जोशीमठ ते औली - माणसांच्या आतमीयतेची अनुभूती

  • 23.2k
  • 4.3k

हा प्रवास आहे एका दाम्पत्याचा. म्हणजे आमचा. चार धाम यात्रा ही सहसा भक्तिभावाने केली जाते. आमच्या मनातही ईशवराबद्दल नितांत आदर आहे. परंतु या यात्रेत हिमालयातील सर्वांगसुंदर निसर्ग अनुभवणं हे आमच्यासाठी महत्वाचं ध्येय होतं अस म्हटलं तरी वावगं ठरू नये. आणि ध्यानीमनी नसताना भेटलेली माणसं आम्हाला हा प्रवास अविसमरणीय ठरायला मदतच करून गेली.... हरिद्वारापासून छोट्या जीपने सुरु झालेला आमचा प्रवास वळणावळणाचा आणि निसर्गाची रूपे दाखवीत जाणारा होता. या प्रवासात आमच्या नकळत आम्ही अनुभवली माणसं. यात्रेच्या काळात व्यवहार आणि अर्थार्जन शोधणारी पण कष्टकरी आणि जीवाला जीव देणारी. तिथल्या निसर्गासारखी लोभसवणी. तिथला निसर्ग हा मनमौजी पण आहे याचा प्रत्यय पदोपदी येतो. आज या