मृत्युसाठी खुप पर्याय आहेत परंतु जन्म घेण्यासाठी एकच तो म्हणजे.... *आई*

शब्द छळ.....!!!
पाहते तुझी वाट
वाट दूर जाते
जाते निघून मी
मी एकटीच राहते
राहते मागे गावं
गावं माझा कोकण
कोकण म्हणजे स्वर्ग
स्वर्गाहुनी निराळे
निराळे अंदाज तुझे
तुझे तुजपाशी
तुजपाशी माझा ठाव
ठाव अंतरीचा गवसेना
गवसेना जे हरवले
हरवले माझे मन
मन पाखरू झाले
झाले गेले विसरूया
विसरूया त्या आठवणी
आठवणी फक्त उरल्या
उरल्या काही वेदना
वेदना या सुखावती
सुखावती ती स्वप्ने
स्वप्ने ती भंगलेली
भंगलेली धरणी
धरणी माझी माय
माय दुधावरची साय.....
-डिके

Read More