Your companionship is like a moon in the sun - 7 in Marathi Love Stories by Bhagyashree Parab books and stories PDF | साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा - 7

साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा - 7

निव्या आणि विष्णू चा एवढा मोठा आवाज होता की वंश त्या आवाजाने पडता पडता वाचला..

वंश उठत वैतागून " अरे काय कीटकीट आहे... " एवढ बोलून रूमच्या बाहेर आला..

बाहेर आल्यावर मोठ्या आवाजात " नीलिमा काकी..."

वंश ने आवाज दिल्याने नीलिमा काकी पाच मिनिटांनी त्याच्यापुढे हजर...

नीलिमा आल्यावर वंश " सकाळी सकाळी एवढ्या मोठ्याने कोण ओरडल..."

नीलिमा " माहीत नाही वंश बाबा.. आवाज तर बाहेरून आला..."

वंश " बाहेरून.. ठीक आहे मी बघतो , तुम्ही नाष्ट्याच बघा..."

नीलिमा " हो वंश बाबा..." एवढ बोलून नीलिमा किचन मध्ये निघून गेली...


नीलिमा गेलेली बघून वंश लगेच बाहेर निघून आला.. त्याने इकडे तिकडे बघितल ते निव्या आणि विष्णू एका कोपऱ्यात उभे असलेले दिसले सोबत त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती... निव्या आणि विष्णू सोबत बाकीचे बॉडी गार्ड पण तिथे होते.. त्याला समजायला वेळ नाही लागला की तिथे काही तरी झाल आहे...


वंश तिथे जातो तर तो समोरच दृश्य पाहुन स्तब्ध होतो आणि त्याचा अंगावर सर्रकन काटा येतो.. समोर निवृत्ती बेशुध्द अवस्थेत पडलेली असते..वंश पुढे पाऊल टाकणार तर निव्या त्याला बघून जोरात " तिथेच थांबा मिस्टर वंश पुढे यायचे कष्ट नाही घेतले तरी चालतील , आम्ही बघू आमच्या निवृत्ती ताईला.." आमच्यावर जोर देत वंश ला पुढे यायला नकार दिला...


निव्या च त्याच्याशी अस बोलण वंशच्या कपाळावर आठ्या पडतात तो मनातच धुसपुसत " व्हॉट द..**.. मी काय तिला खाणार आहे का , फक्त मदत करण्यासाठी येत होतो ना.. आणि आता दादा वरून थेट मिस्टर वंश , शेवटी माज दाखवला ना.. हे सगळ नाटकच आहे ह..."


तो मनातच बोलत असताना त्याला आवाज येतो " राम काका ताईला उचला आणि माझ्या बेडरूम मध्ये घेऊन चला.. ( वंश कडे तिरक्या नजरेने बघत..) काहींना फक्त राक्षसी दाखवता येते त्यांच्यात माणुसकी नावाचा एक पण गुण नाही..."


निव्याचा बोलण्याचा रोख कळण्याने त्याला खूपच राग आला आणि तो रागातच त्यांच्याकडे जातो आणि इथे विष्णु निवृत्ती ला उचलणार तर , वंश लगेच निवृत्तीला आपल्या दोन्ही हातांवर उचलून घेतो आणि आत घेऊन जातो..

इथे निव्या गालातच हसून वंश च्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत उभी असते..
निव्याला अस हसताना बघून विष्णू तिला " दि हसतेस का ?...आणि आता दादाला अस विचित्र का बोलत होती.."


निव्या " माणसाला जर त्याच्या इगो तून बाहेर आणायच असेल तर वाकड वागाव लागत बाळा..."


विष्णू " अरे वा दि मानल हा तुला.."


निव्या नसलेली कॉलर उडवत " मग आहेच मी हुशार.."


विष्णू " ह दि मी हुशार कुठे बोलल.."

निव्या आठी पाडत त्याला रोखून " म्हणजे तुला नक्की म्हणायच काय आहे..."

विष्णू तिचा चिडलेला चेहरा बघून " कुठे काय चल लवकर नाही तर दादा तांडव करायचा परत..."

निव्या " हो.. चल.. चल.. लवकर..." एवढ बोलून ती झपझप पावले टाकून आत निघून गेली तिच्या पाठोपाठ विष्णू पण झपझप पावले टाकून निघून गेला....


वंश निवृत्ती ला घेऊन निव्या च्या बेडरूम मध्ये घेऊन आला आणि तिला अलगद बेडवर झोपवून बाजूला होत तिच्या कडे एकटक बघतो.. तिला अस निचपित पडलेल बघून त्याला वाईट वाटत , राहून राहून तो स्वतःलाच दोष देत असतो...

वंश " हीची अवस्था माझ्यामुळे झाली , मी शांतपणे हॅण्डल करायला पाहिजे होत... तिने लग्न केल यात तिची काहीच चूक नाही , उगाच मी कोणा दुसऱ्याचा राग हिच्यावर काढल.. "

वंश मनात बोलत असताना त्याला निव्या चा आवाज येतो " मिस्टर वंश आता तुम्ही जाऊ शकता..."

वंश हळूच स्वतःशी पुटपुटत " परत मिस्टर वंश... ह.." एवढ बोलून काहीच न बोलता तिथून निघून जातो...

वंश निघून गेल्यावर निव्या च्या चेहऱ्यावर हसू उमटत...

वंश ला निव्या ने मिस्टर वंश बोललेल आवडल नव्हत का ते त्यालाच समजत नव्हत.. कुठेतरी निव्या आणि विष्णू बद्दल त्याच्या मनाच्या कोपऱ्यात त्यांच्याबद्दल प्रेम निर्माण होत होते आणि यापासून वंश अनभिज्ञ होता...

एके ठिकाणी एका फ्लॅट मध्ये

एक माणूस कॉल वर बोलत होता " सर तुमच काम झाल बघा आम्ही त्या निवृत्ती च लग्न करून टाकल..."

पलीकडून " गुड, तुम्हाला तुमचे पैसे भेटतील थोड्यावेळाने... आणि हो माहीत आहे ना कोणाला काही कळता कामा नये समजल..."

तो माणूस " हो सर , कोणाला काहीच कळणार नाही... आम्हाला आमचे पैसे भेटले की , तुम्ही सांगितल्याप्रमाणे इथून निघून जाणार..."


पलीकडून " हो आणि परत मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न नाही करायचा..." एवढ बोलून पलिकडच्या व्यक्तीने लगेच कॉल कट केला...


कॉल कट झाल्यावर तो माणूस स्वतःशीच " काय माणूस आहे इतका ॲटीट्यूड.. जाऊदे मला काय माझ काम झाल आता , पैसे भेटले की मग इथून दूर निघून जाईल..." इतक बोलून ते बाल्कनीतून बेडरूम मध्ये येतात..

बेडरूम मध्ये आल्यावर समोर उभ्या असलेल्या एका बाईला " शीतल आपले पैसे भेटले लगेच निघू , इथे थोड्यावेळ सुद्धा नाही थांबायच..."

शीतल " हो मी तोपर्यंत उरलेल समान वैगरे पॅक करून घेते.. बर झाल आता तिच्यापासून सुटका झाली , रोज रोज तीच रडण ऐकुन माझ डोक फुटायची वेळ आलेली.."


हे दोघ बोलत असताना दारावरची बेल वाजते " आता कोण आलय " बोलून शीतल दरवाजा उघडायला जाणार तर त्यांना अडवत ते " थांब मी उघडतो दार , तू उरलेली पॅकिंग कर..." एवढ बोलून ते दार उघडायला निघून जातात...


दार उघडल्यावर समोर बघतात तर सोसायटीचे सेक्रेटरी मानव पाटील असतात...

मानव " अरे अशोक तू जाणार म्हणून म्हटल तुला भेटाव , मग झाली का पॅकिंग करून... "

अशोक " हो अर्धी झाली आहे , अर्धी बाकी आहे ती शीतल करत आहे..."

( अशोक आतून वाईट जरी असले तरी ते बाहेरून चांगला मुखवटा लावून फिरत होते , त्यांच्या बरोबर त्यांच्या पत्नी शीतल सुद्धा तश्याच होत्या... ते म्हणतात ना बाहेरून एक आतून एक अस..)


मानव " हो , मग कुठे घेतल घर..."

( अशोक मनात " तुला काय करायच आम्ही कुठेही जाऊ.. आमच नोकर बनून येणार आहे की काय म्हणे कुठे घेतल घर... आता याला आम्ही कुठे घर घेतल सांगितल तर पुढे प्रोब्लेम होतील त्यापेक्षा दुसर काही तरी सांगाव लागेल..)

अशोक भानावर येत हसून " ह आम्ही सिंगापूर ला घेतल आहे घर..."

अशोक ने सिंगापूर म्हंटल्यावर मानव ला आश्चर्य वाटल " इतक्या लांब घर तिथे घर घेण्यासाठी तर खूप पैसे लागतात आणि इतके पैसे यांच्याकडे कुठून आले.. मी विचारल तर राग येईल , जाऊ दे न विचारलेले च बरे..."

मानव मनात आलेले विचार झटकून " ओह छान , हॅप्पी जर्नी... आम्हाला कॉन्टॅक्ट करत रहा विसरू नका..."


( अशोक मनात " कोण करतय कॉन्टॅक्ट ह....")

अशोक " हो.. हो.. करू आम्ही कॉन्टॅक्ट तुम्हाला..."

मानवच अशोक शी बोलून झाल्यावर तो निघून जातो...

मानव निघून गेल्यावर अशोक स्वतःशीच " गेला नुसत डोक्याला ताप करून ठेवतो हा प्रश्न विचारून विचारून..."

शीतल बेडरूम मधून बाहेर येत " कोण होत हो..."


अशोक " तो सेक्रेटरी मानव... सिआयडी सारखे प्रश्न विचारत होता... म्हणे घर कुठे घेतल..."

शीतल " मग तुम्ही काही सांगितल नाही ना काही... जयपूर ला घेतल ते..."


अशोक आठया पाडून " तू काय मला वेडा समजते काय.. काही नाही सांगितल त्याला... सिंगापूर ला घर घेतल आहे एवढच बोललो..."

शीतल " हा मग ठीक आहे... मी पॅकिंग करून ठेवली आहे , आता टेम्पो आली की त्यात सामान ठेवायच बाकी..."

अशोक " हा.. मी कॉल केला आहे त्या टेम्पो वाल्याला तो येईल थोड्यावेळाने... "

शीतल " ठीक आहे मी चेक करते काही राहील आहे का..."

अशोक " हो.."

जीवनश्री बंगलो


निवृत्ती ला हळू हळू शुद्ध येते , ती डोळे कीलकीले करून हळू हळू उघडून इकडे तिकडे बघते तर तिच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव उमटतात...क्रमशः

- भाग्यश्री परब

Rate & Review

Dipti Kadam

Dipti Kadam 4 months ago

शारदा जाधव
Arati

Arati 5 months ago