Hey, I am on Matrubharti! Basically I am a mechanical engineering graduate with post graduate degree in production engineering from VJTI. I have 20 years industrial experience and 22 years academic experience. I like to read and write . I know 4 languages specifically Kannada , Marathi, Hindi and English. I have published 6 articles in wikihow.com . Before retirement I was a principal of a polytechnic.

1. प्रेम म्हणजे काय आहे काय?
अ. माहिती नाही...1
ब. थोडी माहिती आहे...2
क. संपूर्ण माहिती आहे...3
2. आनंद म्हणजे माहिती आहे काय?
अ. माहिती नाही...1
ब. थोडी माहिती आहे...2
क. संपूर्ण माहिती आहे...3
3. आपल्या घराण्यातून मिळालेल्या आनंद
अ. गरीब घराणे...1
ब. मध्यम वर्गीय...2
क. श्रीमंत घराणे...3
4. आपल्याला नोकरी मिळाल्याने किती आनंद झाला?
अ. कमी पगाराची, पण आपल्या गावात...1
ब. जास्त पगाराची, पण गावापासून लांब...2
क. स्वतःच्या गावात, जास्त पगाराची...3
5. आपल्या लग्न ठरल्यावर मिळालेल्या आनंद
अ. जोडीदार सुंदर आहे, पण सुसंस्कृत नाही...1
ब. जोडीदार सुंदर नाही, पण सुसंस्कृत आहे...2
क. जोडीदार सुंदर आणि सुसंस्कृत आहे...3
6. मुलांच्या कडून किती आनंद मिळाला?
अ. मुल झालेच नाही/मुल झाले वेळेवर, पण अपंग निघाले...1
ब. मुल झाले, पण उशीरा झाले...2
क. मुल झाले वेळेवर आणि सुदृढ निघाले...३
7. मुलांना वाढवताना मिळालेला आनंद
क. मुल हुशार नाही...1
ब. मुल average आहे...2
क. मुल एकदम हुशार निघाले...3
8. मुलांच्या नोकरी मुळे मिळालेला आनंद
अ. नोकरी खूपच उशीराने मिळाली...1
ब. लगेचच मिळाली, पण कमी पगाराची...2
क. लगेच आणि चांगल्या पगाराची मिळाली...3
9. मुलांच्या लग्नापासून मिळालेल्या आनंद
अ. सून/जावई मनासारखे नाही...1
ब. सून/जावई ठीक आहे...2
क. सून/जावई मनासारखे मिळाले...3
10. म्हातारपणात मिळालेला आनंद
अ. खूप आजारपणामुळे त्रस्त...1
ब. थोडे औषधे मुळे ठीक...2
क. प्रक्रति ठणठणीत, एकदम फिट...3
11. देवामुळे मिळालेला आनंद
अ. देवानी काही दिला नाही/ देव मानत नाही...1
ब. जास्त नाही, कमी नाही, ठीक आहे...2
क. देवाने खूप काही दिलेला आहे...3

वर 11 प्रश्न दिली आहे. उत्तर तुम्ही निवडा आणि मार्क द्या. बेरीज करा.
10 पेक्षा कमी मार्क.... दुःखी आणि दुर्दैवी
11 ते 25....आनंदी
26 ते 33... खूप आनंदी आणि समाधानी.

हे एक साधा प्रयत्न आनंदाला मापण्यासाठी. सूचना अपेक्षीत आहे. धन्यवाद

Read More

*।। श्री राम जय राम जय जय राम ।।*

*🚩श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर🚩*

*🌸 प्रवचने :: २४ मार्च 🌸*

*प्रपंच हा परमार्थाला साधन म्हणून वापरावा.*

आपले खरे समाधान भगवंताजवळ आहे, आणि ते मिळण्यासाठी भगवंताचे प्रेम आम्हांला लागणे जरूर आहे. ते प्रेम आपल्याला कसे मिळेल याचा आपण विचार करू.

वास्तविक, आईचे तिच्या मुलावरचे प्रेम स्वाभाविक असते, तिला मुलावर प्रेम कर म्हणून शिकविण्याची जरूरी नसते; त्याप्रमाणे भगवंतावर आपले प्रेम असणे जरूर आहे.

मनुष्यजन्म हा भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे. ईश्वराने एवढी सृष्टी निर्माण केली, पण मनुष्यदेह निर्माण केल्यावर त्याला फार आनंद झाला. त्याला वाटले, खरोखर या योनीमध्ये जन्म घेणाऱ्याला माझे प्रेम मिळविता येऊन मला ओळखता येईल. असे असताना मनुष्यप्राण्याला भगवंताचे प्रेम स्वाभाविक का बरे असू नये ?

मनुष्यप्राणी हा नेहमी आनंदासाठी धडपडत असतो; मग या धडपडीतून भगवंताचे प्रेम त्याला का बरे येऊ नये ?
मला वाटते, ज्या ध्येयासाठी आपण धडपडत असतो ते ध्येय ठरविताना आम्ही चुकत असलो पाहिजे खास.

आमचे ध्येय असे असले पाहिजे की, त्यातून आम्हांला शाश्वत आनंद मिळविता आला पाहिजे. तो आनंद जर एवढया कष्टाने, मेहनतीनेसुद्धा आम्हांला मिळत नसेल, तर आमचे ध्येयच चुकले असे म्हणायला कोणती अडचण आहे ?

तुम्ही सांगा. आज प्रपंच आम्हांला हवासा वाटतो, प्रपंचातल्या नाना तऱ्हेच्या गोष्टी आम्हांला सुख देतील असे वाटत असते, आणि त्या मिळविण्यासाठी आम्ही अहर्निश झटत असतो.

वस्तूसाठी चाललेली आमची धडपड ही खरे पाहता त्या वस्तूसाठी नसून, त्यातून मला आनंद मिळेल या कल्पनेने, त्या आनंदासाठी, आम्हांला ती वस्तू हवी असते. त्या वस्तूत मला समाधान मिळेल ही कल्पना नाहीशी व्हायला पाहिजे.

आज प्रपंचात मला समाधान मिळेल असे वाटते; ती माझी कल्पना नाहीशी होणे जरूर आहे.

ही प्रपंचाची आस जोपर्यंत आहे तोवर भगवंताचे दास आम्हांला होता येणार नाही, आणि शाश्वत समाधान आम्हांला मिळणार नाही.
"तूं जगाची आस सोडून दे, मी तुला शाश्वत आनंद देतो, " असे भगवंत आम्हांस सांगत आहे.

ही जगाची आस, हे प्रपंचाचे प्रेम, आम्हांला कसे सुटेल ? प्रपंच सोडल्याशिवाय भगवंताचे प्रेम आम्हांला येणारच नाही का ?

प्रपंच सोडून देण्याची आज आमची तयारी नाही. तो न सोडता भगवंताचे कसे होता येईल, ह्यासाठी संतांनी मार्ग सांगितला आहे. त्या मार्गाने आम्ही जाणे जरूर आहे.
ज्याप्रमाणे आपण आपल्या या खिशातील पैसे त्या खिशामध्ये ठेवतो, त्याचप्रमाणे प्रपंचातील आपले मन आपण काढून भगवंताकडे लावावे. तसे करण्यात समाधान आहे.

भगवंताला अशी प्रार्थना करावी कीं, " देवा, प्रारब्धाने आलेले भोग येऊ देत, पण तुझे अनुसंधान मात्र चुकू देऊ नकोस. "

*८४ . दिवा जळायला हवा असेल तर त्यामध्ये सतत तेल घातले पाहिजे , तसे भगवंताचे अनुसंधान सारखे राहण्यासाठी त्याचे नामस्मरण आपण सतत करीत असावे .*

*।। श्री राम जय राम जय जय राम ।।*

Read More

अरे माणसा म्हणू नको,
कोरोना कोरोना,
म्हण कोरोनाराम, कोरोनाराम
होईल तुझा कल्याण

कधी पाहिलास काय
कोरोनाला कुठेतरी
तरीही किती घाबरतोस मरायला?
रामावर विश्वास ठेवून
बिनधास्त का राहत नाही
सगळे संतांच्या सारखे

कोरोना कोरोना म्हणण सोड
रामराम म्हणत जा
रामराम म्हणत जा.

Read More

ह्याला म्हणतात आनंद

epost thumb

आनंद येथे आहे.

epost thumb

#आनंद
शोधू कुठे कुठे
मी आनंद ?
मदत कराल का
कोणी मला?

दुःखाचे विरुद्धार्थि
शब्द आहे सुख
कोणी सांगेना मला
आनंदाचे विरुद्ध शब्द

सुख म्हणजे काय असतो
कळते सर्वांना, पण
आनंदाचा अनुभव
सांगणारा भेटला नाही
मला आज पर्यंत

मला वाटते,
भगवंताच्या नामातच
मिळेल हा आनंद
जितके मनापासून
घेता नाम तितकेच
लवकर समजेल आनंद

विठ्ठल विठ्ठल श्रीहरी विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल श्रीहरी विठ्ठल

Read More

माणसाला काय हव असते?
पैसा: ही एक अशी वस्तू आहे, ज्यामुळे माणूस बरेच काही खरेदी करू शकतो. म्हणून तर जगातील सगळी माणसे पैसे कमवायला धडपड करत असतात. हे काय बरोबर नाही. कारण,
पैसेनी खालील गोष्टी खरेदी करू शकत नाही.
१.आई,वडील
२.सद्गुरु
३.चांगली बायको
४.श्रवणकुमार सारखे मुले
५.प्रेम
६.चांगले मित्र
७.चांगली बुद्धी
८.आनंद
९.समाधान
१०.पुण्य
११.अमरत्व
म्हणून मी पैसेला दुय्यम स्थान देतो.

Read More

माणूस पळत असतो
पैशाच्या मागे,
देव म्हणतो, किती पळशील....
कर प्रेम माझ्यावर,
देईन तुला वाटेल ते,
विसरू नकोस मला.

Read More