Ankilesh - 6 in Marathi Love Stories by Nitin More books and stories PDF | अंकिलेश - एक प्रेमकथा - 6

अंकिलेश - एक प्रेमकथा - 6

@ अंकिता

काही म्हणा, मुंबईतली बेस्ट इज बेस्ट! म्हणजे मुंबईत बसेसची कंपनी बेस्ट नावाची आहे. त्या बसने केईएम हाॅस्पिटलच्या कँपस मध्ये पोहोचले अगदी तेव्हापर्यंतही तिथे येण्यासाठी कुठला बहाणा सांगावा हे ठरवले नव्हते. आय सेड आय विल डिसाइड ॲट द लास्ट मोमेंट. विल बिल्ड द ब्रिज व्हेन हॅव टू क्राॅस द रिव्हर! नाहीतर किंवा अगदी हिंमत करून खरे खरे सांगूनच टाकेन. आर या पार! शेवटी इजन्ट द ट्रूथ इटर्नल? अँड अख्खि'ज बाॅडी लँग्वेज टेल्स मी, ही डझ लाईक मी टू! त्या लाल बसमध्ये मी खूप दिवसांनी बसलेले. म्हणजे खूप पूर्वी मी हट्ट केला तेव्हा पपा घेऊन गेलेले. एका संडेला. पूर्ण व्हीटी एरियात फिरवून आणलेले. पण आय वाॅज अ स्माॅल गर्ल देन. त्यानंतर डायरेक्ट आज. ते ही डबल डेक्कर मध्ये. गंमत म्हणजे टिल दॅट डे आय युझ्ड टू थिंक, वरच्या मजल्यासाठी पण एक वेगळा ड्रायव्हर असतो म्हणून! तशी बस रिकामी होती. पण आधी कुणी तरी बसलेला असेल त्या जागी, तर हाऊ डू आय सिट देअर? आधी मला वाटलं तसं म्हणून मी उभीच राहिले.. तर कंडक्टर म्हणाला, ताई बसून घ्या. मी दुर्लक्ष केले नि तेवढ्यात ड्रायव्हरने मोठा ब्रेक मारला.. आय स्टंबल्ड.. मग म्हटले आता बसायलाच हवे. सीटवर बसले, वरच्या मजल्यावर खिडकीतून वारा मस्त येत होता. आमच्या लव्हस्टोरीत ही बस महत्वाची. कारण पुढे मी आणि अख्खि बसमधून खूप फिरलो. वरच्या मजल्यावरची ती पहिली सीट बेस्ट. तिथे हवा मस्त येते नि समोर सगळे दिसतही असते. आजूबाजूची रियालिटी अशी पब्लिक ट्रान्स्पोर्टमधूनच जास्त रियली जाणवते. एनी वेज, आय वाॅज टेलिंग अबाऊट माय व्हिजिट टू केईएम .. त्याआधी हल्लीची गंमत.. म्हणजे अख्खि म्हणतो मला,"तू आहेस ना, तू म्हणजे आहेस अगदी जाना था जापान पहुंच गए चीन!"

"नाऊ व्हाॅट डझ दॅट मीन?"

"इट मीन्स एखादी गोष्ट तू सुरू कुठून करतेस नि सांगता सांगता पोहोचतेस कुठे सांगता यायचे नाही! अगदी तुला स्वत:ला देखील!"

मी म्हटले,"नाऊ यू नो, दॅट्स द सिक्रेट आॅफ माय स्कोअरिंग इन आॅल एक्झाम्स! कन्फ्यूज द एक्झामिनर!"

"सो यू आर कन्फ्यूशियस?"

त्याचा हा विनोदी स्वभाव तेव्हा आवडायचा मला..

सो अबाऊट दॅट व्हिजिट..

केईएम कँपस मध्ये पोहोचले मी, तर आय डिडन्ट नो अख्खिला शोधावे कुठे नि कसे? फक्त आय न्यू देअर आर लेक्चर हाॅल्स अँड लॅब्स. बट ही हॅड मेन्शन्ड देअर फेव्हरिट प्लेस.. काॅलेज कट्टा. जस्ट आऊटसाइड द कँटिन. बाजूलाच लायब्ररीही आहे. पाठी टेनिसकोर्ट. म्हणजे ही जागा इकडेतिकडे लक्ष ठेवण्यासाठी बेस्ट! पुढे तो एकदा म्हणाला ही, नव्या ग्रँड जुनियर गर्ल्स येतात ना, त्यांना पाहण्यासाठी ही जागा बेस्ट! अख्खि असे काही करत असावा? मी विचारले तर म्हणाला,"नॅचरली. मेडिकल काॅलेजचा हा एक फायदा! इंजिनियरिंग हॅज टू फ्यू गर्ल्स!"

"ओह! म्हणून तू मेडिकलला आलायस की काय?"

"अर्थात!"

"मग? मिळाली की नाही कुणी गर्लफ्रेंड?"

"छे ग! शोधतोय! व्हेकन्सी आहे!"

"यू नो सम पीपल हॅव नियर व्हिजन!"

"म्हणजे?"

"नथिंग! कशी हवीय तुला गर्लफ्रेंड?"

"कसली गर्ल नि कसली फ्रेंड यार! आम्ही नुसतेच बघणारे.. पण त्यापुढे काही नाही!"

हे खरेच होते. आमच्या स्टोरीत मी पुढे गेले नसते तर ही वुडन्ट हॅव स्टेप्ड अहेड. म्हणजे तसा तो शाय ही आहे, नि ॲज ही हॅड सेड लेटर आॅन, ही कुडन्ट ॲफोर्ड टू वेस्ट टाइम इन आॅल धिस!

"वेस्टिंग टाइम? यू मीन तू माझ्याबरोबर तुझा टाइम वेस्ट करतोयस?" आय हॅड सेड इट ॲंग्रिली.. इव्हन दो आय हॅड रियलाइझ्ड व्हाॅट ही ॲक्च्युअली मेन्ट. त्यावर तो म्हणालेला,

"नॅचरली! एवढ्या वेळात लव्ह अँड बेलीतली चार पाच पेजेस वाचून झाली असती!"

"तू.. यु आर अ बुक वर्म अख्खि!"

"आणि तू? रिंग वर्म, राउंड वर्म की पिन वर्म?"

जस्ट फाॅर इन्फो, धिज आर द टाइप्स आॅफ वर्म्स फाउंड इन ह्यूमन्स!

यू नो, मला असे अखिलेशसारखे जमिनीवर पाय आणि हेड आॅन शोल्डर्स असणारे लोक आवडतात. दे आर काॅन्फिडंट अबाउट सेल्फ आणि नाॅट ॲपोलोजेटिक अबाऊट देअर विकनेसेस. हे लोक इन अ गिव्हन सिच्युएशन, कम आऊट विथ फ्लाइंग कलर्स.

साॅरी, आय स्टार्टेट वाँडरिंग अगेन..

तर कट्ट्यावरची भेट..

गेट मधून आत शिरताना आय डिडन्ट नो व्हेअर टू लुक फाॅर हिम. तो भेटेलच याची ही काहीच खात्री नव्हती. पण मी एकच विचार केला.. जस्ट डू इट. विचार न करणे हाच विचार! आणि इफ आय डोन्ट गो, शुअरली आय वोन्ट सी हिम! पुढे काही घडायचे असेल, रादर घडवायचे असेल तर हॅव टू टेक चान्स. आज नाही तर अजून काही चान्सेस. कधी न कधी तो भेटणारच. जाऊन जाऊन जाशील कुठे? आय वोन्ट लेट यू एस्केप!

मी इकडून तिकडे भटकत भटकत कॅंटिनजवळ पोहोचले. तिकडून बाजूच्या कट्ट्यावर.. आणि आय कुडन्ट बिलिव्ह! कट्ट्यावर अख्खि बसलेला. तो ही एकटाच. आपल्याच विचारात इतका गुंग की मी समोर आलेले दिसले नसेल त्याला? की तो माझाच तर विचार करत नसेल?

तो मला पाहून दचकला. एकाएकी उठून उभा राहिला, म्हणाला,"ओह! तू? व्हाॅट ब्रिंग्स यू हिअर?"

व्हाॅट? नाही, 'हू ब्रिंग्स मी हिअर' म्हणायला हवे! आता ही इम्तिहान की घडी है.. काय सांगावे? सांगू ह्याला.. ह्याच्यामुळे माझा सगळा बॅलन्स बिघडलाय. डोकं चालेनासं झालंय. आणि झोप उडालीय. ह्याला भेटण्यासाठी काय काय प्लॅन्स बनवतेय मी. नि आज न राहवून मी पोहोचलेच इथवर..

"नथिंग. इथे आलेले ना तर आय थाॅट आय विल से थ्यांक्स.."

"कशाबद्दल?"

"ते त्या दिवशी.. ट्राॅफी.."

"ओह ते.. त्यात काय एवढं.."

"तरीही. यू केम आॅल द वे.."

"ओके. थ्यांक्स फाॅर द थ्यांक्स! म्हणून यू केम आॅल द वे? इकडे कुठे काय काम?"

"का? येऊ शकत नाही?" मग एकाएकी मला पॅथोच्या पुस्तकाची आठवण आली..

"अरे, राॅबिन्सन'स पॅथाॅलाॅजी. लेटेस्ट एडिशन. आमच्या इथे मिळत नाही. इकडे मिळते का ते पहायला आलेय.."

"मग? मिळालं?"

"नाही.."

"नाही? आॅफकोर्स इट्स अव्हेलेबेल.."

"ते नाही. बुक स्टोअर.."

"म्हणजे?"

"आय कुडन्ट फाइंड द बुक स्टोअर.."

"काय सांगतेस? काल तर तिथेच होतं! हरवलं की काय? चल मी दाखवतो.."

मला दुसरे काय हवे होतं? भालानी बुक स्टोअर गेटच्या बाहेरच आहे मला ठाऊक होते. पण माझ्या रॅपिड थिंकींग ब्रेन मधून ही आयडिया चांगली मिळाली.. अख्खिबरोबर त्या दुकानात जाईपर्यंत काय काय विचार मनात येऊन गेले. एकदा वाटलं, लेट राॅबिन्सन गो टू हेल. याला सारं सांगावं. एवढी बडबडी मी. पण हवे ते शब्द तोंडावर येतील तर शपथ..

मग कारण नसताना मी राॅबिन्सनचे टेक्स्ट बुक विकत घेतले.. तेवढाच भालानीचा धंदा वाढला असणार! बाजूलाच सह्याद्री रेस्टाॅरंट होते..

"इफ यू ॲग्री दॅट आय वुड पे, चल इकडे काॅफी घेऊयात?"

"का? कँटिनमध्ये नको?"

"चालेल.."

मला काय? हे आमचे नायरचे कँटीन थोडीच होते? आणि जितका वेळ जास्त मिळेल तितका हवाच होता.

"तुला ते पुस्तक गाडीत ठेवायचे असेल तर.."

त्या राॅबिन्सनच्या जाड्या पुस्तकाकडे पाहात अख्खि म्हणाला.

"नो. इट्स ओके. आणि मी बसने आलेय. गाडी कशाला?" पुढे मी 'सवय व्हायला हवी' हे ही बोलले हळूच..

"काही म्हणालीस?"

"नाही. कुठे काय.."

आम्ही कँटिनमध्ये येऊन बसलो. इतक्या वर्षांनी तो दिवस मला अजूनही आठवतोय. शब्द न शब्द.. खरेतर घडले काहीच नाही. पण तरी ही..

Rate & Review

Nitin More

Nitin More Matrubharti Verified 8 months ago

Aquilon playz

Aquilon playz 8 months ago