सावर रे.... - Novels
by Amita Mangesh
in
Marathi Love Stories
सावल्या फुलांच्या, पावले ही फुलांची, वाट हळवी वेचताना सावर रे ए मना सावर रे सावर रे, सावर रे, एकदा सावर रे ।। सावल्या क्षणांचे, भरून आल्या घनांचे थेंब ओले झेलताना सावर रे ए मना सावर रे सावर रे सावर रे एकदा सावर रे ।। गाणे गुण गुणत ती किचन मध्ये काम करत होती. नाजूकशी, सुंदर, चंचल, मृगनयनी. आवाजात गोडवा आणि चेहऱ्यावर आनंद. रोजच अशीच छान दिसायची पण आज तिच्या चेहऱ्यावर अलौकीक तेज दिसत होतं. आज जरा जास्तच खुश दिसत होती. तिची आई किचन बाहेरून तिला गुंनगूनताना पहात होती. आपल्या मुलीच्या चेहऱ्यावरील आनंदाने ती मनोमनी सुखावली होती. आई..."हम्म आज कोणी
सावल्या फुलांच्या, पावले ही फुलांची, वाट हळवी वेचताना सावर रे ए मना सावर रे सावर रे, सावर रे, एकदा सावर रे ।। सावल्या क्षणांचे, भरून आल्या घनांचे थेंब ओले झेलताना सावर रे ए मना सावर रे सावर रे सावर ...Read Moreएकदा सावर रे ।। गाणे गुण गुणत ती किचन मध्ये काम करत होती. नाजूकशी, सुंदर, चंचल, मृगनयनी. आवाजात गोडवा आणि चेहऱ्यावर आनंद. रोजच अशीच छान दिसायची पण आज तिच्या चेहऱ्यावर अलौकीक तेज दिसत होतं. आज जरा जास्तच खुश दिसत होती. तिची आई किचन बाहेरून तिला गुंनगूनताना पहात होती. आपल्या मुलीच्या चेहऱ्यावरील आनंदाने ती मनोमनी सुखावली होती. आई..."हम्म आज कोणी
मागील भागात, माईंच्या काळजात चर्रर्र झाले त्या काही बोलणार तर नितीन आणि सारिका लगेच बाजूला झाले. माईंनी भरल्या डोळ्यांनी समोर पाहिले तर त्यांच्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडला "यश…." "यश...."म्हणत माईंनी त्याला दारातच मिठी मारली आणि त्यांचे डोळे आपोआप ...Read Moreमुलाच्या येण्याने आनंदून बेधुंद वाहू लागले. यश ची अवस्था पण काहीशी तशीच होती. खूप मिस केलं होतं त्याने त्याच्या आईला. त्याचे ही डोळे पाणावले होते. मुलं कितीही मोठी झाली तरीही त्याना आईच्या कुशीत जे समाधान मिळतं ते कदाचित स्वर्गात पण नसावं. त्याने आईला मिठीत घेऊनच विचारले... "कशी आहेस तू आई?" माई… "मी बरी आहे रे आता तू आलास ना
जाई घरी येई पर्यंत एकदम शांत होती. घरी आल्यावर ती सरळ फ्रेश व्हायला गेली. तर नितीन आणि आई बाबा बाहेरच हॉल मध्ये बसून राहिले. सगळेच खूप अस्वस्थ दिसत होते. नितीन आईला म्हणाला,..."आई बाबा तुम्ही दोघेही जाई समोर असे हताश ...Read Moreनका, आपल्याला तिला सावरावे लागेल.जरी ती चेहऱ्यावर दाखवत नसली तरी तिची अवस्था माहीत आहे ना कशी असेल." आई पण भरल्या डोळ्यांनी बोलते…."हो रे मला तीच काळजी वाटते. एक तर ती कोणाकडे जास्त बोलत नाही आतल्या आत कुढत राहील. इतकं सगळं झालं तरी तिने डोळ्यात पाणी येऊ दिलं नाही." बाबा…."हो ना आपण कमजोर पडलो पण ती कठोर बनली." नितीन..."त्याच कठोर पणाची
तिने वळून पाहिले तर ती गाडी सरळ तिच्या दिशेने येत होती. अजून जवळ जवळ आता अगदी तिला धडक बसेल इतकी जवळ आणि आपल्या डोळ्यावर हात घेऊन ती जोरात किंचाळली…..."आ…...ई….." ...Read Moreती गाडी अगदी तिच्या जवळ येऊन थांबली. तिची ती अवस्था पाहून तो जोरात ओरडला… "जाई…" त्याचा आवाज ऐकून तिने डोळ्यावरचा हात बाजूला कडून समोर पाहिलं तर यश धावत तिच्या जवळ आला होता. तिने भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिले तिच्या तोंडून फक्त ......"यश " इतकेच बाहेर पडले. त्याला पाहून तिचा हुंदका वाढला होता. तो तिच्या जवळ आला, त्याला तिची अवस्था पाहून तिची खूप काळजी आणि काहीशी भीती पण वाटत होती. त्याला
पलीकडून येणारा आवाज ऐकून जाई स्तब्ध झाली. तिला विश्वसच बसत नव्हता. यश ने तिला कॉल केला होता. ती पुन्हा त्याच आवाजात हरवून गेली. *हॅलो, जाई…..? पलीकडून यश बोलत ...Read Moreपण जाईच्या तोंडून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. ती नुसतीच ऐकत होती. पुढे काही बोलावं हे तिला सुचतच नव्हतं. प्रेमाच असच असतं ना समोर आवाज जरी ऐकला तरी मन गुंतून जात. सगळ्या जगाचा विसर पडतो. सुख-दुःख संवेदना विसरून मन तल्लीन होऊन जाते. जाईच पण तसच झालं होतं. तो मात्र तसाच बोलत राहिला. हॅलो….हॅलो…..आवाज येतोय ना? जाई…. हॅलो… तू बोलत का नाहीस?....जाई आर यु देअर?.......
एलेना दिसतच होती इतकी सुंदर की तिच्या कडे नुसतं पहात रहावस वाटत होतं. एक तर तिचं सौंदर्य कातील होते. कमनिय बांधा त्यात तिचा पेहराव इंडोवेस्टर्न मग काय सोने पे सुहाना. यश तर यश पण जाईला पण तिचा हेवा वाटला. ...Read Moreयश साठी हीच योग्य आहे. असा विचार तिच्या मनात डोकावून गेला. मग नकळत तिने बाजूच्या आरश्यात स्वतःला पाहिले आणि एलेना सोबत तुलना करू लागली. जाईला मॉडर्न कपडे आणि डिझाईन चा खूप सुंदर सेन्स होता पण तिची आवड नेहमी साधी असायची, उलट एलेना होती. ती होतीच एखाद्या मॉडेल सारखी, मेंटेन आणि सुंदर.
सप्त सुरांची सुरमयी आरोळी देऊन पक्षांच्या किलबिलाटाने आणि सूर्याच्या किरणांचे चहू बाजूला तुषार फुलवत पहाटेने आपले डोळे थोडेसे किलकिले केले होते तोच एक आवाज आला, आई…... आई बिचारी ...Read Moreसकाळी पांढरे फुटायचा आधीच उठते हो, तिने आवाज ऐकून आश्चर्याने पाठी पाहिले तर नितीन चक्क सहा वाजता सकाळी उठून तयार होऊन तिला हाक देत होता. त्याला प्रतिउत्तर न देताच ती क्षणभर तशीच त्याच्या कडे पहात राहिली. त्याने पुन्हा तिला आवाज दिला, अग आई अशी पाहतेस काय, प्लिज चहा दे ना पटकन, मला उशीर होतोय. त्याची आई त्याच्या जवळ येत म्हणाली अरे रोज तुला
एखाद्या सिंहाच्या गर्जने सारखा भारदस्त आवाज पुन्हा गरजला, या बसा हितं. नितीन घाबरत पुढे सरकला आणि त्या भारदस्त आवाज असणाऱ्या व्यक्तीच्या पायांना स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले. क्षणभरासाठी ...Read Moreकडक व्यक्तित्वाच्या डोळ्यात चमक आली पण आपला आवाजातील दरारा त्यानी तसाच कायम ठेवला आणि म्हणाले, राधिका पाणी घेऊन या पावण्यास्नी. पुढे त्यानी नितीन सोबत आलेल्या व्यक्तीकडे एक रागीट कटाक्ष टाकला तर ती व्यक्ती खाली मान घालून लगबगीने वाड्याच्या आत निघून गेली. घाईतच आतून एक महिला पाणी घेऊन आली आणि नितीनला दिलं. त्याने प्याला भर पाणी घटाघट पिउन घेतलं आणि तो जवळच्या