Punahbhent book and story is written by Vrishali Gotkhindikar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Punahbhent is also popular in Fiction Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
पुनर्भेट - Novels
by Vrishali Gotkhindikar
in
Marathi Fiction Stories
पुनर्भेट भाग १ घड्याळाचा काटा साडेनऊ कडे गेलेला पाहताच रमाने हातातली पोळी तव्यावर टाकली आणि बाहेरच्या खोलीत बसलेल्या मेघनाला हाक दिली , “मेघु ये ग लवकर गरम पोळी घालतेय तुला ,ताट वाढले आहे तुझे . जवळच्या छोट्या टेबल वर एका ताटात रमाने भाजी ,कोशिंबीर वाढली होती . शेवटची गरम पोळी ताटात वाढून रमाने ग्यास बंद केला . आणि मेघनाच्या पोळीवर तुप वाढले . तोपर्यंत मेघना आत येऊन खुर्चीवर बसली,तिच्या शेजारीच रमा बसली . दोघींनी एकत्रच खायला सुरवात केली . मेघु माझी जायची वेळ झाली बर का आज सुजाता नाही येणार तेव्
पुनर्भेट भाग १ घड्याळाचा काटा साडेनऊ कडे गेलेला पाहताच रमाने हातातली पोळी तव्यावर टाकली आणि बाहेरच्या खोलीत बसलेल्या मेघनाला हाक दिली , “मेघु ये ग लवकर गरम पोळी घालतेय तुला ,ताट वाढले आहे तुझे . जवळच्या छोट्या टेबल वर ...Read Moreताटात रमाने भाजी ,कोशिंबीर वाढली होती . शेवटची गरम पोळी ताटात वाढून रमाने ग्यास बंद केला . आणि मेघनाच्या पोळीवर तुप वाढले . तोपर्यंत मेघना आत येऊन खुर्चीवर बसली,तिच्या शेजारीच रमा बसली . दोघींनी एकत्रच खायला सुरवात केली . मेघु माझी जायची वेळ झाली बर का आज सुजाता नाही येणार तेव्हा मलाच दुकान उघडायला हवे इथे तुझा डबा भरून ठेवलाय
पुनर्भेट भाग २ थोड्याच वेळात सुजाता आली .. दोघी कामात गर्क होऊन गेल्या यानंतर सहा कधी वाजले तिला समजलेच नाही . सुजाता आणि ती दोघी दुकान बंद करून बाहेर पडल्या . सुजाता जवळच रहात होती ,रमाचा निरोप घेऊन ती ...Read Moreगेली . उद्या रविवार असल्याने आता सोमवारीच दोघी भेटणार होत्या . रविवारी तेथील कॉलेज शाळा बंद असत . शिवाय रविवारी रमाला इतर कोरडे पदार्थ ,त्यांची तयारी ,आणि ते तयार करणे ही कामे असत . मेघना पण रविवारी घरीच असे . त्यामुळे रमा रविवारी दुकान बंदच ठेवत असे . रमा घरी पोचली तेव्हा मेघना काही वाचन करीत बसली होती . आईला
पुनर्भेट भाग ३ रमाही खुप हुशार होती . लहान वयात पाहिलेल्या आईवडिलांच्या आकस्मिक मृत्यूमुळे जास्तच समंजस झाली होती . अबोल असलेल्या रमाचे काका काकुंवर खुप प्रेम होते . आई वडिलांच्या माघारी ते दोघेच तिची “दुनिया” होते . उत्तम मार्काने ...Read Moreदहावी उत्तीर्ण झाली . त्यानंतर तिने जिल्ह्याच्या गावी जाऊन आपले शिक्षण पुरे केले . पदवीधर झाल्यावर नोकरी करावी आणि घरात हातभार लावावा असा तिचा विचार होता . नोकरीसाठी जिल्ह्याच्या गावी जायची तिची इच्छा होती . पण काकांना ते मान्य नव्हते . रमाला ते आपल्यापासून लांब जाऊ द्यायला इच्छुक नव्हते . आता काका काकू बरेच वृद्ध झाले होते . त्यामुळे जी
पुनर्भेट भाग ४ अनाथ आश्रमातच लहानपणापासुन तो वाढला होता . त्याचे शिक्षण तिथेच पूर्ण झाले होते . एकदोन प्रयत्नात सरकारी नोकरी पण मिळाली होती . पगार चांगला होता . त्याचे दोन खोल्याचे एक घर सुद्धा होते गावाबाहेर.. थोडे पैसे ...Read Moreटाकल्यावर आता त्याला लग्न करायचे होते . त्याच्या बाजुने लग्नाचे पाहायला कोणीच नव्हते. म्हणून त्याने स्वतःच ही स्थळे पाहायची मोहीम सुरु केली होती . आज तो ऑफिसमधील आपला मित्र मोहन याच्यासोबत आला होता . रमाचे स्थळ त्याला असेच समजले होते . त्याने गावातच रमाला पाहिले होते . साधीसुधी पण आकर्षक दिसणारी रमा त्याला आवडली होती . म्हणूनच तिच्या घरच्यांकडे तो
पुनर्भेट भाग ५ मेघना रितूकडून परत घरी आली तेव्हा आठ वाजले होते . आली तेव्हा खुपच खुशीत होती ती !! “आई इतकी मजा आली न रितुकडे . आणि जेवण सुद्धा मस्त केले होते मावशींनी, खुप पदार्थ केले होते ...Read Moreसंध्याकाळी पण आम्हा मुलींसाठी बाहेरून पिझा ,केक, पास्ता असे पण मागवले होते . अगदी पोट फुटेपर्यंत खाल्ले बघ . आणि खुप दंगा ,धमाल केली ग .. कसला जबरदस्त वाढदिवस साजरा झाला रितूचा ..!! बर आई तु जेवलीस का ? आणि हा केक दिलाय बघ तुझ्यासाठी डब्यात रितुने रितुच्या आई तर बरेच पदार्थ देत होत्या पण तु फक्त केक दे म्हणलीस न