Hey, I am reading on Matrubharti!

सांग हे निर्मिका।

सांग हे निर्मिका का असे केले तू?
लिहून भाग्य माझे का मिटवले तू?
करशील असे काही नव्हते कधीच वाटले
तू हसशील मजवर नव्हते कधीच वाटले

जाणतो तुझी माया आहे मजवर
उगीच का नाव तुझे घेतो आम्ही भुवर
निसर्ग नटवून दिला आम्हा दान तू
तरी तक्रारीचा केला आमच्या सन्मान तू

मीच नाही दुनिया सारी मानते तुला
निर्मिका खेळ हा तुझाच वाटे मला
आणखी सांगू तुला काय मला वाटते
आम्हाला सोडून तुलाही, नाही करमत वाटते

मला सांग एक , का आम्हा निर्मिले तू?
निर्मिले जरी , मग पुन्हा संपविले का तू?
होतोे तूला जर प्रिय आम्ही तुझ्यापरी
तर मुत्यू आम्हास सांग का बरे दिला तू?

प्रश्न हा सारखा पडतो मला निर्मिका
खरेच सारे आम्ही, तुझीच लेकरं का?
दिले बरेच काही न मागता आम्हास तू
लेकरांना आपल्या सांग दुःख का दिले तू

Read More