Hey, I am on Matrubharti!

विलग्नवास


विलग्नवास हा विषय वाचूनच तुम्ही पोस्ट वाचायला सुरु केली असणार हे नक्की ...पण घाबरू नका बरेच दिवस जे आपण quarantine म्हणतोय न तेच ते.........
आमच्या मावशीला मी म्हटलं घरात राहून राहून वैताग आलाय खूप तर त्या लगेच म्हटल्या २०१२ पासून मी quarantine च आहे .मला काही कळाल नाही मी विचारलं अस का म्हणताय तर त्यावर त्या म्हटल्या अग मी retire झालेय तेव्हापासून quarantine च आहे ना ! वयस्कर लोकांना तुमच्या पिढीच्या काही लोकांनी quarantine केलय ना?
आपण अजून एक महिना देखील घरात नाही तोच कंटाळा आलाय,विताग आलाय बरेच कारण सांगतोय पण आपल्या आजूबाजूचे काही लोक नेहमीच quarantine life जगात आहेत पण आपल्याला काय न त्याचं ? बर ते जुड्या सध्या विचार फक्त corona चा करायचा हे सोडून काही उभयतांमध्ये भांडण व्हायला लागलेत पुणे महिला दक्षता समितीने अशा तकारी आल्यास पतीला quarantine व्हयला लागेल असा आदेश देखील दिलाय. थोडक्यात काय quarantine आपल्याला खूप काही शिकवतोय पण आपण दुर्लक्ष करतोय....
रोज सोशल मिडीयावर वेगवेगळ्या पदार्थांनी धुमाकूळ घातलाय वेळ भेटलाय तर सार्थकी लावायचा म्हणून रोज नवीन पदार्थ आणि माझ्या मैत्रिणीने ते try करून पोस्त केल म्हणून मी केल पाहिजे असा काहींचा अट्टाहास....
वेगवेगळे challege येतात त्याची तर काही बातच निराळी.....
पण तुम्हाला लक्षात येतंय का? रोज धकाधकीच्या जीवनात तुमचा नवरा अगर बायको तुम्हाला फक्त सोशल मिडीयावर भेटते ती तुमच्या जवळ आलीये तुम्ही तिला नव्यानं ओळखू लागलाय,तुमच्या मुलांची growth खूप जवळून अनुभवताय, आपली सासू आपल्यापेक्षा आपल्या पिलांना खूप चं सांभाळते हे जाणवतंय का ? आपल्या कामवाल्या मावशी आपण नसताना देखील खूप छान घर सांभाळतात तरी आपण त्यांना नावं ठेवतो हे कळतंय कारण corona मुले आपण त्यांना सुट्टी दिली आणि याचा प्रत्यय प्रत्येक भांड घासताना आपल्याला येतोय...
आता तुम्ही म्हणाल वेगळ की यात कळतंय की आम्हाला सगळं पण हा देखील विचार केला पाहिजे की हे quarantine आपल्या आयुष्यात किती छान क्षण आणतय पण काही ठिकाणी दु:ख पण आहे बरं का ,काहींची लग्न मुहूर्त पुढे ढकलले गेले , काहींची मुलं दुसरीकडे अडकलीत काहीना काही अडचणी आहेत सर्व ठप्प असल्याने खायचे हाल पण सर्व जण आपआपल्यापरींनी अडचणीवर मात करतंय..
नेहमी आपण जिथे राहतो ते सोडून बाकी सगळ्या जगाला quarantine करत जगत असतो पण आज एका विषाणूणी सगळ्यांना quarantine केलय ते वाईटच पण जर आपण वर्षातून एकदा आठवडाभर जरी स्वताला quarantine केलं तर घरात खूप चांगली ऊर्जा निर्माण होईल, outing तर नेहमीच करतो आपण पण घरात राहून बाहेरच्या जगाला quarantine करून बघू नक्कीच नव्यानं आपल्या कुटुंबाच्या प्रेमात पडू,मुलं खूश ,घरातील वयस्कर खुश,आपल्या मावशी खुश आणि सर्वात महत्वाच घरत काही निर्जीव वस्तू असतात पण त्या म्हणयला निर्जीव असतात पण सगळ आनंदून गेल तर त्यांच्यात देखील एक चकाकी येईल असा मला वाटतं ....
असो खूप झाल बाई quarantine पुराण मुलांनी धुडगूस घातला असेल इतक बोलेपर्यंत! भेटू लवकरच तोपर्यंत घरात रहा,सुरक्षित रहा आणि आपला मंत्र म्हणत रहा
GO CORONA GO………………..

Read More

सोशली कनेक्ट राहण्याकरिता जिथे जाऊ तिथे वायफाय वापरतोय पण आपल्या जवळच्या व्यक्तीच्या मनाशी कनेक्ट व्हायला वायफाय ची सुद्धा गरज नाही हे विसारतोय का आपण सगळे?

Read More