Tu Hi re majha Mitwa book and story is written by Harshada in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Tu Hi re majha Mitwa is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
तू ही रे माझा मितवा - Novels
by Harshada
in
Marathi Love Stories
“इटर्निया बिजनेस सेंटर” नाव असलेले क्रोम प्लेटेड अक्षरे सकाळच्या कोवळ्या उन्हाने झळाळून निघाली होती. धावत पळत ‘ती’ तळमजल्याच्या लिफ्टजवळ आली. 3rd floor –“दि शोकेस मिडिया प्रा.लि.” ह्या नावावरून तिने हलकेच हात फिरवला, एक स्मित हास्य तिच्या चेहऱ्यावर पसरलं आणि तिने लिफ्ट कॉल केली,लिफ्टमधे शिरल्यावर जरा केस एकसारखे केले, लिफ्ट तिसऱ्या मजल्यावर आल्यावर ती घाईघाईने शोकेस मिडियाच्या ऑफिसमध्ये गेली, रिसेप्शनला ऑफर लेटर दाखवून तिने जुजबी माहिती घेतली.रिसेप्शनिस्टने उजव्या बाजूला हात दाखवत एका बोर्डकडे इशारा करत म्हटलं-“ मॅम तुम्हाला ऑलरेडी उशीर झालाय, ह्या बाजूला कॉन्फरन्स रूम आहे आणि induction lecture ऑलरेडी सुरु झालंय, your senior Mr. Arush Jadhav is very strict about the
#भाग_१“इटर्निया बिजनेस सेंटर” नाव असलेले क्रोम प्लेटेड अक्षरे सकाळच्या कोवळ्या उन्हाने झळाळून निघाली होती. धावत पळत ‘ती’ तळमजल्याच्या लिफ्टजवळ आली. 3rd floor –“दि शोकेस मिडिया प्रा.लि.” ह्या नावावरून तिने हलकेच हात फिरवला, एक स्मित हास्य तिच्या चेहऱ्यावर ...Read Moreआणि तिने लिफ्ट कॉल केली,लिफ्टमधे शिरल्यावर जरा केस एकसारखे केले, लिफ्ट तिसऱ्या मजल्यावर आल्यावर ती घाईघाईने शोकेस मिडियाच्या ऑफिसमध्ये गेली, रिसेप्शनला ऑफर लेटर दाखवून तिने जुजबी माहिती घेतली.रिसेप्शनिस्टने उजव्या बाजूला हात दाखवत एका बोर्डकडे इशारा करत म्हटलं-“ मॅम तुम्हाला ऑलरेडी उशीर झालाय, ह्या बाजूला कॉन्फरन्स रूम आहे आणि induction lecture ऑलरेडी सुरु झालंय, your senior Mr. Arush Jadhav is very strict about the
#भाग_२रूमचा दरवाजा सरावाने धाडकन उघडत ऋतुजा आत आली आणि बेडवर पर्स फेकत ती तनुच्या गळ्यात पडली. तिच्या रुमी तनु आणि प्रिया आवक होऊन एकमेकांकडे बघत होत्या.तिच्या डोक्यावरून हात फिरवत तनु म्हणाली-“ये ऋतू काय झालं? जॉबच्या पहिल्याच दिवशी अशी ...Read Moreवैतागली आहेस?”तिच्यापासून बाजूला होत बेडवर बसत वैतागून ती म्हणाली-“यार तने बघ ना पहिल्याच दिवशी एका अत्यंत खडूस,स्टुपिड,मूर्ख आणि बेअक्कल मुलाशी पंगा झाला..”तनु आणि प्रिया दोघीही तिच्या ह्या वाक्यावर हसल्या.तिच्या डोक्यावर टपली मारत प्रिया म्हणाली-‘ऋत्या आता कॉलेज संपल ..हे नवीन लाइफ आहे,प्रोफेशनल लाइफ..! पंगे घ्यायचे दिवस संपले आता. Be matured ...चल आता फ्रेश हो,मी मस्त कॉफी करते ...मग तुझं फर्स्ट डे पुराण
#तू_ही_रे_माझा_मितवा...????#भाग_३आज तनु आणि प्रियाने कामानिमित्त रात्री उशिरा येण्याची परवानगी घेतली असल्याने ऋतू एकटीच होती रूमवर. फ्रेश होऊन ती बाल्कनीत कॉफी घेऊन बसली.रेवाच्या वाक्याने तिचं मन दुखावलं गेलं होतं,डोळे पाणावले होते. तनु आणि प्रिया कामात असल्याने ...Read Moreफोन करायचा प्रश्नच नव्हता. मनातलं सांगावं इतकं जवळ आतापर्यंत बाकी इतर मित्रमैत्रिणी असं कुणीच नव्हतं...रूममधली शांतता अंगावर येत होती. खालून फक्त काही लहान मुलांच्या खेळण्याचा आवाज शांततेवर ओरखडा पाडत होता, एरवी दंगामस्ती करत ही कातरवेळ कशी निघून जाते ते कळतही नसे पण आज जणू संध्याकाळ अंगावर येत होती. खोल खोल काहीतरी दुखावलं आहे आणि नेमकं सल काय आहे हे न कळल्याने अजूनच तिचे डोळे भरून येत
ऋतूला रात्री उशिरा जाग आली,अजूनही थकवा जाणवत असला तरी ताप उतरल्यामुळे जरा हुशारी आली होती.तिची चाहूल लागताच शेजारी पेंगुळलेल्या प्रिया आणि तनु लगेच उठल्या. तनुने तिला व्यवस्थितपणे भिंतीला टेकवून बसवलं, तिचं ब्लॅंकेट सारखं केलं.“You Ok?” तिच्या डोक्यावरून हात ...Read Moreप्रिया म्हणाली.मानेनेच होकार देत ती भिंतीला मागे टेकून बसली.“हे बघ आता आराम करायचा हं..दोन दिवस सुट्टी टाकायला सांगितली आहे डॉक्टर काकांनी.” तिला समजावणीच्या सुरात तनु म्हणाली.“दोन दिवस?..अजिबात गरज नाही.I am absolutely ok.आणि हो प्रिया, माझ्या घरी सांगितलं नाही ना? ते उगाच दोन दिवस तिकडे बोलावतील आणि मग पुन्हा लग्न,स्थळं,मुलं.. उगाचच कटकट,अबोला होता तेच ठीक होतं असं वाटतंय” ती वैतागत म्हणाली.“नाही ग
लॅचचा जरासा आवाज झाला. अभय रुममध्ये आला तेव्हा अंधार होता.सवयीने त्याचा हात भिंतीवर चाचपडला आणि त्याने बटन दाबलं.प्रकाश पसरला तसं त्याने समोर पाहिलं रायटिंग टेबलवर डोकं ठेवून वेद झोपला होता.शेजारी लॅपटॉप आणि बियरच्या दोन रिकाम्या बॉटल.‘ ये रायटर..उठं’ ...Read Moreखांद्याला धरून गदागदा हलवत अभय म्हणाला.“ये...भाव काय विषय आहे...हळू की जरा” डोळे उघडायचा प्रयत्न करत वेद म्हणाला.“साल्या दोन बॉटल उडवल्या तू? तुला माहितीय ना बियरसारखा छपरी आयटम पण चढतो तुला...कशाला रिस्क घेतो..काय आज एकदम ‘दारू पीके शायरी’ वैगरे मूड आहे का ?” फ्रेश होत अभय म्हणाला.“अभ्या...साल्या तुझी सेकंड शिफ्ट म्हणजे माझ्या डोक्याला त्रास असतो...मस्त झोपलो होतो..without any tension.. उठवायलाच हवं होतं का?” जडावलेल्या