The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.
248
533.5k
1.6m
मी मराठी साहित्यिक आहे. माझी एकोणतीस पुस्तके प्रकाशित आहेत. शेतकरीआत्महत्या करी कादंबरीची तिसरीआव्रुत्ती प्रकाशित आहे.राम शेवाळकर,सचिन तेंडुलकर, बाळासाहेब ठाकरे, सदाशिव पाटील ही चरित्र पुस्तके प्रकाशित आहेत. श्यामच्या छानछान गोष्टी या पुस्तकाची निवड राज्यशासनाने पुरक वाचनासाठी केली असून या पुस्तकाच्या ऐंशी हजार प्रती शासनाने छापून महाराष्ट्रातील प्राथमिक शाळांमध्ये वितरित केल्या आहेत. मी नुकताच मात्रुभारतीला जोडलागेलो असून मात्रुभारतीवर माझी सचिन आणि मी बाप्पा बोलतोय ही पुस्तके प्रकाशित आहेत.
#KAVYOTSAV -2 ****आजोबा.. आजोबा.. **** आजोबा, आजोबा थकलात का? मामाच्या सदनिकेत दडलात का? मामाची सदनिका दहाव्या मजल्यावरी तिथे दडली आजोबांची स्वारी | आजोबांनी विचारले चंद्राला कुठे रे बाबा तू दडलास हवाहवासा वाटे तुझा सहवास पण कधी दिसत नाहीस | आजोबा उठती सकाळी सकाळी वाटे कोवळे ऊन घ्यावे अंगावरी रवी न पोहचे दहाव्या मजल्यावरी चहूकडे असे शांतता भारी | मामाची बायको आळशी बाई लावली कामाशी कडक चहा आवडे आजोबाला बाईचा चहा अळणी कसा | आजोबांना हवी चमचमीत भाजी बाई करी गोडचुटुक भाजी बाईंची पोळी वातडधोंड आजोबांच्या कवळीची कुरकुर | आजोबांनी केली मामीकडे तक्रार ती म्हणे भारी तुमची किरकिर मिळेल ते खा गुमानं सांभाळून रहा मुकाट्यान | आजोबाला आला मामीचा राग नेलं गाऱ्हाणं मामाकडं तो म्हणे ही म्हातारपणीची सोंगं मिळेल त्यात माना समाधान पाहूनी आजोबांची तडफड आजी बोले तडतड जीवन आपले उतरतीकडं करू नका वायफळ बडबड उगी नका वाढवू टेंशन जगूया मिळेल ते खाऊन येता बोलावणे करू वैकुंठी प्रयाण तस्सेच, आजोबा म्हणती हसून। (नागेश सू शेवाळकर) फ्लॅट क्रमांक ११०,वर्धमान वाटिका फेज ०१, क्रांतिवीर नगर लेन ०२ संचेती शाळेजवळ थेरगाव पुणे ४११०३३. संपर्क ९४२३१३९०७१.
#KVYOTSAV -2 पाऊस आणि ललना ! पाऊस आणि ललनेचा सारखाच असतो खेळ भुलवती खेळवती आस लावती प्रसंगी दडी मारून बसती | जाता त्यांचा रूसवा काढाया हसत नाहीत दिसत नाहीत दुरून डोंगर साजरे दिसती | या या म्हणता येत नाहीत। आले आले म्हणता धिंगाणा कसा घालती पळती कोसळती चहूकडे दुरावा क्षणात नाहीसा करती | जलधारा बघा कशा कोसळती ललनेच्या प्रेमा येई भरती कंटाळा ना बघा कुणा येई सृष्टी सारी आनंदे डोलू लागे | प्रसन्न असता रमणी प्रेमाचे येई भरते क्षणभरात होती निष्ठुर दोघे अंधार पसरे चोहीकडे | विश्वासू नये दोघांवर विश्वासघातकी दोघेही कृञिम पर्याय पावसासाठी ललनेसंगे चाले न तेही। **** (नागेश सू शेवाळकर) फ्लॅट क्रमांक ११०, वर्धमान वाटिका फेज ०१, क्रांतिवीर नगर लेन ०२, संचेती शाळेजवळ थेरगाव, पुणे ४११०३३ संपर्क 9423139071.
#KAVYOTSAV -2# =====सांग बा डाक्टरा ===== झाली किती तरी वर्षे येतो डाक्टरा तुझ्या दारी ऊन असो थंडी असो वा पाऊस चुकवत नाही कधी तुझी वारी | येई ज्या ज्या दिवशी नित्य नवा आजार सांगशी आणि सांगशी पथ्यापथ्य भारी भराभरा औषधी लिहून देशी | सर्दी डोकेदुखी नि अंगदुखी ही तर नित्याचीच दुखणी कधी देशी आयुर्वेद औषधी तर कधी आलोपॅथी महागडी करीत गेलो तू सांगशील ते तेल ही सोडले तूप ही सोडले तिखट आंबट हद्दपार केले जेवणात मग तथ्य काय उरले रक्तदाब आला वस्तीला घेऊन मिञ रोग सोबतीला नयनी म्हणे मोत्यागत बिंदू आला दोन्ही नयना कृत्रिमतेचा उजाळा चाळिशी गाठता गाठता बघा कशी साथ दाढांनी सोडली साखर नाही खायची डाळ ही वर्ज्य झाली पित्त कसे नेहमी खवळलेले चहा सुटला सोडली कॉफी आवडे जे जे ते सारे सोडले फ्रिजचे पाणी केंव्हाच पळवले केली तारुण्यात खावखाव कामासाठी नित्याचीच धावाधाव साथीला आली जीवघेणी आव उगवले आपोआप कोलेस्ट्रॉल हंगामी फळांची आवड भारी मज सांगितले बघ तू कसे पेरू नाही खायचा, खाऊ नको बोर आवडती फळे बघ गेली दूर केळीकडे पाहू नका ढुंकून कालच आला एक नवा पाहुणा नाव त्याचे गोंडस म्हणे मुतखडा पालक टमाटे जाऊन ताटी कडू कारली रोग औषधे पथ्य यांची झाली यादी हातभर लांब औषधी डब्बे गोळ्यांची पाकिटं यांनी भरली माझी कपाटं पथ्यापथ्याने जीवन झाले बकाल प्रकटले डोकी अकाली टक्कल लढवू कोणती सांग आता शक्कल जीवनी येण्या समाधान रोग औषधे पथ्य यासवे घेरले विविध डॉक्टरांनी प्रत्येक वेळी धाडी बा तज्ज्ञांकडे तुझ्यासंगे भरले खिसे अनेकांचे बा डाक्टरा विनवणी तुज एक सांग आता निर्वाणीचं एक खाऊ तरी काय रोज रोज अपथ्याची यादी दे एकच एक आता थकलो पुरता नागवलो अशा कशा चक्रव्यूहात अडकलो करू नकोस माझा अभिमन्यू बा डाक्टरा हीच विनवणी तुजशी || ******* ********************* (नागेश सू शेवाळकर) फ्लॅट क्रमांक ११०, वर्धमान वाटिका फेज ०१ क्रांतिवीर नगर लेन ०२, संचेती शाळेजवळ थेरगाव, पुणे ४११०३३ 9423139071.
#KAVYOTSAV -2# *गॅसबाला* . गॅस दरवाढीने झाली जनता ञस्त | कंपनीने युक्ती शोधली मस्त | नेमुनी गॅसबाला मदमस्त | टाक्या पोहोचू लागल्या घरोघर | टाकी घेऊन येता टंचपोर| दरवाढीचा ग्राहकांस पडला विसर| टाकी घेऊन येता खांद्यावर | लालेलाल झाला चेहरा सुंदर | पाहूनी चेहरा घामाने डबडबलेला। ह्रदयाचा ठोका कसा चुकला। पाहूनी मनमोहक अदा खास। यजमान धावला मदतीस| हात लावताना टाकीस | नयन भिडले नयनास| श्वासात मिसळता श्वास | हसू फुटले यजमानास | केला इशारा जाता जाता | देईन माझी सारी मालमत्ता | घरी आहे मी एकटाच आत्ता | मारू प्रेमाच्या खुल्लमखुल्ला बाता| हसून म्हणाली ती बाला| होईल आनंद फार मजला| काळजी मज तुझी प्रेमवीरा| कशी सांभाळशील कवळी शूरवीरा| ====================== नागेश सू. शेवाळकर, फ्लॅट क्रमांक 110 वर्धमान वाटिका, फेस 01, क्रांतिवीर नगर लेन 02 संचेती शाळेजवळ थेरगाव पुणे 411033. (9423139071) nageshspande@gmail.com
'स्वराज्यसूर्य शिवराय' ह्या माझ्या चरित्रात्मक कादंबरीचा सातवा भाग मातृभारती या लोकप्रिय संस्थेच्या वतीने प्रकाशित झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचा परिचय, त्यांच्या पराक्रमाचे वर्णन, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, गनिमी कावा, धाडस, साहसी- जीवाला जीव लावणारे सवंगडी, शत्रूला सळोकीपळो करून सोडणारी नीती अशा सर्व बाबींवर प्रकाश टाकण्याचा, परिचय करून देण्याचा मी प्रयत्न केला आहे. शेकडो वर्षे झाली परंतु श्री शिवाजी महाराजांची लोकप्रियता आजही तशीच आहे, उत्तरोत्तर ती वाढते आहे. शिवराय हे महाराष्ट्रातील जनतेचे दैवत आहे. सिनेमा, नाटक, कथा,कादंबरी, चरित्र, पोवाडे, गाणी इत्यादी कुठल्याही प्रकारचे वर्णन समोर येताच शिवभक्त क्षणभर थांबतो, पाहतो, ऐकतो, गुणगुणतो, भक्तीभावाने महाराजांना वंदन करून मगच पुढे जातो.शिवराय ही व्यक्तीरेखा जनसामान्यांच्या ह्रदयात घर करून आहे. आबालवृद्धांना आवडणारे, भावनारे अनेक प्रसंग शिवरायांच्या जीवनात आले होते. मग तो अफजलखानाचा वध असो, शाहिस्तेखानाची फजिती असो, आग्र्याहून चातुर्याने करुन घेतलेली सुटका असो, पावनखिंडीतील बाजीप्रभूचा पराक्रम असो, मुरारबाजीचे साहस असो, प्रतापराव गुजर यांचे जगावेगळे धाडस असो ... अशा शेकडो घटना आजही शिवभक्तांना मंत्रमुग्ध करतात. जिजाऊ.... शिवरायांच्या मातोश्री. शिवरायांच्या जीवनात धाडसाचे, पराक्रमाचे, स्वराज्य निर्मितीचे बीजांकुरण करताना, शिवरायांना धीर देणाऱ्या, मार्गदर्शन करणाऱ्या अशा या आऊसाहेब. अनेकांनी शिवरायांच्या जीवनावर लिहिले आहे. मीही मला जमेल तसे लिहितो आहे. जवळपास पंचवीस भाग होण्याची शक्यता आहे. श्री महेंद्र शर्मा जी, अनुजाजी आणि मातृभारती संस्थेच्या सर्व संबंधित व्यक्तींनी मला संधी दिली त्यामुळेच मी शिवरायांसारख्या राष्ट्र पुरुषावर, युग पुरुषावर लिहू शकलो. वाचकांनीही प्रकाशित झालेल्या सातही भागांचे चांगले स्वागत केले आहे. सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद. आभारी आहे.
Continue log in with
By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"
Verification
Download App
Get a link to download app
Copyright © 2023, Matrubharti Technologies Pvt. Ltd. All Rights Reserved.
Please enable javascript on your browser