Hey, I am reading on Matrubharti!

#LoveYouMummy मातृभूमी.. ‘ने मजसी ने परत मातृभूमीला.. सागरा प्राण तळमळला..’ सावरकर.. किती, काय काय सहन केले या देशभक्तांनी.. यांच्या बलिदानाने तुझ्या पारतंत्राच्या शृंखला तुटल्या पण मिळाले का स्वातंत्र्य.. आताही तू भ्रष्टाचार, आतंकवाद, बेरोजगारी, महागाई या कधीही न तुटणा-या शृंखलेतच श्वास घेत आहेस. “जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी”.. तुझे स्थान काय आहे याची सगळ्यांना परत परत का म्हणून आठवण करून द्यावी लागते.. तुला ‘सोने के चिडिया’ म्हणून गौरविले जायचे.. आता फक्त घोटाळे, अपराध यांचे व्रण खोलवर शिरलेत.. वेदनेने तू तडफडत आहेस.. पण हे बंध लाथाडून आता तुला उठायचे आहे.. विश्वस्वरूपी जगधारिणी.. संकटी तारिणी तू.. या प्रलयंकारी तांडवा नंतर सृजनातुनी रंग भरणार आहेस तू.

Read More

#LoveYouMummy

मातृभूमी...

‘ने मजसी ने परत मातृभूमीला.. सागरा प्राण तळमळला..’ सावरकर.. किती, काय काय सहन केले या देशभक्तांनी.. यांच्या बलिदानाने तुझ्या पारतंत्राच्या शृंखला तुटल्या पण मिळाले का स्वातंत्र्य.. आताही तू भ्रष्टाचार, आतंकवाद, बेरोजगारी, महागाई या कधीही न तुटणा-या शृंखलेतच श्वास घेत आहेस.

“जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी”.. तुझे स्थान काय आहे याची सगळ्यांना परत परत का म्हणून आठवण करून द्यावी लागते.. तुला ‘सोने के चिडिया’ म्हणून गौरविले जायचे.. आता फक्त घोटाळे, अपराध यांचे व्रण खोलवर शिरलेत.. वेदनेने तू तडफडत आहेस..

पण हे बंध लाथाडून आता तुला उठायचे आहे.. विश्वस्वरूपी जगधारिणी.. संकटी तारिणी तू.. या प्रलयंकारी तांडवा नंतर सृजनातुनी रंग भरणार आहेस तू.

Read More


बदकाचे तळे 

तळ्याच्या काठाला मनीमाऊ बसली 
बदके पिल्लं पाहून गालातच हसली 

पिल्लू येताच जवळ रडायला लागली          
पिल्लाला आणखीनच काळजी वाटली 
 
मनीमाऊ तुला रडायला काय झालं
डोळ्यामध्ये तुझ्या पाणी का आलं
         
         
काय सांगू बाळा काटा लागला         
काढायला जाता मी आतच गेला 

येशील  का रे बाळा मदत करायला 
जरा येऊन बस इकडे या काठाला 

धूर्त मनीमाऊ गालातच हसली         
पिल्लाला तिची मनिषा कळली 

मनीमाऊ गुज तुझ्या मनीचे कळले 
असे म्हणत पिल्लू हळूच निसटले 

बालकविता-सुचिता प्रसाद घोरपडे
 

Read More