Shimplyache Shopis nko jiv adkla motyat - 1 in Marathi Love Stories by Pradnya Jadhav books and stories PDF | शिंपल्याचे शोपीस नको जीव अडकला मोत्यात.. - 1

शिंपल्याचे शोपीस नको जीव अडकला मोत्यात.. - 1

"नको प्रेम करू इतकं की...आपण दूर झालो की तुलाच सांभाळणं अवघड होईल." राहुल म्हणाला.

"वेडा आहे का तू....मला माहित आहे तू मला सोडून जाऊच शकत नाहीस...कारण तुझ माझ्यावर खूप प्रेम आहे..त्यामुळे असल फालतू बोलणं बंद कर.......नाहीतर एक कानाखाली देईल......."
त्रिशा हसत म्हणाली....त्यावर तो पण किंचित हसला..त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला...ती समोर पाहत होती......तो मनातच तिच्याकडे बघत म्हणाला..

"सोडून तर जावच लागेल , पण तुला कसं सांगू हे कळत नाही आहे...." राहुल मनात म्हणाला....पण मनात बोलताना सुद्धा त्याला प्रचंड वेदना होत होत्या...

त्रिशा सध्या 11 वी ला होती....आणि राहुल मेडिकल च्या सेकंड year ला होता....दोघांचं एकमेकांवर अगदी जीवापाड प्रेम होत,अल्लड प्रेम.....

"बर तू कधी तुझ्या आई बाबांबद्दल नाही सांगितलं....नेहमी माझी आज्जी अशी आहे तशी आहे....अस सांगत असते..." राहुलने विचारलं.

राहुल च्या बोलण्यावर त्रिशा एकदम शांत झाली....ती विषय पटकन बदलत म्हणाली...

त्रिशा म्हणाली "ओके चल बाय मी जाते...नाहीतर आज्जी वाट बघत असेल घरी...हा....."

"ठीक आहे जा....पण नीट जा." राहुल म्हणाला.

"हो रे....." त्रिशा हसत म्हणाली.

राहुलला पण कळलं की ती विषय बदलाव म्हणून बोलत आहे....तो पण काही म्हणाला नाही....

ती जाताच त्याने त्याचे रिपोर्ट बाहेर काढले...काही दिवसाचा पाहुणा होता तो...त्याने बाजूला पहिलं तर त्रिशाच ब्रेसलेट होत....त्याने ते हृदयाजवळ कवटाळलं.....डोळ्यातलं एक अश्रू खाली पडला...त्याच खूप प्रेम होत तिच्यावर पण......पण ब्रेन ट्यूमर होता त्याला....वाचण्याचे चान्सेस खूपच कमी होते...त्यात तिला कायमच एकटीला सोडून जाणं...त्याहून कठीण होत......सांगू पण शकत न्हवता तिला तो...घरचे तर पूर्ण खचले होते..

थोड्यावेळ मनसोक्त रडून झाल्यावर तो गेला....

कदाचित हाच दिवस आमच्या भेटीचा शेवटचा दिवस असेल.....!! ह्ह आता रडून काहीही फायदा न्हवता , तो इतक्या दुःखात असून मला समजू हि नये कि तो कोणत्या हालातीतून जातं होता....

आज जावून त्याला 6 वर्षे झाली......एकही दिवस नाही असा कि त्याची कोणत्याच क्षणाला आठवण नाही आली....!!! तेव्हा त्याची भेट झाल्यानंतर रात्र भर त्याच्यासोबत घालवलेल्या क्षणानां आठवत बसायचे , आज तेच क्षण आठवून त्याच्या आठवणीत झुरतेय............!!

6 वर्षानंतर...

ती तयार होऊन खाली आली....तिने वरती हुडी आणि खाली जिन्स घातली होती....ती म्हणजे त्रिशा होती.....कानात हेडफोन्स होते.....आपली बॅग पाठीमागे अडकवून ती चालत होती...

तिची आई रिया तिला थांबवत म्हणाली..."त्रिशू थांब..... नाश्ता करून जा...."

पण ती काही थांबली नाही...ती पुढे जात होती..

"त्रिशा....मी काय म्हणाले ते ऐकू नाही आले का तुला......" तिची आई म्हणाली.

त्रिशा थांबली आणि मागे वळली....

त्रिशा रागात म्हणाली "तुला किती वेळा म्हणाली आहे....तू माझी आई नाही.....उगाच काळजी करण्याचे नाटक मुळीच करू नको....राग येतो मला....."

"त्रिशा अस का बोलते तू बाळा , ९ महिने तुला पोटात वाढवली आणि तू म्हणतेय तुझी आई नाही..." रिया (तिची आई)

"हे.....हे...अस रडणं माझ्या समोर तर मुळीच नको...माझे आई बाबा दोन्ही....माझी आजीच आहे...त्यामुळे मी तुला आई बोलू हा विचार लांब ठेव..." त्रिशा म्हणाली.

त्रिशा निघून गेली...जाताना एक कटाक्ष निलेश ( बाबा ) वर टाकून निघून गेली...

आज्जी...खालती येत म्हणाली "तिला कृपया एकटं राहू दे... माझ्या मुलीचं आयुष्य बरबाद करून तिच्याकडून अपेक्षा ठेवता..."

"आई पण आमची मज..." निलेश म्हणाले....

" एक शब्द पण नको काढुस समजल...." आज्जी खूप रागात म्हणाली.

निलेश त्या वर गप्पच बसला..तो रिया ला घेऊन वरती गेला..

त्रिशा बाहेर पडली तेच तिच्या समोर मृणाल आली...( मृणाल तिची सख्खी बहीण फक्त १ वर्ष मोठी )

मृणाल म्हणाली "त्रिशा..अग असे कपडे घालून कुठे जात आहेस....आणि"

त्रिशा तिला मध्येच तोडत म्हणाली " एक एक मिनिट , तू पण तुझ्या आई सारखे प्रश्न नको विचारत जाऊस...मी काय घालायचं आणि काही नाही...हे तू नको समजावू समजल जस्ट गेट लॉस्ट....😠"

त्रिशा तिला रागात म्हणाली...आणि पुढे गेली तेच समोर अनिकेत तिला रागात पाहत होता...तिने त्याच्याकडे पाहिलं तो डॉक्टरच्या कोट वरच होता , कदाचित कार पार्क करत होता...तिने त्याला एक लूक दिला आणि आपली स्पोर्ट्स बाईक काढली आणि त्याच्यावर बसून निघून गेली....

( त्रिशा अनिकेत आपल्या कथेचे नायक आणि नायिका आहेत बर का..😜 )

त्रिशा जाताच अनिकेत मृणाल जवळ आला..

अनिकेत रागात म्हणाला. " I will kill her...."

"अनिकेत अस का बोलत आहेस..." मृणाल म्हणाली.

अनिकेत म्हणाला." मग काय बोलू मी..कशी बोलते तुझ्याशी ती...😠😠😠 वरून अंकल अँटी ला पण अशीच बोलते I hate her..."

मृणाल म्हणाली " तू पण अगदी तसाच आहेस बघ..तिला पण हेट हर हेट हर बोलायची सवय आहे...made for each other..."

अनिकेत म्हणाला " मृणालsss"

"अच्छा सॉरी बाबा..नाही चिडवत बर मी जाते..मला एक्झाम ची तयारी करायची आहे..."मृणाल नमत घेत म्हणाली.

अनिकेत तिला म्हणाला "कसला अभ्यास करते तू??....तुझा होणारा नवराच डॉक्टर आहे.....स्वतः
च हॉस्पिटल आहे...तुला अभ्यास करायची काय गरज आहे....मी शिकवतो की.."

मृणाल म्हणाली "अनिकेत तू पण ना.... चल बाय."

मृणाल घरी आली..अनिकेत पण हॉस्पिटल मध्ये निघून गेला...

इथे... त्रिशू कॉलेज मध्ये आली ,तिला एका जागी खूप गर्दी दिसत होती..

तिने पहिलं तर सगळे आपले मार्क्स बघण्यासाठी खटाटोप करत होते....

ती तशीच पुढे निघाली..तिला माहित होत या वेळी सुद्धा तिने टॉप केलं असणार कॉलेज मध्ये....

ती क्लास रूम मध्ये आली...अर्धे स्टुडंट्स होते , ती जाऊन बेंच वर बसली ...

सर यायला पण अजून वेळ होता....म्हणून तिने बॅगेतून एक डायरी काढली...

तस तिच्या चेहऱ्यावर एक हास्य पसरले.. अर्थात ती राहुलचीच डायरी होती...

डायरीच्या पहिल्या शब्दापासून ते डायरीच्या शेवटच्या पानापर्यंत फक्त तिच्याच बद्दल होत , तिला त्याच्या प्रेमावर हसूच यायचं...

आताची त्रिशा कशी आणि पहिली त्रिशा कशी आहे...हे पाहून तिला नवल वाटायचं...

की आपण ही पाहिले अस होत...❤️

तिने डायरी बंद केली आणि बॅगेत पुन्हा ठेऊन दिली...ती डायरी नेहमी सोबत असायची तिच्या कारणच तसं होत.....तिला राहुल नेहमी आपल्या सोबत आहे..... हे तिला जाणवायचं....

फक्त २० दिवसच सोबत होते दोघे पण..... पण काय करणार नियतीला मान्य नसेल कदाचित त्याचं प्रेम....

असा अचानक आयुष्यात आला आणि निघून पण गेला....मला कायमच सोडून , नेहमी गॉड ( देव ) असच करतो माझ्यासोबत पहिले माझे आई बाबा त्या नंतर राहुल....

माझ्या आयुष्यातल्या सर्वात महत्त्वाचे भाग त्याने काढून घेतले आहेत.....जर मी अनाथाच असते तर बरं झाल असत......ना मला त्यांच्या आठवणीत राहायला लागलं असत.....ना राहुल माझ्या आयुष्यात असता.....

सगळ भेटून पण काहीच राहत नाही माझ्याकडे.....राहतात त्या फक्त आठवणी.... बस इतकच या पुढं कोणालाच माझ्या आयुष्यात जागा नाही....

आई , बाबा , एक बहिण असून पण मी अनाथासारखी जगते.....रोज जगून पण मरते त्याच कोणाला काहीच नाही....

"म्हणे मी तुझी आई आहे .....😠😠 I just hate him I hate.......bloody*******" त्रिशा मनातच तिचा राग व्यक्त करत होती....तिने पटकन आपल्या डोळ्यातलं पाणी रोखल आणि शांत बसून राहिली....

थोड्यावेळाने सर पण आले....त्यांनी तिच्या अपेक्षे प्रमाणे तीच नाव बेस्ट स्टूडेंट म्हणून उच्चारल....तिला आनंद झालाच....

कारण एक डॉक्टर बनने तीच स्वप्न होत....मृणाल पण तिच्याच क्लास रूम मध्ये होती....पण आज ती आली न्हवती...

त्यांचं लास्ट इअर होत...आणि एक्झांम झालेच होते , आता सगळ्यांना उद्याच कळणार होत की कोणाला कोणत्या हॉस्पिटल मध्ये intern म्हणून एन्ट्री मिळणार आहे..

सगळेच स्टुडंट्स उत्सुक होते..

क्रमशः ..

Rate & Review

Vishal Bhire

Vishal Bhire 3 months ago

Pradnya Jadhav

Pradnya Jadhav Matrubharti Verified 4 months ago

Anuja Jadhav

Anuja Jadhav 4 months ago

Share