×

Hey, I am reading and writing on Matrubharti!

या गड्यांनो या रे या
मैदानावरती खेळ खेळुया .....

कधी खेळुहा विटी दांडू
कधी आपणहे चिंचोके खेळू (१)
या गड्यांनो या रे या
मैदानावरती खेळ खेळुया

हू तू तू ची रंगत न्यारी
कूस्ती मधली पटकी भारी (२)
या गड्यांनो या रे या
मैदानावरती खेळ खेळुया

खो खो मधला ‘खो’ चुकवूया
चेंडूफळी चा चेंडू पळवूया (३)
या गड्यांनो या रे या
मैदानावरती खेळ खेळुया

*केदार शेवाळकर * ©®©

Read More

तू

तू पहाटेच ऊठतेस
नहाणे करतेस
अंगण सडा रांगोळी करतेस
वातावरण सारे प्रसन्न करतेस.

बरोबरीने गतिमान होतेस
स्वतः सोबत घराची प्रगती करतेस
दोन्ही घराण्याचे नाव मोठे करतेस
जगात स्वतःला सिद्ध करतेस.

सायंकाळी दिवे लावतेस
मंत्र उच्चार करतेस
मुले संस्कारीत करतेस
आयुष्य सुंगधी करतेस सर्वांचे.

तू शक्ती तूच दिव्यता भासतेस
तूच खरी भगवती असतेस
तू माय बहीण अर्धांगीनी लेक असतेस
तुझ्या समोर माझे मस्तक आदराने झुकते.

**केदार शेवाळकर**

Read More

'आईना’

अरे आईना खोटे बोलू नकोस तू
उगा फसव्या गोष्टी दावू नकोस तू
भले कैद रुप माझे तुझात,
ऊगा रुपास नवी चौकट लावू नकोस तू.

आरशात माझे रूप बेहाल झाले
आरशाचे पहा गाल लाल झाले
भले असेल दूनीया रंगीबेरंगी तुझी
ऊगा बेगड मजला लावू नकोस तू.

मेख मलाही तुझी माहित आहे
तुला आईना साथ पाऱ्या ची आहे
जे आत येईल तेच दाव बाबा
ऊगा शपथा कुणाच्या घेवू नकोस तू.

*केदार शेवाळकर *

Read More