chandani ratra book and story is written by Niranjan Pranesh Kulkarni in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. chandani ratra is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
चांदणी रात्र - Novels
by Niranjan Pranesh Kulkarni
in
Marathi Love Stories
राजेशला सकाळी जाग आली तेव्हा त्याला फार आश्चर्य वाटलं. कारण तो त्याच्या घरी बेडवर नव्हता तर स्वारगेट बसस्थानकाच्या एका बाकावर होता. ‘यावेळी आपण इथे कसे आणि का झोपलो होतो?’ राजेशला प्रश्ण पडला. तो बाकावरून उठला. त्याने खिशाला हात लावला पण खिशात पाकिट नव्हतं. मोबाईल सुद्धा नव्हता. खिशात फक्त एक शंभराची नोट होती. राजेश बसने घरी पोहोचला. त्याच्याकडे घराची चावीसुद्धा नव्हती. पण दारात ठेवलेल्या झाडाच्या कुंडीखाली ठेवलेल्या जादाच्या चावीने राजेशने दरवाजा उघडला. राजेशचं डोकं फार दुखत होतं. त्यामुळे तो कॉलेजलाही गेला नाही. कीतीही विचार केला तरी कोडं सुटत नव्हतं. ‘आपल्याला कोणी किडनॅप तर केलं नसेल ना?’ राजेशच्या मनात विचार येऊन गेला.
राजेशला सकाळी जाग आली तेव्हा त्याला फार आश्चर्य वाटलं. कारण तो त्याच्या घरी बेडवर नव्हता तर स्वारगेट बसस्थानकाच्या एका बाकावर होता. ‘यावेळी आपण इथे कसे आणि का झोपलो होतो?’ राजेशला प्रश्ण पडला. तो बाकावरून उठला. त्याने खिशाला हात लावला ...Read Moreखिशात पाकिट नव्हतं. मोबाईल सुद्धा नव्हता. खिशात फक्त एक शंभराची नोट होती. राजेश बसने घरी पोहोचला. त्याच्याकडे घराची चावीसुद्धा नव्हती. पण दारात ठेवलेल्या झाडाच्या कुंडीखाली ठेवलेल्या जादाच्या चावीने राजेशने दरवाजा उघडला. राजेशचं डोकं फार दुखत होतं. त्यामुळे तो कॉलेजलाही गेला नाही. कीतीही विचार केला तरी कोडं सुटत नव्हतं. ‘आपल्याला कोणी किडनॅप तर केलं नसेल ना?’ राजेशच्या मनात विचार येऊन गेला.
सकाळी आठ वाजता राजेश स्वारगेटला पोहोचला. ऑटोने तो घरी आला. दरवाजाला कुलूप नव्हतं म्हणजेच रवी परत आला होता. राजेशने बेल वाजवली पण दरवाजा उघडला नाही. त्याने पुन्हा बेल वाजवली पण पुन्हा तेच. तिसऱ्या बेलनंतर मात्र दरवाजा उघडला. समोर रवी ...Read Moreचोळत उभा होता. त्याच्याकडे पाहूनच कळत होतं की त्याची झोपमोड झाली आहे. “अरे राजेश! काय माणूस आहेस राव तू. तुला एवढे फोन केले तर तुझा फोन स्वीच ऑफ. अन एक फोन करता येत नाही होयरे तुला. मला वाटलं काय गचकला की काय हा.” एवढे बोलून रवी मोठयाने हसू लागला. “मला आत तर येउदे पहिलं. सांगतो की सगळं.” राजेश रवीला म्हणाला
राजेशला मात्र एका वेगळ्याच विचाराने ग्रासलं होतं. आज वर्गांत आलेल्या त्या नवीन मुलीबद्दल त्याला एक प्रकारचं कुतूहल वाटत होतं. अजून तो वृषालीला भेटलाही नव्हता पण तिला पाहताच त्याच्या मनात नक्कीच काहीतरी वेगळी भावना जागी झाली होती. हे प्रेम होतं ...Read Moreहे त्यालाही कळात नव्हतं. पण ज्या व्यक्तीला आज आपण पहिल्यांदाच पाहिलं, जिच्याशी आपली अजून नीट ओळख देखील नाही तिच्याबद्दल आपल्या मनात प्रेमभावना कशा निर्माण होतील? याविषयी संदीपशी बोलावं असही राजेशला वाटलं पण संदीपला प्रेमाबद्दल विचारणं म्हणजे एखाद्या भिकाऱ्याला श्रीमंतीविषयी विचारण्यासारखं होतं. आणि त्याने संदीपला विचारलं जरी असतं तरी त्याने “कशाला असल्या भानगडीत पडतोस अभ्यासात लक्ष दे” असा रुक्ष सल्ला दिला
बरोबर नऊ वाजता राजेश घरातून बाहेर पडला. थोड्याच वेळात तो संदीपच्या घरापाशी पोहोचला. आज मात्र राजेशला थोडा वेळ थांबायला लागलं. काही वेळाने संदीप घाईघाईतच घरातून बाहेर आला व गाडीवर बसला. गाडी चालवत असताना आज कॉलेजात वृषाली परत दिसेल या ...Read Moreराजेश सुखावला. “सहस्त्रबुद्धे सरांनी दिलेला होमवर्क झाला का?” संदीपच्या प्रश्नाने राजेश भानावर आला. वृषालीच्या नादात आज पहिल्यांदा राजेश होमवर्क करायला विसरला होता. राजेशच्या उत्तराची वाट न पाहताच संदीप सांगू लागला, “अरे काल आईची तब्येत अचानक बिघडली. बाबा पण घरात नव्हते. त्यांना ऑफिसमध्ये काम होतं. त्यामुळे मलाच तिच्याबरोबर दवाखान्यात जावं लागलं. काल काहीच आभ्यास झाला नाही. मग सकाळी उठुनच सगळा होमवर्क
आज रविवार होता. राजेशचा गावातला मित्र गणेश आज पुण्यात आला होता. त्याला कपडे खरेदी करायचे होते. त्यामुळे राजेशचा पूर्ण दिवस गणेशबरोबर फिरण्यातच गेला. गणेश रात्री राजेशच्याच फ्लॅटवर राहिला व सकाळी लवकर घराबाहेर पडला. राजेशनेच त्याला स्वारगेटला सोडलं. पण त्यामुळे ...Read Moreत्याला बर्वे उद्यानात जाता नाही आलं. त्यामुळे राजेशला आज फार चुकल्यासारखं वाटत होतं. व्यायाम करायचा राहिल्यामुळे नव्हे तर एका वेगळ्याच कारणामुळे तो थोडा मलूल झाला होता. घरी परत येताच राजेशने झटपट आवरलं व नेहमीप्रमाणे तो संदीपच्या घरासमोर येऊन थांबला. संदीप व राजेश कॉलेजला पोहोचले. पहिल्या तासाची बेल वाजली व जाधव सर वर्गात आले. राजेशने आजूबाजूला पाहिलं. वृषाली कुठेच दिसत नव्हती. मुलांची