Rutu Badalat jaati - 17 in Marathi Love Stories by शुभा. books and stories PDF | ऋतू बदलत जाती... - भाग..17

ऋतू बदलत जाती... - भाग..17

ऋतू बदलत जाती....१७.

"नाही...ते.. डॉक्टर निघून जातील.."त्याने सावीला कडेवर घेतले .

""अदीती तु पण चल...."महेशी.

"अगं तिला कशाला....तिला काम असेल ना राहूदे तिला.."अदीती पाय पुढे टाकतचं होती कि अनिकेत महेशीचा हात पकडून तिला बाहेर घेवून आला.

आता पुढे...

त्याने महेशीला हाताने धरूनच गाडीत बसवले.
क्रिश मागून पळत आला ,अनिकेतला वाटलं की हा म्हणतो की काय मला पण येऊ द्या म्हणून .....वेडा अनिकेत घाईघाईने गाडी सुरु करू लागला.

"अनिकेत आहो ..थांबा.. क्रिश कडे सावीची फाइल आहे ती तर घेऊ द्या..."महेशी.

"ओ तर .क्रिश फाईल द्यायला आला होता का..?" त्याने गाडी थांबवली.

महेशी त्याच्याकडे विचित्र नजरेने बघत होती ,तो आज थोडा वेगळाच वागत होता.

"अनिकेत च्या डोक्यावर काही परिणाम तर नाही ना झाला...??" महेशीला वेगळी शंका येत होती.

अनिकेत गाडी चालवत महेशीकडे बघत गालातल्या गालात हसत होता.

"नक्कीच ..नक्कीच.. त्यांच्या डोक्यात काहीतरी परिणाम झाला आहे..... देवा बाप्पा..!! यांना गाडी निट चालवू दे फक्त.. मी तुझ्यासाठी परत उद्या पुरणाचे मोदक बनवेल...." महेशी मनातल्या मनात देवाचा धावा करत होती.

"महेशी ह्या पैठणी मध्ये तू छान दिसतेस..." अनिकेतने महेशीची स्तुती केली.महेशी तर उडालीच.

" हा नक्की अनिकेतच आहे ना ..??अचानक कुठलं दुसर भूत घुसलय याच्यात.. ..शांभवी बाळा तू तर नाही ना त्याच्यामध्ये.. "महेशी.

"शंभू.. शंभू .."ती थोडंसं जवळ जावून हळू आवाजातच पुटपुटली .

"अनिकेतने तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघितले.ती लगेच बाजूला झाली.

अनिकेत गाडी जरा जोरात चालवत होता, त्याला लवकरात लवकर डॉक्टरकडे पोहोचायचं होतं. बिचारी महेशी जीव मुठीत धरून बसली होती.

"हूश्श बाबा ..!! आले एकदाचे हॉस्पिटल.." गाडी थांबताच महेशी लगेच खाली उतरली.

डॉक्टर कडे आज जास्त गर्दी नव्हती ,त्यांनी लगेच सावीला लस दिली आणि ते बाहेर पडले. अजूनही अनिकेतला कसली तरी घाई होती, ते गाडीत बसले आणि परतीच्या प्रवासाला लागले . पण आता गाडी घराकडे नव्हती जात ,महेशी विचारात पडली.

"आधीच त्यांचं डोकं ठिकाणावर नाही आहे ...कुठे घेऊन चालले हे मला ..??हे देवा वाचव रे आता.."महेशी मनात बोलत होती.

"आपण कुठे चाललो आहोत ..??"महेशीने भीत भीतच विचारले.

" कुठे नाही जवळच गार्डन आहे... सावी किती रडली ना लस घेताना ...म्हटलं थोडं फिरून आणू तिला..."अनिकेत.

" आधी सांगितलं असतं ..तर मी तिची प्रॅम पण घेतली असती.. ही तर झोपली पण.."महेशी सावी कडे बघून बोलली....

" मग तर चांगलंच झालं.."अनिकेतच्या तोंडातून आपसूक निघून गेले.

"काय.. !! "महेशी थोडी आश्चर्यचकित झाली.

"म्हणजे ..तेवढाच तिचा आराम होईल.""अनिकेतने सावरले.

"मग चलायचं का घरी .."महेशी.

" एवढी काय घाई आहे तुला... आता आलोच आहोत तर.. थांब थोडा वेळ.."अनिकेत.

आज अनिकेत तिला आश्चर्यावर आश्चर्याचे धक्के देत होता. एक तर सकाळपासून तिला अरेतुरे करून एकेरी नावाने बोलत होता.
त्यानंतर म्हणे छान दिसते आणि आता म्हणतो गार्डन जवळ थांब.....बिचारी महेशी.

त्याने गाडी फिरून गार्डन च्या मागच्या साईडला आणली .तिथे छोटासा आर्टिफिशल तलाव बनवला होता आणि बसायला बेंचेस वगैरे होते..

"उतरतेस का..?"अनिकेत.

महेशने मांडीवर झोपलेला सावीकडे इशारा केला.

त्याने लगेच मागच्या सिटवरून एक बेबी बास्केट काढली आणि तिला तिच्यात ठेवायला सांगितले. मग हळूच ती बास्केट स्वतः जवळ घेतली, सावी उठू नये म्हणून.... ती बाहेर आल्यावर परत त्याने ती बास्केट सीटवर ठेवली. आणि ते दोघे तिथेच उभे राहिले.

काय बोलावं, कुठून बोलायला सुरुवात करावी दोघानाही सुचत नव्हतं..अनिकेतने ईकडे तिकडे बघीतले.

" तू पापडी चाट खाणार.. ??"अनिकेत काहीतरी बोलायचं म्हणून बोलला ,त्याला जे बोलायचं होतं ते त्याच्याने बोललं जात नव्हतं,खरतर त्याला तीला ईकडे आणून, आपल्या बोलण्यात फसवून तिच्याकडून काढून घ्यायचे होते, कि तिच राधा आहे .पण ऐन वेळी जीभ आणि मेंदूंने त्याची साथ सोडली..चल म्हटले तरी चालतच नव्हता तो...

"नाही नको.. जेवण आत्ताच झाले ना.." महेशी थोडक्यात बोलली.

"फेसबुक वर किती मोठे मोठे लेक्चर देतेस मला.. आणि आता हीला जरासही बोलता येत नाही का?.."अनिकेत मनात चरफडला .

" का घेऊन आले ..आले तर आले वर काही बोलत पण नाही .. खरंच बाप्पा काहीतरी झाल आहे नक्की यांना..."

आता दोघेही बोलत नव्हते तर तिथे उभे राहून काय करणार .... किती काही ठरवून आला होता अनिकेत घरून.. पण काहीच सुचत नव्हते .अखेर पाय दुखायला लागले.

"जाऊदे चल घरी जाऊ.. "अनिकेत.
तीनेही मान डोलावली.

सावीची बास्केट मांडीवर घेऊन ती बसली.
घरी पोहोचल्यावर अनिकेतने सावीला घेतले आणि तो तिला तिच्या रूम मध्ये झोपवून आला.

त्याची जरा चिडचिडच होत होती म्हणून तो सरळ रुममध्ये निघुन गेला,त्यात ड्रिंकपण घेवू शकत नव्हता. आधी एवढं तर नाही पण अधून-मधून तो ड्रिंक्स घेत होता. पण गणपती बसल्यामुळे आजींनी त्याला त्यासाठी मनाई केली होती.
'काय करू ..?काय करू ..? त्याच्या मनाला चैन पडत नव्हती.. अखेर त्याने काही फाइल्स उघडल्या, लॅपटॉप उघडला आणि काम करायला बसला.
तरीसुद्धा त्याची चिडचिड काही कमी होत नव्हती . त्याने मोबाईल उघडला राधाला मेसेज केला ."हाय राधा काय करतेस ...??"

पण महेशी त्यावेळेला किचन मध्ये सावी साठी काहीतरी बनवत होती, त्यामुळे तिने मोबाईल बघितला नाही.

महेशीचही उत्तर येत नव्हतं त्यामुळे त्याची अजून जास्त चिडचिड व्हायला लागेली.

तेवढ्यात महादू वर आला .
"साहेब चहा आणू का तुमच्यासाठी??

"नको काही नकोय मला .."अनिकेत वैतागून बोलला.

महादू परत वळत होता तेवढ्यात त्याने परत आवाज दिला..
"महादू एक काम करशील.. महेशी ला सांग कॉफी वर घेऊन यायला..."

महादूने मान डोलावली आणि तो खाली निघून गेला.

" ताई ..! साहेबांनी तुम्हाला कॉफी घेऊन वर बोलावलेय..."महादु.

.
तिकडे क्रिश आणि आदिती दोघांनीही ते ऐकलं होतं दोघं गालातल्या गालात हसत होते शांभवीला मात्र ते कसे तरीच होत होत.

"महादू एक काम कर.. मी बनवून देते कॉफी तुला तूच घेऊन जा.."महेशी.

"नाही ताई आज साहेबांचा मूड काही ठीक दिसत नाही आहे ...उगाच चिडचिड करतील तुम्हीच जा..."महादू.

"अरे देवा आज काय झालं अनिकेतना .." तिने ट्रेमध्ये कॉफी कप ठेवला आणि काही बिस्कीट घेतले आणि वर गेली .अनिकेत लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून बसला होता, पण त्याचं सर्व लक्ष दारावरच होतं, तिने दारावर टकटक केली आणि आत आली..

"तुमची कॉफी टेबल वर ठेवतेय.." असं बोलून ती निघणार होती की ,मागून पटकन येऊन अनिकेतने तिचा हात पकडला. तिचं हृदय धडधड करायला लागलं ,चेहर्‍यावर भीती दाटून आली. त्याने तिच्या पुढून जाऊन तिला घट्ट मिठीत पकडलं .आता कुठे त्याला थोडं शांत वाटायला लागलं होतं.. पण महेशी तशीच निश्चल उभी होती ,तिला कळतच नव्हतं नेमकं काय झालं ..

पण काही क्षणात तिलाही त्याची उबदार मिठी हवीहवीशी वाटायला लागली. तिने डोळे बंद केले आणि त्याचा सहवास अनुभवू लागली.
पण तिच्या डोळ्यासमोर काहीतरी आलं आणि तिने डोळे उघडले , त्याला जोरात आपल्या मिठीतुन दुर ढकलून ती पळतच खाली गेली.

महेशीने ढकलल्यामुळे अनिकेत जवळजवळ खाली पडता पडताच वाचला. त्याला राग आला तिचा ,पण नंतर त्याला त्याच्या कृतीचा पश्चाताप व्हायला लागला.

"मला माझ्या इमोशन्स वर कंट्रोल ठेवायला पाहिजे होते ,....आता ती माझ्या विषयी काय विचार करेल.. याच्या बायकोला जाऊन आताच कुठे दीड पावणेदोन महिने होतील आणि हा.. शी अनिकेत तुला असं नको वागायला पाहिजे होतं...
मी माझ्या राधाला मिठी मारली ....मी महेशीला मिठी नाही मारली... किती दिवसापासून तिला भेटायचं होतं... किती कंट्रोल केले मी स्वतः वर तिला बघितल्यापासून... माझी मिठी चुकीची नव्हती राधा..... खूप खूप बेचैन होतो मी तुला भेटण्यासाठी ..किती वर्ष ...किती वर्षापासून .... आणि तु अशी नजरेसमोर असताना.. माझ्या मीठीमध्ये ती उत्कंठा होती राधा .....फक्त तुझ्या भेटीची उत्कंठा.."अनिकेत स्वतःशीच बोलत होता.

महेशी खाली आली तिला खूप अपराधी वाटत होतं.
"जर शांभवीने आम्हाला असं मिठीत बघितलं असेल तर... तिला किती यातना झाल्या असतील... पण त्यांच्या मिठीत मला आज एक तळमळ जाणवत होती.. एक बेचैनी जाणवत होती जी शांत झाली.." महेशी विचार करत होती.

"राधा किती वर्ष तु मला असा भेटायला टाळणार आहेस...??"अनिकेत.

"आपण असेच चांगले आहोत ना अनिकेत.."राधा.

"पण मला माझ्या लग्नात हवी आहेस तू ...तू ये ना.."अनिकेत.

" बर मग मी आले तर तू काय करशील..??"राधा.

"सर्वात आधी तर मी तुला एक टाईट हग देईल..... खूप खूप दिवसापासून तुला भेटायचय मी लवकर सोडणारच नाही तुला..."अनिकेत.

"वेडे आहात का तूम्ही अनिकेत ??..मी मुलगी आहे तुमची बायको काय म्हणेल..??"राधा.

"मला नाही माहिती ..पण इतक्या दिवसापासून फक्त आपण चॅट वर बोलतोय... तरी माझ्या मनात तु खोल रूतुन बसलीस...तेव्हा ..जेव्हा प्रत्यक्ष तू समोर येशील तेव्हा मी माझ्या भावना कसा आवरेल ...मी एका मित्राला मिठी मारू शकतो तर ...मैत्रिणीला का नाही ...??..तोच भाव असेल आणि मला वाटतं शांभवी कदाचित हे समजून घेईल"अनिकेत.

"वेडे आहात तुम्ही अनिकेत खरच वेडे आहात काय तर म्हणे रुतुन बसलीस हाहाहा..."
राधाने शिफातिने विषय बदलून लावला.

आज तुमच्या मिठीत तेच होतं का अनिकेत..??
सावीच्या रडण्याच्या आवाजाने ती आठवणींतून बाहेर आली.

सावी झोपेतून उठली , महेशी तिला फ्रेश करून बाहेर घेऊन आली , तिला थोडे खाऊ घातले पोटात पडल्याबरोबर सावी खेळायला लागली.

महेशी ची नजर मात्र क्रिशला शोधत होती.
तो आणि आदिती नुकतेच बाहेरून आलेले.

क्रिश मला सांग ना तुला शांभवी दिसते आहे का..??

"अग ही काय तुझ्या शेजारीच बसलीए..सावी जवळ खेळतेय तिच्याशी.."क्रिश.

महेशी क्रिशला हाताला पकडून जरा बाजूला घेऊन गेली.

"क्रिश मला सांग शांभवीच्या चेहऱ्यावरती कसले भाव आहेत ..??ती दुखी आहे असं काही वाटते आहे का??"
क्रिश ने शांभवीकडे बघितले ती सावी कडे बघून स्मित करत होती.

"नाही ती नॉर्मल वाटतेय..पण तु असं का विचारतेस..??"क्रिश गोंधळला.
.
"हुश्श..!!"महेशीने मनातच देवाचे आभार मानले बरं झालं शांभवीला काही दिसले नाही ते...

पण शांभवी ने या दोघांची कुसूरफुसूर ऐकली होती तिने हळूच नजर उंचावरून वर अनिकेतच्या रूमकडे बघितले आणि तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच हसू उमटले.

ऋतू बदलत जाती....
सोहळे मनाचे...
पुरवत रहाती..
कधी झोक्यात झुलती
कधी मातीत लोळती...
ऋतू बदलत जाती.......

क्रमक्षः...

****************

भेटूया पुढच्या भागात....

© शुभा.
dates3027@gmail.com.