नमस्कार , मी कोमल प्रकाश मानकर Professionally मी लेखक नाही पण लिहायची खुप आवड आहे . तुम्हाला माझं लिखाण आवडेल ही आशा करते . komalprakashmankar@gmail.com

आयुष्यात काय हरवतं असं म्हटल्यावर मी नक्कीच म्हणेल ...
बालपण हरवतं , शाळेच्या प्रागणात केलेली मौजमस्ती हरवते .
अजून काही हरवतं असावं तर . शिक्षकांनी लावलेली शिस्त ...
आणि जे काही मोलाचं हरवतं असेल ते त्या काळात खळखळून
हसलेलं हास्य ...

आयुष्यात एवढचं काही हरवतं की माणसं देखील हरवतात ?? माणसं हरवत नसली तरी वेळेनुसार बदलतात जरूर . त्यांच्या बदलत्या रुपांची
कारणही शोधून काढली पाहिजे ना ! का बदलतात माणसं वेळेसोबत .
पैसा , गलेलठ्ठ पगार बघून की बढत्या इमेज सोबत घेऊन आलेला इगो हर्ट करत असावा म्हणून ....

परवा माझी जुणी मैत्रीण दिसली रस्त्यांना जातांना . हाक मारायला तोंड उघडलं होतं ; पण म्हटलं , नको उगीच एनर्जी खर्च होईल . आणि तिचा अँटिट्यूडही बिनधास्त बोलण्याला मागे सारत आड येईल .

वेळ बदलते माणसं का बदलणार नाहीत .

इलियट म्हणतो :

आगगाडीत बसलेले तुम्ही
हे स्टेशनवरचे तुम्ही नसता ,
किंवा पुढच्या स्टेशनवरचे तुम्ही नसाल .
आगबोटीच्या कठड्यावर वाकताना मागचा रस्ता
लाटांनी रुंदावलेल्या बघताना
तुम्ही म्हणू शकणार नाही की हा
टाकला मागे मी माझा
भूतकाळ आणि हा मी सामोरा भविष्याला ....

कारण , व्यक्ती बदलल्या तरी त्याच्यातल्या प्रवृरीच्या काही जिन्नस खुणा
त्यांच्या स्वभावगुणात रोवलेल्या असतातच . म्हणून त्या बदलत्या प्रवृत्तीला माणसं पण ह्या सर्वात हरवतात म्हटलं तर कुठे बिघडलं .

आणि आपल्या आयुष्याला प्रत्येकझण पुरतोच का ? कसा पुरणार . पूर्वीचे सर्व वाटेत आलेले आपल्या मार्गाने वाट दिशाहीन होऊन धुंडाळत रवाना होतातच . प्रत्येक वाटाड्या या प्रवासात उपयोगी नसतोच पण उपयोगासाठी म्हणून नाही . हृदयात त्याला खऱ्या दिलानं स्थान असावं . म्हणजे वाटेने तो कधी परत भेटलाच तर ताट मानेने चेहऱ्यावर चमक आणून एक स्मित तरी देता यावं . मग भेटी गाठी कितीही योग योगाचे बहाने असेल तरी ती शुल्लक ठरतात .

कितीतरी काळ लोटला असं वाटतंय . शेवटी तारखा त्या तारखा कँलेंडरच्या पानांचा आराखडाच तो . आपणही तिथेच बंधिस्त होतो .
कधी कधी वाटत माणुस घडीच्या काट्यावर नाचतो आणि तारखांवर चालतो . आणि असाच जिंदगीचा गाढा रेटत जातो .

Read More

सुखद संध्याकाळ...
बाल्कनीतला गार वारा आणि रफीची अवीट अविस्मरणीय गाणी...
जीने को और क्या चाहीये... ??

       मे च्या काठावर जून लवकर येण्याची  साऱ्यांनाच वाट असते . उष्णतेची लाट  कमी होऊन धो धो बरसणाऱ्या सरीच्या आगमनाच्या प्रतिक्षेत चातकही वर मान करून अवकाशाकडे बघत बसला असतो ...  आणि मी त्या चातकासारखीच पाऊसाची वाट बघत असते  ...

     मृगाचा पहिला पाऊस म्हणता येणार नाही कारण अजून एक आठवडा वळणीवर आहे  .... पण  आज सायंकाळी  काय झालं .... अचानक ढग दाटून आले .... दिवसभर रणरणत्या उन्हाने धरतीची लाही लाही झालेली ... मी  बाहेर पडले आकाशात चांदण्या निघाल्या का म्हणून बघायला ... पण चांदण्या न दिसता .... माझ्या अंगावर पावसाचे टपोरे थेंब पडतं होते ... काय सांगू मला एवढं अप्रूप वाटलं .... हे ह्यासाठी पाऊस आपला जिगरी दोस्त . कल्पना न करता पाऊस असा बाहेर पडल्यावर अंगावर पडणं भारीच ना !

रूम मध्ये रेडिओ मी ऑन  करून ठेवलेला ... त्या गोड आठवणीत एका माझ्या आवडत्या रफीच्या गाण्याची भर पडली ...

गाण्याचे बोल बाहेर ऐकायला येतं होते .... पाऊस आज धो धो  पडणारं की नाही माहिती नव्हतं पण
गाणं ऐकायला म्हणून मी आत गेले ..


दिल का सूना साज तराना ढूंढेगा
तीर - ए - नाज निशाना ढूंढेगा
मूझको मेरे बाद जमाना ढूंढेगा

लोग मेरे ख़्वाबो को चुरा के , ढालेंगे अफसानों में
मेरे दिल की आग बँटेगी , दुनिया के परवानो में
वक्त मेरे गीतों का खज़ाना ढूंढेगा,
दिल का सूना साज ...

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

आणि मग थेंब थेंब पडणारा पाऊसही निघून गेला ??

© कोमल मानकर

Read More

मुझे बेटीही रहने दो !

epost thumb

         स्त्री म्हणजे ....

   "  स्त्री "...... ह्या शब्दाने
     बंद ह्रदयाची कप्पे 
     धाडकन उघडावी 
     किर्रर्रर्र आवाज न 
     करता कसलाही ...
     त्याचं नीरव शांततेने 
     सांगावे तुम्हाला आम्हाला
     काहीतरी ,
     मिडीया वर्तमानपत्र जनता
     जनार्दना पर्यंत बातमी पोहचवणारी 
     सारीचं माध्यम ...
     एवढचं काय ?
     तर , माणसाचा मेंदू 
     एक दिवस लुळा पडावा 
     एवढं स्त्रीला ओरबडून 
     घेतलयंं कोणी ?
     नवर्याने कुटूंबाने राष्ट्राने समाजाने
     की देशाने असं म्हटलं तर 
     वावंग ठरेल ...
     रूतण्याचे घाव देह 
     रक्त बंबाळ करतात 
     ओल्या जखमा मनाच्या 
      मात्र काळीज सलतात ....
      डावरी कस्टम ,डोमेस्टीक वायलन्स 
      सहस्त्रावधी झुंबर लेवून 
      निमूटपणे पायाखाली दाबून 
      तुडवलं ही असतं तिने 
      पण, संसार तिचाच ना !
      शेवटी स्त्री म्हणजे ....
      पिंजर्यातलं पाखरूच का ??

     © कोमल प्रकाश मानकर 
       (विजय कॉलनी ) सिंन्दी रेल्वे वर्धा 
      इमेल :- Mankarkomal1997@gmail.com

Read More

https://youtu.be/EG53N5u1GMs

नुकतीच मोऱ्या production निर्मित स्त्रियांच्या मासिकपाळीवर एक वेबसिरीज सुरू केली आहे ....

प्रत्येकाने बघावी ...

Read More

तुम्ही महिला आहात म्हणून .....


मानव जातीत स्त्री आणि पुरुष फक्त ह्या दोन जाती आहेत....

माझे काही प्रश्न स्त्रियांसाठी ... जे मला स्त्रियानाच विचारावेसे वाटतात .

गळ्यात मंगळसूत्र घातल्याने म्हणजे तुमचा पती जिवंत आहे नाहीतर नाही ह्याचा अर्थ असा होतो काय ??

तुम्ही परंपरा समजून मंगळसूत्र घालता का ? की सौभाग्याचं लेणं म्हणून ....स्त्रीच्या गळ्यात मंगळसूत्र असलं म्हणजे

तिचं रक्षण होतं असं कुठे आहे भर दिवसा विवाहित स्त्रीच अपहरण बलात्कार होतोच आहे . मग शहर असो की खेडे

दिल्ली पासून गल्लली पर्यंत हे वावटळ थांबलेलं नाही ....

लग्नातच तुम्हाला जोडवे घातल्या जाते . भांगात कुंकू भरल्या जाते कधी लहानपणापासून न घातलेल्या बांगड्याचा भार सहन करावा लागतो . नवरा जिवंत असताना एखादी दिवस साधी कपाळावर टिकली जरी नाही लावली तरी हा समाज मागे कुरबुर करतो . सासू दातओठ खाते आपल्याच नावाने . आणि नवरा मरतो तेव्हा स्मशानातं त्याचा मृत्यू देह नेत नाही तर हाच समाज लग्नात जे संस्कृती म्हणा रितीरिवाजाच्या नावाखाली म्हणा जे काही बहाल करतो ते सारं काढून घेतल्या जाते . कपाळावरच कुंकू पुसल्या जातं हातातल्या बांगड्या काढून घेतल्या जाते एवढंच काय तर नवरा मेल्यावर हिरव्या बांगड्याचा चुडा ही त्या स्त्रीने कधी घालू नये . म्हणजे स्त्रीच्या सौन्दर्याची सारीच शान लयाला गेली . लावलीच कधी कपाळावर टिकली तर मग समाजच ओरडेल ..म्हणेल ," ह्या स्त्रीचा नवरा मेलाय आणि बघा हिला नाटण्या सावरण्याची आवड गेली नाही ..."

मग ह्या अश्या बंधनात तुमचं स्त्रीपण तुम्ही का विकावं ?

टिकली नाही लावली तरी नवरा तो नवरा असणारच आहे ..लावली तरी असणारच आहे राहाला प्रश्न तुमच्या सौन्दर्याचा नाही सौभाग्याचा प्रेम करता ना नवऱ्यावर तर तुमचं खरं सौभाग्य तोच आहे ..लग्न झाल्यावर पुरुर्षांचं कधी आडनाव बदल्या जाते का ? नाही ना ! तुम्ही का म्हणून आपलं वडिलांकडील आडनाव आहे ती ओळख मिटवून नवऱ्याचं आडनावं लावावं ? 

आज काल फॅड आलंय राव ...मुलांनाही कानात डूल कुरळ्या बारीक केसाची चुटी घालताना बघितलं . लेडीज ब्युटीपार्लर सारखे जेन्टस ब्युटीपार्लर वर जाऊन पुरुष मेकअप करू लागलेत ..मग त्यानेही बांगड्या घातल्या हातात तर बिघडलंय कुठे ??

- कोमल प्रकाश मानकर

Read More

मुक्या वेदनांचे वेटोळे

     चार भिंतीच्या आत असो की,
     सताड मोकळ्या सडकेने
     सुरक्षिता कुठे नामशेष झाली
     गल्ली चौंकाच्या 
     रस्त्याने ॥
     
    झपाटलेल्या सडकांवरून
    भटकत रहावे अनंत यातना;
    सहन करत तिने,उद्रेक होतो
    अतिमानुषतेचा, किती कळस गाठला
    निच्चतेचा अन् क्रुरतेचा ह्या नरभक्षकांने ॥

   थोडसं गंभीर व्हायचं,
   वर्तमानपत्रातल्या हेडलाईनंने चारचौघात
   दुख: व्यक्त करायचं ,परत जैसे थे
   सारं काही कॉमन झालं मँन 
   रोज एक तासात घडणारे चार बलात्कार ही ॥

   रखरखत्या छातीवर बरबटले 
  असेन मुसंडी मारून तिला लिंगपिसाटानी तर ,
  तिने मात्र न्यायव्यस्थेला धक्काही देऊ नये.      
  आंधळेपणाची पट्टी बांधली आहे 
  न्यायदेवतेने ॥

  सरतेशेवटी सरतं सगळं,
  संपतो श्वास तिच्यातला....
  तरीही पेटत नाही ठिणगी कुणाच्या दिमाखात,
  तो मातीमोल देह सरणावर पेटत जातो ,
  ग्वाही देत परत परत ह्याच सरणावर निष्पाप जीव
  भरडला जाईल म्हणत राख होतो....॥

     

© कोमल प्रकाश मानकर 
 
  इमेल Mankar123komal@gmail.com

Read More