लेखक, अनुवादक

दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

विनीता देशपांडे

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

-Vineeta Shingare Deshpande

कॉफी..........
सख्या रे,
तुझ्या रुसण्याचा गोडवा
कॉफीतल्या साखरेसारखा
प्रत्येक घोटासोबत
अलवार रेंगाळणारा.

विनीता देशपांडे

Read More

काॅफी.....
जुने पुराणे क्षण..
कॉफीचा कप ओठाला लावताच
धापा टाकत येतात.
काही वाफेच्या वलयात विरतात....
काही उगाच घुटमळतात....

Read More

#द्रुत
चंचल चपळ मेघशामला
द्रुत गतीने धरणी झेपावता
आवरता आवरेना वेग हिचा
सावरता सावरेना राग हिचा

पुस्तकं, अनंत शब्दांच जग
या जगात सापडतं हरवलेलं बालपण
अनाहूत गवसतो दडून बसलेला रोमांच
कधी सुप्त विचारांना दिशा देतात
कधी हे शब्द प्रेरणा देतात
कधी धीर तर आशेचा किरण देतात
हे शब्द म्हणजे चैतन्याचा स्त्रोत अन्
कैवल्याचा ठेवा.

विनीता देशपांडे

Read More

अंतरात रुजलेला
मंद संधिप्रकाश
या प्रकाशात मन
उजळून जात.

विनीता देशपांडे

गोंधळलेले शब्द
करतात आघात
सैरभैर मन
कसे आवरु?

विनीता देशपांडे

मनाचिये गर्भात
विचारांचा वणवा
वणव्याच्या ताब्यात
वेंधळा मेंदू

विनीता देशपांडे