मी..माझ्या भाषेत सांगतोय काही..नक्कीच आवडेल तुम्हाला...वाचायला हवे असे.

#अडथळा

शर्यत आहे तिथे
अडथळा वाट पाहे..
पार करून जातो
विजय त्याचा आहे..

©सदासन

#खोडकर

खोडकर तुझ्या बटांना
साथ मुजोर वाऱ्याची
चुंबिती तुझ्या गालाला पण
पंचायत होते बिच्याऱ्याची

©® संजय स गुरव

Read More

#प्रकाश

अंधारात प्रकाशाची
घाईत अवकाशाची
संकटात प्रयत्नांची
खरी गरज समजते...

©®संजय स गुरव

#पतंग

सोपं नसतं पतंग होणं
दोर जीवाचा कुणा हाती
उडत राहणं जिथे वारा
दिशा कोणती, कसली गती?

©® संजय स गुरव (सदासन)

Read More

#फक्त

वेळेआधी यश मिळत नाही
कष्टाविना फळ कधीच नाही.
संघर्ष करा, समजून घ्या फक्त
संयम ठेवा यश हुकणार नाही.

©®संजय स गुरव (सदासन)

Read More

#वेडा

कोण पुढे जात असल्यास
घालू नये कधीच खोडा.
कितीही अडथळे आले तरी
ध्येय गाठतोच "ध्येयवेडा".

©® संजय स गुरव (सदासन)

Read More

#द्वेष

मनात असता द्वेष
चढतो रागाला त्वेष
हरतो तुमचा विवेक
वाट्याला येतो रोष.

©®संजय गुरव(सदासन)

#चेहरा

आरसा माणसाचा खरा
असतो त्याचाच चेहरा
आतले प्रतिबिंब सांगते
मुखवटा खोटा की खरा.

©® संजय स गुरव

#मनाला

प्रश्न पडावेत मनाला
मिळेल उत्तर तुम्हाला
संवादाचा पुल बांधा
जोडण्या मनाशी मनाला

©®संजय गुरव

#आदर

दिला तर परत मिळतो
वसा हा ज्याला कळतो
"आदर" मागत नका बसू
मीपणा मग पुरता छळतो.

संजय स गुरव