प्रपोज..-३

(15)
  • 7k
  • 1
  • 4k

------------------------------------------------------------------------------------------------------------- गौतम अमेरिकेला गेला.... तिथे सेट झाल्या झाल्यावर त्यानी रियानी दिलेली यादी पहिली. आधी गडबडीत त्याला रियाच मेल पाहायला वेळ मिळालाच न्हवता. त्यानी यादी पहिली आणि त्याच्या एकदम हसूच आल. रीयानी इन मीन २ गोष्टी लिहिल्या होत्या. त्यानी लगेच रियाला फोन लावला. रियानी फोन उचलला आणि ती उत्साहात बोलायला लागली, गौतम.. तुला आत्ता वेळ झाला का रे फोन करायला तुला पोचल्यावर मेल केल होत रिया..उगाच झापू नकोस! इथे सेट व्हायला जरा वेळ गेला आणि कामाच तर काही विचारूच नकोस. काम मस्त आहे पण खूप काम आहे. सो त्यात राहीला फोन करायचा. कशी आहेस