OR

The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.

Matrubharti Loading...

Your daily story limit is finished please upgrade your plan
Yes
Matrubharti
  • English
    • English
    • हिंदी
    • ગુજરાતી
    • मराठी
    • தமிழ்
    • తెలుగు
    • বাংলা
    • മലയാളം
    • ಕನ್ನಡ
    • اُردُو
  • About Us
  • Books
      • Best Novels
      • New Released
      • Top Author
  • Videos
      • Motivational
      • Natak
      • Sangeet
      • Mushayra
      • Web Series
      • Short Film
  • Contest
  • Advertise
  • Subscription
  • Contact Us
Publish Free
  • Log In
Artboard

To read all the chapters,
Please Sign In

Mala Kahi Sangachany by Praful R Shejao | Read Marathi Best Novels and Download PDF

  1. Home
  2. Novels
  3. Marathi Novels
  4. मला काही सांगाचंय..... - Novels
मला काही सांगाचंय..... by Praful R Shejao in Marathi
Novels

मला काही सांगाचंय..... - Novels

by Praful R Shejao in Marathi Fiction Stories

(509)
  • 101.3k

  • 292.6k

  • 255

१. शेवटचा संवाद....? उन्हाळा ऋतू । एप्रिल महिन्यात दिवसभर प्रवास करून सूर्य मावळतीला आला , तसे चिमणी पाखरांचे थवे शांततेने परत आपल्या घरट्याच्या दिशेने निघाले तर दुचाकी चारचाकी वाहने तीच शांतता भंग करत, सर्व , घराच्या दिशेने निघाले, ...Read Moreगर्दीत एक युवक आपल्या दुचाकीवरून जात होता बहुतेक घरीच । मध्येच दुचाकीचा वेग कमी करून त्याने मोबाइल बाहेर काढला आणि कानाला लावलेले हेडफोन ठीक करत रिंग जात आहे कि नाही ऐकायला लागला , तोच दुसऱ्या बाजूने हॅलो कोण बोलत आहे ? असा आवाज ऐकू येताच एक दीर्घ श्वास घेत त्यानेसुद्धा हॅलो म्हणत प्रतिसाद दिला दुसऱ्या मोबाईल वरून हॅलो ... कुमार

Read Full Story
Download on Mobile

मला काही सांगाचंय..... - Novels

मला काही सांगाचंय..... - Part - 1 - 2
१. शेवटचा संवाद....? उन्हाळा ऋतू । एप्रिल महिन्यात दिवसभर प्रवास करून सूर्य मावळतीला आला , तसे चिमणी पाखरांचे थवे शांततेने परत आपल्या घरट्याच्या दिशेने निघाले तर दुचाकी चारचाकी वाहने तीच शांतता भंग करत, सर्व , घराच्या दिशेने निघाले, ...Read Moreगर्दीत एक युवक आपल्या दुचाकीवरून जात होता बहुतेक घरीच । मध्येच दुचाकीचा वेग कमी करून त्याने मोबाइल बाहेर काढला आणि कानाला लावलेले हेडफोन ठीक करत रिंग जात आहे कि नाही ऐकायला लागला , तोच दुसऱ्या बाजूने हॅलो कोण बोलत आहे ? असा आवाज ऐकू येताच एक दीर्घ श्वास घेत त्यानेसुद्धा हॅलो म्हणत प्रतिसाद दिला दुसऱ्या मोबाईल वरून हॅलो ... कुमार
  • Read Free
मला काही सांगाचंय.... - Part - 3 - 4
३. अघटित आता सर्व जागीच स्तब्ध झालं होतं. वाहनांची गर्दी आता रस्त्यावरून कुमार पडला त्याठिकाणी व्हायला लागली होती. सगळे लोक काय झालं ? कसं झालं ? एकमेकांना विचारत होते तर काही जवळ जाऊन त्याला बघत होते.... डोक्याला मार लागल्याने ...Read Moreरक्त वाहत होते. कुमार मात्र डोळे बंद करून पडून होता इतक्यात कुणीतरी फोन करून रुग्णवाहिका बोलावली... काही वेळांत पोलीस हि अपघातस्थळी आले आणि पंचनामा करायला लागले सगळं कसं अचानक घडलं होत. ... लोक आपसात कुजबुज करत होते ... कोण आहे हा तरुण ? कसा घात केला नशिबानं ! काय होईल देव जाणे ! कुणी म्हणत होत खूप रक्त गेलं
  • Read Free
मला काही सांगाचंय.... - Part - 5 - 6
५. वास्तव अवास्तव असं घाई घाईत बोलून लगेच फोन ठेवल्यामुळे प्रशांत आणि त्याच्या आईला अनेक प्रश्न पडायला लागले होते...... कुमार कुठे आहे ?अजून घरी का आला नाही ?त्याचा मोबाईल कुणाला आणि कुठे सापडला? नेमकं काय झालं असेल ? तो ...Read Moreतर आहे ना ? वेळेचे भान ठेवून प्रशांत म्हणाला.. " आई तू काळजी करू नकोस ... मी जाऊन येतो पोलीस स्टेशनला, तू घरीच थांब. बाबा पण लग्नाला गेले , परत यायचे आहेत अजून..." त्यावर आई त्याला म्हणाली ... "अरे शहराला आले असतील पण वाहन नसेल गावी यायला , नाहीतर थांबले असतील मित्राकडे उशीर झाला म्हणून." एवढं बोलून ती थांबली. प्रशांत
  • Read Free
मला काही सांगाचंय.... - Part - 7 - 8
७. आसवांची परीक्षा गावातून बाहेर जात असता रस्त्यावरचे दिवे मनात येणाऱ्या विचारांसारखे एका मागून एक मागे जात होते. मनात असंख्य प्रश्न डोकं वर काढू पाहत होते, नेमकं काय झालं असेल कुमार सोबत? असा अचानक अपघात झाला कसा? फार लागलं ...Read Moreनसेल ना त्याला? परमेश्वरा कुमारला काही होऊ देऊ नकोस. असं मनात सुरु असता सुजित आणि कुमारची आई शहराकडे जायला निघाले.... या सर्व प्रकारापासून अलिप्त ... त्याच्या आईला मात्र याचा अजून थांग पत्ता नव्हता . चंद्र आणि चांदण्यांनी रस्ता प्रकाशमान होता जणू त्याच्या वाटेत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून कि काय ? बराच वेळ दोघंही शांत होते. त्यासाठी दोन कारणं होती
  • Read Free
मला काही सांगाचंय..... - Part - 9 - 10
९. डायरीचं गूढ कुमारला आपण पूर्ण समजलो नाही .... निदान जिवलग मित्र या नात्याने तरी... असं सुजितला वाटून गेलं... काय लिहलं असेल त्यानं यामध्ये आणि कुणाबद्दल? मनात असे विचार येत असता त्याने डायरीचं पहिलं पान उघडलं तर पहिल्याच पानावर ...Read Moreलाल रंगाने "मला काही सांगाचंय" असं मोत्यासारख्या सुंदर अक्षरात एखाद्या पुस्तकाचं नाव लिहावं तसं लिहलं होतं .... मग या डायरीत काय गुपित दडलं आहे हे पाहण्यासाठी सुजित पान पालटून वाचत होता . .. दोन तीन पान वाचून झाली न झाली तोच त्याचा फोन वाजायला लागला आणि डायरीच्या पानात बोट ठेवत त्याने फोन घेतला तर "अरे ,सुजित कुठं आहे तू
  • Read Free
मला काही सांगाचंय.... - Part - 11
११. एक नवीन पहाट डायरी वाचत असता पहाटेचे 5 केव्हा वाजले सुजितला कळलं नाही. डायरीचे शेवटचे पान वाचून झाल्यावर त्याने डायरी बंद करत पापण्यांवर थांबलेले आसवं पुसले. डायरी मांडीवर ठेवून तो तसाच बसला होता, आता त्याच्या मनात विचारांचे वादळ ...Read Moreहोते, रात्री 12 वाजल्यापासून तो जागी होता पण त्याला झोप येत नव्हती कदाचित डायरीत कुमारने जे काय लिहिलं होतं यामुळे; अनेक प्रश्न त्याला पडले होते मग विचार करत असता कुमारच्या आठवणी मनात गर्दी करायला लागल्या अन विचार करत असताच त्याचा डोळा लागला अन त्याला झोप लागली पण एक दीड तास झाला न झालाच वाहनांचा आवाज आल्याने त्याला जाग आली, शहर
  • Read Free
मला काही सांगाचंय.... - Part - 12
१२. शेवट कि सुरुवात ? ती घराच्या आवाराचे गेट उघडून आत शिरलीे. आवाराचे गेट लोटून आत जाताच कुणाचीही नजर पडेल अशी अतिमोहक गुलाबाची फ़ुलं हवेत डुलत होती.... आवाराच्या भिंतींना लागूनच लहान लहान पान असणाऱ्या कलमांची मोठ्या मेहनतीने लागवड केलेली.... ...Read Moreमध्यात सम्पूर्ण अंगण झाकणार इतकं विशाल बदामाचे झाडं...! जवळच थोडं दूर एका कोपऱ्यात असणारा मोगरा हि त्याचा सुगंध उधळत त्याच् अस्तित्व जपून होता.... अशीच आणखी बरीच झाडे तिथलं वारावरण प्रसन्न ठेवण्याची जबाबदारी अगदी प्रामाणिक पणे बजावत होते..... आवाराच्या गेट जवळून अगदी चार पाच पावलं चालत जाताच दारासमोर तुळशी वृन्दावन... या सर्व देखाव्यावरून शहरात कमी जागा असल्याची आणि त्यातही कमी जागा
  • Read Free
मला काही सांगाचंय .... - Part - 13
१३. प्रवास १ ती लगबगीने पावलं उचलत बस स्थानकच्या दिशेने निघाली... पावलं एकामागे एक जात असता मनात कितीतरी प्रश्न गर्दी करत होते.... रहदारीचे ठिकाण असल्याने रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार उंच अशोकाची झाडं होती.... तर मध्येच काही अंतराने गुलमोहराची झाडं ...Read Moreझाडाखाली बसायला जागा म्हणून बाक ठेवलेले .... तापत्या उन्हात हे बाक म्हणजे एक सवंगडी .... सकाळ संध्याकाळ झाली की तिथं गर्दी असते ... तर रोजच्या येण्याजाण्याच्या रस्त्यात येत असल्याने कि काय... या नवीन शहरात आल्यापासून तिला गुलमोहराचं एक वेगळंच आकर्षण वाटतं होतं... तिला मोहून टाकणारी गुलमोहराची झाडं आज वाऱ्यासोबत जणू गप्पा मारत होती.... पण आज त्यांच्याकडे साधी एक नजर सुद्धा तिने
  • Read Free
मला काही सांगाचंय.... - Part - 14
१४. तडजोड कुमारचे आई - वडील , आकाश आणि सुजितचे वडील गावाला पोहोचले. ते कुठेही न थांबता सरळ घरी आले. अंगण कसं रखरखं झालं होतं.. ते दुचाकीहून खाली उतरताच घरासमोर शेजाऱ्यांची गर्दी जमली... आकाशने घराच्या कुलुपाची चावी घेऊन ...Read Moreउघडला... जे काही लोक, कुमारला रात्री भेटायला जाऊ शकले नाही.. ते तब्येत आता कशी आहे ते विचारण्या त्याच्या अंगणात जमले होते.... सर्व कुमार कसा आहे..? हाच एक प्रश्न विचारत होते ... वारंवार कुमारचं नाव आणि त्याची विचारणा ऐकून ती माउली व्याकुळ झाली आणि घरात न जाता ... डोळ्यात जमा झालेल्या आसवांना वाट मोकळी करून देत ... दाराच्या पायरीवर बसली . ती
  • Read Free
मला काही सांगाचंय.... - Part - 15
१५. मैत्रीचं नातं ... इकडे जिल्हा रुग्णालयात ... प्रशांत आई वडिलांची वाट पाहत होता . त्याला भावाची झालेली अवस्था बघवत नव्हती तरी तो 5-5 मिनिटांनी ICU च्या त्या गोलाकार काचेतून कुमारला जाग आली की नाही ते पाहत होता . ...Read Moreवेळी तो निराश होऊन दाराजवळून परत येत होता ..... खरं तर त्याचं मन मानायला तयार नव्हत कि कुमारचा अपघात झाला आहे . कुमार स्वतः इतरांना वाहन हळू चालव म्हणून बजावत होता आणि स्वतः जबाबदारीनं दुचाकी हळूच चालवायचा . मग असं अचानक कसं काय होऊ शकत ? हा प्रश्न त्याला बेचैन करीत होता ... का म्हणून असं व्हावं ? का दादाच्या
  • Read Free
मला काही सांगाचंय...- १६-१
रुग्णवाहिका कुमारला जिल्हा रुग्णालय येथून घेऊन निघाली . सूर्य डोक्यावर आलेला ... आजूबाजूला धुराचे लोट तर रस्त्यात वाहनांची गर्दी , सुरळीत वाहतूक सुरु राहावी यासाठी मध्येच येणारे स्पीड ब्रेकर ... चौक आला की लाल दिवा लावून ट्रॅफिक सिग्नल वाटेत ...Read Moreआणखी नवा सोबती थांबायला भाग पाडत होता तर एकीकडे भरधाव वेगाने एका नवीन प्रवासाला सुरुवात झाली ... कुमारला मात्र या सगळ्या गोष्टींची काहीएक जाणीव नव्हती ... त्याचे वडील मायेनं त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होते . तो जणू डोळे मिटून या दुनियेपासून अलिप्त अश्या वेगळ्याच दुनियेत हरवला होता... त्याच्या मागेच काही अंतर ठेवून ऑटोने त्याची आई , प्रशांत आणि आकाश येत होते
  • Read Free
मला काही सांगाचंय...- १६-२
इकडे रुग्णवाहिका कुमारला घेऊन पोहोचली .... वॉर्डबॉय त्याला चाकांच्या बेडवर ठेवून आत न्यायला लागले सोबत त्याचे वडील आणि सुजीतचे वडील मागे मागे जात होते ... दवाखाना अगदी स्वच्छ आणि सर्व सोयीसुविधायुक्त असल्याचे त्यांना दिसून आले .... त्याचे रिपोर्ट डॉक्टर ...Read Moreयांनी आधीच पाहिले होते म्हणून त्याला ICU मध्ये दाखल करण्याचे सांगितले होते .... त्याला ICU मध्ये दाखल केले तोच डॉक्टर , नर्स यांनी त्याला तपासून त्याची अवस्था समजून घेत त्याला आवश्यक ते इंजेक्शन , सलाईन लावून ते बाहेर आले . कुमारच्या वडिलांची भेट घेऊन त्याला निरीक्षण करण्यासाठी आज रात्रभर ठेवू आणि उद्या सकाळीच ऑपरेशन करू काळजीच कारण नाही ... सर्व
  • Read Free
मला काही सांगाचंय...- १७-१
१७. नकळत... बस निघून गेली पण सुजित अजूनही तिथेच थांबून होता ... त्याला जे गुपित डायरी वाचल्यानंतर कळलं होतं ते तिला सांगणं गरजेचं होतं असं त्याला वाटतं होत . ' मी तिला सगळं सांगून टाकायला हवं होतं पण आता ...Read Moreनिघून गेली .... का म्हणून मी तिला सांगू शकलो नाही ? कुमारने जर मला कधी कळू दिल नाही तर आणखी कुणाला माहित असणं अशक्य .... शेवटी जे काय झालं ते तसेच कुमार आणि त्याच्या डायरीतच गुप्त राहावं असा नियतीचा कौल असावा ... ' मनातच हे सर्व काही तो स्वतःलाच सांगत होता , त्याचा मोबाईल वाजला .... " हॅलो सुजित ...
  • Read Free
मला काही सांगाचंय...- १७-२
१७. नकळत... remaining मग थोडं जेवण करून ते सर्व गच्चीवर जमले . निळ निळ आभाळ चटक चांदणं रात्र , चंद्राची कोर उमललेली , दाट झाडीत लुकलुक चमकणारे काजवे , मध्येच कितीतरी दुरून प्रवास करत येणारी वाऱ्याची झुळूक सोबत ...Read Moreसुगंध लेवून आली ... असा मनमोहक देखावा पण त्याकडे त्यांचं लक्ष नव्हतं तर कुमार जागा झाला असेल काय ? हा विचार ते करत होते मग न राहवून त्यांनी आकाशला फोन करून विचारलं पण त्यांची निराशा झाली ... मग पुन्हा एकदा सर्व कुमार आणि त्याच्यासोबत शेवटी कधी , काय बोलणं झालं हे सांगत होते ... त्याच्या आठवणी तो तिथं नसून असल्याचं भासवत
  • Read Free
मला काही सांगाचंय...- १८-1
१८. नियतीचा खेळ... आत कुमारचं ऑपरेशन सुरु होत ,पण त्याची काहीएक जाणीव त्याला नव्हती . तो आधीच बेशुध्द होता आणि ऑपरेशन सुरु करण्यापूर्वी डॉक्टरांनी त्याच्या काही अवयवांना सुन्न करेल असे इंजेक्शन दिले होते... जवळ जवळ दीड तास झाला तरी ...Read Moreसुरूच होते ..... कुमारच्या आई वडिलांना काळजी वाटत होती की आत जाऊन खूप वेळ झाला पण अजून काही कुमारला बाहेर आणलं नाही , तो ठीक तर असेल ना ? ती माउली मनोमन , " परमेश्वरा माझ्या कुमारला वाचव , त्याला जीवन दे , या संकटातून आमची सुटका कर अशी प्रार्थना करत होती . " तर बाहेर खुर्चीवर बसून खूप वेळ
  • Read Free
मला काही सांगाचंय...- १८-२
१८. नियतीचा खेळ... remaining तर इकडे ती तिच्या शहरात पोहोचली तेव्हा बराच वेळ झाला होता ... ती बसमधून उतरून घरी जातेवेळी रस्त्याच्या कडेला दिवे लागले होते , तिने मोबाईल मध्ये किती वाजले ते पाहिले तर ७:३० वाजलेले ... तिने ...Read Moreपरत हँडबॅगमध्ये ठेवला तर हाताला काहीतरी लागल्याचं तिला जाणवलं पण तिला घाई असल्यामुळे तिने त्याकडे दुर्लक्ष करून ती पटापट पावलं उचलत घरी जात होती , काही मिनिटांतच ती घरी पोहोचली ... पण कुमारला त्या अवस्थेत पाहुन तिचं मन सारखं त्याच्या विचारांत गुंतलं होतं.. ती घरी आल्यावर , तो ठीक असेल काय ? त्याची काय हि अवस्था झाली ? या प्रश्नांनी
  • Read Free
मला काही सांगाचंय...- १९-१
१९. स्मृति ती एक एक पान बाजूला सारत वाचत होती .... तोच तिला ते अक्षर कुमारचं असल्याचं लक्षात आलं ... तसं समोर आणखी काय लिहिलं असेल ? स्वतःलाच विचारत तिने पान सरकविले ... पानाच्या मधोमध लिहिलं होतं ..... मराठी ...Read Moreमाननीय भाऊसाहेब वा . वा . पाटणकर यांच्या ओळी आठवल्या , त्यात जरा भर घालून मन मोकळं लिहायला सुरुवात करतो ... " आजवर इतक्याचसाठी नव्हती आसवं गाळली । गाळायची होती अशी , की नसतील कोणी गाळली । आसवांच्या या धनाला जाणून मी सांभाळिले । आज या विरहाक्षणी यांनीच मला सांभाळिले ।" जरावेळ विचार करत तिने ते पान बाजूला केलं ...
  • Read Free
मला काही सांगाचंय...- १९-२
१९. स्मृति remaining - 1 तिच्याशी दुसऱ्यांदा भेट झाली तो दिवस ... मी आणि माझ्या मित्रांनी ऍडमिशन बद्दल आज माहिती मिळवून लगेच कॉलेज निवडायचं ठरवलं होतं , सर्व मित्र एकाच कॉलेजला आणि एकाच वर्गात प्रवेश घेऊ अस ठरवून होतो ...Read Moreमी कॉलेजला ऍडमिशन करायची म्हणून शाळा सोडल्याचा दाखला आणि मार्कशीट आणायची करिता गडबडीने निघालो होतो , आधीच उशीर झालेला ... मग काय घरूनच सायकल जोरात चालवत निघालो . तर ती तिच्या घराच्या अंगणात समोरच हजर , मी येत असल्याचे दिसून तिने हसत मला पाहिले . मग काय मी सायकल हळू चालवत समोर जात होतो . मनात वाटलं कोणत्या वेळेला हि
  • Read Free
मला काही सांगाचंय...- १९-३
१९. स्मृति remaining - 2 हात आणि पायाची जखम बरी व्हायला तीन चार दिवस लागले ... त्यामुळे सायकल घेऊन फिरवायला बाहेर गेलो नाही , पायी पायी कबीर जवळ मात्र रोजच जात होतो , त्याच्या सहवासात वेदनांची जाणीव जरा कमी ...Read Moreमी तिथं जाऊन पुस्तक वाचत बसायचो मध्येच तिचा विचार मनात आला की कबीरला तिच्याबद्दल सांगून मन मोकळं करत होतो ... कॉलेज सुरु व्हायला अजून वेळ होता म्हणून वाचनालयात असलेली नावाजलेली बरीच पुस्तक वाचून काढावी अस ठरवलं ... सर्व मस्त चाललं होतं .. जवळपास एक आठवडा मला त्रास सहन करावा लागला , मला बरं वाटायला लागलं ... मग काय , दुसऱ्याच
  • Read Free
मला काही सांगाचंय...- २०-१
२०. दिलासा मनात विचारांचं वादळ उठलेलं , तरी ती कामं करत होती ... तिने कपडे धुवून वाळायला दोरीवर टाकले , भांडे स्वच्छ धुवून किचनमध्ये ठेवले ... सतत मनात येणारे विचार शरीराला आणखी क्षीण करत होते त्यामुळे रोजच्यापेक्षा काम ...Read Moreतिला जास्त वेळ लागला . काम संपवून तिने घामाने चिंब झालेला चेहरा थंडगार पाण्याने धुऊन पदराने पुसला ... जरावेळ आराम करावा मग पुन्हा डायरी वाचत बसावं अस मनाशी ठरवून , पंखा सुरु केला आणि ती खुर्चीत बसली ... घामाने चिंब झाल्याने तो गार वारा तिला हवाहवासा वाटत होता ... तिने केसांची लांब वेणी समोर घेतली ... चेहऱ्यावर येणारे केस बाजूला सारले
  • Read Free
मला काही सांगाचंय...- २०-२
२०. दिलासा remaining " तेच तर सांगते , मी बाहेर आले तेव्हा बघते तर काय सायकल ला चावीच नव्हती , थोडं घाबरल्यासारखं वाटलं तू असतास तर जरा मदत झाली असती पण ... मग मला वाटलं कुणी तरी चावी काढून ...Read Moreअसेल , मला काही सुचत नव्हतं ... मी सहज म्हणून वॉचमन काकांना विचारलं की माझ्या सायकल ची चावी तुम्हाला दिसली का ? तर सुदैव माझं कुणी तरी एक मुलाने चावी त्यांच्याकडे दिली होती ... " " अरे वा ! हे एक ठीक झालं ... " " हो , नाहीतर आज चांगलीच पंचाईत झाली असती ... तो मुलगा नाही मिळाला त्याचे
  • Read Free
मला काही सांगाचंय... - २१
२१. आनंदाश्रू सुजितच्या मनात आलेला प्रश्न तसाच राहीला आणि तिच्या मनातला सुध्दा ... मोबाईल वरचा संवाद संपला ... तिने मोबाईल बाजूला ठेवला , कुमारने डायरीत अजून काय लिहिलं याचं कुतूहल प्रत्येक क्षणाला वाढतच होत ..... मनात येणारे विचार ...Read Moreसारून तिने पुन्हा डायरी उघडून वाचायला सुरुवात केली.. ... ... ... कुमारने लिहिलं होतं ... बारावीचं वर्ष ... माझं कॉलेज सुरु झालं होतं आणि तिचं सुध्दा , मग काय सोबतच कॉलेजला जाणं , येतेवेळी सोबतच घरी येणं असा रोजचा दिनक्रम .... आमची मैत्री आणखी घट्ट झाली , तिचा सहवास मला जास्तच आवडायला लागला होता पण मनात प्रेम वगैरे अस काहीएक नव्हतं
  • Read Free
मला काही सांगाचंय... - २२
२२. एकांत स्वतःशी तिचा असा संवाद सुरु असता ती त्या भावविश्वात मग्न झाली ... कितीतरी विचारांचे बाण प्रत्येक क्षणाला तिचं मन विचलित करू लागले ... मनात अचानक आलेले विचार घर करू पाहत होते पण दुसऱ्याच क्षणी आणखी पुढे ...Read Moreलिहिलं असणार ? असं तिच्या मनात आलं आणि तिने समोर वाचायला सुरुवात केली ... रविवार दिवस होता ... बराच वेळ पुस्तक वाचून नोट्स काढून घरच्या घरी जाम कंटाळा आला होता , मग काय सायकल घेऊन निघालो सुजितला भेटण्यासाठी पण मनात ती नव्हतीच कारण सकाळपासून फक्त आणि फक्त अभ्यास करत जवळ जवळ अर्धा जास्त दिवस निघून गेला होता ... तर म्हटलं चला
  • Read Free
मला काही सांगाचंय... - २३
२३. आठवण एकांतात असल्याने त्या अनावर प्रश्नांनी तिच्या मनावर ताबा मिळवला ... पण तिचा नाईलाज होता कारण गतकाळ आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या गोष्टी एकाकी असतांना जास्त तीव्र होऊन आपला हेतू साध्य करतात ... कधी विसर पडलेला भूतकाळ नजरेसमोर जुन्या ...Read Moreजाग्या करून मनाची समाधी लावतात ... मनं बिचारं त्या आठवणींचा पाठलाग करत कितीतरी दूर प्रवास करत परत त्या क्षणी जे काय झालं , घडून गेलं , इतिहासात जमा झालं तिथं जाऊन धूळ खात बसलेल्या आपल्याच प्रतिमा , मूर्ती , सुख दुःखाचे जुने सोहळे दाखवतं अन पाहत राहतं .... जणू काही पहिल्यांदाच हे सारं घडत आहे असं समजून पुन्हा ते सारं
  • Read Free
मला काही सांगाचंय...- २४-१
२४. अनपेक्षित इकडे या शहरात - जेथे कुमार , त्याचे कुटुंब आणि मित्र परिवार सर्व जण असलेल्या ठिकाणी डॉ . वैद्य यांच्या दवाखान्यात - ऑपरेशन थिएटरचा लाल दिवा बंद झाला पण आत कुमार कसा असेल ? ऑपरेशन ठीक ...Read Moreना ? आणखी किती वेळ आहे ? असे प्रश्न सर्वांच्या मनात मागे पुढे येत होते म्हणून तो लाल दिवा बंद झाला आणि त्याचबरोबर ऑपरेशन पार पडलं याची कल्पना कुणालाच नव्हती ... जेव्हा ऑपरेशन थिएटरचे दार उघडून त्याला बाहेर आणले , त्याचे आई वडील , प्रशांत इतर सर्व जण त्या बेडच्या दिशेने जायला लागले ... त्याचे आई वडील जवळच उभे होते म्हणून
  • Read Free
मला काही सांगाचंय...- २४-२
२४. अनपेक्षित remaining 10 - 15 मिनिटांनी त्यांना रस्ता काहीवेळ मोकळा दिसला आणि ते पलीकडे पोहोचले ... हॉटेल मध्ये जाऊन बसले ... " दादा , जरा पाणी मिळेल का ? " अनिरुध्द इतक्यात एक 12 - 13 ...Read Moreमुलगा लगेच पाण्याचे भरलेले ग्लास घेऊन हजर झाला आणि त्याने पटापट ते ग्लास टेबलवर ठेवले ... खांद्यावरच्या कापडाने टेबलवर किंचित सांडलेले पाणी पुसले ... डोळ्यावर आलेले केसांचे वळण हाताने मागे सारून " बोला , दादा लय ऑर्डर आहे ... " जरावेळ त्याच्याकडे पाहून - " दोस्ता , दोन फुल चहा .. " आर्यन " आणखी काही ... " ( जरावेळ एकमेकांकडे पाहून
  • Read Free
मला काही सांगाचंय...- २५-१
२५. सोनेरी क्षण रूमचा दरवाजा उघडून ते शिरले ... समोर बेडवर कुमार , त्यांना आत येतांनी बघून त्याने जरा मान वळून पाहिलं ... त्याला त्रास होऊ लागला तशी त्याने मान परत सरळ केली ... नजर रोखून तो त्यांना ...Read Moreलागला , त्याची आई जवळ आली, त्याला त्या अवस्थेत पाहून तिला काय वाटतं होतं याची कल्पना कुणालाच करता येणं जवळ जवळ अशक्य ..! तिने खूप धीराने पापणीवरचे आसवं खाली गळण्याआधी पटकन पदराने टिपले ... त्याच्या बेडजवळच दोन लहान लहान स्टूल ठेवलेले होते , ती मात्र त्याच्याजवळ बेडवर बसली ... त्याच्या हाताला स्पर्श करून त्याच्या पूर्णतः उतरलेला चेहरा पाहून - " कुमार
  • Read Free
मला काही सांगाचंय...- २५-२
२५. सोनेरी क्षण remaining सायंकाळचे 7 वाजत आले , बाहेर सगळे लोक आपल्या दैनंदिन जीवनात आनंद, द्वेष , सुख दुःख , साथ , एकांत जे काय वाट्याला आहे ते मान्य करणाऱ्या तर काही त्याच गोष्टींचा विरोध करून असं ...Read More? असा प्रश्न निर्मिकाला विचारणाऱ्या सर्वांचा आज च्या पुरता निरोप घेऊन सूर्य पश्चिमेला जाऊन पोहोचला .... इतक्यात आकाशचे वडील आणि काही शेजारी भेटीला आले ... पुन्हा एकदा कुमार कसा आहे ? हा प्रश्न नव्याने त्यांना ऐकावा लागला आणि तेच ते एक उत्तर देताना मन जड होत होतं ... सर्व दिलासा देऊन परतून जायला लागले ... मोबाईल मध्ये वेळ पाहत " आपल्याला
  • Read Free
मला काही सांगाचंय... - २६
२६. जाणीव अनिरुध्द बॉक्स जवळ बसून असतांना डोळे भरून आल्याने त्याचे दोन चार आसवं त्यावर पडली ... पटकन खिश्यातून रुमाल काढून त्याने ते आसवं पुसले अन ओल्या पापण्या हि रुमालाने पुसल्या ... मग अलगद बाहेर काढून त्यावर डाग ...Read Moreपडला नाही ना म्हणून पाहण्यास त्याने जवळ घेतले . परत एकदा हलक्या हाताने ते वेष्टन साफ केले . निरखून पाहिल्यावर त्याला समजले की ते सोनेरी रंगाचे वेष्टन सर्व बाजूंनी चिटकवून पॅकिंग केले आहे ... अन त्याला प्रश्न पडला की आता काय करायचं ? आत काय ते उघडून पाहायचं कि नाही ? कुमारला काय वाटेल ? तो स्वतः भेट म्हणून कधीतरी देणार
  • Read Free
मला काही सांगाचंय... - २७
२७. आभास इकडे दुसऱ्या शहरात - त्यांनी सोबतच चहा घेतला ... काही वेळ आज ऑफिसात दिवस कसा गेला ... ते तो तिला सांगत होता पण नेहमी सारखं तिचं आज त्या गोष्टींत मन रमत नव्हतं ... खरं तर ...Read Moreमन हरवलं होतं ... कुठे ? तर कुमारच्या डायरीत .... ती त्याच्या समोर जरी बसून होती पण तिचं मन दूर कुठेतरी डायरीत जे काय आतापर्यंत तिने वाचलं होतं त्यातच अडकून होतं आणि आणखी पुढे काय ? यासाठी ती आतुर झालेली ... कदाचित म्हणूनच ती तिथं असूनही तिथं नव्हती तर जे काय वाचलं ते पुन्हा पुन्हा आठवून जणू ती स्मरण करू लागली ...
  • Read Free
मला काही सांगाचंय.... - २८
२८. गतकाळ ती बराच वेळ बिछान्यावर पाठ टेकवून बसलेली होती आणि दुपारी घाई घाईत काम केल्याने तिला जरा थकवा जाणवत होता . तिने एकावर एक अश्या दोन उश्या ठेवल्या , जरा खाली सरकून तिने त्यावर मान ...Read More. डायरी हातात घेऊन वाचतांना बरोबर उजेड येत आहे कि नाही म्हणून तिने एकदा वाचून पाहिलं आणि हवा तितका प्रकाश डायरीच्या कागदांवर पडत नसल्यामुळे तिने तो नाईट लॅम्प जवळ ओढला . आता ती पूर्ण बिछान्यावर झोपून , किंचित मान वर ठेवून , दोन्ही हाताचे कोपर गादीत रोवून , हाताने डायरी नीट पकडून पुढे वाचायला लागली ... कुमारने डायरीत समोर लिहिलं होतं
  • Read Free
मला काही सांगाचंय.... - २९
२९. निमित्त तिने दार उघडले ... बाहेर येतेवेळी नाईट लॅम्प आणि पंखा बंद न केल्याने सुरूच होते ... ती दार मागे ढकलून बिछान्यावर बसली , डायरी अलगद उचलून हातात घेतली ... पुढे वाचायला सुरुवात करणार तोच मोबाईलचा ...Read Moreसुरु असल्याचं तिला समजलं , आधी टॉर्च बंद करून स्वतःशीच ---' कुमारने आणखी काय लिहिलं ? ' अस पुटपुटत ती डायरी वाचायला लागली .... कुमारने लिहिलं होतं ..... .... .... तेव्हा माझ्यात एक बदल झालेला मला समजून आला होता तो म्हणजे तिला भेटायचं म्हणून मी कोणता ना कोणता बहाणा शोधायचो . मग काही वेळा मला निमित्त साधून तिला भेटता
  • Read Free
मला काही सांगाचंय..... - ३०
३०. नशीब नाईट लॅम्पचा मंद प्रकाश डायरीच्या पानांवर पडत होता , जरा नजर रूममध्ये इकडे तिकडे गेली की उजेड जणू नसल्याचं तिला भासत होतं ... पंख्याचा गार वारा , नीरव शांतता असल्याने फिरणाऱ्या पात्यांचा गरगर असा आवाज ...Read Moreसोबतीला होते आणि कुमारची डायरी ... मनात मध्येच येणारे काही विचार , आठवणी ... बिछान्यावर पूर्ण अंग टेकवून तिला बरं वाटलं ... मनात येणारे विचारांचे वावटळ दूर करून तिने वाचायला सुरुवात केली ... कुमारने समोर लिहिलं होतं --- तिची MS-CIT ची परीक्षा झाली , मला ठाऊक होतंच कि ती पास होणार अन ती चांगले टक्के घेऊन
  • Read Free
मला काही सांगाचंय..... ३१ - १
३१. स्वप्न आणि सत्य ती काही वेळ तशीच बिछान्यावर डोळे मिटून होती .... तिच्या बंद पापण्यांच्या पडद्यावर तिला काही परिचित अपरिचित चित्र दिसू लागली ... ती फक्त विचाराधीन मनाला ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न करु लागली ... तिला एकवेळ ...Read Moreदवाखान्यात पाहिलेला कुमार दिसला , तिने डोळे उघडले ... किंचित मान वर करून तिने हळूच बाजूला नजर फिरवली तर तो पलीकडे तोंड करून झोपलेला तिला दिसला , परत एकदा खात्री करून तिने डायरी हातात घेतली ... तीने पुढे वाचायला सुरुवात केली... कुमारने डायरीत समोर लिहिलं होतं ... तिचा वाढदिवस होऊन जवळपास एक आठवडा झाला होता पण तरीही केवळ बाहेरगावी
  • Read Free
मला काही सांगाचंय..... ३१ - २
३१. स्वप्न आणि सत्य remaining कुमार होता तसाच जागी उभा होता जणू तिने दिलेला आवाज त्याने ऐकलाच नाही ... ती परत परत त्याला आवाज देत राहिली पण तिला काहीएक प्रतिसाद मिळाला नाही मग तिला समजलं की कदाचित ...Read Moreखाली येणाऱ्या पाण्याच्या आवाजामुळे त्याला हाक ऐकायला जात नसेल ... आता काय बरं करावं ती विचार करत असता अचानक कुमारचा तोल जाऊन तो खाली पडत असल्याचं दिसून आलं ... अन ती जोरात किंचाळली " कुमार sssss " तो पाण्यासह खाली येत होता ... जसं पाणी मोठमोठ्या काळ्या दगडांवर आदळून समोर वाहत होत तसं कुमार इतक्या उंचावरून खाली पडला तर तिच्या
  • Read Free
मला काही सांगाचंय..... - ३२
३२. भेटीची ओढ इकडे कुमारच्या घरी ... ... ... नवीन ठिकाणी तशी उशिराच झोप येते तर याबरोबरच कुमार आणि त्याच्या कुटुंबियांवर हि वेळ आली होती त्यामुळे सर्वांनाच दुःख झालं होतं ... मग याप्रसंगी मन कश्यातच ...Read Moreनव्हतं तर झोप रोजच्यासारखी कुणालाच लागली नव्हती ... गावात कोंबडा आरवला कि सर्व लोक जागी होतात , तशी सर्वांना जाग आली ... सर्व उठून जागेवरच बसले ... बऱ्याच दिवसांनी नजरेसमोर त्यांनी जरा वेगळा आणि मनमोहक देखावा ते पाहिला ... तांबूस सूर्यकिरण नभनक्षी कामात बुडालेले , पाखरांची किलबिल सुरु झालेली , गुराढोरांना चारापाणी करून लोक कामात रमलेले , कुणी दुधाच्या धारा काढत असल्याचा
  • Read Free
मला काही सांगाचंय..... - ३३ - १
३३. आशा , निराशा कितीतरी वेळ ती तशीच खुर्चीत बसून होती ... मनात येणारे प्रश्न तिला आणखी जास्त त्रास देत होते ... डोकं शरीरापेक्षा जड झालं की काय असं तिला वाटून गेलं , तिच्या मनात सतत एकापाठोपाठ एक ...Read Moreयेत होते ... असं स्वप्न का पडलं ? त्याचा नेमका काय अर्थ असावा ? कुमार ठीक तर असेल ना ? मला असं स्वप्न पडले नियतीचा काही संकेत तर नसावा...? अनेक प्रश्न तिच्या मनात घर करत होते , ती बेचैन झाली , शेवटी विचारांचं ते वादळ दूर करत ती बेडरुममध्ये गेली ... आत प्रवेश केला , तिची नजर डायरीवर स्थिरावली ... पण
  • Read Free
मला काही सांगाचंय..... ३३ - २
३३. आशा , निराशा remaining बस शहरातील स्थानकात पोहोचली , प्रवाश्याच्या खाली उतरण्याच्या गडबडीने तिला एक दोन जणांचा धक्का लागला अन तिला जाग आली ... गर्दीतून वाट काढीत ती बसमधून खाली उतरली . बस स्थानकात जणू काही ...Read Moreभरली अस तिला भासलं ... ती पायी चालत बस स्थानकातून बाहेर निघाली , उन्ह चांगलंच तापलेलं ... खांद्यावरची हॅन्डबाग जरा डोक्यावर धरून तिने झपझप पावलं उचलली , मुख्य रस्त्यावर आली तिथं बाजूलाच कडुनिंबाची विशाल सावली देणारी झाडं लावली होती ... ती एक झाडाच्या सावलीत उभी राहिली ... तिने सुजितला फोन करून बस स्थानक ला आल्याचं सांगितलं , त्यावर सुजितने लगेच येतो
  • Read Free
मला काही सांगाचंय..... ३४ - १
३४. लपंडाव कुमारचे आई वडील तिच्याशी काही जुन्या आठवणी तेव्हा ताज्या झाल्याने पुन्हा एकदा नव्याने आठवून बोलत होते , ती सारं मन लावून फक्त ऐकत होती ... मध्येच त्यांना दिलासा देत होती , तिला पूर्ण कल्पना होती की ...Read Moreकुमार म्हणजे त्यांचा एकमेव आधार .. नियतीनं का असा खेळ मांडला अस तिला क्षणभर वाटून गेलं , काही वेळानंतर जुन्या आठवणीत भिजवून तो भावनारूपी पाऊस शांत झाला ... सोबतच त्यांचं बोलणं थांबलं आणि तिच्या मनात पावसानंतर तळं साचावं तसे विचार एकामागून एक साचायला लागले ... मध्येच त्याच्या डायरीत वाचलेले काही प्रसंग त्या साचलेल्या पाण्यात होडी बनून इकडे तिकडे बेभान होऊन जलविहार करू
  • Read Free
मला काही सांगाचंय..... ३४ - २
३४. लपंडाव remaining रिकामा झालेला चहाचा ग्लास टेबलवर गोल गोल फिरवत , मध्येच दोन्ही हात टेबलवर ठेवून तळहात एकावर एक ठेवले " मी तुला , तुझ्या हँडबॅग मध्ये चुकून आलेलं नोटबुक येतेवेळी आणायला सांगितलं होतं ..." ...Read More" अस्स ते होय , असेल की बॅगमध्ये " म्हणत तिने खांद्याला अडकवलेली बॅग टेबलवर ठेवली , आतमध्ये हात घालून तिने रिकामा हात बाहेर काढला ... एक नजर सुजितला पाहिलं , " अरे यात तर नाहीये ..." " काय ? डायरी बॅगमध्ये नाही ... " सुजित जवळ जवळ ओरडला . " अरे , जरा हळू बोल , आणि डायरी कसली ? " सुजितने
  • Read Free
मला काही सांगाचंय..... - ३५
३५. भाग्य सुजित बस स्थानक येथून दवाखान्यात परत आला तर आर्यन , अनिरुध्द आणि ऋतुराज सुध्दा इतक्यातच तिथं पोहोचले होते . एकमेकांशी नजरानजर झाल्यावर सुजितला त्याच्यावरचा राग त्यांच्या डोळ्यात दिसून आला ... मग तो जवळ जाऊन ," दोस्तहो , ...Read Moreमाहित आहे तुम्हाला नक्कीच माझा राग आला असेल , पण खरंच माझा नाईलाज झाला होता असं नाही की मी विसरलो होतो , नाही मला तिला डायरीबद्दल विचारण्याचा मुळीच विसर पडला नव्हता , मी तिला एकांतात बसून व्यवस्थित विचारलं तर ती चुकून डायरी घरीच राहिली अस सांगत होती आणि तिला घरी जाणं खूप आवश्यक होतं म्हणून मी तिला थांबवू शकलो नाही
  • Read Free
मला काही सांगाचंय..... ३६
३६. का ? सुजित , आर्यन , अनिरुध्द आणि ऋतुराज सोबतच कुमारच्या वॉर्डजवळ पोहोचले . इतक्यातच डॉक्टर त्याच्या रूममधून बाहेर पडतांना त्यांना दिसुन आले , त्याचे आई वडील , आकाशचे वडील , सुजितचे वडील डॉक्टरशी बोलत ...Read More, झपाझप चार पाच पावलं टाकत ते तिथं जाऊन ठेपले ... डॉक्टर देवांश सांगत होते की , " कुमारची तब्येत आता बऱ्यापैकी चांगली आहे , तुम्ही त्याला भेटू शकता फक्त जास्त लोक एकसाथ जाऊ नका आणि त्याला त्रास होईल म्हणून जास्त बोलू पण नका .. समजलं ना , येतो मी .." सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर पसरली , आई वडिलांसह प्रशांतने रूमचे
  • Read Free
मला काही सांगाचंय..... - ३७
३७. स्वार्थ कँटीन मध्ये पाहिलेला तो मुलगा आणि कुमार दोघेही त्यांच्या जीवनात आलेल्या परिस्थितीचा सामना करत आहे , आपण कुमारवर जे बेतलं ते बदलू शकत नाही तर निदान त्याच्या कुटुंबियांना आधार देऊ शकतो याचं समाधान मानून ते ...Read Moreपोहोचले . प्रत्येकाच्या मनात कुमारला काहीतरी विचारायचं होतं , पहिलं म्हणजे अपघात कसा झाला ? आता कस वाटतंय ? हे सर्वांना समान प्रश्न पडले होते तर सोबतच आजवर डायरीचं गुपित का लपवून ठेवलं ? आमच्यावर , आपल्या मैत्रीवर तुला विश्वास नव्हता का ? असे प्रश्न चारही जणांना वेढा घालून होते याशिवाय सुजितला पडलेला प्रश्न जरा वेगळाच होता , मैत्रीत , जीवनात
  • Read Free
मला काही सांगाचंय.... - ३८ - १
३८. बहर - निसटून गेलेले क्षण ती तिच्या शहरात पोहोचली , लगबगीने चालत ती घरी आली , आवाराचे गेट उघडून ती अंगणातील तुळशी वृन्दावनाजवळ थांबली . हँडबॅग मधून चावी काढून तिने कुलूप उघडलं नंतर दरवाजा ... ...Read Moreकाढतांना हातात घेतलेली हँडबॅग तिने हॉलमध्ये आल्याआल्या टेबलवर ठेवली , किचनमध्ये जाऊन तिने थंडगार पाण्याची बॉटल बाहेर काढली आणि ती बेडरुममध्ये शिरली , बेडवर बसून ती दोन चार घोट पाणी प्यायली , तिने साडीच्या पदराने चेहऱ्यावर आलेला घाम पुसला आणि पंखा सुरु केला , पटकन मागे वळून ड्रेसिंग टेबल जवळ आली आणि तिने डायरी हातात घेतली ... ती वाचायला सुरुवात करणार तोच
  • Read Free
मला काही सांगाचंय.... - ३८ - २
३८. बहर - निसटून गेलेले क्षण - 2 पावसाळा संपून हिवाळा सुरु झाला , नवरात्र उत्सव आला होता .. दसऱ्याच्या दिवशीची गोष्ट , मी सायकल धुवून पायदळ तिच्या घरासमोरून जात होतो , ती समोर आली , आज ...Read Moreवेगळपण तिच्यात दिसत होतं मला सेकंदाचाही वेळ लागला नसावा तिने दोन लांबलचक वेण्या घातल्या होत्या आणि तिला खरंच खूप छान दिसत होत्या म्हणून ती आवाज देण्याची वाट न पाहता मी स्वतःहून तिथं थांबलो , तिने अंगणात रांगोळी काढली होती आणि रांगोळीचं ताट हातात घेऊन ती काढलेल्या कलाकृतीला पाहत होती , मी तिला आवाज दिला अन तिला मला वळून पाहिलं ..
  • Read Free
मला काही सांगाचंय..... - ३८ - ३
३८. बहर - निसटून गेलेले क्षण - 3 असंच जरा आनंद , नाराजी , नवे मित्र आणि जुन्या आठवणी जमा करून ते वर्ष संपलं , नवीन वर्ष सुरु होणार होत , यावेळी मात्र मी ग्रिटींग कार्ड बनवायचं ...Read Moreअसं ठरवलं होतं आणि तिला भेटूनच नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा द्यायच्या असा मनात विचार केला होता ... म्हणून सकाळीच लवकर उठून तयार झालो , तिला जाऊन भेटलो आणि दोघांनी एकमेकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या ... मी खुश होतो की नवीन वर्ष्याची सुरुवात छान झाली , कॉलेजचं गॅदरिंग असल्याने सर्व विद्यार्थी एकाच वेळी परिसरात गोळा झाले होते , दिवसभर एकापेक्षा एक
  • Read Free
मला काही सांगाचंय..... - ३८ - ४
३८. बहर - निसटून गेलेले क्षण - 4 सूर्यास्त होऊन चांगलाच अंधार पडला होता मग मी घरी आलो , मनात कितीतरी गोष्टी एकामागून एक येत राहिल्या ... तिने जाण्याआधी एकदा जर मला सांगितलं असत तर कालच एक दिवस आधी ...Read Moreवाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असत्या , कमीत कमी पुन्हा माझ्यावर हि वेळ आली नसती , तिने मला शब्दानेही न सांगता अस अचानक जाणं बरोबर नव्हतं , तिने खरंच चूक केली आणि मन मात्र माझं दुखावलं , यावेळी तिचा खरंतर खूप राग आला होता , समोर असती तर तो राग कदाचित व्यक्त झाला असता पण तीच सुदैव ती नजरेसमोर नव्हती आणि आता
  • Read Free
मला काही सांगाचंय..... - ३९ - १
३९. सोबती - जुने कि नवे - 1 ती विचार करत झपाझप पाच सहा पावलं टाकत किचनमध्ये शिरली . तिने फरशीवर पडलेला ग्लास उचलून ओट्यावर ठेवला , मांजर उपद्वाप करून कुठे लपली ते पाहायला लागली पण ...Read Moreकाही तिच्या नजरेस आली नाही ... तरी काहीतरी आवाज करून , कुठे कोपऱ्यात लपून बसली असेल तर पळून जाईल म्हणून तिने एक दोनदा हाकलून द्यायचं म्हणून प्रयत्न केला , जरावेळ हालचाल होते का ते पाहून तिने फ्रीज उघडला आणि थंडगार पाण्याची एक बॉटल बाहेर काढली ... दोन तीन घोट पाणी ती तिथंच प्यायली , मांजर बहुतेक निघून गेली असावी असा विचार करून
  • Read Free
मला काही सांगाचंय..... - ३९ - २
३९. सोबती - जुने कि नवे - 2 या अनुभवातून मी जरा सावरलो होतो , तिच्यावर असलेल्या प्रेमाच्या आहारी जाऊन मी काही वेळाकरिता भरकटलो होतो पण आता मला जाणीव झाली होती की ती जितकी महत्वाची होती तितकीच ...Read Moreमाझ्याकडून असलेल्या अपेक्षांची पूर्तता होणे हे सुध्दा महत्वाचं होतं ... म्हणून मी मनातलं प्रेम जोवर मी माझं ध्येय साध्य करत नाही तोवर व्यक्त करायचं नाही असं ठरवलं . तोपर्यंत फक्त जे जस आहे तसंच सुरु ठेवावं हेही स्वतःला समजावलं ... सुरुवातीला तिला भेटायचं टाळण खूप कठीण होतं , सारखं मनात यायचं तिला पाहावं , तिच्याशी गप्पा मारत बसावं अस ... कितीही
  • Read Free
मला काही सांगाचंय..... - ३९ - ३
३९. सोबती - जुने कि नवे - 3 तिच्यासाठी एक छानपैकी ग्रिटींग आणि एक लाल गुलाब घेऊन , काय आणि कसं बोलावं याचा सराव करून कॉलेजला गेलो होतो , पण माझं दुर्दैव जास्तच जोरावर होतं , ती ...Read Moreआलीच नव्हती आणि त्यादिवशी एक नजर दिसली पण नव्हती ... मग काय निराश होऊन कबीर जवळ ते ग्रिटींग आणि गुलाबाचं फुल घेऊन नशिबाला दोष देत बसून राहिलो होतो , मनात एकाच वेळी कितीतरी भावना येत होत्या ... राग , दुःख , प्रेम ..! एक क्षण आला की डोळ्यात आसवांनी गर्दी केली , एक दोन थेंब खाली पडले , दुःखाचा ओघ सरला
  • Read Free
मला काही सांगाचंय..... - ३९ - ४
३९. सोबती - जुने कि नवे - 4 तिच्याशी बोलत थांबण्याची माझी मुळीच इच्छा नव्हती ... तरी मी म्हणालो , " किर्तीप्रिया , हे तुझं काय चाललं ? " " कुठे काय ? काही तर ...Read More... " " अस मध्येच रस्त्यात सायकलच्या आड येणं , समजा माझा तोल गेला असता तर किंवा तुला लागलं असतं तर .." " कुमार , ते होय , काही झालं नाही ना ... आधी तु सांग इतके दिवस कुठे होता ? दिसलाच नाही ... " तिचं अस निष्काळजीने वागणं मला जरा आवडलं नव्हतं म्हणून " मला ना आधीच घरी
  • Read Free
मला काही सांगाचंय.... - ४० - १
४०. एक घाव आणखी - 1 कुमारने असं लिहिलेलं वाचत असता प्रत्येक पानागणिक पुढे काय ? हि उत्सुकता तिच्या मनात कायम राहिली , ती पुढे पुढे वाचत असताना कधी तिला प्रश्नांनी जाळ्यात ओढलं , तर कधी विचारमग्न ...Read More... कधी तिला खूप हसू आलं ती आठवणीत हरवून गेली , भानावर आली की पुन्हा एकदा कुमारची डायरी या वेगळ्या दुनियेत एकरूप होऊन गेली ... डायरी जसजशी वाचून पूर्ण व्हायला लागली तेव्हा ती डायरी संपायला नको असंही तिला वाटायला लागलं , डायरीचे शेवटच्या पानातील काही प्रसंग तिला इतके अधीर करून गेले की तिच्याही पापण्या ओलावल्या , अश्रू अनावर झाले गालावरून खाली
  • Read Free
मला काही सांगाचंय.... - ४० - २
४०. एक घाव आणखी - 2 इकडे रुग्णालयात --- जेव्हा जवळपास ६:३० वाजलेले , डॉक्टर देवांश वैद्य आणि नर्स यांनी कुमारला तपासलं , त्याच्या तब्येतीत बऱ्यापैकी सुधारणा झाली हे त्यांना कळलं आणि त्याचा त्यांना आनंदही झाला ...Read Moreतो आनंदाचा क्षण कुमारच्या आई वडील , भाऊ , नातेवाईक , मित्र यांना सांगण्याआधीच जागीच विरला , एका चिंतेचा तिथे उगम झाला . सुरुवातीला डॉक्टर वैद्य यांना विश्वासच बसेना जे अनुभवास आलं ते इतकं अनपेक्षित होत की त्यांनी पुन्हा पुन्हा ती गोष्ट खरी आहे याची खात्री करून घेतली आणि लवकरात लवकर कुमारच्या कुटुंबियांना या गोष्टीची कल्पना देणे आवश्यक आहे हे जाणून आधी
  • Read Free
मला काही सांगाचंय.... - ४० - ३
४०. एक घाव आणखी - 3 अनिरुध्द आणि आर्यन यांनी मिळून सर्वांसाठी चहा बनवला , चहा पिल्यानंतर ते चौघे बाजूच्या खोलीत बसले , जे कुमारच्या जीवनात अचानक घडलं ते कल्पनेच्या दुनियेपासून कित्येक दूर होते , अजूनहि त्यांना डॉक्टरांनी ...Read Moreते खरं वाटत नव्हतं . पण त्यांच्या मान्य किंवा अमान्य केल्याने वास्तव बदलणार नव्हतंच ... डॉक्टरांच्या बोलण्याने त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला होता , आज पहिल्यांदा चौघे एकाच जागी बसले असून तिथे शांतता पसरली , बोलायला जणू शब्द नाहीत की काय ? आर्यन ला मात्र ही शांतता जास्त वेळ रुचली नाही . " दोस्तहो , मला तर अजूनही डॉक्टरांनी सांगितलेले पटत नाही
  • Read Free
मला काही सांगाचंय.... - ४० - ४
४०. एक घाव आणखी - 4 " जवळपास ६ वाजता , डॉक्टरांनी कुमारला तपासलं तेव्हा तो त्यांच्याशी बोलला आणि डॉक्टरांना त्याचा आजार समजला , कुमारने डॉक्टरांना विचारलं की ' मी कुठे आहे , तुम्ही कोण आहे ? ...Read Moreत्यावर डॉक्टरांनी , ' तुझा अपघात झाला आणि तुझं ऑपरेशन केलं ... ' असं सांगितल्यावर तो काहीही बोलला नाही , अस डॉक्टर म्हणाले होते , डॉक्टरांनी जेव्हा परत त्याला विचारलं की ' कुमार , आता तुला कसं वाटत आहे ? ' तेव्हा , त्यांना एक नजर पाहून तो सारखा इकडे तिकडे पाहत होता , तर डॉक्टरांनी परत त्याला ,' कुमार तुला
  • Read Free

Best Marathi Stories | Marathi Books PDF | Marathi Fiction Stories | Praful R Shejao Books PDF

More Interesting Options

  • Marathi Short Stories
  • Marathi Spiritual Stories
  • Marathi Fiction Stories
  • Marathi Motivational Stories
  • Marathi Classic Stories
  • Marathi Children Stories
  • Marathi Comedy stories
  • Marathi Magazine
  • Marathi Poems
  • Marathi Travel stories
  • Marathi Women Focused
  • Marathi Drama
  • Marathi Love Stories
  • Marathi Detective stories
  • Marathi Moral Stories
  • Marathi Adventure Stories
  • Marathi Human Science
  • Marathi Philosophy
  • Marathi Health
  • Marathi Biography
  • Marathi Cooking Recipe
  • Marathi Letter
  • Marathi Horror Stories
  • Marathi Film Reviews
  • Marathi Mythological Stories
  • Marathi Book Reviews
  • Marathi Thriller
  • Marathi Science-Fiction
  • Marathi Business
  • Marathi Sports
  • Marathi Animals
  • Marathi Astrology
  • Marathi Science
  • Marathi Anything

Best Novels of 2023

  • Best Novels of 2023
  • Best Novels of January 2023
  • Best Novels of February 2023
  • Best Novels of March 2023
  • Best Novels of April 2023
  • Best Novels of May 2023
  • Best Novels of June 2023

Best Novels of 2022

  • Best Novels of 2022
  • Best Novels of January 2022
  • Best Novels of February 2022
  • Best Novels of March 2022
  • Best Novels of April 2022
  • Best Novels of May 2022
  • Best Novels of June 2022
  • Best Novels of July 2022
  • Best Novels of August 2022
  • Best Novels of September 2022
  • Best Novels of October 2022
  • Best Novels of November 2022
  • Best Novels of December 2022

Best Novels of 2021

  • Best Novels of 2021
  • Best Novels of January 2021
  • Best Novels of February 2021
  • Best Novels of March 2021
  • Best Novels of April 2021
  • Best Novels of May 2021
  • Best Novels of June 2021
  • Best Novels of July 2021
  • Best Novels of August 2021
  • Best Novels of September 2021
  • Best Novels of October 2021
  • Best Novels of November 2021
  • Best Novels of December 2021
Praful R Shejao

Praful R Shejao

Follow

Welcome

OR

Continue log in with

By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"

Verification


Download App

Get a link to download app

  • About Us
  • Team
  • Gallery
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms of Use
  • Refund Policy
  • FAQ
  • Stories
  • Novels
  • Videos
  • Quotes
  • Authors
  • Short Videos
  • Free Poll Votes
  • Hindi
  • Gujarati
  • Marathi
  • English
  • Bengali
  • Malayalam
  • Tamil
  • Telugu

    Follow Us On:

    Download Our App :

Copyright © 2023,  Matrubharti Technologies Pvt. Ltd.   All Rights Reserved.