दुसऱ्या दिवशी सकाळी....
अन्वीला पहिले सकाळी जाग येते....
ती झोपेतून उठून बसते , तस तिच लक्ष युग कडे जात....
तो किती शांत झोपला होता , बघावं तेव्हा टेन्शन घेत फिरत असतो... झोपताना किती टेन्शन फ्री वाटत....
अन्वी त्याच्या जवळ सरकत ती त्याच्या केसांवरून हात फिरवत स्वतःशीच हळू आवाजात बोलत असते " युग आय एम सो लकी तू माझ्या आयुष्यात आहेस.... आणि खूप सार थँक्यू मला इतकं प्रेम दिलस , सांभाळून घेतलस.... तू नसता तर मी कशी राहिली असती , आता तर मी डिप्रेशन मध्ये जाऊन फार वेडी झाली असते.... पण तू मला त्यादिवशी सांभाळून घेतलं त्या खोट्या दुनियेतून मला खूप लांब घेऊन आलास जिथे कोणताही त्रास नाही , पण तू स्वताला त्रास करून घेतोस ते नाही आवडत मला.... तुझ्याशिवाय कोणी नाही रे युग , दादा माहीत नाही कुठे आहे त्याची खूप आठवण येते रे प्रत्येक वेळी तो ठीक तर असेल ना की कोणत्या संकटात फसला तर नसेल ना याची अनामिक भीती दाटून येते.... पण मला माहित तू शोधूनच काढशील दादाला , विश्वास आहे तुझ्यावर तेही स्वतः पेक्षा जास्त....तसा माझा नवरा खुच इंटेलिजन्स आणि क्युट आहे , मला तर तुझ्यावर खूप प्रेम करावस वाटत आहे...."
युग डोळे बंद करूनच बोलतो " मग कर ना , कोणी अडवल आहे.... मी तुझाच नवरा आहे...."
अन्वी त्याच्या कडे बघत थोडी दूर होऊन " तू जागा आहेस...."
युग " हो , तू जवळ आलेली तेव्हाच जाग आली मला , मी डोळे उघडणार तर तू बोलायला सुरुवात केली , मग मी तसाच पडून राहिलो...."
अन्वी बेडवरून उठणार तर युग तिला आपल्या अंगावर जवळ ओढुन घेत " कुठे चाललीस आता तर बोलली होती ना तुझ्यावर खूप प्रेम करावस वाटत आहे ते , मग कर ना मी अनुभवायला तयार आहे...."
अन्वी लटक्या रागात त्याच्या छातीवर हलक मारत लाजून " युग जा बाबा..."
युग सिडेक्टीव आवाजात " हाय आपका ये शर्माना..."
अन्वी लाजत च त्याच्या छातीत चेहरा लपवत गोड आवाजात " युग...."
तिच्या अश्या गोड बोलण्याने युग गालात हसतो....
युग तिची फिरकी घेत " मग मॅडम काल सोहम बोलत होता तस आपण कंन्टीन्यू रोमान्स करायचा...."
युग च्या अश्या बोलण्यावर अन्वी लगेच त्याच्या मिठीतून बाहेर येते आणि त्याला डोळे मोठे करून दटावत " युग , काहीही काय.... तुला फ्रेश नाही व्हायचं का बाकीचे उठले असतील...."
युग " त्यांचं जाऊ दे ते आपापल्या पार्टनर सोबत रोमान्स करत असतील , आपण पण करूया मग...."
एवढ बोलून युग तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवायला जाणार तर अन्वी त्याच्या ओठांवर बोट ठेवते आणि थोडी दूर होत " नाही.... चल उठ फ्रेश हो लवकर तोपर्यंत मी नाष्ट्याच बघते...."
ती उठून जाणार तर युग लगेच तिला आपल्या जवळ खेचतो आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवत तिचे ओठ चाखतो.... हे अचानक झाल्याने अन्वी चे डोळे मोठे होतात नंतर तीही हळू हळू डोळे बंद करून त्याला प्रतिसाद देते.....
थोड्या वेळाने ते बाजूला होतात.....
युग तिच्या कपाळावर ओठ टेकवत , नाकावर नाक घासत तिला आपल्या मिठीत सामावून घेतो , तीही त्याच्या मिठीत सामावून जाते.....
इथे सोहम आणि नेत्रा उठून फ्रेश होऊन आपापली तयारी करत असतात....
नेत्रा ओठांवर लिपस्टिक लावत असते , तस सोहम च लक्ष तिच्या कडे जात तो अनामिष नजरेने तिला बघत असतो....
तिने लाईट येल्लो कलर ची साडी नेसली होती.... गळ्यात नाजुकश्या मंगळसूत्र शिवाय दुसर काही घातलं नव्हत , केस अर्धे घेऊन मोकळे सोडले होते , चेहऱ्यावर हलकासा मेकअप , वन साईड पदर सोडला होता.... नेत्रा खूपच सुदंर दिसत होती आज....
तिला बघून सोहम शिट्टी वाजवू लागला....
शिट्टीच्या आवाजाने नेत्रा त्याच्याकडे न बघता बोलते , कारण तिला माहित आहे त्याने शिट्टी का वाजवली तरीही ती बोलते " काय मिस्टर सोहम आज चक्क शिट्टी.... "
सोहम हसत शिट्टी वाजवत तिच्या कडे जात पाठून मीठी मारत तिच्या खांद्यावर अनुवटी टेकवत बोलतो " आज माझी बायको जास्तच सेक्सी दिसत आहे ना म्हणून.... एक काम करू आज दिवसभर या रूम मध्ये रोमान्स करू खाली नको जायला काय म्हणते... "
त्याच्या अश्या बोलण्याने नेत्रा ने मनातच कपाळावर हात मारून घेतला आणि त्याच्या हातावर एक चापट मारत त्याचा हाताचा विळखा सोडवून मागे वळून त्याला लटक्या रागात " चावटपणा पूरे हा....चल खाली लवकर वाट बघत असतील बाकीचे...."
एवढ बोलून ती तिथून निघाली....
सोहम " अरे मी काय चावटपणा केला...."
सोहम बोलत मागे वळून बघतो तर नेत्रा कधीच रूम बाहेर निघून गेली होती.....
सोहम पण मग केसांवर हात फिरवत तोही रूम बाहेर निघून गेला.....
अनाया आणि वेद च्या रूम मध्ये.....
अनाया फ्रेश होऊन वेद ला उठवत असते , पण वेद काही केल्या उठत नाही....
मग ती बाथरूम मध्ये जाऊन एक छोटी बकेट पाणी घेवून बाहेर येते आणि वेद च्या अंगावर टाकते....
तसा वेद खाडकन झोपेतून उठतो , त्याला आता काय झाल होत काही समजल नाही.... नंतर अनाया ला हसताना आणि तिच्या हातात बकेट बघून वेद काय समजायचं ते समजून गेला....
वेद वैतागून रागात अनाया ला " काय केलं हे तू...."
अनाया हसू थांबवत भोळेपणाचा आव आणत " अरे इतकं रागवायला काय झालं मी तर फक्त तुला उठवत होती...."
वेद " मग काय अस उठवतात...."
अनाया " कस उठवतात मग , मला तर हीच ट्रिक माहीत आहे...."
वेद अंगावरच पांघरूण बाजूला करत " थांब सांगतो कस उठवतात ते...."
वेद तिच्या जवळ उठून येत असताना ती पटकन तिथून निसटते , तसा वेद पण तिच्या मागे लागतो....
हे दोघ बेड ला गोल धावत असतात....
शेवटी वेदच्या हातात अनाया सापडते.....
वेद तिला दोन्ही हातांनी लॉक करत घट्ट पकडून " आता कुठे पळशील , सांगतो आता झोपेतून कस उठवतात ते.... "
अनाया त्याच्या तावडीतून सुटण्याचा निष्फळ प्रयत्न करत " वेद सोड.... पटकन फ्रेश हो खाली जायचं आहे...."
वेद नकारार्थी मान हलवत " नाही.... आधी तुला नीट शिकवू तर दे झोपेतून कस उठवतात ते...."
अनाया विनवणी करत " वेद सॉरी ना.... सोड प्लीज...."
वेद " नो वे.... तू चूक केली आहेस शिक्षा तर भेटली पाहिजे.... "
अनाया " कोणती शिक्षा..."
वेद " मॉर्निंग किस पटकन पाहिजे नाही तर यातून सुटका नाही तुला...."
ती कितीही नाही बोलली तरी वेद काही ऐकणार नव्हता म्हणून ती त्याच्या ओठांवर ओठ टेकवत मॉर्निंग किस देते....
थोड्या वेळाने सगळे एकत्र खाली जमतात , नाष्टा करून सगळे मज्जा मस्ती करायला बाहेर निघून जातात.....
पूर्वाच घर....
पूर्वा आपल्या रूम मध्ये बंद खोलीत....
मोबाईल वर काही तरी चाळत होती....
तिला पाहिजे ते भेटल्यावर तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता....
ते इंस्टाग्राम वर एका मुलाचं अकाउंट होत पण ते एक प्रायव्हेट होत आणि त्यात त्याचा एकट्याचा फोटो म्हणून डीपी ठेवला होता , तेच फोटो बघून पूर्वा खुश झाली आणि तिने लगेच फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली.....
पूर्वा स्वतःशीच हसत त्या डिपीतल्या फोटो कडे बघत " आधी याला आपल्या जवळ करेन त्यादिवशी तर माझ्या मनातल काहीही न ऐकता निघून गेला.... पण आता नाही लवकरच माझं तुझ्यावरच प्रेम व्यक्त करेन...."
क्रमशः
- भाग्यश्री परब