Bahirji book and story is written by Rajancha Mavla in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Bahirji is also popular in Fiction Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
बहिर्जी - स्वराज्याच्या तिसरा डोळा - Novels
by Rajancha Mavla
in
Marathi Fiction Stories
हिरव्या रंगाच्या नानाविध छटांनी नटलेल्या नी जरीचा शालू पांघरलेल्या डोंगराआडून आकाशमणी सूर्याचं तेजबिंब हळूहळू आकाशमंडलात वर चढू लागलं. सोनेरी रंगांची मुक्त उधळण करीत सूर्यकिरणे धरतीवर हात पाय पसरू लागली. दिवस होता भाद्रपदातल्या चतुर्थीचा. शिवाय, याच शुभ मुहूर्तावर आलेला बैलपोळा. गावकऱ्यांच्या उत्साहाला एक वेगळंच उधाण आलं होतं. लोकांनी आपापली घर फुला तोरणांनी सुशोभित केली होती. गावातील घरे, मंदिरे, वाडे आणि गावचे प्रवेशद्वारही झेंडू, जास्वंद, शेवंता अशा नाना फुलांनी शृंगारली होती. कालच, गावकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी आपली दूधदुभती, वासरं, बैलं नदीच्या पाण्यात दगडा मातीने घासून पुसून स्वच्छ चकचकीत केली होती. त्यांच्या नैसर्गिक काळ्या, पांढुरक्या, तांबड्या रंगाला एक वेगळीच झळाळी आली होती. त्यांची बाकदार शिंगे नाना रंगांनी सुरेख रंगवून काढली होती. आपल्या वाडवडिलांपासून वापरत असलेल्या लाकडी / लोखंडी पेटाऱ्यांमध्ये वर्षानुवर्षे जपून ठेवलेल्या रंगीबेरंगी नक्षीदार झुली धुवून स्वच्छ केल्या होत्या. त्या आता जनावरांच्या पाठीवर विराजमान झालेल्या होत्या. बैलांची, खोंडांची डौलदार वशिंडं , शेपट्या, पाय विविध नैसर्गिक रंगांनी रंगवलेली होती. गळ्यांत चामड्याचे पट्टे असलेल्या घुंगरा घंट्यांच्या माळा चढवल्या होत्या. त्याच बरोबर आपल्या घरच्यांनी रात्री स्वतः बनवलेल्या झेंडूच्या फुलांचे हार त्यांच्या गळ्यांत आणखीनच आकर्षक दिसत होते. सर्व जनावरांच्या कपाळावर घरच्या सुवासिनींनी भरलेल्या कुंकवा गुलालाचा रंग उठून दिसत होता.
१. झुंज हिरव्या रंगाच्या नानाविध छटांनी नटलेल्या नी जरीचा शालू पांघरलेल्या डोंगराआडून आकाशमणी सूर्याचं तेजबिंब हळूहळू आकाशमंडलात वर चढू लागलं. सोनेरी रंगांची मुक्त उधळण करीत सूर्यकिरणे धरतीवर हात पाय पसरू लागली. दिवस होता भाद्रपदातल्या चतुर्थीचा. शिवाय, याच शुभ मुहूर्तावर ...Read Moreबैलपोळा. गावकऱ्यांच्या उत्साहाला एक वेगळंच उधाण आलं होतं. लोकांनी आपापली घर फुला तोरणांनी सुशोभित केली होती. गावातील घरे, मंदिरे, वाडे आणि गावचे प्रवेशद्वारही झेंडू, जास्वंद, शेवंता अशा नाना फुलांनी शृंगारली होती. कालच, गावकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी आपली दूधदुभती, वासरं, बैलं नदीच्या पाण्यात दगडा मातीने घासून पुसून स्वच्छ चकचकीत केली होती. त्यांच्या नैसर्गिक काळ्या, पांढुरक्या, तांबड्या रंगाला एक वेगळीच झळाळी आली होती. त्यांची
२. दवंडी निसर्ग देवतेच्या कुशीत वसलेलं गाव, आजूबाजूला हिरव्या रंगाचा पदर ओढून सज्ज असलेल्या सह्याद्रीच्या मुशीत, बाजूनेच खळाळत वाहणाऱ्या नदीच्या किनाऱ्यावरून येणाऱ्या मंद मंद शीतल वायुलहरी अंगावर पांघरून निजल होत. पक्ष्यांच्या कलकलाटाने हळूहळू जागं होऊ लागलं होत. पूर्वेकडून सुर्यादेवताही ...Read Moreअसंख्य रंगीबेरंगी कुंचल्यांनी आकाशाचं छत नानाविध रंगात रंगवून टाकण्यासाठी प्रकट होऊ लागला होता. त्याच्या तांबूस सोनेरी किरणांनी अवघा भवताल उजळून टाकण्यासाठी डोंगरा आडून वर सरकत होता. नदीपासून आणि घाटावरच्या मंदिराच्या मागच्या बाजूने अर्धा एक फर्लांग अंतरावर निंबाच्या झाडामध्ये रामोश्यांची वस्ती होती. मोजून दहा बारा घर होती. मातीच्या भिंती आणि गव्हाच्या, किंवा नदीतल्या पानगवताने शाकारलेली छप्पर असलेली,
३. शिकार नदीच्या मधोमध एका लहान खडकावर शंभू महादेवाचं एक प्राचीन मंदिर होतं. त्याच्या आजूबाजूला पसरलेल्या जमिनीवर लहानसहान वृक्षराईंनी वेढलेलं ते हिरवंगार छोटंसं द्वीप जणू नदीच्या पांढुरक्या निळ्या कोंदनातील पाचूच्या खड्यासारखं भासत होतं. किनाऱ्यावर असलेल्या दगडी घाटावर तिथपर्यंत जाण्यासाठी ...Read Moreमोठमोठाले खडकांची एकसंघ माळ होती. पावसाळ्यात नदी दुथडी भरून वाहायला लागली कि, मंदिरातल्या शंभू देवाचं दर्शन दुरापास्त होऊन जायचं. दैनंदिन जीवनात, देव कार्यात अडचण येऊ नये म्हणून गावातील लोकांनी घाटालगतच एक छोटंसं मंदिर उठवलं होतं. रोजच्या देवकर्मात येणारी बाधा दूर झाली होती. सकाळ संध्याकाळ देवालयातली घंटा महादेवाच्या आराधनेत तल्लीन होऊन जायची. तिचा टनत्कार चुहुदिशांना एक मंगलमय स्वरणाद सोडून जायचा.
४. लाल महाल सूर्य डोक्यावरून ढळू लागला होता. दिवे घाटाच्या डोंगरावरून खाली उतरून पुण्यात पोहोचायला बहिर्जी आणि मारत्याला दुपार टळून गेली. दोघेही आता कसब्यात पोहोचले होते. देवी देवतांची मंदिरे, वाडे, घरे पाहत लोकांना विचारत ...Read Moreदिशेनं चालत होते. काही वर्षांपूर्वी आदिलशाही फौजेने पुण्यावर, त्यातही मुरार जगदेव या मराठा सरदाराने पुणे जाळून बेचिराख केले होते. पुण्याच्या वेशीवर पहार रोवून त्यावर चपला टांगल्या होत्या. याचा अर्थ, कुणीही या जागेवर वस्ती करू शकत नाही. शेती करू शकत नाही. आणि असे आढळल्यास त्याचं मुंडकं धडा वेगळं केलं जाईल. ज्या पुण्यात आधी आनंदाने लोक राहायचे तिथं बाभळी, गवत आणि जंगली
५. वाघाची शिकार भल्या पहाटे शिवबा अन त्याच्या मावळ्यांनी गुंजन मावळातल्या गावाला निरोप दिला अन पुण्याकडे परतीचा प्रवास चालू झाला. हवेतला गारवा अंगाला झोबत होता. शिवबाने अंगावर शाल घट्ट बांधून घेतली होती. घोड्यांच्या ...Read Moreआवाज अन त्यामुळे मागे उडणारी धूळ हवेत मिसळून जात होती. हळू हळू सूर्य नारायणाचे दर्शन होऊ लागले होते. अंगावर सूर्याची सोनेरी कोवळी किरणे पडू लागली होती. पक्षांचा किलबिलाट आता ऐकू यायला लागला होता. मधूनच एखादा हरणांचा कळप हुंदडताना दिसे. तर मधेच मोरांचा "म्याऊऊउ........ म्याऊऊऊउ ....." आवाज कानावर पडे. समोरच काही माणसं हातात काठ्या घेऊन धावत जाताना नजरेस पडत होती. मागून