Hey, I am on Matrubharti!

गाव

नाही कोणते आडनाव,
नाही कोणाला नाव !
माणसांची वस्ती जेथे,
असे कोणते सांगा गाव ?

-दर्शन जोशी

रसिकांना मोहवणारे
लालित्यपूर्ण कृत्य !
संगीत म्हणजे संगम
गायन वादन नृत्य !

-दर्शन जोशी

प्रेम

भावनेचा भावनेशी,
फसवा ब्लाईंडगेम !
खरं म्हणावं की खोटं,
तुमचं माझं प्रेम ?

-दर्शन जोशी

आटली खरेच येथे
उरातील माया ममता !
प्रत्येकाच्या अंतरात
भिनते उगा विषमता !

-दर्शन जोशी

कोण जाणते काय होते
कळीकळीला फुलताना
जाणत नाही कारण कधीही
मनाच्या हिंदोळ्यांवर झुलताना !

-दर्शन जोशी

*माझ्यातला परमेश्वर*

जीवनात नाही कळले,
हे शरीर आहे नश्वर !
पाहिलाच नाही कधी मी,
गड्यांनो माझ्यातला परमेश्वर !

दारु , पार्टी , मटणाची मी,
अशी काही खैरात केली .
धुमधडाक्यात बेभान नाचून,
अनेक मित्रांची वरात केली.

तेच सारे दोस्त मला ,
पोहचवायला आले आहेत !
माझी उष्टी दारु माझ्यासमोर,
मनसोक्त रिचवायला आले आहेत !

ही सारी मोहमाया आता,
आहे का बरे अजरामर ?
पाहिलाच नाही कधी मी,
गड्यांनो माझ्यातला परमेश्वर !

दर्शन जोशी
संगमनेर

Read More

हितगुज

बरं का आई तुझ्या लेकीला,
आभाळापेक्षा मोठं कर !
जिथपर्यंत जात नाही,
कोणाचीही नजर वर .

स्वावलंबी कर तुझ्या लेकीला,
जरा धीट मुलीला होऊ दे !
सूर्यासारखा प्रखर प्रकाश,
तिच्या पर्यंतही पोहचू दे !

आजपर्यंत जशी वागली,
लेकीसोबत वागू नको .
उमलत्या अजाण निष्पाप कळीला,
आडबाजूला टाकू नको !

काय म्हणून तू लेकीला,
कशासाठी अडवते आहे ?
लोकांच्या तकलादू आग्रहाने,
स्वत:ची माती करते आहे ?

दे टाकून पोरखेळ अन्,
पोरीला शाळेत शिकव
स्पर्धेच्या नव्या युगामध्ये,
लेकीला स्पर्धेत टिकव !

एक दिवस घराचे तुझ्या,
लेक तुझी राखेल नाव !
तेव्हा बघंच तुझ्या दारात ,
होईल आनंदाचा गं वर्षाव !

दर्शन जोशी
संगमनेर

Read More

गतकाळातील आठवणींचा
घेण्या अचूक मागोवा
पत्रलेखन करुन सुंदर
धाडा तुमचा सांगावा !

-दर्शन जोशी

समय के साथ साथ
हरदम चलना सीखो
वक्त की रफ्तार से
आगे बढना सीखो

-दर्शन जोशी