काळ रात्र होता होता... - Novels
by Subhash Mandale
in
Marathi Novel Episodes
पावसाळ्याचे दिवस होते. संध्याकाळची वेळ होती. धोधो पाऊस पडून गेला होता, तरीही पावसाची बारीक संततधार सुरूच होती.
आज रोजच्या पेक्षा थोडं लवकरच काम उरकले होते. निदान आज तरी घरी लवकर पोहोचू या खूशीत अॉफिसमधून बाहेर पडलो, पण रस्त्यावर वाहनांची हू ...Read Moreगर्दी दाटलेली. रात्रीचं लुकलुकणाऱ्या काजव्यांचे मोहोळ नजरेसमोर घोंघावत रहावं, तसं वाहनांच्या लाईटच्या उजेडात आभाळातून पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे बारीक तुषार चमकून डोळे दिपवून टाकत होते.
घरी लवकर पोहोचण्याच्या उत्साहावर पावसाने पाणी फिरवले होतेच, पण वाहनांच्या दाट गर्दीतून वाट काढत पुढे पुढे सरकत राहणे तेवढेच आपल्या हातात होते.
दिवसभर कमी अधिक पाऊस पडतच होता, त्यामुळे हवेत कमालीचा गारठा पसरलेला होता. अंगात अगदी कमी वेळात थंडी संचारली होती. गावाकडे लोक जसं 'शिवकळा येण्यासारखी थंडी आहे' असे म्हणतात, तशी बोचरी थंडी होती. अशा थंडीत दातांचं थडथडणं काही केल्या थांबत नव्हते.
त्या दिवशी रोज ठरलेल्या वेळेपेक्षा कित्ती तरी उशिराने घरी पोहोचलो. या जास्तीच्या वेळात घरापर्यंत पोहचण्यासाठी जी धडपड करावी लागली; ती केरात उलट्या पडलेल्या झुरळासारखी होती. जेवढी धडपड करावी तेवढी थोडीच.
काळरात्र होता होता... १. पावसाळ्याचे दिवस होते. संध्याकाळची वेळ होती. धोधो पाऊस पडून गेला होता, तरीही पावसाची बारीक संततधार सुरूच होती. आज रोजच्या पेक्षा थोडं लवकरच काम उरकले होते. निदान आज तरी घरी लवकर पोहोचू या खूशीत अॉफिसमधून बाहेर ...Read Moreपण रस्त्यावर वाहनांची हू म्हणून गर्दी दाटलेली. रात्रीचं लुकलुकणाऱ्या काजव्यांचे मोहोळ नजरेसमोर घोंघावत रहावं, तसं वाहनांच्या लाईटच्या उजेडात आभाळातून पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे बारीक तुषार चमकून डोळे दिपवून टाकत होते. घरी लवकर पोहोचण्याच्या उत्साहावर पावसाने पाणी फिरवले होतेच, पण वाहनांच्या दाट गर्दीतून वाट काढत पुढे पुढे सरकत राहणे तेवढेच आपल्या हातात होते. दिवसभर कमी अधिक पाऊस पडतच होता, त्यामुळे हवेत कमालीचा
काळरात्र होता होता... २.आज मला तो अगदी खूप जवळचा मित्र असल्यासारखं समजून आपल्या दुःखाची झोळी पुर्णपणे उलटी करत होता. आपल्या मनात इतके दिवस साठलेलं दुःख झाडून झाडून खाली करत होता." गणेश तुझं सगळं म्हणणं बरोबर आहे, पण यात मी ...Read Moreकरू शकतो?"कितीतरी वेळ गणेशच्या कंठात धडका मारत असलेल्या हुंदक्याचा अखेर बांध फुटला, म्हणाला,"अरे, ती आत्महत्या करायला गेलीय."'आत्महत्या' हा एकच शब्द ऐकला, अन् अंगावर सर्रकन काटा उभा राहिला. माझ्या तोंडातून आपसूकच शब्द निघाला,"आत्महत्या?!..." " हो, आत्महत्या... आत्ताच ती आतल्या खोलीत गेलीय न् आतून दरवाजा बंद करून घेतलाय. मी तर खूप घाबरलोय. सगळं सुचवायचं बंद झालंय." , घाबऱ्याघुबऱ्या झालेल्या गणेशला बोलणं उरकेनासं
काळरात्र होता होता... ३. अपेक्षेप्रमाणे, त्यांनी मनात खोलवर साचलेलं आपलं दुःख उघडं करत त्याला वाट करून द्यायला सुरुवात केली, "आजपर्यंत कुठलीही गोष्ट माझ्या मनासारखी घडली नाही. कदाचित मला मिळालेला जन्मही मला नकोसा होता. म्हणूनच की काय, माझ्या जन्माच्या वेळी ...Read Moreआई मला कायमची सोडून गेली. लहानपणी आईच्या मायेचं सुख कधी अनुभवायला मिळालेच नाही. तारुण्यात असताना एक जीवलग वाटावा असा मित्र भेटला, ज्याच्यावर आपलं सगळं जीवनच अर्पण करावं असं वाटलं, पण त्याचं जगणं म्हणजे 'लिहिणं' होतं. एकदा, त्याला मी म्हणाले, " कथा, कविता लिहिण्याचा छंद पाळणं, म्हणजे भिकेचे डोहाळे लागण्यासारखे आहे. अशा कथा आपल्या जीवनावर जातात. आजपर्यंत कुठल्या लेखकाचं जीवन सुखात