मृगजळ ( भाग -1)

(83)
  • 21.5k
  • 18
  • 7.9k

काळोख गर्द पसरलेला त्या अंधारमय सडकेवरून वाहनाची रेलचेल जरा जास्तच होती . मुसळधार पाऊस रस्त्यांच्या कडेला असलेली गंटारे नाल्या तुडूंब भरलेल्या . श्री ला समोरचं काचेतून काहीच नव्हतं दिसतं काचावरही सततची न थांबता पडणारी पाऊसाची धार तो वैतागून गेला . आज पहाटे पासून पाऊसाची रिपरिप सुरू होती तो असा अचानक वेग धारन करून तांडव करेल ह्याची पुर्वकल्पना ऋतुजाला पण नव्हती म्हणून ती अॉफीस मधून आपली सर्व काम आटोपून जरा उशिराच घरी जायला निघाली .. दहा आटोला तिने समोर हात देऊन थांबवण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थच !एकही आटो थांबायला तयार नव्हता ... आता काय करावं घरी पोहचणं होणारं की नाहीमाझं ....ह्याच विचाराने ऋतुजाचा जीव त्या पाऊसात खालीवर होत होता