Bhetli tu Punha - 2 in Marathi Love Stories by Sam books and stories PDF | भेटली तू पुन्हा... - भाग 2

भेटली तू पुन्हा... - भाग 2गोव्यातील एका आलिशान बंगल्यामध्ये ...

"कुठे गेली ती?, दहा महिने झाले, अजून तुम्हाला ती भेटली नाही?"

एक व्यक्ती रागात फोनवर बोलत होती. समोरून काही तर बोलाल गेलं.

"ही तुम्ही कारण सांगणं बंद करा आधीssss, मी तुम्हाला काम करण्याचे पैसे देतो, ना की कारण सांगण्याचे."
तो अजून ही रागात बोलत होता.

"मला पुढच्या पंधरा दिवसांमध्ये ती माझ्या समोर पाहिजे, नाहीतर आय विल किल यु, गॉट इट."

अन त्याने रागाने मोबाईल फरशीवर फेकला. तसा मोठा आवाज होऊन मोबाईलचे तुकडे झाले.
लगेच एक नोकर येऊन फरशी साफ करू लागला.

तो होता रुद्र. एका गर्भ श्रीमंत वडिलांचा स्वार्थी मुलगा. प्रॉपर्टीसाठी त्याने आपल्या आई वडील व बहिणीला मारून टाकल होत.

त्याला वाटलं की सगळे अडथळे दूर झाले आहेत, पण दहा महिन्यांपूर्वी त्याला समजलं होत की त्याची बहीण जिवंत आहे. तेव्हा पासून तो तिला शोधत होता. पण आज पर्यंत ती सापडली नव्हती. म्हणून तो चिडला होता.

रुद्रचे आयुष्य आयशोरामत सुरू होते. पण लिगली तो त्या प्रॉपर्टीचा मालक नव्हता हे त्याला माहित होतं. पुढे जाऊन बहीण परत आली आणि प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागू लागली तर, हिस्सा नाहीsss , ही सगळी प्रॉपर्टी तर तिच्याच नावावर आहे. ती आली की मग आपण पुन्हा रस्त्यावर येऊ. या विचाराने तो जास्तच काळजीत होता. आणि आपली माणसं त्याने बहिणीला शोधण्यासाठी पाठवली होती.

*****

मुबंई मध्ये एका छोट्याश्या घरामध्ये...

एक व्यक्ती खुर्चीवर बसून फोन वर बोलत होती.

" हॅलो.... झालं का काम...."

" हो....झालं मी कॉल करणारच होतो तुम्हाला..."

" काय माहिती मिळाली...."

"एक व्यक्ति आहे जी त्यांच्या अवती भोवती फिरताना दिसते...मला वाटतं तो मॅडमांच्या पाळतीवर आहे...."

"कोण आहे तो?, ओळखता का तुम्ही त्याला"

"नाही , पण लवकरच कळेल की कोण आहे तो."

"ओके, लक्ष ठेवा त्यांच्यावर, मालकांचा जीव वसला आहे त्यांच्यामध्ये"

"हो नक्कीच साहेब.."

तो इसम उठला व बेडवर झोपलेल्या आपल्या मालकाकडे गेला.

" मालक , काय बी काळजी करू नकासाssss, ताईसाहेब बऱ्या हायती. तुमी लवकर ठीक व्हा म्हणजे आपल्याला ताईसाहेबच्या कड जाता येईल."

तो इसम आपल्या मालकाशी बोलत तर होता पण, बेडवर झोपलेली व्यक्ती काहीही न बोलता, न काही हालचाल करता फक्त छताकडे पाहत पडून होती.

"सावित्री, लक्ष दे मालकांच्याकड. मी आलो जाऊन बाहेर जरा."

अस म्हणून तो इसम घरा बाहेर पडला.

*****

"आदी sss , चल जेवया." साहिल आदित्य च्या केबिन मध्ये येत बोलाल.

पण त्याला आदि केबिन मध्ये दिसला नाही.
साहिल मनातच विचार करू लागला,"हा कुठे गेला असेल आता?"

साहिल तसाच बाहेर आला आणि शिपाई पवारांना बोलवलं.

"पवार , साहेब कुठे गेले?"

"काय माहित नाही साहेब, पण सकाळीच गेलेत ते बाहेर अजून आले नाहीत."

"बर तू जा." अस म्हणून साहिल ने खिशातून मोबाईल काढला आणि आदित्यला कॉल केला.

"हॅलो!,कुठे आहात साहेब?"

"हो आलोच , काही काम होत का?"

"हो खूप महत्वाचे काम आहे, तुला किती वेळ लागणार आहे?"

"हे काय आलोच" अस म्हणत आदित्य आत आला.

"बोल काय काम होत?" आदित्य त्याच्या जवळ जाऊन बोलला.

"भूक लागली आहे.." तो पोटावरुन हात फिरवत बोलला.

"एवढंच ना चल जेवुया"

अस म्हणत आदित्य त्याच्या खांद्यावर हात टाकून बाहेर आला. जवळच्याच रेस्टॉरंट मध्ये त्यांनी जाऊन ऑर्डर दिली.

"काय रे, तू कामाच्या वेळेत कुठे गेला होतास?"

"काम होत थोडं म्हणून गेलो होतो."

"कोणतं काम?"

साहिलचा प्रश्न ऐकून आदित्य काही क्षण गप्प बसला, आणि बोलला.

"एक नवीन क्लायंट आहे, त्याला भेटायला गेलेलो."

"अच्छा, मग झालं का काम ?"

"हो, दोन दिवसात होईल सगळं "

******

आयडियल इंग्लिश मेडीयम स्कुल...

अन्वी स्टाफरूमध्ये काम करत बसली होती. गोखले सर ही तिथे आले.

"हाय, दीक्षित मॅडम...प्रिन्सिपल सरांनी काल मीटिंग मध्ये काय सांगितलं? .

अन्वी वहीत काही तरी लिहीत होती. लिहिता लिहिताच ती बोलली," दरवर्षी प्रमाणे मुलांना शॉर्ट टूरला नेण्याबाबत मिटिंग होती. "

" कुठे घेऊन जायचं ठरवले आहे ?" गोखले सर बोलले.

जवळच बसलेले पाटील सर बोलले.

"काय नेहमीच आहे आहे ना पाचगणी , कास पठार , मॅप्रो असंच की कुठे तर.."

"कास पठारsss, आता बघण्यासारखं असेल ना मग तिकडेच जाऊया का?"

"हो मला ही पाहायचं आहे , मी ही नाही गेले कधी तिकडे " मस्के मॅडम बोलल्या.

"आपल्या साठी नाही ओ ट्रिप मुलांच्यासाठी आहे."

"हो मुलंही पाहतीलच ना"

" मुलंही पाहतील आणि आपण ही"

अश्या गप्पा सुरु होत्या. थोड्यावेळातच पाटीलसर , मस्के मॅडम बाहेर निघून गेले.

स्टाफरूमला आता फक्त अन्वी व गोखले सर बसले होते. कोण नाही हे पाहून सर अन्वीला हळूच म्हणाले.
" तुम्हाला कुठे जायला आवडेल मॅडम"
त्याच्या बोलण्याचा टोन पाहून अन्वी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं.
" मला आवडेल तुम्हाला घेऊन जायला. फक्त तुम्ही आणि मीsss" गोखले सर ओठांवरून जीभ फिरवत बोलले.

"हो पण मला इंटरेस्ट नाही तुमच्या सोबत येण्यात, तुम्ही अस करा तुमच्या मिसेस ला घेऊन जा फिरायला, आवडेल त्यांना, फक्त तुम्ही आणि तुमची बायको..." अन्वी हसत बोलली आणि बाहेर निघून गेली.

तिच्या या उत्तराने गोखले सर आवक होऊन तिच्याकडे पाहतच राहिले.

रुद्र कोणाला शोधत आहे?, तो आजारी माणूस कोण आहे? आणि ते कोणत्या स्त्री बद्दल बोलत आहेत ?
जाणून घेऊ नेक्स्ट पार्ट मध्ये . हा पार्ट कसा वाटला नक्की सांगा.

धन्यवाद!


Rate & Review

Mansi

Mansi 4 months ago

Soni Verma

Soni Verma 4 months ago

nice

smita sahasrabuddhe
Vishal Bhire

Vishal Bhire 6 months ago

शारदा जाधव