Rabta - 11 in Marathi Love Stories by Bhagyashree Parab books and stories PDF | राबता - अ क्रेझी लव्ह... - 11

राबता - अ क्रेझी लव्ह... - 11

तेज च्या बोलण्याने सगळे पटकन मागच्या दरवाज्याने बाहेर येतात.... आणि तिथून पळून जातात....




थोड्यावेळाने ते तेज च्या बंगल्यावर येतात.....


बंगल्याच्या आत येताच तेज सुटकेचा श्वास घेतो आणि सोफ्यावर आरामात रेलून बसतो....


जिया पण तेज च्या सोफ्याच्या समोर रिलॅक्स होऊन बसते....


थोड्या वेळाने एक नोकर पाण्याचा ट्रे टेबलवर ठेऊन निघून जातो तसे ते दोघ पटकन पाण्याचा ग्लास उचलून घडाघडा पाणी पितात.....



जिया पाण्याचा ग्लास ट्रे वर ठेऊन " बर झाल लवकर पळालो तिथून नाही तर आता जेल मध्ये असतो...."


तेज " हो , मुळात वाचलो...."


जिया " हम.... आणि तो मेलेला माणूस त्याच्याकडून काय भेटणार होत की त्याला एवढ टॉर्चर करत होतास...."



तेज " तोच एक होता जो अन्वी आणि युग कुठे आहेत ते सांगणार होता... पण काही एकही शब्द बोलायला तयार नव्हता , म्हणतो काहीही कर मारून टाकल तरी चालेल पण मी कधीच सांगणार नाही की ते दोघ कुठे आहेत...."



जिया विचार करत " याला कस माहीत की ते दोघ कुठे आहेत...."


तेज " तो त्या दोघांचा खूपच जवळचा मित्र आहे..."


जिया " नाव काय त्याच..."


तेज " आद्विक...."


जिया " व्हॉट ? हा कसा भेटला तुला.... हा तर आऊट ऑफ इंडिया होता ना...."


तेज मुश्किल हसत " हा इथेच होता इंडिया मध्ये.... त्याने फक्त तिकीट घेऊन ठेवली होती... पण तो गेला नाही कुठे हे आम्हाला चौकशी केली तेव्हा समजल , मग काय आणल उचलून.... एक मिनिट तू याला कस ओळखते ?..."


जिया काही बोलणार तर एक माणूस घाबरतच त्यांच्या समोर येतो....


त्याला अस आलेलं बघून तेज " काय झाल ? इतका का घाबरला आहेस ?...."


तो माणूस अडखळत " स...स.... सर...ते...."


तेज तो नीट बोलत नाही म्हणून रागात " नीट बोलला नाहीस ना तर.... मी आता काय करेल याचा विचारही केला नसेल...."


तेजला अस रागात बघून तो एका दमात बोलतो " सर तो आद्विक पळून गेला...."



आद्विक पळून गेला हे ऐकुन जिया आणि तेज जबरदस्त शॉक होतात......


तेज च तर तळपायाची आग मस्तकात जाते तो भयंकर रागात " तो मेलेला ना असा कसा जिवंत.... म्हणजे त्याने फक्त नाटक केले होते... पण तो अश्या अवस्थेत नाही पळू शकत कोणी तरी आहे जो त्याच्या सोबत आहे....( त्या माणसाकडे बघत....) तुम्ही काय झोपला होता काय रे.... जर तो भेटला नाही ना तर बघा मी काय करेन...."




एवढ बोलून तेज तर तिथे असलेला एक काचेचा ग्लास उचलून त्या माणसाच्या दंडावर जोरात मारतो....


तसा तो माणूस कळवळतो....



तेज त्या माणसाला बघून " इथे माझा तोंड का बघत बसला आहेस जा इथून...."



तो माणूस शरमेने खाली मान घालून " सॉरी सर.... परत अशी चूक नाही होणार...."


त्या माणसाच्या बोलण्याने तेज आणखी रागात येऊन हाताच्या मुठी आवळून दात ओठ खात थंड आवाजात " तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का... जा इथून...."



तेज च रागीट चेहरा बघून तो माणूस लगेच तिथून निघून जातो....



तो माणूस तिथून निघून गेल्यावर तेज रागातच दुसरा काचेचा ग्लास तिथेच खाली जोरात फेकून देतो आणि स्वतःशीच " त्या आद्विक ची ज्याने कोणी मदत केली आहे ना त्याला तर मी अजिबात सोडणार नाही आणि सोबत आद्विक , युग आणि अन्वी.... या चौघांना अशी शिक्षा करेन की त्या नशिबाला पण या चौघांची दया येईल...."



जिया " आधी त्या पळवून घेऊन गेला त्या माणसाची तरी कुंडली काढ.... ( तसा तो शांत होतो....) काढू शकतोस का , नाही ना.... तू साधं अन्वी आणि युग ला शोधू शकला नाहीस , मग त्याला कस शोधशील...."



जियाच्या बोलण्याने तेज पूर्ण शांत होतो....


जिया " आता शांत का आहे... अजुन रागव ना...."


तरीही तेज शांत होता.....



जिया " ऍनी वेज यापुढे जरा रागाला बाजूला ठेव आणि शांत विचार कर.....आता मी काय सांगते ते ऐक , माझ्याकडे एक प्लॅन आहे...."


तसा तेज लगेच तिला बघतो आणि बोलतो " ओके , बोला.... काय प्लॅन आहे ?....."


जिया त्याच्या समोर बसत त्याला प्लॅन सांगते......











युग आणि अन्वीच घर......


युग आणि अन्वी आपल्या बेडरूम मध्ये बोलत असतात....



अन्वी यूगच्या केसांवरून हात फिरवत असते आणि युग तिचा सहवास घेत असतो....


युग ला शांत बघून अन्वी " युग आज शांत शांत का.... काही प्रॉब्लेम झाल आहे का.... पूर्वा काही बोलली का...."


युग त्याच्या केसांवर फिरणारा हात आपल्या हातात घेत त्यावर किस करत " नाही पूर्वा काही नाही बोलली...."


अन्वी " मग अस शांत का आहेस... खर खर सांग उगाच स्वताला त्रास करून घेतोस , एक तर तुझ डोक खूप दुखत असत आणि तुला त्याची काळजीच नाही...."


अन्वी ची बडबड ऐकून युग लगेच उठून तिच्या ओठांवर बोट ठेवत " श्श्श् किती ती बडबड.... आणि मी शांत आहे कारण माझी बायको आज प्रेम करतेय म्हणून...."


अन्वी डोळे बारीक करून " म्हणजे इतर वेळी नाही करत का..."


युग " करते ना पण आज जास्तच आलंय ना म्हणून..."


अन्वी त्याच्या दंडावर तीन चार फटके मारत " ह युग नालायक , मूर्खा...."


युग तिचे दोन्ही हात पकडुन बाजूला करत मिठीत घेत " मला माहित आहे तू खूप प्रेम करते माझ्यावर मला त्रासात बघून तुलाही त्रास होतो..... थँक्यू अन्वी माझ्या लाईफ मध्ये आल्या बद्दल... आय लव्ह यू...."


अन्वी मीठी घट्ट करत " लव्ह यू टू युग..."


युग " मगाशी मला नालायक , मूर्खा म्हणाली याची शिक्षा तर भेटणार तुला...."


अन्वी मिठीतून लगेच बाहेर " काय ?...."


युग मिश्कीलपणे तिच्या ओठांकडे बघत तिला हसत असतो...


युग ला काय पाहिजे समजल्यावर अन्वी लगेच उठून पळत दारापर्यंत येत " तुला पाहिजे ते नाही भेटणार समजल...."


युग " येय ही चीटींग आहे... बोलणार नाही हा मी मग रडत बस नंतर...."


अन्वी त्याला वाकुल्या दाखवत " नाहीच भेटणार...."

एवढ बोलून ती तिथून निघून जाते....


इथे युग स्वतःशीच " मी घेऊन च राहणार बघू कशी नाही देत ती... तुला द्यावच लागेल मिस सुमो गर्ल...."


तोही मग तिथून निघून जातो.....









एका जुन्या घरात....


एक व्यक्ती रागातच समोरच्या पाच व्यक्तींना बघत असते....


ती व्यक्ती रागातच त्यांना " तुमची हिम्मत च कशी झाली परत यायची म्हटलेलं ना त्याला पकडल्याशिवाय परत यायचं नाही.... मनोज तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तू असा निघशिल वाटलच नव्हत... द ग्रेट मनोज रिकाम्या हाती पहिल्यांदा परत आला...."


मनोज " बॉस आम्ही गेलो होतो , पण तो तिथून पळून गेला आणि ते वॉचमन ने धमकी दिली त्यामुळे आम्हाला तिथून निघून यावं लागलं...."


ती व्यक्ती आणखी रागात " काय तू एका साधारण वॉचमन च्या धमकी ला घाबरला..... आणि त्या वॉचमन ची हिम्मत च कशी झाली उलट बोलायची , चल मला तिथे घेऊन बघतोच त्या वॉचमन ला....."


तसे ते सगळे तिथून निघून जातात.....








पूर्वा च घर......


पूर्वा च्या वडिलांनी अंजूनही तिच्या बेडरूम च दार उघडल नव्हत.....



पण पूर्वा आहे ती काहीही करू शकते.....

आणि तिने तस केल पण.....


क्रमशः


- भाग्यश्री परब