दाटला हा संशय भीषण होता... - Novels
by Bhagyashree Parab
in
Marathi Women Focused
आध्या शिंदे ही कथेची नायिका , दिसायला खूप सुंदर टपोरे पाणीदार काळे डोळे , पोपटासारखे नाक , कंबरेपर्यंत काळेभोर केस... दिसायला इतकी सुंदर असली तरी तिला आपल्या सुंदरतेचा कधी माज नव्हता , तिचा स्वभाव पूर्ण साधा सरळ तिला तसचं ...Read Moreआवडायच कधीही ती कोणत्याही गोष्टीत मोठेपणा दाखवत नसे... तिचं राहणीमान ही साधं होत... ती आता पाचवीत शिकत होती... तिचं कुठुंब एक मध्यमवर्गीय होत कुठुंबात तिची आई कल्पना शिंदे गृहिणी , बाबा विश्वास शिंदे सरकारी नोकरीत ऑफिस मध्ये कामाला होते... तिचे बाबा तिच्या अभ्यासाविषयी खूपच कडक होते , कधी प्रेम तर कधी ती चुकल्यावर मात्र तिला तिच्या बाबांच्या रागाचा सामना करावा लागायच्या... ती कधी वाईट वागू नये म्हणून त्यांना तस रहावं लागयच... भाऊ कल्पेश शिंदे सहा वर्षाचा लहान पाहिलीत शिकायला होता , या भाऊ बहिणीच भांडण एकदा भांडले की कधी थांबायचे नाही... यांना सांभाळता सांभाळता कल्पना यांना नाकी नऊ यायचं...
" आई आले मी बघ कुठे आहेस तू "एक अकरा वर्षाची मुलगी शाळेतून आल्या आल्या आपल्या आईला आवाज देत होती...तिची आई " आध्या किती तो गोंगाट जरा शांत पणे आवाज देता नाही येत का..."आध्या " अग आई तुला माहीत ...Read Moreमला शाळेतून आल्या आल्या तू डोळ्यासमोर हवी असते..."आई " आता काय लग्न झाल्यावर पण मला डोळ्यासमोर ठेवणार आहेस का..."आध्या " काय ग आई मी अजून लहान आहे कशाला या छोट्याशा जीवाचा जीव घेतेस..."आई " काहीही नको बडबड करुस चल आता जेवायला वाढते..."आध्या " हो आलेच मी दहा मिनिटात फ्रेश होऊन..."( आध्या शिंदे ही कथेची नायिका , दिसायला खूप सुंदर टपोरे
आध्या आपल्या रूम मध्ये अभ्यास करत असते...तेवढ्यात तिला बाहेरून तिच्या बाबांचा आवाज येतो , ती उठून जातच असते की तिला आठवत पूर्ण अभ्यास झाल्या शिवाय उठायचं नाही असा बाबांचा नियम आहे...मग ती परत बसून अभ्यास पूर्ण करायला घेते...थोड्यावेळाने तिचा ...Read Moreपूर्ण होतो आणि ती सगळ आवरून बाहेर हॉल मध्ये येऊन बसते...तिचे बाबा टीव्ही बघत बसलेले असतात आध्या आलेली दिसताच त्यांनी टीव्ही बंद केली आणि आपला मोर्चा तिच्या कडे वळवला...विश्वास ( आध्या चे बाबा ) " अभ्यास झाला का ?..."आध्या हसून " हो बाबा झाल अभ्यास..."विश्वास " ठीक आहे मग दाखव अभ्यास आणि सोबत दैनंदिन पण दाखव..." ( आध्या च्या शाळेत
कल्पना रूम मध्ये येते आणि समोरचं दृश्य बघून घाबरून ओरडते...कल्पना " अहो... काय करताय वेडे आहात का तुम्ही..."विश्वास खिडकी बाहेर बघत आणि साईड ला भिंतीवर हाताच्या मुठी आवळून जोरजोरात मारत होते...इकडे कल्पना यांनी आवाज दिला तरी त्यांचं लक्ष नव्हत... ...Read Moreन राहवून कल्पना त्यांच्या जवळ आल्या आणि त्यांना थांबवून बेड वर बसवलं , सोबत त्याही त्यांच्या बाजूला जाऊन बसल्या...कल्पना त्यांचा हात बघत " अहो , काय करत होता तुम्ही अस कोण भिंतीवर मारत जोरजोरात हात बघा कसं झाल आहे ते..."विश्वास " मग काय करू मी आध्या ला ओरडाव वाटत नाही तरी ती अस काही करते मग मला राग येतो आणि
कल्पना रात्री उशिरा झोपल्याने सकाळी उशिरा उठतात... उशिर झाल्याने घाईगडबडीत नाष्टा बनवतात पण नाष्ट्यात पोह्यामध्ये मीठ नसत आणि घाईगडबडीत त्या विसरून जातात त्यांना वाटत की मीठ टाकलेलं आहे... किचन मधल सगळ आवरून त्या विश्वास आणि कल्पेश या दोघांना नाष्ट्यासाठी ...Read Moreथोड्यावळाने विश्वास आणि कल्पेश नाष्ट्यासाठी डायनिंग टेबलवर येऊन बसतात , कल्पना नाष्टा वाढतच असते की विश्वास त्यांना थांबवतात... विश्वास थंड आवाजात शांतपणे " आध्या कुठे आहे उठली नाही का अजून , वेळेचं भान आहे की नाही तिला..." त्यांचा असा धारधार शांत आवाज ऐकुन कल्पना दचकल्या , नंतर त्यांनी स्वताला सावरून त्यांच्याशी बोलू लागल्या... कल्पना " तुम्हीच काल रात्री तिला बंद
विश्वास आणि कल्पेश निघून गेल्यावर आध्या आणि कल्पना एकमेकांकडे बघत राहतात...कल्पना भानावर येत " मी आणते दुसरे पोहे बनवून..."आध्या " नकोय मला..."कल्पना " आध्या बाळा हे बघ बाबा आता रागात आहे , रागात बाबा काहीही बोलतात , काहीही करतात... ...Read Moreशांत झाल्यावर ते बोलतील नीट... आता खाऊन घे थोड रात्री काही खाल्ल नाही तू..."आध्या " आई अजुन किती खोटी आशा दाखवशील तू आणि खोट बोलून का स्वताला त्रासात आणत आहेस..."कल्पना ".........."आध्या " नाही आहे ना उत्तर तुझ्याकडे..."येवढं बोलून आध्या रडतच आपल्या रूम मध्ये निघून जाते... इथे कल्पना मटकन खाली खुर्चीवर बसतात , त्यांना रडू येत होत... रडावस वाटत होत त्यांना
त्या व्यक्तीच्या ओरडण्याने आध्या दचकते आणि समोर बघते तर तिच्या चेहऱ्यावर भीती आणि शॉक दोन्ही दिसत होते...कोणी उत्तर देत नाही म्हणून ती व्यक्ती आणखी रागात " मी म्हंटल काय चालू आहे... ( आध्या कडे बघत ) हा कोण आहे ...Read Moreविश्वास ना एवढ्या रागात बघून तिच्या तोंडून एकही शब्द निघत नव्हता...पण त्या मुलाला मध्येच डिस्टर्ब केलेलं बघून तोही त्यांना रागात बघत होता....तो मुलगा " तुम्हाला दिसत नाही का गर्लफ्रेंड शी बोलतोय ते कशाला मध्ये मध्ये येताय आमच्या..."आध्या त्याच्या अश्या बोलल्याने भलतीच शॉक झाली आणि तिच्या बाबांकडे बघू लागली जे की त्यांच्या चेहरा पूर्ण रागाने लाल झालेला , हाताच्या मुठी आवळल्या
आध्या ओरडत " बाबा..."कल्पना , आध्या , कल्पेश तिघेही त्यांच्याजवळ जातात...आध्या त्यांना हलवत " बाबा... बाबा... काय झालं..."कल्पना त्यांच्या गालावर थोपटत " अहो... उठा..."आध्या आईला " बाबांना हॉस्पिटल ला घेऊन जावं लागेल..."कल्पना " हो... हो..."बाबांना अस पडलेलं बघून कल्पेश ...Read Moreआपल्या बहिणीला " हे सगळ हिच्या मुळे झाल आहे... बघाव तेव्हा काही काही करत असते..."आपला भाऊ आपल्याशी असा वागतोय हे बघून आध्या ला वाईट वाटत...कल्पना रागात कल्पेश ला " कल्पेश शांत रहा इथे यांना काय झाल आणि तू बोलतो काय आहे.... यांना हॉस्पिटल न्याव लागेल लवकर..."ते लगेच विश्वास ना हॉस्पिटल मध्ये घेऊन जातात...तिथे जाऊन समजत की त्यांनी जास्त टेन्शन घेतल्याने
कल्पेश त्या व्यक्तीला गालावर एक हात ठेऊन बघत होता....ती व्यक्ती खूपच रागात " लाज नाही वाटत का अस बोलताना ती बहीण आहे ना तुझी... आम्ही हेच शिकवलं आहे का तुला की कोणाशी कस बोलायचं ते , तुझ्या बाबांना तुझी ...Read Moreदिसत नाही आहे हीची चूक दिसतेय... जास्त लाडावून ठेवलं आहे म्हणजे कसही वागशील का... आता आपल्या बहिणीशी अस वागतोय माहीत नाही पुढे जाऊन बाकीच्या मुलींशी कस वागशील... जर पुढे अस काही घडल ना तर तुझी आई तुला विसरून गेली अस समज... तिला साथ देण्याच सोडून हे असल काही बोलतोयस , ज्यामुळे तिला आणखी त्रास होईल... "कल्पना विश्वास ना भेटून बाहेर
आध्या आणि कल्पना घाबरून एकमेकांकडे बघत राहतात...आध्या घाबरत " आई आता काय करायचं...."कल्पना " उचलावच लागेल ना आता , नाही तर काही खर नाही मग..."आध्या " हो... उचल स्पीकर वर ठेव..."कल्पना उचलायला जाणार फोन वाजून बंद झाला तेवढ्यात... मग ...Read Moreसेकंदाने परत फोन वाजला मग त्यांनी लगेच उचलून स्पीकर वर ठेवला...फोनवरील व्यक्ती कल्पना ने फोन उचलल्या " इतका वेळ लागतो का फोन उचलायला , डोकं आहे की नाही बाबा फोन आला आहे पटकन उचलाव..."कल्पना अडखळत " सॉरी... सॉरी आई..."( गीता शिंदे या विश्वास यांच्या आई यांचा स्वभाव एकदम खडूस सारखं , आध्या पहिली मुलगी झाली म्हणून यांना खटकत होतं... नेहमी
आध्या तोंडावर हात ठेवून रडत असते....आध्या अशी रडत असताना तिथे बाजूच्या बाकावर बसलेली एक आजी तिच्या बाजूला जवळ येऊन बसते आणि मायेने आध्या च्या डोक्यावरून हात फिरवते...ती आजी प्रेमाने आध्या ला " बाळा काय झाल रडत का आहेस... "तिच्या ...Read Moreकोणी तरी आलेलं पाहून ती लगेच स्वताला सावरत डोळे पुसत त्यांना बघते , त्या आजी प्रेमाने तिला बघत होत्या , त्यांचा प्रेमळ आवाजात माया लपलेली होती... आध्या ने कधी आजीच प्रेम अनुभवलं नव्हत आजोबा तर ती यायच्या आधीच वर निघून गेले होते... ती आज पहिल्यांदा आजीच प्रेम अनुभवत होती...आध्या त्यांना बघत " काही नाही आजी ते बाबांना बर वाटत नाही
कल्पना आणि आध्या समोरच्या व्यक्तीला बघून आवंढा गिळतात...समोरील व्यक्ती त्या दोघींना बघून रागाने धुसपुसत असते...आध्या मनात " आध्या बेटा आता आपल काही खर नाही हे ज्वालामुखी लवकर शांत नाही होणार अस दिसत आहे... चला आध्या बाळा तयारी करा मनाची ...Read Moreकरण्याची...."आध्या हळू आवाजात कल्पना ला " आई भूत सोडून गेलं वाटत यांना..."तिच बोलण ऐकून कल्पना तिला रागात बघत हळू आवाजात " आध्या शांत बस..."आईला अस रागात बघून आध्या शांत बसते...यांची खुसुरपुसुर चाललेली बघून रागात समोरची व्यक्ती " काय खुसूरपुसुर चाललीय मयलेकीची..."त्यांच्या आवाजाने त्या दोघी दचकतात....कल्पना शब्दांची जुळवाजुळव करून " काही नाही आई.... तुम्ही अस अचानक आलात आम्हाला सांगायचं होत लवकर
आध्या बाहेर येऊन डायनिंग टेबलवर आई च्या बाजूला जाऊन बसते....कल्पना " आध्या मगाशी जे आजीला बोललीस ते चुकीचं होत बाळा त्या मोठ्या आहेत तुझ्यापेक्षा , त्या कितीही काहीही बोलू दे आपण जास्त लक्ष नाही द्यायचं..."आध्या " आई प्लीज मला ...Read Moreकाही बोलायचं नाही आहे , त्या तुझ्याबद्दल काय काय बोलत होत्या मी अस गप्प बसू का... बाबांना तरी माहीत आहे का याबद्दल , आजींनी तर बाबांना प्रेमाने बोलून बोलून आपल्यात तिरस्कार निर्माण केले आहेत... बाबांसमोर तर ती लाडीगोडी लावत असते आणि पाठीमागून तर हे अस , आजी वागते ते किती चुकीचं आहे हे नाही समजत का आजीला..."कल्पना " बाळा अस
सकाळी आध्या उठून फ्रेश होऊन नाष्ट्या साठी बाहेर आली....डायनिंग टेबल कडे जातच होती की आत्या ने तिला मध्येच अडवल....आत्या " आल्या बघा महाराणी नटून तटून...."( जशी आई तशी मुलगी यांचा स्वभाव गीता सारखाच... स्वताला स्मार्ट समजणे हे यांचे विचार....)आध्या ...Read Moreपाडत मनात " यांना काय झाल मध्येच भुताने झपाटले तर नाही ना..."आध्या " ह... आत्या तुम्हाला कदाचित चष्मा लागला आहे , एकदा डोळे तपासून घ्या...."तिच्या अश्या बोलण्याने आत्याला ला खूप राग आला....आत्या रागात " मला बोलतेय मला या... या... अंजली ला..."आध्या " हो तुम्हाला च बोलतेय एक काम करा आत्या डोळ्यासोबत कान पण तपासा..."आत्या " तोंड सांभाळून बोल समजल नाही
शाळा सुटल्यावर आध्या सरळ घरी येते आणि जेवून वैगरे लगेच अभ्यासाला बसते....संध्याकाळ पर्यंत आध्या चा अभ्यास पूर्ण होतो आणि ती रूमच्या बाहेर येते , बघते तर बाबांच्या आवाजाने तिला समजत की बाबा आले आहेत.... आध्या खुश तर होते तिच्या ...Read Moreतिच तोंड बघायचं नसत म्हणून ती नाराज होऊन किचन मध्ये जात असते तर मध्येच काहीतरी आठवत थांबते....तिला आठवत की आत्या ची माफी मागायची आहे....आध्या लगेच आत्याच्या रूम च्या दिशेने जाते ती दार परमिशन घेण्यासाठी दार वाजवायला हात पुढे करणार तेवढ्यात दार उघडलं जात , ती हळु मान वर करून बघते तर समोर तिचे बाबा रागात तिला बघत उभे होते....विश्वास तिला
दुसऱ्या दिवशी....सगळे नाष्टा करून आपापल्या कामाला निघून जातात...काल तिच्या बाबांनी बोलल्या प्रमाणे आध्या ला विश्वास सोडायला येतात...रिक्षात...आध्या हिम्मतीने " ब... बाबा माझी चूक काय आहे ते तरी सांगा , मलाच माहीत नाही मी कोणती चूक केली ती... तुम्ही सांगाल ...Read Moreती चूक सुधरवायच प्रयत्न करेन प्लीज सांगा... हवं तर मी माफी मागते हात जोडून , मला दुसरी शिक्षा द्या पण मैत्रिणी पासून दूर नका करू प्लीज..."विश्वास " गप्प एकदम गप्प बसायचं समजल एकही शब्द तोंडातून काढायचं नाही... चुका सुधारशील , तू जी चूक केली आहे ती माफी मागायच्या लयकीचीच नाही आणि माफ करायच्या लायक पण नाही.... माफी मागून गेलेले शब्द
आध्या ती बुक वाचायला सुरुवात करते..." प्रिय आध्या उर्फ माझी जान , विचित्र वाटत असेल ना अशी चिठ्ठी वैगरे , काय करणार मजबूरी आहे... तुझ्या बाबांना समजल तर तुला घरातूनच काढतील , म्हणून माझं चिठ्ठी वैगरे लीहण्याच डोक चाललं... ...Read Moreसांग हा कशी वाटली आयडिया ( आध्या मनात " एकदम झकास शेवटी माझी च बहीण तू , किती ती माझी काळजी... लव्ह यू पल्ले...) तू जेव्हा या शाळेत पहिल्यांदा आलेली दुसरीत होतो बघ , तेव्हा तुझ्या कडे बघून अस वाटायच की आपण खूप वर्षांपासून ओळखत आहोत , आपण अगोदर च ओळखत आहोत असच वाटायचं अगदी... मग आपली मैत्री झाली हळूहळू
पल्लवी च घर... पल्लवी च नुकतच अभ्यास झाला होता , ती आपल्या रूम मध्ये बसून आध्या ने लिहिलेलं पत्र वाचत होती... प्रिय पल्लवी उर्फ माझी पल्ली , आता पल्ली म्हणले तर रागावू नको , तुझ ...Read Moreप्रेम आहे ना माझ्यावर मग ज्याच्यावर प्रेम असत त्यांच्यावर रागवायच नाही ( अस लिहिलेले बघून पल्लवी च्या चेहऱ्यावर गोड हसू पसरलं ती स्वतःशी " नौटंकी बट स्वीट ") बाकी हे बुक पत्र लिहण्याची आयडिया छान आहे , मग आमच्या पल्ली राणीची प्रगती झाली म्हणायची आमच्या सोबत राहून राहून ( पल्लवी " वेडी...") तर मी एवढच लिहेन की मला फक्त बाबांना
आध्या सुशीला आजीला घट्ट मिठी मारून रडत होती आणि आजी तिला शांत करत होत्या....सुशीला आजी " बाळा रडू नको अशी रडताना छान नाही वाटत तू...तुला काहीही अडचण असेल तर मला बिंदास्त सांग माहीत आहे की आता फोन वर नाही ...Read Moreशकत पण पल्लवी ला सांग मग ती मला सांगेल..."आध्या स्वताला शांत करत " हो..."सुशीला आजी " शहाणं माझं बाळ ते.... आणि ( त्यांच्या सोबत आलेल्या व्यक्तीला बघत...) हा माझा नातू शिव..."पल्लवी " अरे शिव तू... आजी आम्ही तिघ तर एकाच वर्गात शिकतो आम्हाला माहीत नव्हत की तुम्ही याच्या आजी आहात..."सुशीला आजी " अरे वा मग तर चांगलच आहे... "आध्या आणि
या दोघी समोर येऊन उभ्या आणि त्याला डिस्टर्ब केलं त्यामुळे त्याला खूपच राग आला होता....तो रागात काही बोलणार तेवढ्यात आध्या मध्ये बोलली " अरे थांब मला ओळखल नाही का , मी कधीपासून वाट बघत होती पण तू आलाच नाही ...Read Moreवाट बघितली...त्यादिवशी बोलला होतास की उद्या भेटू मी आलेले पण तू आलाच नाही , मी तर रोज यायचे पण तू दिसायचा च नाही... "तिच्या बोलण्याने तो मुलगा पिघळला होता...तो प्रेमळ आवाजात " सॉरी तुला माझी वाट बघावी मला माहितीच नव्हत तू माझी वाट बघत होती ते , काय आहे ना मी अभ्यासात खूप बिझी होतो ना... ( आध्या मनात :
ती मुलगी " आलास किती वेळ इथे तुझी बायको वाट बघून थकली..." तो मुलगा " माझी बायको वाट बघत होती माझी , अरे वा म्हणजे आमच्या कडे लक्ष आहे म्हणायचं नाही तर कधी लक्ष च नसत... बिचारा मी किती ...Read Moreकरायचं..." मुलगी त्याच्या हातावर फटका मारत " शिव गप रे काहीही काय बोलतो आहे म्हणे लक्ष नाही आमच्या कडे , तू फ्री तरी असतो का कधी आज रविवार आहे तर इथे बायकोला टाईम देण्याऐवजी ऑफिस ची काम करत बसला आहेस.... तूही बाबांसारख करणार का आता , जस बाबांनी आधी प्रेम केलं आणि नंतर...." शिव तिला आपल्या कडे वळवून ओठांवर बोट