Saroj Gawande

Saroj Gawande Matrubharti Verified

@sarojg160926

(491)

53

151.6k

287.6k

About You

मी एक लेखिका आहे.. मला सामाजिक, प्रेम , प्रेरणादायक या विषयांवर कथा लिहायला आवडतात. सध्या रहस्यकथा लिहायचा प्रयत्न सुरु आहे..माझ्या कथा वाचकांना आवडतात. त्यांच्या भरभरुन प्रतिक्रिया आल्या की लिहायला अजुनच प्रेरणा मिळते..

सोडणार नाहीस साथ कधीही
वचन मला आज‌ दे,
काट्याकुट्यातून चालताना
फक्त तूझा हात दे.

तूझ्याचसाठी आहे
माझा प्रत्येक श्वास रे,
हृदयातील भावनांना
तूझ्या हृदयाची साथ दे.

चालताना वाटेवरती
येतील जरी वादळे
परतून लावू सारी
गुंफून हाती हात रे

येतच राहतील आयुष्यात
पदोपदी क्षण मोहाचे,
नाते विश्वासाचे कायम राहिल
एकमेकांच्या हृदयात रे

कायम राहो अशीच सोबत
होईल घट्ट नात्यांची विण
घडीभरही नको दुरावा
आजन्म सख्या साथ दे..

Read More