Rabta - 9 in Marathi Love Stories by Bhagyashree Parab books and stories PDF | राबता - अ क्रेझी लव्ह... - 9

राबता - अ क्रेझी लव्ह... - 9

पूर्वाच घर...

पूर्वा दरवाजा जोरात वाजवत होती.... रात्र झाली होती तरी कोणी दरवाजा उघडला नव्हता , अशोक ने ऑर्डर देऊन ठेवली होती... आणि धमकी पण दिलेली जो कोणी दरवाजा उघडेल त्याची हालत खूपच खराब होईल

पूर्वा ओरडत रागात " दार उघडा , मी इथून बाहेर पडले ना तर एकेकाला बघेन...."

पण कोणी ऐकलं नाही सगळे तिला इग्नोर करत होते....

दरवाजा कोणी उघडत नाही म्हणून ती विनवण्या करायचं सोडून देते आणि बेड कडे जायला निघते तर दरवाजा उघडल्याच आवाज येतो... ती मागे वळून जाणार तर कोणी तरी जेवणाच ताट आत ढकलत लगेच दरवाजा बंद केला होता....

पूर्वा धावत जाऊन परत दरवाजा वाजवते पण तिथे कोणी नसत त्याने फक्त जेवणाच ताट ठेवून तिथून गेलेला असतो.... तो पूर्वाच्या घरी काम करणारा एक नोकर असतो जे तिच्या वडिलांनी म्हणजेच अशोक ने त्याला तसं जेवण देऊन यायला सांगितलं होत....

काय करणार शेवटी ती त्यांची मुलगी होती... फक्त तिला एका चांगल्या वळणावर घेऊन जायचं होत.... पण त्यांना कोण सांगणार अस बेडरूम मध्ये कोंडून ठेऊन ती आणखी वाईट होईल.... शेवटी एक वडील मुलीच्या चांगल्यासाठी काहीही करेल....


कोणी नाही समजून पूर्वा तिथून बेड वर जाऊन बसते....
ती बसल्यावर तेवढ्यात फोन ची नोटिफिकेशन वाजते तस तिचं लक्ष फोन कडे जात , मग ती फोन हातात घेऊन नोटीफिकेशन बघते तर तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.....


कारण युग ने तिची फ्रेंडशिप रिक्वेस्ट आणि मेसेज रिक्वेस्ट असेप्ट केली होती.....


तशी ती त्याला पुढे मेसेज करू लागते....


पूर्वा " कसा आहेस ?...."


योगायोग म्हणजे युग ऑनलाईन असतो....


युग " मी मस्त आहे , तू ?...."


पूर्वा " मी पण मस्त...."

युग " ओके...."


पूर्वा " मग आणखी काय चालू आहे तुझ्या जीवनात...."


युग पुढे रिप्लाय देत नाही , पूर्वा ला वाटत तो ऑफलाईन गेला असेल म्हणून ती नंतर देईल रिप्लाय समजून तीही ऑफलाईन जाते आणि फोन बाजूला ठेऊन देते.....

आनंदातच ती जेवण करते....
जेवण करता करता ती मनातच " मी सांगू नाही शकत की किती खुश आहे मी , माझ्या मनासारखं होतंय युग ने फ्रेंडशिप रिक्वेस्ट असेप्ट केली जो मुलगा मला साधं बघायचा पण नाही त्यानेच मेसेज रिक्वेस्ट असेप्ट केली वाव.... मी थोड्या दिवसांनी त्याला माझ्या मनातल सांगेल त्याआधी या अन्वीचा बदला घ्यायचा आहे हीच्यामुळे माझी लाईफ मध्ये प्रॉब्लेम आलेत , हीची लाईफ अशी उध्वस्त करेन की कोणी विचारही केला नसेल..... जस्ट वेट अँड वॉच अन्वी मी येतेय लवकरच...."
युग आणि अन्वीच घर....


पूर्वा ने त्याच्या जीवनाबद्दल प्रश्न विचारलेले आवडल नव्हत म्हणून तो चिडून ऑफलाईन जातो , त्याच्या बाजूला बसलेली अन्वी त्याला अस चिडलेले बघून तिला हसू येत होत पण तिने हसू आतच दाबले , नाही तर युग साहेब आणखी चिडायचे....


अन्वी आपले हसू दाबत युग ला " आता अशी चिडचिड करशील तर तिच्या मनात काय चालू आहे ते कस समजेल...."


युग चिडूनच अन्वी ला " तुला माहीत आहे ना कोणी माझ्या जीवनाबद्दल विचारलेले आवडत नाही..... आणि ते या मुलीने विचारल मग चिडू नाही तर काय करू...."


अन्वी हसत " युग शांत हो बाबा.... मी विचारल होत तेव्हा तर एवढी चिडचिड नव्हती केलेलीस हा...."


युग " तू माझं प्रेम होतीस तेव्हा म्हणून तू विचारलेली प्रत्येक गोष्ट आवडायची मग त्यात चिडचिड कसली... आणि तुला हसायला काय झाल आहे....."


अन्वी " तू अशी चिडचिड करतोय म्हणून हसू येतेय खूप...."


युग आणखी चिडून " अन्वी , यार...."


अन्वी आपल हसू दाबत " सॉरी सॉरी...."


युग " खूप हसू येतेय ना , थांब तू....."


एवढ बोलून युग पटकन तिला जवळ घेत आपले ओठ तिच्या ओठांवर ठेवतो.....श्वास फुलतो तसं युग अन्वी ला बाजूला करतो.....
तशी अन्वी त्याला लटक्या रागात दंडावर हलक मारते....युग तिचे हावभाव बघून हसतो , तशी अन्वी पण हसत त्याला मीठी मारते....


अन्वी युग च्या मिठीतून बाहेर येत त्याला " युग पूर्वा च्या मनातल जाणून घ्यायचं असेल तर या गोष्टींचा सामना करावा लागेल.... मला माहित आहे तुला पर्सनल विचारलेले प्रश्न आवडत नाही तरी तिला उत्तर द्यावच लागेल , तुला उत्तर द्यायचं नसेल तर दुसर तिला पटेल अस उत्तर दे.... "

युग " हो...."

अन्वी हसत " ओके... शांत हो आता एवढी चिडचिड चांगली नाही , माझा विश्वास आहे तुझ्यावर.... काहीही झालं तरी अंतर नाही देणार तुला...."

युग " थँक्यू अन्वी.... लव्ह यू...."


अन्वी " लव्ह यू टू.... चल जेवायला जेवण रेडी आहे...."


युग " हो , चल...."

एक व्यक्ती जीव तोडून रस्त्यावरून धावत होता....
त्या व्यक्तीच्या कपड्यावर कुठे ना कुठे छिद्र पडले होतें आणि खरचटले होते....


तो धाय मोकलून पळत होता....शेवटी तो त्याचा इच्छित ठिकाणी आला....
तो व्यक्ती एका छोट्या बंगल्याजवळ उभा होता , तसा तो बंगल्याचा गेट उघडून आत आला... नशीब तिथे वॉचमन नव्हता नाही तर त्याला अश्या अवस्थेत बघून बाहेरच हाकलून दिले असते.....


तो व्यक्ती चालत त्या बंगल्याचा दरवाज्याजवळ येऊन उभा राहतो आणि बेल वाजवतो....


काही मिनिटांनी एक बाई दार उघडते आणि समोर त्या व्यक्तीला बघून तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागत ती रडतच त्या व्यक्तीला मीठी मारते.... तस तो व्यक्ती पण तिला रडतच मीठी आणखी घट्ट करतो....


अन्वी च घर...


अन्वीची आई काव्या योगेश ला " अन्वी बद्दल काही माहीत पडल का..."

योगेश " नाही अजुन माहीत नाही कुठे असेल आपली मुलगी....खूप शोधल कुठून कुठून माहिती काढायच प्रयत्न केले पण कुठेच अन्वी बद्दल समजल नाही...."


काव्या " अन्वी ने एकदा तरी विचार करायचा होता आपला कस राहू आपण तिच्याशिवाय...."

योगेश " तिने आपलाच विचार केला होता , आपल्याला त्रास होऊ नये म्हणून ती दूर निघून गेली.... इतकी दूर की आपण शोधू शकत नाही..."


काव्या " अन्वी कुठे आहेस तू बाळा...."


थोड वेळ शांतता पसरते....

काव्या अडखळत योगेश ला " अहो , एकदा शुभम..."


शुभम च नाव ऐकून योगेश ला खूप राग येतो ते रागातच काव्या ला " त्याच नाव पण नको घेऊ.... त्याला किती विचारल तर त्याने एका शब्दाने पण सांगितलं नाही की
अन्वी कुठे गेली ती.... मी त्याला कधीच माफ नाही करणार , त्याने तिला थांबवायचं सोडून तिला अस कस जाऊ दिल..."


एवढ बोलून योगेश रूम मधून रागातच बाहेर निघून जातात...


इथे काव्या हात जोडून वर बघत " देवा सगळ सुरळीत कर हात जोडते मी...."


इकडे तेज एका व्यक्तीची कॉलर पकडून त्याला रागात " बोल पटकन अन्वी कुठे आहे...."


तो व्यक्ती " तू काहीही कर मी नाही बोलणार समजल....."


तेज चा राग लिमिट च्या बाहेर गेलेला असतो....

तेज डोळ्यात अंगार आणून त्या व्यक्तीला " तू असा नाही ऐकणार थांब...."


तेज त्या व्यक्तीची एका हाताने कॉलर पकडून तिथे असलेल्या एका खुर्चीवर ढकलून देतो तसा तो व्यक्ती खुर्ची सकट खाली पडतो , मग तेज एका हाताने त्याची कॉलर पकडून ती खुर्ची एका पायाने उभी करत त्या व्यक्तीला त्या खुर्चीवर व्यवस्थित बसवतो आणि तो त्या व्यक्तीच्या समोर जाऊन बसतो....


तेज त्या व्यक्तीला " शेवटच विचारत आहे बोल...."


तो व्यक्ती " नाही.... तू काहीही कर मला संपवून टाकल तरी चालेल मी नाही बोलणार...."


तेज राक्षसी हास्य आणत " नाही...."


तेज पटकन त्याचा एक हात टेबलवर ठेवून त्याच्या मनगट आणि बोटांच्या मध्ये जोरात चाकू मारतो....


तस त्या व्यक्तीचा आवाज चारही बाजूने घुमतो.....आणि ती व्यक्ती जागीच बेशुद्ध होते.....तेज तिथे असलेल्या एका व्यक्तीला रागाने " याला कितीही टॉर्चर करा याच तोंड उघडलं पाहिजे नाही तर यांच्यासारखी तुमची पण अशीच हालत करेन...."


एवढ बोलून तेज तिथून रागातच निघून जातो....क्रमशः

- भाग्यश्री परब