वारस - Novels
by Abhijeet Paithanpagare
in
Marathi Horror Stories
"अय गण्या,आर इथं कुठं आणलंस र?तुझ्या चपटी पिण्याच्या नादात आपल्या दोघांच मढ बसण बघ" भिऊ नको रे तू,काय नाय होणार,मी एकदा आधी पण आलोय इथं,काय भूत बीत नाहीये"पर गावकरी तर म्हणत्यात कि जांगलातल्या वाड्यात जायचं नाही ते,तिथं कुणाला बी जायची परवानगी नाहीये ना"गावातल्या लोकांकड कुठं ध्यान देतू,, कोण बुवा कधी बोलून गेलाय आणि समदे जण त्याच्या बोलण्यावर भरोसा ठेऊन इकडं येत नाही.आणि तस आपण कुठं वाड्यात जाणार हावोत,आपण दूर थांबायचं त्या वाड्यापासून"दूरच थांबायचं हाय तर मग जातूच कशाला?"मग पिणार कुठं र?आपली जुनी जागा त्या त्या नदी काठची तर आता पावसाळा लागल्यानं पाण्यात गेलीये,,अन नवीन सरपंचान तर गावात चार वर्षांपासून दारूबंदी
"अय गण्या,आर इथं कुठं आणलंस र?तुझ्या चपटी पिण्याच्या नादात आपल्या दोघांच मढ बसण बघ"" भिऊ नको रे तू,काय नाय होणार,मी एकदा आधी पण आलोय इथं,काय भूत बीत नाहीये""पर गावकरी तर म्हणत्यात कि जांगलातल्या वाड्यात जायचं नाही ते,तिथं कुणाला बी ...Read Moreपरवानगी नाहीये ना""गावातल्या लोकांकड कुठं ध्यान देतू,, कोण बुवा कधी बोलून गेलाय आणि समदे जण त्याच्या बोलण्यावर भरोसा ठेऊन इकडं येत नाही.आणि तस आपण कुठं वाड्यात जाणार हावोत,आपण दूर थांबायचं त्या वाड्यापासून""दूरच थांबायचं हाय तर मग जातूच कशाला?""मग पिणार कुठं र?आपली जुनी जागा त्या त्या नदी काठची तर आता पावसाळा लागल्यानं पाण्यात गेलीये,,अन नवीन सरपंचान तर गावात चार वर्षांपासून दारूबंदी
पहाट झाली होती.जरासं तांबडं फुटल्यासारखं वाटत होत,त्या तसल्या अंधुक प्रकाशात वाट काढत काढत शेवटी विजू गावच्या वेशी जवळ पोहोचलाच,.चेहऱ्यावरून गावात कस तरी करून पोहोचल्याचा आंनद ओसंडून वाहत होता,त्याला कारण सुद्धा तसंच होत.गावातून बाहेर पडायला आणि गावात घुसायला दोनच रस्ते.त्यातला ...Read Moreरस्ता ऐन पावसात नदीच्या पुरामुळे पुरता बंद व्हायचा.आणि दुसरा रस्ता जायचा तो घनदाट झाडीतून,जन्गलातून,आणि त्या तसल्या वाटेतून कसातरी रस्ता काढत काढत दोन वर्षा नंतर तो गावात पोहोचला होता.गावात तर आला पण आता कधी घरी पोहोचतो आणि कधी नाही असं त्याला झालं होतं.गावात कालच भरपूर पाऊस पडल्याने जागोजागी चिखल जमला होता,कशीतरी त्यातनं वाट काढत काढत तो पुढे सर करू लागला.आता पहाट
मंदिरातन निघून विजू घराकडे निघाला,घर म्हणाल तर त्याच स्वतःच अस घर नव्हतंच,आई आणि बाबा लाहनपनीच देवाघरी गेलेले, त्यामुळे त्याच्या काकांकडेच तो रहायचा.काका तसे स्वभावाने चांगले,प्रेमळ,,काकू सुद्धा जीव लावायच्या,एकंदर आई बाबांची कमी कधी जाणवू नये असाच त्यांचा प्रयत्न असायचा.त्याना स्वतःच ...Read Moreनसल्याने त्यांनी विजू आणि चिमणीला स्वतःच्या मुलाप्रमान जपलं होत. विजू सगळं सामान घेऊन भरभर पाऊल टाकत घराकडे आला,तेच ते जून दगड मातीने बनलेलं पण प्रशस्त घर,घराच्या बाहेर एक छानसा गोठा होता,त्यात चार पाच गुर दिसत होती.विजू ने गोठ्यात जाऊन हळुवार पणे गायीवरून हात फिरवायला सुरुवात केली,तेव्हढ्यात त्याच्या पायाशी येऊन मोती रेलू लागला,,विजू ते सगळं बघून फारच खुश झाला.दोन वर्षानंतर गावात
4अशाप्रकारची सूचना करून पाटलांनी मग सभेकडे बघितलं तर मंडळी सगळे लोक काळजी घ्या,,आपल्या घरातल्या लोकांना तिकडं जाण्यापासून थांबवा,आणि हो तरुण पोरानो कुठलंही पाऊल उचलण्या आधी एकदा आमची परवानगी घ्या म्हणजे अजून जास्त अघटित घडायचं नाही बघा,चला आता ही सभा ...Read Moreसम्पली अस मी जाहीर करतो ,सरपंचांनी सभेची सांगता केली आणि हळूहळू सगळेच पसार होऊ लागले,,बघता बघता पूर्ण वाडा आता खाली झाला.विजू आणि गृप ने सुद्धा पाटलांचा निरोप घेतला ,त्यांच्या सोबतच कविता पण निघाली,'कविता',विजुच्याच वर्गात शिकलेली, रंगाने गव्हाळ पण तशी सुंदर.ती पण गावच्या शाळेतच सध्या शिक्षिका म्हणून कार्यरत होती,श्रीधर ची मानलेली बहीण.त्या दोघांनी मिळून शाळेला बऱ्यापैकी सुधरवल होत.खूप सारे गावातले मुलं आता शाळेत
5सर्व जण मग्न असताना अचानक कुणीतरी ग्रंथालयाच्या दरवाज्यात येऊन उभ राहील. एक व्यक्ती होता तो,,पांढरीशी दाढी,मिशी,,डोळ्यांवर चष्मा,,आणि हातात आधार मिळावा म्हणून एक काठी.मुख्यध्यापक होते ते,, काय करताय रे पोरानो इथं,,माझ्या परवानगी शिवाय आतमधे घुसलच कसे? ,एकदम करारी आवाजात ते ...Read Moreसर तुम्ही,,अहो आम्ही इथं..म्हणजे... ,श्रीधर अडखळत अडखळत बोलू लागला, इथं काय इथं,,इतक्या रात्री करताय काय? अहो सर आम्ही त्या वाड्याबद्दल माहिती शोधायला आलो होतो. ,कविता एका झटक्यात बोलली. कोणता वाडा? तोच जन्गलातला वाडा, ज्यामुळे सरपंच दगावले आहेत,,विजू म्हंटला कि त्या वाड्याबद्दल एक पुस्तक आपल्या ग्रंथालयात आहे,,म्हणून आम्ही वेळ न घालता रात्रीच इथे आलो पुस्तकाचं नाव ऐकताच अचानक ते गम्भीर झाले, विजय,तुला त्या पुस्तका बद्दल माहिती कुठून मिळाली? माझ्या बाबांनि लहानपणी मला सांगितलं
6सरांनी हि पूर्ण कहाणी सांगितली अन एक सुस्कारा टाकला.त्यांनी हळुवार प्रत्येकाकडे बघितल.महेश,सूर्या, तुका ,कविता यांच्या चेहऱ्यावर गोंधळ स्पष्ट दिसत होता.आपल्या गावात अस काही झालं असेल याची कल्पनाहि त्यांनी कधी केली नसणार,,श्रीधर ला अनेक प्रश्न पडले अस वाटत होत,,तर विजू,विजूच्या ...Read Moreलकेर सुद्धा बदलली नव्हती,इकडे श्रीधर ने त्यात प्रश्न टाकला, सर पण जर का तो वाड्यात कैद आहे,मग त्याने वाड्याच्या बाहेर येऊन हत्या कशा केल्या? हा चांगला प्रश्न विचारलास बेटा.काय आहे ना कुठलंही मायाजाल असलं ना तरी त्याची एक कमजोर कडी असतेच...तो त्या वाड्यात कैद आहे असं म्हणण्यापेक्षा तो तिथून बाहेर पडू शकत नाही. बाहेरचा प्रकाश मग तो कुठलाही असो त्याला अडवून ठेवतो,पावसाळ्यात
7दोन तीन दिवस असेच गेले... विजू च तर्क वितर्क लावणं चालू होत.त्यात त्याला त्याच्या मित्रांची पण साथ मिळतच होती....असेच सगळे जण संध्याकाळी कट्ट्यावर बसले असताना अचानक दुरून त्याना सूर्य पळत येताना दिसला...धापा टाकत टाकत तो विजू जवळ आला, ...Read Moreसूर्या, काय झालं,एव्हढा का घाईत आहेस आर विज्या,एक खराब बातमी हाय बघ. काय झालं? आर आपल्या शाळेचे हेडमास्तर वारले,,मंदिरा पासल्या विहिरीत त्यांचं शरीर तरंगत आहे,चला पटकन बघाया ते ऐकताच सगळेच जण ताडकन उठून उभे राहिले,सगळ्यांनाच धक्का बसला होता... सगळेच जण पळत पळत विहिरीपाशी गेले... काही पोरांनी मिळून ते शरीर बाहेर काढलं... धड एकदम पाणी भरल्याने फुगलं होत.कुणाला विश्वासच बसत नव्हता कि अस काही झालंय म्हणून... सरांची
8दुसऱ्या दिवशी रविवार होता.शाळेला सुट्टी असल्याने कविता पण आज घरीच होती.सुमारे सकाळचे अकरा वाजले असणार ,कविता भरभर पावलं टाकत विजूचा घरी जात होती,त्या तशा वातावरणात पण तिला दारुण घाम फुटला होता... घरात घुसत नाही ते लगेच चिमणी दारातच ...Read Moreहोती,,शाळेत पण तिला शिकवायला कविताच असल्याने दोघींची चांगलीच गट्टी जमली होती, तुम्ही विजू दादा साठी आलात ना इथं,,पण विजू दादा तर झोपूनच आहे काय, अकरा वाजता ,तिला त्याच्या त्या शहरातल्या या आळशी सवयीचा आधीच राग यायचा आणि त्यात आज तर घाई पण होती. चल आपण जाऊन उठवू त्याला ,अस म्हणत दोघीही त्याच्या खाटे जवळ गेल्या.आजूबाजूला अनेक पुस्तक अस्ताव्यस्त पडलेले होते.कदाचित रात्रभर काहीतरी वाचत बसला असणार तो..
9उभा घटने नन्तर तर गावाला जणू ग्रहण लागलं होतं ,गावातले प्रतिष्ठित व्यक्ती जसे सरपंच,मुख्यध्यापक यांचा मृत्यू झाला होता,पाटील गावातून गायब झाले होते,गावातून बाहेर पडायला मार्ग नव्हता...दर दोन दिवसातून एक व्यक्ती गायब होत होता,गावातून बाहेर पडण्याचा मार्गही नव्हता,श्रीधर तर पूर्णतः ...Read Moreगेला होता.विजू ने पुन्हा तिकडं वळून न बघण्याचा निर्णय घेतला .गावातला प्रत्येक व्यक्ती पुढचा नंबर आपला नसावा अशी प्रार्थना करत दिवस काढत होता.असाच एक महिना निघून गेला.मागच्याच आठवड्यात आलेल्या अमावस्येच्या तर 3 लोक एकाच दिवशी गायब झाले.गावात घाबराटीच वातावरण होत.अशाच वेळेत एके दिवशी सकाळी सकाळी कविता पळत पळत विजू च्या घरी आली,होणाऱ्या सासू सासर्यांना नमस्कार करून तिने नेहमीप्रमाणे गाढ झोपलेल्या
10दुसरा दिवस उजाडला,,त्या दिवसाप्रमाणेच आज तिघेच पहाटे पहाटे वाड्याकडे निघाले होते.आज तस वातावरण साफ वाटत होत... गारवा पण कमी होता.हळूहळू करत करत तिघेही टेकडीच्या पायथ्याशी पोहोचले.मागच्या वेळेसच अनुभव आजही श्रीधरच्या अंगावर काटा आणत होता."लक्षात ठेवा आपण चाललो तर आहे,तिघे ...Read Moreआहोत,येताना एकत्र तिघेही येउ नाहीतर एकही नाही,,कारण तिघांपैकी एकजण जरी वाचलो तरी त्या प्रसंगाची आठवण आपल्याला आतुन मारून टाकेल",श्रीधरच्या बोलण्याचं दुःख कळून येत होत.विजू त्याला उत्तर देत बोलला,"आज नाही श्रीधर ,आज मी तसा प्रसंग पुन्हा येऊच देणार नाही"झालं तर मग,विठ्ठलाचं नाव घेऊन तिघेही निघाले टेकडी चढायला ,टेकडी चढताच समोर वाडा उभा होता.वाड्यात आतमधे घुसणार तोच कविताने मृगरस तिघांवर सुद्धा शिंपडला,त्याचा
11आणि तो करार म्हणजे तेहत्तीस माणसांचा भोग,जेणेकरून त्यांना हे असलं का होईना शरीर मिळेल आणि मग त्याद्वारे ते मुक्त होईल... सर्वप्रथम माझी ही ऑफर ते स्वीकारत नव्हते.पण शापाच्या वेदनानी त्यांना झुकवल... ठरलं तर मग मी त्यांना तेहत्तीस भोग चढवणार ...Read Moreआणि ते मला ते गुपित सांगणार होते.आणि माझं नशीब पण बघ ना ज्या रात्री मी इथं आलो त्याच रात्री मला सरपंच वाड्या बाहेर दिसले... मग काय त्यांच्यापासूनच मी सुरुवात केली,,तो मूर्ख माणूस बोकडाचा नैवेद्य घेऊन आरती म्हणत होता,मग काय हीच वेळ साधून त्याला मी डोक्यात वार करून बेशुद्ध केलं आणि त्याचाच नैवेद्य माझ्या बा ला चढवला... त्याच्याच तासभर नंतर गण्या