#MORALSTORIES
यश
भर उन्हातून राजू आपल्या आजोबांबरोबर आपल्या वार्षिक परीक्षेचा रिपोर्ट कार्ड आणण्यासाठी शाळेत जात होता. तरी उन्हात सुद्धा राजू आपल्या पडलेल्या सावली बरोबर खेळत खेळत चालत होता. राजू त्या सावलीला पकडण्याचा प्रयन्त करत होता. परंतु त्याच्या बरोबर त्याची सावली सुद्धा पुढे पुढे सरकत होती. हे बघून राजुने आपल्या आजोबांना विचारले " आजोबा, ही सावली मला पकडता का येत नाही----? " परंतु शाळेजवळ आल्याने आजोबांनी राजुच्या प्रश्नाचे उत्तर न देताच सरळ शाळेच्या गेट मध्ये प्रवेश केला. बरीच गर्दी होती. त्या गर्दीतच राजुने बघितले कि त्याचा मित्र विकास पहिल्या नंबरमध्ये येऊन सर्वोत्तम गुणांनी उत्तीर्ण झाला होता. त्यामुळे विकासचे सर्व मित्र अभिनंदन करून शुभेच्छांचा वर्षाव करत होते.
गर्दी बरीच असल्याने रिपोर्ट मिळण्यास दोन तास लागले.राजू एका विषयात दोन गुणांनी नापास होता. तरीसुद्धा त्याला दोन गुण देऊन वर चढवले होते. हे आजोबांकडून कळले तेव्हा राजू फारच उदास झाला. त्याच उदास चेहऱ्याने राजू आजोबांचा हात धरून घरी परतत होता. ऊनही बरेच कमी झाले होते. आजोबांनी राजुचा मूड नीट करण्यासाठी त्याला विचारले " राजू, आपण शाळेत जातेवेळी तू तुझ्या सावलीला पकडत होतास नं---? आता कुठे गेली ती सावली---? " राजू सुद्धा इकडे तिकडे बघू लागला. परंतु त्याला सावली दिसली नाही. म्हणून आजोबांनीच सांगितले कि " राजू बेटा, आता सावली तर तुझ्या पाठी पाठी येत आहे." हे बघून राजूलाही कौतुक वाटले. "राजू बेटा, मार्क्स कमी पडले म्हणून उदास नं होता चांगला अभ्यास कर. ही सावली म्हणजे हे तुझे यश आहे असे समज. त्यासाठी तुला त्याच्या पाठी धावायची गरज नाही तर तुझ्या कर्तृत्वाने हीच यशरूपी सावली तुझ्या पाठी पाठी येईल आणि तुझ्यावरही अभिनंदनाचा वर्षाव होईल.

Read More

#MORALSTORIES
यश भर उन्हातून राजू आपल्या आजोबांबरोबर आपल्या वार्षिक परीक्षेचा रिपोर्ट कार्ड आणण्यासाठी शाळेत जात होता. तरी उन्हात सुद्धा राजू आपल्या पडलेल्या सावली बरोबर खेळत खेळत चालत होता. राजू त्या सावलीला पकडण्याचा प्रयन्त करत होता. परंतु त्याच्या बरोबर त्याची सावली सुद्धा पुढे पुढे सरकत होती. हे बघून राजुने आपल्या आजोबांना विचारले " आजोबा, ही सावली मला पकडता का येत नाही----? " परंतु शाळेजवळ आल्याने आजोबांनी राजुच्या प्रश्नाचे उत्तर न देताच सरळ शाळेच्या गेट मध्ये प्रवेश केला. बरीच गर्दी होती. त्या गर्दीतच राजुने बघितले कि त्याचा मित्र विकास पहिल्या नंबरमध्ये येऊन सर्वोत्तम गुणांनी उत्तीर्ण झाला होता. त्यामुळे विकासचे सर्व मित्र अभिनंदन करून शुभेच्छांचा वर्षाव करत होते.
गर्दी बरीच असल्याने रिपोर्ट मिळण्यास दोन तास लागले.राजू एका विषयात दोन गुणांनी नापास होता. तरीसुद्धा त्याला दोन गुण देऊन वर चढवले होते. हे आजोबांकडून कळले तेव्हा राजू फारच उदास झाला. त्याच उदास चेहऱ्याने राजू आजोबांचा हात धरून घरी परतत होता. ऊनही बरेच कमी झाले होते. आजोबांनी राजुचा मूड नीट करण्यासाठी त्याला विचारले " राजू, आपण शाळेत जातेवेळी तू तुझ्या सावलीला पकडत होतास नं---? आता कुठे गेली ती सावली---? " राजू सुद्धा इकडे तिकडे बघू लागला. परंतु त्याला सावली दिसली नाही. म्हणून आजोबांनीच सांगितले कि " राजू बेटा, आता सावली तर तुझ्या पाठी पाठी येत आहे." हे बघून राजूलाही कौतुक वाटले. "राजू बेटा, मार्क्स कमी पडले म्हणून उदास नं होता चांगला अभ्यास कर. ही सावली म्हणजे हे तुझे यश आहे असे समज. त्यासाठी तुला त्याच्या पाठी धावायची गरज नाही तर तुझ्या कर्तृत्वाने हीच यशरूपी सावली तुझ्या पाठी पाठी येईल आणि तुझ्यावरही अभिनंदनाचा वर्षाव होईल.

Read More

#LoveYouMummy
प्रिय आईस,
आज तुझ्यापासून मी कितीही दूर असले तरी तू माझ्या जवळपास असल्याचा भास होत असतो. कारण प्रत्येक गोष्टीतून तू दिलेले संस्कार, ममता, माया, निःस्वार्थ प्रेम पाण्यातले प्रतिबिंब प्रमाणे मला माझ्या कृती शैलीतून स्पष्ट दिसून येतात. हे सर्व तुझ्या संस्काराचे श्रेय आहे. "आईविना भिकारी " म्हणतात ते खरंच आहे. माझ्या व्यथांच्या जखमांना ममतेच्या फुंकरने शीतल करून, संस्काराच्या फुलोऱ्यात माझ्या जीवनाला फुलवून, विशाल मनाच्या सागरात माझ्या छोट्या-मोठ्या अपराधांचे शल्य लपवून मला लहानपणापासून आजपर्यंत क्षमाची आणि आधाराची मोठी साथ दिलीस. मी सुखात असो, दुःखात असो, अडचणीत असो त्यावेळी तुझ्या आठवणींच्या सावलीत सुद्धा तू माझ्या जवळ असते. पाठीवर वात्सल्याने हात फिरवते, ममतेच्या पदराखाली घेऊन विसावा देते. तुझ्या कुशीत सारे ब्रह्माण्ड सामावून जाते. कशी तुला मी विसरू-----? " म्हणून सदा मी हेच गाणं गुणगुणत असते " आई तुझी आठवणं येते------ “
तुझी लाडकी,
शोभा.

Read More