Night Games - Episode 19 in Marathi Horror Stories by prajakta panari books and stories PDF | रात्र खेळीते खेळ - भाग 19

रात्र खेळीते खेळ - भाग 19

पाऊस चालूच असतो पण त्यासोबत मोठ वादळ येत कावेरीने ठेवलेला दगड एक काळी सावली जमिनीपासून वर स्वतः कडे खेचून घेते त्यासोबत ती ने लिहिलेली अक्षर पुसली जातात..

ते थोड्या अंतरावर जातात आणि वीर व अनूश्रीला आवाज देवू लागतात पण ते आलेले वादळ आणि पावसाचा वाढलेला जोर यातून त्यांचा आवाज कदाचित त्यांच्यापर्यंत पोहोचतच नसतो‌. ते परत हाक मारून एकदा परत जावून बघाव म्हणून मागे वळतात. आणि मोठ्या काळजीत पडतात कावेरीला अधिराज दिसतच नाही कोठे ती खूपच घाबरते अरे अचानक हा अधी कोठे गेला आताच तर आम्ही बोललो...
अधिराजही जस मागे वळतो तस त्याला धक्का बसतो त्याला कावेरी दिसतच नाही त्याच्या मनातही पुरता गोंधळ निर्माण होतो अरे काय हे हि कावू कोठे गेली आता आताच तर इथे होती.. तो तिला आवाज देवू लागला.

अनूश्री आणि वीर एकमेकांचा हात पकडत कावेरीला आणि अधिराजला शोधत असतात पण त्यांना सुद्धा ते सापडतच नसतात. तरीही ते तसेच चाललेले असतात.

एका जागी गेल्यावर त्या दोघांचे पाय स्थिरावतात. वीर म्हणतो.....
ये अनू बघितलस ....
हो रे नक्कीच ते दोघे काही वेळापूर्वी याच जागेवर होते.. ते पुढे जातच असतात तोवर अनूच्या पाया खालील जमीन दुभंगते व अनू खालच्या खोलीत जाते... हि क्रीया इतकि वेगात घडते कि वीर आणि अनूश्रीला काय करायच तेच कळत नाही कारण त्यांचे हात एकमेकांच्या हातातून निसटतात. वीर त्या अंधाऱ्या जमिनीखालील खोलीत डोकावून अनूश्रीला आवाज देवू लागतो... ये अनू ये अनू... तो आत डोकावतो पण त्याच्या एक गोष्ट लक्षात येते त्याच्या हातातल पुस्तक पेट घेवू लागलेल असत तो तसाच मागे जातो आणि फुंकर मारणार असतो पण अचानकच पुस्तक परत होत तस होत. तो ते पुस्तक तसच धरत परत अनूला आवाज द्यायला जातो तस ते पुस्तक परत पेट घेत.... तो परत मागे येतो... आणि स्वतः शीच म्हणतो नक्कीच इथ खूपच मोठ्या प्रमाणात नकारात्मकता आहे पण अनूला असच सोडून कस जाणार पण हे पुस्तक सुद्धा व्यवस्थित राहिल पाहिजे... काय करायच.. थोड्या वेळात त्याला एक कल्पना सुचते. तो त्या पुस्तकाला वडाच्या झाडाच्या खोडात ठेवतो त्याने अस ऐकलेल कि वडात देवाचा वास असतो आपण अनूला शोधून परत येवू म्हणून तो ते पुस्तक खोडात ठेवतो आणि त्या खड्ड्यात उडी घेतो.

कावेरीला कळतच नाही कि आता काय कराव मनात तर पुन्हा नको ते विचार सुरू होतात पण तिला विश्वास वाटत असतो कि आपल्याला भ्रमित केल जात आहे पण आम्ही लांब नाही आहोत कदाचित आम्ही खूप दूर जाव परत म्हणून हे सगळ ते घडवून आणत आहेत. तिच्या हातात अजूनही ते शस्त्र असत ती तशीच त्या शस्त्राला डोळे मिटून वंदन करते आणि म्हणते हे श्रीराम तुम्हीच आता काही तरी मार्ग दाखवा.. ती मनातच जय राम श्रीराम जय जय राम जप करू लागते...

त्यासोबत तिथली जमीन हादरे देवू लागते.. पण तरीही ती डोळे न उघडता साधना सुरूच ठेवते... अचानकच तीच्या डोळ्यासमोर काही चित्र दिसू लागतात... तीच्या डोळ्यासमोर काही वेळापूर्वीचा प्रसंग उभा राहतो ती आणि अधिराज चाललेला असतो. त्यांच्याच शेजारी थोड्या अंतरावरून वीर आणि अनूश्री चाललेले असतात.. ते चौघही एकमेकांकडे बघत असतात.. आणि कावेरीला आश्चर्यच वाटत अरे ते आमच्याच बाजूला होते अस कस होईल आम्हाला तर तिथ झाड झुडपच दिसत होती.. ती तसच थांबते पुढच चित्र बघूनही तिला धक्काच बसतो जेव्हा ती आणि अधिराज मागे वळतात तेव्हाही ते एकमेकांच्या सोबतच असतात तिला परत आश्चर्य वाटत हे कस शक्य आहे अधिराज आणि मी शेजारीच राहून एकमेकांना हाक मारत होतो तरीही आमचा आवाज एकमेकांना ऐकू जात नव्हता..
ती परत पुढे बघू लागते तिला अनूच आणि वीरच चित्र दिसत वीर आणि अनू चाललेले असतात आणि अचानकच अनूच्या पायाखालची जमीन दुभंगून जाते. अनू त्या खोलीत जाते... नंतर वीरही पुस्तक त्या खोडात ठेवून त्या खड्ड्यात उडी घालतो अरे हा तर तोच खड्डा आहे ज्यात आपण फसलो होतो... पण कसली माया करतात हे लोक इतक्या जवळ असूनही आम्ही एकमेकांना पाहू नाही शकलो... तीच्या समोर आणखी एक चित्र उभ राहत त्यात अधिराज ती ने दगडाने अक्षर कोरलेल्या ठिकाणी जातो.. तर तिथ अक्षरच नसतात तिला परत आणखी एक चित्र दिसत एक काळी आकृती तो दगड उचलतो त्यासोबत ती अक्षर पुसली जातात... शीट यार त्या आकृतीने आमच्या खूणाही पूसल्या.. ती तशीच बघत राहते.. तोवर तिला आणखी एक चित्र दिसत त्यात अधिराजला मारायला धार केलेला एक सूरा घेऊन तो म्हातारा येत असतो... कावेरी तशीच उठत देवाच नाव घेत तशीच धावत धावत आधीच्या ठिकाणी जावू लागते यावेळी देवाच नामस्मरण केल्यामुळे तिला कोणतीही माया भूलवत नाही.. कि रस्ता शोधताना अडचण येत नाही ती तशीच धावत पळत त्या ठिकाणी जावू लागते.. तो म्हातारा अधिराजवर सूरा धरतो. अधिराज अनभिज्ञ असतो पण मागे कसलीतरी हालचाल जाणवते म्हणून मागे वळून बघतो तसा हादरूनच जातो. तो माणूस राग राग धरून त्वेषाने सूरा चालवतो पण तो सूरा दुसरीकडेच पडतो कावेरी तिथे पोहोचलेली असते. ती त्याला माणसाला दूर ढकलते. त्या माणसाला जोरात फटका पसतो.. त्याला हाताला आग लागल्यासारखी होते कारण तीच्या हातात ते शस्त्र असत आणि आता आणखी एक गोष्ट पुस्तक जवळ असत... ती येताना त्या वडाच्या खोडातल पुस्तक घेऊन आलेली असते.. तिला चित्रात दिसलेल असत कि ती सगळे मिळून ते झाड पाडणार असतात त्याला जाळणार असतात ते पुस्तक जळाव म्हणून... खर तर ही पुढची घटना असते पण कदाचित देव त्यांना थोडी मदत करावी म्हणून तीच्या डोळ्यासमोर आणतो.. ती मागे बघते पण तो माणूस गायब झालेला असतो.. पण तिथे त्याचा आवाज घुमतो असच मारणार नाही आता तुम्हाला तुम्ही माझ्या मनातला अग्नि आणखीच भडकवला आहात आता तर याच एकत्र एकत्रच एकमेकांसमोरच सगळ्यांना मारतो मित्रांसाठी रडवत रडवत.. हा..‌ हा... हा...
पण ते दोघ परत एकत्र आलेले असतात म्हणून त्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून आधी एकत्र तर येवू नंतर काय होईल ते होईल अस म्हणून पुढे जावू लागतात..
कावेरीला चित्रात दिसलेल असत कि अनू आणि वीर त्या खड्ड्यात गेलेले असतात ती अधिराजसोबत आता जावू लागते..
अनू त्या खड्ड्यात बेशुद्ध पडलेली असते वीर तिला आवाज देत देत पुढे चाललेला असतो.. त्याला तिथे खूपच नकारात्मकता जाणवत होती.. अचानकच एक आवाज त्याच लक्ष वेधून घेतो.. तो राजचा आवाज असतो.. तो त्याला हाक मारत होता...‌
तो त्या आवाजाच्या दिशेने जावू लागतो. पण त्याला निराशाच येवू लागते. कारण फक्त आवाजच येत असतो तिथल्या कोपऱ्या कोपऱ्यातून पण त्याला कोठेच राज सापडत नाही.. त्याच्या लक्षात येत नक्कीच हा त्या माणसाचाच डाव आहे त्याला मी अनूपर्यंत पोहोचू नये अस वाटत असणार... पण राज पण असू शकतो ना तो ही नाही सापडला अजून पण नाही अस नाही होवू शकत जर राज असता तर त्याच्या आवाजात आपल्याला आर्तता जाणवली असती कारण आम्ही एक दिवसासाठी जरी नाही भेटलो तरी तो किती भावूक होवून आवाज द्यायचा त्यासोबत आधी गळ्यात पडून रडायचा त्याला शांत कराव लागायच नाही हा राज नाही असू शकत. त्याचे डोळे परत भरून येतात.. परत भानावर येवुन तो अनूला शोधू लागतो...

ये कावू कोठे घेऊन आलीस या खड्ड्यात किती जोरात उड्डी मारलीस नंतर मलाही मारायला लावलीस.. काय यार तू अस मी साध्या कट्ट्यांवरून पण कधी उड्डी घेतली नाही..
अरे गप्प ना काय करायला आलोय आपण इथे आणि तु तुझ पुराण सांगतोयस...
काय माझ बोलण पुराण वाटतय तुला....
नाहीतर काय खरच आहे तस आणि हसू लागते.. त्यालाही हसायला येत...

पण कावेरी खरच इथे सापडेल ना अनू आणि वीर...
हो रे नक्की ते इथेच सापडतील... मला तसच दिसलय...

दिसलय म्हणजे तुला कस काय दिसल.... अधिराज विचारतो..

ते तुला नंतर सांगते आधी त्यांना शोधूया अस म्हणत ती पुढे जाते तस पायाला काहितरी लागत आणि तीचा तोल जातो... त्यासोबत कावेरीच आणि अधिराजच लक्ष खाली जात. तर खाली अनू बेशुद्ध पडलेली असते...

अशा प्रकारे तिघांची भेट होते....