माझी अशी काही खास ओळख नाही.गाव -हणमंत वडीये,कडेगाव(सांगली).सध्या पुण्यात राहतो.मराठी संस्कृती' विषयात पदवीधर होऊनही मनासारखे काम मिळाले नाही,पण मनसोक्त वाचन' या आवडत्या व्यसनाने कुठल्या गोष्टीच्या कमतरतेची खंत किंवा कमतरता वाटत नाही.प्रेम भावनेवर लिहायला आवडतं.भावनांचा आदर आणि कदर हा माझ्या लिखानाचा मुख्य विषय घेऊन प्रत्येक सहृदय माणसाच्या भावना प्रवाहीत करण्याचा लेखनाचा प्रपंच.

जीवन या रंगमंचावरचे आपण सर्वच कलाकार.रंगमंचावरुन कधी ना कधी आपली exit होणारच आणि हा रंगमंच जिथल्या तिथं राहणार.

Read More

🙏काटे टोचणारं जबरदस्तीचं गुलाब नकोय मला...

तुझ्याशिवाय....


जीवन तुला काय कळाले,
कठीण प्रसंगी सगळे पळाले.
सगळे मनासारखे घडले पाहिजे,
असे कुठे असते का?

               मखमली जीवनात सुख-दुःखाचा,
पाठशिवणीचा खेळ चालनारच.
दुःखाचा डोंगर सरत नाही,
              म्हणून कोणी मरतं का?

आपण मेलं की काही नाही उरत,
थोड्या दिवस उरतात त्या फक्त आठवणी
तुझ्यासोबत खूप शिव्या दिल्या सरणाला,
आता मात्र कवटाळून बसावसं वाटतंय मरणाला.

               तु माझ्यासाठी रोज नटत होतीस,
प्रसन्न जीवन जगण्यासाठी रोज भेटत होतीस.
माझं गुलाबी मन उन्हाने होरपळून निघतंय,
              तुझ्या आठवणीत माझं मन रोज मरतंय.

उजेड संपला, अंधार दाटला,
सारा मायेचा पाझर आटला.
काय करु? कुणाला सांगू?,
माझं हृदय लागलंय फाटू. 

तू मला सोडलं असतं, वाईट वाटलं नसतं,

वाईट वाटतंय, जीवन जगणं सोडलंस.
तू गेलीस,पण मी नाही जाणार,कारण
देवाला,तू जाण्याचा जाब कोण विचारणार.........

(आपल्या आयुष्यातून माणूस निघून गेला,की मग त्याच्या विषयीचं सगळं निट लिहून काढलं की त्याच्या जाण्याचा खरा अर्थ आपल्याला समजतो)

                                     _"दि सुभाष"

Read More

जगाच्या अफाट पसाऱ्यात कुठे तरी आपण आपल्याच हरवून बसतो,

 तेव्हा आपण आत्मचिंतनासाठी एकांत शोधतो,

एकांतात समजते आपल्यांची ओढ,
मग तळमळतो प्राण..

मग कळून चुकतं
आपली मातृभूमी हीच आपली जीव की प्राण...

Read More

कवर फाटलेल्या पुस्तकाचं वरचं पान मळतं, चोळामोळा होतं,ते खराब झालेले पान फाडून टाकले,की पुन्हा दुसरं पान मळतं, चोळामोळा होतं ही सतत होणारी क्रिया आहे, तसंच दुःखाचं आहे.आपण सुख शोधायला लागलो की दुःखचं मिळतं आणि असे दुःख वारंवार मिळतं.
घडून गेलेल्या घटनांची पुन्हा आठवण काढायची नाही असे ठरले की जे नको आहे तेच घडते.

Read More