writing is my passion

कुछ सिखना है तो
अकेले जीना सिखलो....
ना किसी से उम्मिद रहेगी ,
ना किसी पे विश्वास !

-suchitra gaikwad Sadawarte

उसने बडी हिम्मत से पुछा,
याद आती है कभी मेरी??
मैने हसकर कहा,
याद तो उसे करते है
जिसे भूल जाते है !!

आज जिंदगी से
फिर से प्यार हो गया !
जब उसने गुस्से में भी
तू सिर्फ मेरी है कहा!

कुछ तो लिखना था हमें भी !
बाद मे सोचा ,
क्या करु अब लिखकर
जो उसने‌ पढना जो
छोडा है !

जीवन चक्र.....

सुखाचा उंबरठा ओलांडायला उभा होतो ...
तर समोर दुःख ओवळणीच ताट
घेऊन वाट पाहत होता !

जेव्हा कुटुंबाच्या कुंपणामध्ये होतो ...
तेव्हा तो उडणारा स्वतंत्र पक्षी
मला चिडवत होता ...
आज स्वतंत्र जगभर हुंडतोय
पण आपलेपणाची साथ माझ
जीव रडवेला करत होती..... !

मित्रांच्या घोळक्यात बेधडक
जगत होतो ...
पण रिकामा खिसा निराश करत होता ....
आता खिसा भरलेला होता
पण मित्रांची जागा निराश करत होती ....

जेव्हा हातगाडी वरची पाणीपुरी
डोळ्यातून पाणी आणत होती तेव्हा समोरच फाईव्ह स्टार हॉटेल
मला नकळत खुणावत होत ...
आज हॉटेल मध्ये बसून होतो
पण समोरची हातगाडी
माझ्याकडे बघुन हसताना
दिसत होती ...

एकट आनंदात जगत होतो
आणि माणसांची साथ मला हिणवत होती ...
जेव्हा माणसांची गर्दीमध्ये जाऊन उभा राहिलो ...
तेव्हा एकटेपणा खांद्यावर हात ठेवून आधार देत होता ....

जेव्हा जीवनामध्ये सगळ काही
भरभरून होत..
तेव्हा मरण हवंहवस वाटत होतं!
आज मरण अगदी चहूबाजूंनी मिठी मारून आहे पण
जगण्याची उणीव भासत होती !

Read More

मुलगी म्हणजे......

मुलगी म्हणजे आईची साडी
तर मुलगी म्हणजे बाबांची दाढी ....
मुलगी म्हणजे भावाची बाहुली
तर मुलगी म्हणजे बहिणीची सहेली.....

मुलगी म्हणजे आईची माया
तर मुलगी म्हणजे आजीची छाया....
मुलगी म्हणजे बाबांची
धनाची पेटी तर
मुलगी म्हणजे आजोबांची काठी...

मुलगी म्हणजे एक नकळत आलेला समजूतदारपणा तर
मुलगी म्हणजे एक
जाणून बुजून केलेला
हट्टीपणा ...

मुलगी म्हणजे
स्वतःची असेल तर
जबाबदारी....
मुलगी म्हणजे
दुसऱ्याची असेल खबरदारी .....

मुलगी म्हणजे माहेरची शान
तर मुलगी म्हणजे सासरची मान
मुलगी म्हणजे नवऱ्याचा अधिकार तर
मुलगी म्हणजे
नवीन जीवाचा मूर्तिकार..

मुलगी म्हणजे हक्काची मैत्रिण तर
एक मुलगी म्हणजे
आयुष्यभराच्या सुखदुःखात
बनणारी सोबतीन ....

हा ...आणि ....
मुलगी म्हणजे
आपल परिपूर्ण कुटुंब .....
तर मुलगी म्हणजे
प्रेमाचं , मातृत्वाच प्रतिबिंब ...
....!!!!

Read More

किसी भी रिश्ते में इतना
मत झुकना कि सामने वाला
झुकना हि भूल जाए । ।

- suchitra gaikwad