भुकंप आल्याप्रमाणे तड्या जाऊ लागल्या.. सुर्याच्या गर्भातुन सोनेरी रंगाचा प्रकाश वेगाने बाहेर पडून एक मोठा कानठळ्या बसवणारा आवाज त्याचा विशालस्फोट झाला. स्फोटाने सुर्याचे तप्त लाव्ह्यासारखे मोठ-मोठाले तुकडे बाकीच्या ग्रहांच्या दिशेने फेकले गेले ! पाहता-पाहता ते ग्रह सुद्धा धाड-धाड करत फुटले .हे असले भयाण दृष्य पाहुन समर्थांनी आपला एक हात हलकेच चेह-यावर धरला. समर्थांचेश्वास वाढले होते-ह्दयाची धड-धड काळजात कळ उठवत होती! घशाला भयाने ग्रासून कोरड पाडली होती.कपालावरुन घामाचे ओघळ..भीतीने हो भीतीनेच म्हंणा! अगदी धबधब्या सारख वहात होते.
समर्थांनी अद्यापही आपल्या डोळ्यांवर हात ठेवला होता, श्वास अद्यापही वेगाने आत-बाहेर होत-होते. पुर्णत देह स्टेच्यु सारख थांबल होत.की त्याच अवस्थेत
"क्रूणाल! " समर्थांच्या कानांत एक ओळखीचा आवाज घुमला.
तो आवाज ऐकून समर्थांची श्वावासांची गती सुधारली-बंद पापन्यांन आडून ,डोळे डावी उजवीकडे फिरले, तोंडातून काही शब्द बाहेर पडले.
" अप्पा !"


क्रमश: ...

वेगळेच विश्व,वेगळेच ब्रम्हांड..
अद्भूत आहे , इथल्या दुष्यांची चाल..
फसव आहे , दृष्य सार...
येहूधीचाच.. मायाजाळ

आहे..हा बहुविश्वाचा...वेडाजाळ..कथेविषयी काय वाटत ते नक्की सांगा!
धन्यवाद 🙏🏼😊 ..कंमेंट सेक्शन मध्ये..
5 स्टार देऊन....!

कथा आता आंतिम मार्गावर येऊन ठेपली आहे वाचक मित्रांनो!
लवकरच हा चापटर 1 संपेल..आंणि दुसर चाप्टर..पुढील वर्षी नक्की येइल..!🙏🏼😊

Rate & Review

jayesh zomate

jayesh zomate Matrubharti Verified 4 months ago