Kavale book and story is written by Sane Guruji in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Kavale is also popular in Short Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
कावळे - Novels
by Sane Guruji
in
Marathi Short Stories
मला कावळा लहानपणी फार आवडे. त्याचा तो काळा कुळकुळीत रंग, त्याचा तो मोठा काऽ काऽ आवाज, त्याच्या पंखांचे फडफडणे, त्याच्या वाकुल्या-मला सारे आवडे. आईच्या कडेवर बसून मी त्याला कितीतरी वेळा पाहावयाचा. लहाणपणी, विशेषत: मला, जेवताना आई अंगणात घेऊन यायची. तिच्या हातात घास असायचा व भरवताना ती मला म्हणायची, “हा घे हां, हा काऊचा, हा चिऊचा, तो बघ काऊ. येरे येरे काऊ, माझा बाळ घास खाऊ.” आणि मग घास घ्यायचा. मी राजा. आईच्या कडेवर बसून असा एक एक घास मी खेळत खेळत, चिमण्या-कावळे बघत बघत घ्यायचा. मध्येच कावळा उडून जाई. “गेला काऊ. घे रे एवढा घास, घे हो.” असे आई म्हणायची. आजूबाजूस कावळा दिसल्याशिवाय मी जेवायचा नाही. मी जरा मोठा झाल्यावर त्याला भाकरी फेकायचा व तो धिटुकला ती घ्यायचा. एक दिवस तर मी अंगणात भाकर घेऊन बसलो होतो,
मला कावळा लहानपणी फार आवडे. त्याचा तो काळा कुळकुळीत रंग, त्याचा तो मोठा काऽ काऽ आवाज, त्याच्या पंखांचे फडफडणे, त्याच्या वाकुल्या-मला सारे आवडे. आईच्या कडेवर बसून मी त्याला कितीतरी वेळा पाहावयाचा. लहाणपणी, विशेषत: मला, जेवताना आई अंगणात घेऊन ...Read Moreतिच्या हातात घास असायचा व भरवताना ती मला म्हणायची, “हा घे हां, हा काऊचा, हा चिऊचा, तो बघ काऊ. येरे येरे काऊ, माझा बाळ घास खाऊ.” आणि मग घास घ्यायचा. मी राजा. आईच्या कडेवर बसून असा एक एक घास मी खेळत खेळत, चिमण्या-कावळे बघत बघत घ्यायचा. मध्येच कावळा उडून जाई. “गेला काऊ. घे रे एवढा घास, घे हो.” असे आई म्हणायची. आजूबाजूस कावळा दिसल्याशिवाय मी जेवायचा नाही. मी जरा मोठा झाल्यावर त्याला भाकरी फेकायचा व तो धिटुकला ती घ्यायचा. एक दिवस तर मी अंगणात भाकर घेऊन बसलो होतो,
मी एका शेतात गेलो. दुपारची वेळ होती. मी माझी भाकर घेऊनच शेतात गेलो. मी झाडाखाली भाकर खात बसलो. आधी चारी दिशांना मी भाकरीचे तुकडे फेकले. फेकले नाही, अर्पण केले! आजूबाजूला किड्या-मुंग्या असतील. अदृश्य योनीही असतील त्यांना नको का थोडेसे ...Read Moreएकटे खाणे हे पाप. प्राचीन काळापासून वेद ओरडून सांगत आहे. ‘केवलाघो भवती कैवलादि’ –‘जो केवळ एकटयाने खाईल तो पापरूप होईल.’ परंतु आज ऐकतो कोण? कावळे, चिमण्या, किडा-मुंगी, मांजर, कुत्रे यांनाही आपण जेवताना घास देणे हे तर दूरच राहिले परंतु शेजारी भाऊ उपाशी असेल, घरातील गडीमाणसे उपाशी असतील इकडे तरी आपले लक्ष कोठे असते? थोर हिंदी संस्कृतीचे स्वरूप अजून आपल्या गळी उतरतच नाही. आपण सारे उदरंभर. आपलेच पोट भरणारे झालो आहोत.
“आलास का कावळोबा, केव्हापासून मी तुझी वाटच पाहत होतो. आम्हा माणसांबद्दल तुम्हा पशुपक्ष्यांना काय वाटते, ते मला समजून घ्यायचे आहे. कावळ्यांची प्रचंड सभा भरवायचे ठरले म्हणून मागच्या वेळी तू सांगितले होतेस.” मी विषयाला एकदम हात घालण्याच्या हेतूने दुस-या दिवशी ...Read Moreकावळ्याला बोलावून म्हणालो.
अध्यक्ष व इतर पाच असे सहाजण ईश्वराकडे निघाले. शिष्टमंडळात तरुणालाही घेतले. कावळ्यांची व यमाची मैत्री. पितरांच्या मध्यस्थीने, मृतात्म्यांच्या वशिल्याने कावळे यमदेवापर्यंत जाऊन पोचले. “आम्हांला त्या राजाधिराजाकडे, जगदीश्वराकडे घेऊन चल.” अशी अध्यक्षांनी यमराजाला विनंती केली व ती त्याने मान्य केली.
यमराज, त्याचा महिष आणि हे कावळ्यांचे शिष्टमंडळ देवलोकात येऊन दाखल झाले. तो त्यांना कोलाहल व आरडाओरडा ऐकू आला. मानवांची अफाट गर्दी दिसू लागली. ईश्वराचे दूत त्यांना भराभर खाली लोटत होते. तो पहा एक गयावया करीत आहे. “अहो माझ्या मालकीच्या ...Read Moreगिरण्या आहेत. हजारोंना मी पोटास दिले. मला घ्या आत.”