Author Sangieta Devkar.Print Media Writer

Author Sangieta Devkar.Print Media Writer Matrubharti Verified

@san.devkar74gmail.com4553

(61)

50

106.9k

205.3k

About You

Sangieta Devkar .print /media writer.free lancer writer for pimpri chinchwad sakal news paper. shortfilm director @Amit Brand Communications

तुझ्या नजरेतून

तुझ्या नजरेतून माझं आयुष्य,
मी अनेक रंगात रंगवले होते.
मी झालो होतो फक्त तुझाच,
सारे जग मज अनोळखी होते.
श्वास तूच आणि स्पंदन ही तू,
वेड्या माझ्या जीवाला वेड तुझेच होते.
तप्त त्या उन्हा मध्ये सावली होती तू,
कोसळणाऱ्या पावसात रूप तुझेच होते.
तुझ्याच तर शब्दांना मी माझ्या,
कवितेत कायमचे जपून ठेवले होते.
ना समजली तुला कधी प्रीत माझी,
गायले जे मी गीत,सुर तुझेच तर होते.
नव्हताच अर्थ कशाला,
उगाचच जगणं माझे ओझे होते.
तुझ्या नजरेतून माझे आयुष्य,
पुन्हा एकदा उध्वस्त झाले होते.

समाप्त.

Read More

गणित

आयुष्याचे गणित मला कधी जमलेच नाही.
नजरेत तुझ्या डोकावून पाहिले, शून्या शिवाय तिथे काही दिसले नाही.

-Sangieta Devkar

Read More

तिचं स्वातंत्र्य

एक हुंदका दाबलेला...त्या बंद दाराआड

एक मुक रुंदन ......त्या बंद दाराआड

एक स्वप्न विखुरलेले......त्या बंद दाराआड..

एक मन कोमजलेले.....त्या बंद दाराआड..

एक कळी कुसकरलेली......त्या बंद दाराआड..

वर्षा नु वर्ष तिचे स्वातंत्र्य

कैद आहे......त्या बंद दाराआड

चित्र आता हे बदलते आहे .ती जागी होत आहे.
संसार रथाची चाके दोन, पती आणि पत्नी.

पुरुष प्रधान संस्कृतीत तिला मानले गेले गौण.

चूल आणि मुल सांभाळ, तेवढीच तुझी अक्कल.

तुला काही कळत नाही,तेव्हा रहा तू बनून गुलाम.

समानतेचा शिक्षणाचा , संविधानाने दिला सुंदर हक्क.

तिचा लढा लढण्या साठी आता आहे ती सज्ज.

उच्च शिक्षण आणि हुशारी ने गाजवले तिने राष्ट्रपती पद.

नका समजू तिला लाचार आणि असह्य.

संविधानाने दिले आहे तिला मनमोकळे जगण्याचे स्वातंत्र्य.

समाप्त

Read More

" कौन से लब्ज में ,मै अपना दर्द बया करू?" " ना तुम् समझ पाओगे ,ना मै कह सकू।"ये इशक भी क्या कमाल की चीज है ,यारो... तुम बिन जी ना सकू मर भी ना सकू।"

-Sangieta Devkar

Read More

My shortfilm on YouTube..watch and subscribe my channel 👍
story based on live in relationship!

https://youtu.be/gBDh0n9L8c0

जुन्या चालीरीती,रीती परंपरा यांना छेद देऊया. चला वेगळ्या पद्धतीने होळी साजरी करूया.
"भूक" शॉर्टफिल्म
कथा/ पटकथा / मांडणी/ संकल्पना/ दिग्दर्शन --संगीता देवकर.

Read More
epost thumb

इतने भी ना समझ नही है हम।
बिन मौसम के बारीश में भिगते नही है हम।

-Sangieta Devkar

" A Thursday" च्या निमित्ताने!! (महिला दिन विशेष)

अलीकडेच एक सुंदर सिनेमा बघण्यात आला त्याच नाव "A Thursday"! आपली समाज व्यवस्था आणि शासन यांच मार्मिक चित्रण या सिनेमात आहे. शाळेत जाणारी 15 /16 वर्षाची मुलगी नैना तिच्या वर स्कुल बस मध्ये बस चा वाहक आणि चालक दोघे मिळून बलात्कार करतात. पोलीस कम्प्लेन्ट केली जाते पण नेहमी सारखेच त्या मुलीच्या पदरात निराशाच पडते. तिची आई आणि ती न्याय मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करतात पण रिझल्ट शून्य! पुढे जाऊन ती मुलगी आपल्या वर झालेल्या अन्याया विरुद्ध आवाज उठवते . सोशल मीडिया च्या आधारे पोलीस यंत्रणा आणि सरकारला ही वेठीस धरते. अक्षरशः देशाच्या पंतप्रधाना ना भेटण्याची ती मागणी करते आणि लहान वयात तिच्या वर झालेल्या त्या अत्याचारा साठी न्याय मागते. ही झाली सिनेमाची कथा तिथे काय अशक्य गोष्टी सुद्धा शक्य झाल्या अस दाखवले जाते पण स्त्री अत्याचाराच्या घटना आज ही आपल्याकडे त्याच आहेत त्यात बदल झाला आहे का?
सिनेमा बघून असा प्रश्न पडतो की मुलीला कस आणि किती सुरक्षित ठेवायचे? तिला शाळेत कॉलेज ला तर जावे लागते , तिला सेक्युरीटी म्हणून मग आपण तिच्या मागे जायचे का ? स्कुल बस,शाळा,कॉलेज ऑफिस अशी बरीच ठिकाण आहेत जिथे स्त्री आज ही सुरक्षित नाही आहे. इतकेच काय भर सार्वजनिक ठिकाणी ही तिला मारहाण,शिवीगाळ किंवा विनयभंग केला जातो. मग काय मुलीला जन्माला येऊ द्यायचे नाही का? समाज किती ही शिकला सुशिक्षित झाला तरी 10/ 20 टक्के विकृत पुरुष आज ही समाजात आहेत. त्यांना लहान मुलगी ज्येष्ठ महिला हा फरक दिसत नाही ,दिसते ती फक्त "मादी" ! किती दिवस हे आणि असच चित्र आपल्या समाजात असणार आहे? मुलींना मोकळे पणाने मोकळ्या आभाळात श्वास घ्यायला कधी मिळणार आहे? का आपली शासन यंत्रणा इतकी कमकुवत आहे ?का नाही जबर आणि कडक कायदा अंमलात येत? निदान मुली ला स्व रक्षणासाठी काही तरी अधिकार द्यायला हवा की नको? समाजात वावरताना तिला आपण सुरक्षित आहोत असे वातावरण द्यायला हवे. बलात्कारा सारख्या गुन्ह्याला तितकेच भयानक शासन हवे की नको? आपल्या कडे लोक शाही आहे म्हणून वाटेल तसे वागायचे आणि स्त्री वर अत्याचार करायचे याला पायबंद कधी घालणार ? घरात आणि बाहेर दोन्ही कडे ती सेफ नाही. फक्त "8 मार्च " ला तिचा मान सन्मान करायचा,तिच्या कर्तबगारीचे गोडवे गायचे आणि उरलेले 364 दिवस तिच्या वर बलात्कार करायचा? आता ही हा लेख लिहीत असताना देशात दोन चार बलात्कार सहज झालेले असतील. तिच्या वर होणाऱ्या अन्याया विरुद्ध न्याय मिळवण्यासाठी तिला अजून किती वर्षे संघर्ष करावा लागणार आहे? गुन्हेगाराला असे कठोर शासन हवे की पुन्हा त्याने नजर वर करून एखाद्या स्त्री कडे पाहिले नाही पाहिजे. कधी तशी यंत्रणा आपल्या देशात येणार?
केवळ मूठभर वासनांध पुरुषांमूळे समस्त पुरुष वर्गाला बदनाम केले जाते मग ही घाणेरडी वृत्ती वेळीच ठेचायला आपला समाज कधी पूढे येणार? का तिला तिच्या न्याया साठी "A Thursday" मधील नायिका "नैना" बनावे लागणार??

समाप्त

Read More

मुक्त मी


खूपदा मनात येत,एकदा तुला भेटावं.
राहिलेल्या गोष्टी,मनातले खेद खंत,
बोलावेसे वाटतात.
सवांद नव्हताच रे आपल्यात,
घडला फक्त विसवांद..रुसवे फुगवे.
तुला वाटते ते आणि तसेच,
मी तुझ्या साच्यात आखून घेतल स्वतःला.
पण तू कुठेच नवहता माझ्यात.
यालाच म्हणतात प्रेम,मी खरच वेडी होते.
जाग आली तेव्हा,किती क्षण हातून निसटले होते.
तुझ्या पुरूषार्थात तु मग्न,मी कधी तुला समजलीच नाही.
प्रेम असच असत,तू म्हणशील तस,
माझी व्याख्या तुला पटलीच नाही.
जेव्हा सगळं डोईजड झालं,
मुक्त केलं स्वतःला..
मोकळं आभाळ,मोकळा श्वास खऱ्या अर्थाने अनुभवला.

समाप्त

Read More

हळवे

जी लोक मनाने हळवी असतात ती छोट्या छोट्या गोष्टीने लगेच दुःखी होत असतात. इतकं ही हळवे असू नये की समोरचा आपल्या या कमजोरीचा फायदा घेईल.

-Sangieta Devkar

Read More