Your companionship is like a moon in the sun - 9 in Marathi Love Stories by Bhagyashree Parab books and stories PDF | साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा - 9

साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा - 9

जीवनश्री.. ( वंशच घर )


निवृत्ती च बोलण ऐकून विष्णू आणि निव्या च्या काळजात धस्स होत..

निव्या " निवू ताई.. अस का बोलत आहेस , हे.. हे.. तुझच घर आहे..."


विष्णू प्रश्नार्थक नजरेने निव्याला हळू आवाजात " ताई.." तशी निव्या त्याला डोळ्यांनी बाहेर बघण्याचा इशारा करून सांगते , तस विष्णू बाहेर बघतो तर त्याच्या तोंडून
"ओह.. " निघतो.. कारण बाहेर वंश लपून या तिघांचं संभाषण ऐकत होता..


निवृत्ती निव्या च्या तोंडून ताई ऐकल्यावर तिला काही समजत पण मीच सांगितल होत तुम्ही मला कोणत्याही नावाने हाक मारू शकता कदाचित तिच मूड बदलल असेल म्हणून निवृत्ती ने मनात आलेले विचार झटकून देत " अग इथे तुझ्या मॉम डॅडना पण माहिती की आम्ही दोघांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केल आहे ते आणि ते त्यांनाही मान्य आहे मग मला जावच लागेल इथून.. तसही इथे कोणत नात असेल माझ.. "

विष्णू " मग आम्ही दोघ तुझे कोणीच नाही का.. "

निवृत्ती दोघांना जवळ येण्याचा इशारा करते , तसे ते दोघ तिच्या दोन्ही बाजूला जाऊन बसतात.. ते बसताच निवृत्ती त्या दोघांच्याही खांद्यावर हात ठेवून आपल्या मिठीत सामावून घेत मायेने डोक्यावर हात फिरवत " तुम्ही माझे कोणीच नाही अस कधीच नाही बोलायच समजल , नाही तर मी बोलणारच नाही... एक सांगू तुमच्यासारखी एक छोटीशी बहीण होती माझी माझ छोटस बाळ जणू.. पण ती... "


निव्या तिच्या हातावर हात ठेवून " ताई तुला त्रास होत असेल तर नको सांगू.. बस तू फक्त आम्हाला सोडून नको जाऊस.."


निवृत्ती च्या डोळ्यातून एक अश्रू बाहेर पडले ती रडतच " तिला माझ्या समोर मारल त्यांनी , माझ्या डोळ्या समोर.." एवढ बोलून निवृत्ती हुंदके देत रडू लागली..

तिला अस रडताना बघून माहीत नाही वंश ला काय झाल तो लगेच आत येत वंश निव्या आणि विष्णू ला कडक आवाजात " तुम्हाला काय आज कॉलेज नाहीये का... ( निव्या आणि विष्णू आयआयटी मध्ये फर्स्ट इअर ला आहेत..) जा जावा कॉलेज मध्ये..."

विष्णू " हो मिस्टर वंश जातो आम्ही , पण तुम्ही आमच्या निवू ताईची काळजी घेत असाल तर... "


वंश त्याला रोखून बघत " अस बोलत आहेस जस मी तुमचा एम्प्लॉयी आणि तुम्ही माझे बॉस आहात..."


निव्या " हा असच समजा..."


वंश चिडत " हे अती होतय अस नाही का वाटत तुम्हाला..."


विष्णू " आम्हाला विश्वास नाही म्हणून विचारल , नाही तर काल सारख ताईला बाहेर हाकलून द्याल..."

निव्या " तसही तुम्ही ताईला नाही बाहेर काढू शकत , कारण ही बेडरूम माझी आहे आणि इथे कोण राहणार कोण नाही राहणार हे मी ठरवेन..."


वंश आणखी चिडत " कोण राहणार कोण नाही राहणार यात माझ काही देण घेण नाही समजल..."


विष्णू भुवया उंचावत " देण घेण नाही तर इथे कशाला आलात.. "


विष्णू ने असा प्रश्न विचारल्याने वंश गप्प बसला..

वंश ला अस गप्प बसलेल बघून निव्या " काय झाल मिस्टर वंश अस गप्प का आहात , विष्णू ने काही तरी विचारल तुम्हाला..."


वंश तिघांना नजर न देता " तुम्ही तुमच काम करा समजल... " एवढ बोलून त्यांच्याकडे न बघताच तडक बेडरूम मधून निघून जातो...


वंश निघून गेल्यावर इथे निव्या मनात " दादा तुला काळजी वाटतेय माहितीय मला पण तुझा इगो मध्ये येतोय, कोई बात नहीं एक ना एक दिवस तू निस्वार्थ प्रेम करशील वहिनीवर.. "


निवृत्ती च्या आवाजाने निव्या भानावर येते " निव्या कुठे हरवलीस.. "


निव्या " ह.. कुठे नाही ( विष्णू कडे बघत..) चल विष्णू कॉलेजची तयारी करायची आहे नाही तर लेट होईल.."


विष्णू " हो.. हो.. चल.."



वंशची बेडरूम...


वंश बेडरूम मध्ये आल्या आल्या दोन्ही हातांनी डोक पकडुन सोफ्यावर जाऊन बसला..

वंश स्वतःशीच " मी अस का वागत होतो , तिची एवढी काळजी का वाटत होती..आणि तिची बहीण तिला कोणी मारल असेल जे ती एवढी रडत आहे , हम साहजिक आहे कोणी आपल्या समोर आपल्याच माणसांना मारल्यावर कस वाटत असेल.. पण तिच्या डोळ्यात पाणी बघून मला का वाईट वाटत आहे.. मी तिच्यावर.. नाही.. नाही.. अस नाही असणार , मी दीक्षा वर प्रेम करतो.. फक्त एक वर्ष मग त्या मिस कटकट ला डिव्होर्स देऊन लगेच दीक्षा ला लग्न करायला सांगेन...
तिला डिव्होर्स तर देणार मी , मग तिच पुढे काय कुठे जाणार.. लग्नाच्या दिवशी तिच्या आई वडिलांकडे बघून अस वाटत होत जणू आपल्यावरच संकट निघून गेलय , कोणी आई वडील आपली मुलगी सोडून चालली आहे बघून इतक समाधानी कसे असू शकतात.. मुलीचे आई वडील कसेही असले तरी आपली सोडून चालली आहे याच दुःख तर होतच.. पण तिच्या आई वडिलांकडे बघून अस वाटलच नाही..

काहीही असो तिच आणि माझ डिव्होर्स झाल की तिला जेवढी मदत लागेल तेवढी करायला तयार आहे मी..."


मनात काहीतरी निर्णय घेऊन वंश फ्रेश होण्यासाठी निघून गेला...




निव्या ची बेडरूम...


निव्या आणि विष्णू आपल्या कॉलेजची तयारी करायला निघून गेल्यावर निवृत्ती मनातच " माझ्यामुळे खूप मोठा घोळ झाला आहे आणि सगळ्यांना त्रास सुध्दा त्यासाठी रीतसर माफी मागावी लागेल... हा... ही छान आयडिया आहे.. चला निवू कामाला लागा.."


निवृत्ती मनातच ठरवून फ्रेश व्हायला निघून गेली...





सिद्धार्थ आणि रामेश्वरी ची बेडरूम...


सिद्धार्थ सोफ्यावर बसून ऑफिस मधल काम करत होता आणि रामेश्वरी आरशासमोर बसून आपला मेकअप करत होती...

मेकअप करून झाल्यावर रामेश्वरी सिद्धार्थ च्या बाजूला बसून जरा चिडून ओघातच " अश्या लो कॅरेक्टर असलेलीच मुलगी भेटली का या तुमच्या नालायक मुलाला... जरा आपल्या स्टेटस ला शोभेल अशी तरी शोधायची..."


रामेश्वरी च बोलण ऐकून सिध्दार्थ ला राग आला ते रागातच " काय बोलत आहेस रामेश्वरी समजतय तरी का तुला.. आणि राहिली गोष्ट कॅरेक्टर ला , स्टेटस ला मॅच होणारी हे त्याचा डीसीजन आहे.. यात मी काही नाही करू शकत तसही त्या दोघांचा एका वर्षात डिव्होर्स होणार आहे.. तिने आपल आयुष्यपणाला लावून या लग्नाला तयार झाली आहे , कमीतकमी तिच्याबद्दल थोडा तरी मान ठेव.. तू असा विचार करशील अपेक्षा नव्हती याची... आणि तो एक त्याने लग्नाचा नुसता खेळ करून ठेवलाय त्याचा मनात थोडा सुद्धा विचार नाही आला की डिव्होर्स नंतर तिच्या लाईफ च काय होणार.. मी इतक ओरडून सांगून सुद्धा आपल ते खरच करायच... वैताग आलाय नुसता..." एवढ बोलून सिध्दार्थ आपला लॅपटॉप घेऊन स्टडी रूम मध्ये निघून गेला...


इथे सिध्दार्थ ने इतक सुनावल म्हणून आतूनच चरफडत होती " या काल आलेल्या मुलीमुळे आज सिध्दार्थ ने इतक सुनवल.. पण मी रामेश्वरी आहे हिला असच नाही सोडणार , तिच जगण च अवघड करेन..." स्वतःशीच बोलून तणतणच बेडरूम मधून खाली निघून गेल्या...





लंडन...


एक बाई कुस्तीत पणे हसत फोन वर कोणाशी तरी बोलत होती " हा.. हा.. हा... लवकरच या राणे परीवाराचा खेळ खल्लास होणार आहे..."


पलीकडून " हो.. पण ती मुलगी अजुन भेटली नाही आहे.."


ती बाई " भेटल लवकरच भेटेल ती मुलगी , बस तुमच काम चालू ठेवा.." इतक बोलून त्या बाईने फोन कट केला..


फोन कट करून ती बाई स्वतः शीच " व्हा अपर्णा मानल पाहिजे तुला काय मेंदू आहे तुझा , सलाम तुझ्या मेंदूला.. खूपच माज होता ना खुश राहण्याचा मिस्टर राणे आता बघा ना सगळ कस धुळीस मिसळल.. आता लवकरच राणे हे आडनाव मिटून जाईल... हा..हा..हा.."



क्रमशः

- भाग्यश्री परब