Shekari majha bhola book and story is written by Nagesh S Shewalkar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Shekari majha bhola is also popular in Fiction Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
शेतकरी माझा भोळा - Novels
by Nagesh S Shewalkar
in
Marathi Fiction Stories
१)शेतकरी माझा भोळा! रात्रीची वेळ होती. अमावस्येचा अंधार सम्दीकडं पसरला होता. गावात सम्दीकडं सामसूम होती. रातकिड्यांच्या आवाजासोबत पारावरील पोथीकऱ्याने मधूनच उंचावलेला आवाज रातरची शांतता भंग करत होता. देवळात पाच-सात म्हाताऱ्या आणि चार-दोन म्हातारेच काय ते पोथीपुढे बसून होते. पारासमोरील घरात राहणारा गणपत बायकोशेजारी बाजेवर पडला होता."धनी, औंदा हायब्रीडीचा उतार लै चांगला यील आस वाटत..."व्हय. आज सम्दी हायब्रीड कापून टाकली हाय. उंद्या या फार तं परवाच्या दिसी खळं व्हईल. च्यार- आठ रोजात घर हायब्रीडीनं भरून जाईल बघ.
१)शेतकरी माझा भोळा! रात्रीची वेळ होती. अमावस्येचा अंधार सम्दीकडं पसरला होता. गावात सम्दीकडं सामसूम होती. रातकिड्यांच्या आवाजासोबत पारावरील पोथीकऱ्याने मधूनच उंचावलेला आवाज रातरची शांतता भंग करत ...Read Moreदेवळात पाच-सात म्हाताऱ्या आणि चार-दोन म्हातारेच काय ते पोथीपुढे बसून होते. पारासमोरील घरात राहणारा गणपत बायकोशेजारी बाजेवर पडला होता."धनी, औंदा हायब्रीडीचा उतार लै चांगला यील आस वाटत...""व्हय. आज सम्दी हायब्रीड कापून टाकली हाय. उंद्या या फार तं परवाच्या दिसी खळं व्हईल. च्यार- आठ रोजात घर हायब्रीडीनं भरून जाईल बघ.
२)शेतकरी माझा भोळा! फाटेची साडे आठ-नवाची येळ आसल, समदं सीतापूर जागं झालं व्हतं. जो तो आपापल्या कामामध्ये गुंग होता. गडी-मान्स ढोरायच्या मांघ व्हती. ...Read Moreकाढणं, झाडझूड करणं ही कामही चालली व्हती. मालक आपापल्या गडयाला दिसभरात काय काम करायची त्ये सांगत व्हते. बाया-मान्स सैपाक-पाण्याच्या माघ लागल्या व्हत्या. गणपत बी ईचार करत बसला व्हता, बिडी फुकत व्हता. दिसभर काय कराव आन् काय न्हाई या विचारात पडला व्हता. पर काय करावं त्ये ठरत न्हवतं. येकदा वाटायचं शेतामधी जावं पर दुसरे
३) शेतकरी माझा भोळा! येकदा का कास्तकारायचे आगुंठे घिवून त्यांचे हात तोडल्यावर पुढील काम व्हायला वेळ त्यो किती लागणार? फाता-फाता क्यानालचं काम बी पुर झालं. येक एक्कर म्हन्ता म्हन्ता गणपतचा तीन ...Read Moreतुकडा क्यानालात गेला. त्यो बी वावराच्या बराबर मधून. भावा-भावाची वाटणी होवावं त्या परमानं ! क्यानालच्या दोही बाजूनं समान जिमिन ऱ्हायली. क्यानालचं बांधकाम सुरु आस्ताना गावातल्या शिरिमंतांची मजा झाली. क्यानालात पाणी वाहील तवा वाहील पर बांधकामाच्या वाहत्या गंगेमंदी लोकायनं हात धुवून घेतले. सीतापूरपरमानं क्यानालच्या पट्ट्यात येणाच्या समद्या गावाची चांदी झाली.
४)शेतकरी माझा भोळा! आबासाहेब दोन तीन दिसात मुंबईहून माघारी आले. त्येंच आमदारकीच तिकीट पक्क झाल व्हतं. त्ये शेहरात ऊतरल्याबरूबर त्येंच्या चमच्यांनी क्यानालचा सम्दा परकार त्याच्या कानी घातला. तव्हा ...Read Moreम्हन्ले, "आस हाय काय? फातो काय करायचे ते." गावात आल्याबरूबर त्येनी गणपत आन ज्येंचा पैका मिळाला नव्हता त्या समद्याना बलीवल. ज्ये गडबड करण्याजोगे व्हते. त्येंना पैले बलीवलं आन् त्येंचा पैका दिवून त्येंची त्वांड बंद केले... सर्कारनं मोर्च्च्यावाल्यायचा म्होरक्या फोडल्यावाणी! आस्ते आस्ते सम्दे लोक जमा झाले तव्हा सरपंच बाहेर
५) शेतकरी माझा भोळा! कोंडबा मोटारीतून उतरला आन् पायी पायी घराकडं निघाला. स्टँडपासून गाव चार फरलांग दूर व्हत. तेव्हढ अंतर पायी चालाय लागायच. न्हाई म्हणाया दोन ऑटो व्हते पर ...Read Moreमान्सी पाच रुपै घेयाचे. तेव्हढे पैयसे कोंडबापाशी नसायचे त्यो हमेशा पायीच निघायचा. त्या दिशीबी त्यो पायीच सीतापूरकडं निंघला. दोन-आडीच फरलांग आला आन् त्येच ध्यान सडकेला चिकटून असलेल्या त्येच्या जिमिनीकड गेलं. दोन-आडीच येकरचा त्यो तुकडा नुस्ता खडकाळ व्हता. ह्ये मोठाले धोंडे पडले व्हते. कोंडबाच्या घरी आठरा-ईस्व दरिद्री असल्यामुळे त्येच्या आज्ज्यापासून म्हंजी जवळ-जवळ