siddhi chavan

siddhi chavan Matrubharti Verified

@siddhic

(393)

96

218.7k

460.5k

About You

मी..... अशी मी तशी मी, काय सांगू कशी मी ? माझ्यात मी अशीही, ज्याला वाटे जशीही मी, कुणा वाटे कशीही, पण तुला वाटे तशीही मी. तुझ्यात मी, माझ्यात मी, तुझ्या-माझ्यात मीच मी. [https://siddhic.blogspot.com]

"मी सहज लिहावी कविता प्रेमाची उपमा तू द्यावी.
शब्दाला प्राप्त व्हावा अर्थ जेव्हा चाल तू गुंफावी."

(https://siddhic.blogspot.com)

Read More

"झोपाळ्यावर बसून देखिल एखादा झोके घेत नसेल तर ओळखून जा ,
त्याचा मनात विचारांचे हेलकावे चालू असतात.
हे मनालाच वर-खाली, वर-खाली झुलवून,
भावनांच्या गतीचा लगाम खेचतात.
आणि मग नकळत...मेंदू पोखरून आत घुसून बसतात. "

(https://siddhic.blogspot.com)

Read More

माझ्यातल्या 'मी' पणा ला, मी जरा झाकून ठेवलय.
तुझ्यातल्या 'तू'ला ही, माझ्या मध्ये राखुन ठेवलय.
मी-तू पणाच्या अहंकाराला वेशीपार टांगून ठेवलय.
ऐकला नाहीस तरी चालेल, ऐकवत मात्र जाऊ नको.
विनाकारण ऐकुण घेणार्यातली नाहीच मी,

हे पण तुला आधीच सांगुन ठेवलय. 😉😀😀

(https://siddhic.blogspot.com)

Read More